बैलपोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

कष्टाशिवाय मातीला, बैलांशिवाय शेतीला,

अन बळीराजाशिवाय, देशाच्या प्रगतीला पर्याय नाही..!

बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण आहे हा सण मुख्यता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागांमध्ये साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यात अमावस्येला साजरा केला जातो. हा सण शेतकरी आपल्या बैलांनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालतात त्यांना सजवतात त्यांना हार फुले घालतात. आणि अंगावर रंगीत रंग लावतात त्यांच्या शेंगांना सजावट करून त्यावर सुबक रेषा काढतात.

बैलांच्या गळ्यात नवे घुंगरू आणि घंटा बांधली जाते सायंकाळी गावात बैलांची मिरवणूक काढली जाते लहान मुले ढोल ताशा वाजवतात आणि संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण असते बैलपोळ्याच्या दिवशी शेतीची कामे बंद ठेवले जातात बैलांना विशेष खाऊ पुरणपोळी भाजी भाकरी इत्यादी दिले जाते काही ठिकाणी बैलांची स्पर्धाही घेतली जाते हा सण आपल्या प्राणीमात्रांप्रती कृतज्ञता प्रेम याची शिकवण देतो बैल हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आणि मदतनीस आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. हा महाराष्ट्रातील एक मोठा सण आहे या सणाला घरोघरी बैलांची पूजा केली जाते.

२०२५ बैलपोळा केव्हा साजरा करावा:

बघा यावर्षी अमावस्या ही दोन दिवस दाखवलेली आहे. 22 ऑगस्टला अमावस्या दुपारी 11 वाजून 57 मिनिटानी सुरू होईल आणि 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 37 मिनिटानी ही अमावस्या तिथी संपणार आहे आणि म्हणूनच अमावस्या तिथी असताना आपल्याला बैलपोळा साजरा करायचा आहे. तेव्हा आपल्याला 22 ऑगस्टला शुक्रवारी संध्याकाळी बैलपोळा साजरा करायचा आहे. आता खास करून हा सण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात साजरा करतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी बैलांची पूजा केली जाते. या दिवशी शेतकरी वर्ग बैलांना कोणत्याही प्रकारच जड अवजार काम शेतात करायला दिलं जात नाही या दिवशी सकाळी उठून शेतकरी वर्ग बैलांना छान आंघोळ घालून त्यांना सजवून नटवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून छान छान डाळीसाळी खाऊ घालून त्यांची पूजा करतात. खास करून हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. 2025 मध्ये बैलपोळा आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी साजरा करायचा आहे.

घरातील मातीच्या बैलाची पूजा:

आपल्याकडे खरे बैल जरी नसले तरी आपण विकत भेटणारे मातीचे बैल आणायचे आहेत. काही ठिकाणी पाच बैल आणले जातात. त्यामध्ये एक घोडा देखील असतो. काही ठिकाणी दोन बैल आणून त्यांची पूजा केली जाते. तर पहा बैलांची पूजा करण्यासाठी तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला पाठ मांडून त्यावर त्यांची पूजा करू शकतात. अगदी छोटीशी जागा लागते या दिवशी अमावस्या असल्यामुळे घर छान स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. पाण्यात हळद, मीठ जाड मीठ थोडसं गोमतीर आणि लिंबाचे काही थेंब टाकून आपल्याला घर सर्व पुसून घ्यायच आहे त्यानंतर ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची एक पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा त्यावर स्वच्छ धुतलेला कपडा अंथरून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे.

दिव्याची पूजा करून घ्या छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणा हे दिवा मी तुझी पूजा करत आहे हे दिवा मी तुला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे या पद्धतीने मराठीत आपण मंत्र म्हणून पूजा करून घ्यायची आहे. दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून तांदळाची रास ठेवून त्यावर आपल्याला बैल ठेवायचे आहे अगदी तुम्ही दोन बैलांची जोडी आणली तरी चालेल जर का तुमच्याकडे पाच बैलांची जोडी आणत असेल तर तुम्ही पाच बैल आणून त्यांची पूजा केली तरी चालेल पहा अगदी साधी सोपी पूजा आहे कुणीही करू शकतं परंतु जे नवीन आहेत त्यांना माहिती नसतं की पूजा कशी करावी,

त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे थोडेसे तांदूळ ठेवून किंवा जोड नागलीचे पान ठेवून त्यावर अक्षदा ठेवून त्यावर एक सुपारी ठेवा गणपती बाप्पा स्वरूप सुपारीची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल वाहत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे असे छोटे छोटे मंत्र म्हणून गणपती बाप्पांची पूजा करून घ्या.

त्यानंतर आपण जे बैल आणलेले आहेत ते तांदळाच्या राशीवर ठेवा आता बघा शेतकरी वर्ग त्यांच्या बैलांना या दिवशी छान चोळून आंघोळ घालत असतो आपण बैल आणल्यानंतर थोडसं पाणी आपल्याला एक तुळशीच पान घेऊन किंवा फुल घेऊन आपल्याला बैलांवर पाणी शिंपडून घ्यायच आहे किंवा गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल शिंपडून घ्या त्यानंतर बैलांना हळदी कुंकू वाहा अक्षदा वाहा फुलं असतील फुलं वाहा आणि तुम्हाला जशी सजा सजावट करायची असेल तशी सजावट करून तुम्ही ही पूजा करू शकतात यानंतर आपल्याला फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर बघा दुकानात ते गवताच चाड म्हणतात ते विकत मिळत ते चाड तुम्हाला आणायचा आहे ते देखील तुम्हाला बैलांच्या शिंगांना किंवा बैलांच्या मानेवर किंवा पाठीवर तुम्हाला ठेवायचा आहे. काही ठिकाणी बघा कणकेचे असे गोल गोळे केले जातात आमच्याकडे कणकेचे असे गोल गोळे केले जातात त्याला शिंगोळे असे म्हणतात हे देखील बनवून बैलांच्या शिंगामध्ये घातलं जातं काही ठिकाणी या पद्धतीने जोड बनवून असं जोड शिंगोळे बैलांच्या शिंगात घातले जातात गळ्यात देखील मोठं कणकेच शिंगोळ बनवून कणकेच मोठं असं गोल बांगडी सारखं बनवून ते गळ्यात घातलं जातं तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे.

या दिवशी श्रावण महिन्यातील अमावस्याअसल्यामुळे तुम्हाला बैलांना देखील अघाडा, दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करायचे आहे एखादं फळ ठेवून दूध साखर ठेवून किंवा खडी साखर ठेवून तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे एका लोट्यात पाणी भरून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप लावून पूजेला ओवाळून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जो घरात स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य केला ला जातो आणि याचा नैवेद्य बैलांना खाऊ घातला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने नैवेद्य बनवून तुम्ही बैलांना तो नैवेद्य खाऊ घालू शकतात.

पहा या दिवशी दोन दिवस अमावस्या आलेली आहे शनिवारी देखील सूर्याने बघितलेली अमावस्या आहे आणि शुक्रवारी देखील अमावस्या दुपारी चालू होत आहे त्यामुळे शुक्रवारी आपल्याला संध्याकाळी बैलपोळा हा साजरा करायचा आहे. बैलपोळा साजरा केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलून घ्यायची आहे आणि अमावस्येचे जे पण काही उपाय तुम्हाला करायचे असतील ते उपाय तुम्ही शनिवारी आलेल्या अमावस्येच्या दिवशी दिवसभरात करू शकतात पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा केलेली आहे काही ठिकाणी श्रावण पोळा साजरा केला जातो काही ठिकाणी भाद्रपद पोळा साजरा केला जातो आपल्याकडे श्रावण पोळा साजरा केला जात असल्यामुळे हा पोळा पिठोरी अमावस्येला आपल्याला साजरा करायचा आहे तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा आपण बघितलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *