ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे की असे काय प्रश्न आहेत जे घेऊन आपल्याला भोंदू बाबाकडे जाव लागतं आत्ताच्या या युगामध्ये असे कुठले प्रश्न अशा कुठल्या तक्रारी आहेत आपल्या ज्या आपल्या जवळच्या लोकांसोबत आपण बोलू शकत नाही आपण तज्ञांकडे डॉक्टरांकडे योग्य व्यक्तीकडे जाऊन सल्ले घेऊ शकत नाही तर आपल्याला भोंदू बाबाकडे जावं लागतं विचार करा अशा प्रकारच्या भोंदू बाबाकडे जाऊन चुकीच्या व्यक्तीकडे जाऊन जर अजून काही मोठं प्रकरण आपल्यासमोर आलं आपण मोठ्या खड्ड्यात पडलो तर कितीला पडेल आवर्जून याचा विचार करा एका अनोळखी भोंदू बाबाकडे जात असताना हे सगळं संवाद करण्याची किंवा हे सगळं सल्ला देण्याची गरज याकरता पडली आहे.
मुळशी मधल अजून एक भोंदू बाबाचा प्रकरण समोर आलाय आणि ते भयंकर गंभीर आहे ते याकरता गंभीर आहे कारण हा भोंदू बाबा एखाद्याच्या ॲपचा ताबा मिळवायचा आणि त्याच्या नाजूक क्षणांच रेकॉर्डिंग करायचा त्याच्या खाजगी आयुष्यातल्या काही गोष्टींच रेकॉर्डिंग करायच आहे किती गंभीर आहे तो ते व्हायरल करू शकला असता त्याची वाचता करून तुमचं नाव खराब करू शकला असता तुम्हाला बदनाम करू शकला असता आणि कदाचित तो अशा काही गोष्टी करतही होता. आपल्या सगळ्यांच्या आत्ता समोर असलेली गोष्ट ती
म्हणजे हा भोंदू बाबा ज्याच नाव प्रसाद उर्फ दादा तामदार हा जो दादा तामदार आहे याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल आहे बावधन पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केलेली आहे पण त्याला पकडल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या त्याला पकडलं कसं तर तीही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला समजून घ्यायला हवी याच एक खूप मोठं प्रस्त आहे या प्रसाद तामदारच आणि त्याच्या त्याचे सोशल मीडियावर खूप फॅन्स सुद्धा आहेत हे फॅन्स त्याला फॉलो करतात ते सांगतात ते प्रसाद तामदार म्हणजे आपले जे बाबा आहेत ते सांगतात ते सगळं हे अनुयायी ऐकत होते.
भोंदू बाबा लोकांना कसा फसवायचा:
झालं असं की तुम्हाला पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे चार ते पाच महिन्यांमध्ये मृत्यू येऊ शकतो अशी भीती तो आपल्या भक्तांना भाविकांना अनुयायांना दाखवायचा आणि त्या माध्यमातन याचं निराकरण निरसन मी करतो मी जे सांगेन ते करा जप तप करा असा तो त्यांना सल्ला द्यायचा त्याने मुळशी तालुक्यातल्या सुस या गावी एक स्वामी समर्थ म्हणून इमारत आहे तिथे आपला मठ सुद्धा स्थापित केलेला होता हे सगळे भक्त भाविक त्यांना तो तिथे बोलवायचा जपतप करायला सांगायचा काही सलग तास तुम्ही जपतप केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल असं सांगायचा आणि मग जेव्हा जपतप केल्यानंतर एका क्षणी या भक्तांना भाविकांना झोप लागायची तेव्हा तो त्यांच्याबरोबर अनैतिक गोष्टी सुद्धा करत होता अशी माहिती आहे.
पण त्याचबरोबर तो त्यांचे मोबाईल हातात घ्यायचा आणि मोबाईलवर एक ॲप डाऊनलोड करायचा ते ॲप आहे एअर डाईड किड जर तुम्ही प स्टोर वर गेलात आणि एअरडॉइड किड असं जर टाकलं तर तुम्हाला ते प समोर येईल जर ते ॲप साधारणपणे जो सतत मोबाईल वापरतो किंवा त्यातला तज्ञ आहे त्याच्या हे लक्षात येईल की हे एअर ड्राईड किड ते ॲप कदाचित पालकांसाठी निर्माण केलं गेलं असावं आता मी या सगळ्या शक्य शक्यता सांगते म्हणजेच असं की आई-वडील दोघेही नोकरीला जातात मूल घरी एकट असतं आणि मग त्याच्यावर लक्ष राहावं म्हणून त्याच्या मोबाईलमध्ये ड्राईट किट हे ॲप डाऊनलोड केलं जात असावं, ज्या माध्यमातून ते बाळ कुठे आहे कुणाबरोबर आहे काही अनुचित त्याच्याबरोबर घडत नाही ना जेवलंय का? कुठे बाहेर दुसरीकडे गेलं नाही ना, अशा सगळ्या गोष्टी त्यावर म्हणजे त्याच्यावर लक्ष पालकांना ठेवता येईल म्हणून हे कदाचित ॲप तयार केलं गेलं असावं.
ॲपचा दुरुपयोग करून भक्तांना कस फसवायचा?
हा प्रसाद कामदार त्याचा दुरुपयोग करत होता गैर प्रकार या ॲप मुळे तो करत होता. जर तुम्ही प्लेस्टोर ला गेलात तर एअर डाईट किड नावाने वेगवेगळी ॲप तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांची दिसतील ती काय काम करतात तर ती ॲप डाऊनलोड कराल तुम्ही ज्या मोबाईलमध्ये त्या मोबाईलच नियंत्रण हे दुसऱ्याच्या हातात जातं म्हणजे एअर ड्राईट किड हे ॲप डाऊनलोड केल्यावर कॅमेरा, साऊंड सिस्टम म्हणजे आवाज आणि त्याचबरोबर लोकेशन हे दुसऱ्या व्यक्तीच्या व्यक्तीला कळतं आणि त्याच नियंत्रण सुद्धा त्यावर राहत तर असा हा प्रसाद ते ॲप सगळ्यांच्या मोबाईलमध्ये टाकायचा आणि मग ते आपले भक्त ते आपले अनुयायी काय करतायत कुठे जातायत कुठला शर्ट घातलाय सध्या कुणाबरोबर आहेत अशा प्रकारची माहिती तो त्या अनुयायांना आणि भक्तांना देत होता जेणेकरून भक्तांचा अधिक विश्वास गडत व्हायचा.
आपल्या बाबांना दिव्य शक्ती आहे ते तिथे बसून मठात बसून आपल्याला सांगतायत की आपण काय करतोय कुठे कुठे जातोय कुणासोबत आहोत आणि स्वतःच्या प्रश्नांच निराकरण करण्याकरता हे भक्त भाविक जे आहेत ते या बाबाचा ऐकायचे देखील म्हणजे अज्ञानीच अक्षरशहा की त्याने सांगितलं तसंच्या तसं त्याच अनुकरण करायचं तर हा जो बाबा होता हा तुला जर वाचायचं असेल तुझ्या प्रश्नातन किंवा तुझ्या अडचणीतन तुला मुक्त व्हायचं असेल तुला जर मरणाचं संकट तुझ्यावर नको असेल व्यश्येकडे जायला सांगायचा त्याच्याबरोबर आपल्या प्रियसी बरोबर अनैतिक संबंध ठेवायला तिच्याशी संबंध प्रस्थापित करायला सांगायचा आणि या माध्यमातून ते व्हिडिओ बघून त्या व्हिडिओच चित्रीकरण करून तो ठेवायचा त्याचा विकृती होती ती त्याचा तो आनंद घ्यायचा ते व्हिडिओ तो सेव्ह करून ठेवायचा अशी सगळी माहिती आता समोर येत आहे.
मोबाईल तापला अन् सर्व प्रकरण उघडकीस आल..
आता हे सगळं उघड कसं झालं तर त्यातलाच एक व्यक्ती 39 वर्षाचा एक व्यक्ती आहे ज्याने तक्रार बावधन पोलिसात केली त्याचा मोबाईल सतत सतत गरम होत होता तापायचा त्याच्या त्याचा मोबाईल सतत तर त्याने त्याचा एक सायबर तज्ञ मित्र होता त्याला सांगितलं की अरे माझा मोबाईल खूप गरम होतोय मला भीती वाटते इतका तो गरम होतोय तर तू एकदा चेक कर की काय बाबा झालाय माझ्या मोबाईलला त्या सायबर तज्ञ मित्रान या व्यक्तीचा फोन हातात घेतला तो चेक केला कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्याच्या काही गोष्टी असतील त्याच्या माध्यमातून त्याने तो मोबाईल चेक केला त्यावर हे लक्षात आलं की त्याच्या मोबाईलमध्ये हे एक एअर ड्राईट किड नावाचा ॲप आहे आणि त्या ॲपचा एक्सेस दुसर कोणाकडे तरी आहे म्हणजे तो मोबाईल दुसरं कोणीतरी हँडल करत आहे आणि हे होत असल्यामुळे हा मोबाईल सतत सतत गरम होतोय असं म्हटल्यावर त्याला लक्षात आलं त्या व्यक्तीला लक्षात आलं ज्याचा मोबाईल होता की आपली फसवणूक होते आहे.

मग त्याने इतर जे काही भक्त होते जे त्याला भेटले होते त्या मठामध्ये त्यांना विचारलं की तुमच्याकडे हे ॲप आहे का? हो आमच्याकडे हे ॲप आहे तुम्हाला असे कुठले फोन आले होते का बाबांचे की बाबा तुम्ही कुठला शर्ट घातलाय काय केल वगैरे वगैरे मग त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे आपण फसलो आहोत मोठी दुर्घटना घडायच्या आधी मोठी घटना घडायच्या आधी कदाचित या सगळ्यांना लक्षात आलं आणि त्यांनी बावधान पोलीस ठाण घातलं बावधान पोलिस ठाणा घातल्यानंतर पोलिसांनी लगेचच या प्रसाद तामदार उर्फ दादा तामदार याला ताब्यात घेतलं अटक केली आणि आता त्याच्यावर कारवाई होईल.
अघोरी प्रथा परंपरा या सगळ्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई होईलच फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे. पण किती गंभीर घटना आहे, ही की कोणीतरी आपला मोबाईल जो 24 तास आपल्या हातात असतो तो मोबाईल आपल्या हातातून घेतो त्याच्यात एक ॲप डाऊनलोड करतो आणि त्या ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलचा ॲक्सेस हा आपोआप दुसऱ्याच्या हातात जातो आपलं लोकेशन त्याला कळतं आपण कुठे आहोत काय घात काय नाही हे सगळं त्याला कळतं किती गंभीर गोष्ट आहे असा कुणावरही आपण डोळे झाकून विश्वास ठेवायचा का आपल्या अंतर्गत आणि अत्यंत वैयक्तिक आयुष्यातल्या प्रश्नांसाठी आपण अशी कुणाच्या तरी खोटेपणाची कास धरायची का हा ज्यान त्यान विचार करायचा प्रश्न आहे.
अज्ञान इतकही ठेवू नका की तुम्ही कुठल्यातरी मोठ्या अडचणीत याल अशा प्रकारचे अनेक ॲप सध्या कार्यरत आहेत सायबर गुन्हे या माध्यमातन घडवले जातात तुम्हाला आधी फोनवरून गोड गोड बोलून ते ॲप डाऊनलोड करायला सांगितलं जातं आणि त्यानंतर त्याचा एक्सेस तुमच्या मोबाईलचा एक्सेस स्वतःकडे घेतला जातो आणि मग अनेक आर्थिक गुन्हे सुद्धा झालेले आहेत. कदाचित हा भोंदू बाबा प्रचंड विकृत असावा आणि त्यामुळे तो अशा प्रकारचे अ जे नाजूक क्षणांचे व्हिडिओ होते ते तो रेकॉर्ड करून ठेवायचा.
म्हणजे एका फोनवरून तो व्यक्ती जिथे आहे आपल्या प्रियसी सोबत असेल पत्नी सोबत असेल मैत्रिणी सोबत असेल व्यश्यकडे गेलेला असेल तरी सुद्धा ते सगळे क्षण हा रेकॉर्ड करत होता. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर अनेक जण सावत झालेले आहेत जे त्याला फॉलो करत होते ते देखील आश्चर्यचकित आहेत धक्कादायक घटना त्यांच्याही समोर आली की आपल्या बाबतीतही हे घडू शकलं असेल आता पोलीस या सगळ्याच्या मुळापर्यंत जातीलच पण अशा घटना घडणार नाहीत आपण उगाचच कुठल्याही प्रकारचं अपरिचित असं ॲप डाऊनलोड करणार नाही आणि आपली स्वतःची आर्थिक मानसिक शारीरिक सामाजिक फसवणूक होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी.