बीड जिल्ह्यातल्या वासनवाडीच्या पुढे पांगरी गावाजवळ एक नाला आहे नाल्याच्या आजूबाजूला लोकांना अचानक घाणरडा वास यायला लागला नागरिकांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलीस या नाल्याजवळ पोहोचले त्यांनी तपास केला तर तिथे त्यांना एक बॉक्स दिसला हा वास त्या बॉक्स मधूनच येत होता पोलिसांनी लागलीच बॉक्स उघडला आणि पोलिसांना आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड मोठा धक्का बसला कारण या बॉक्स मध्ये होता छिन्न विछिन्न अवस्थेतला एका महिलेचा मृतदेह हा मृतदेह कुणाचा आहे हे कोड थोडं सोडवायला फार वेळ लागला नाही कारण दोन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती.
पोलिसांनी सगळे डॉट जोडल्यावर त्यांना समजलं हा मृतदेह त्याच महिलेचा होता. ही महिला होमगार्ड म्हणून काम करत होती. पोलीस भरतीची तयारी करत होती. ती कुठे आहे म्हणून पोलिसांचा तपास सुरू होता पण त्यांच्या हाती लागला त्या महिलेचा मृतदेह ते सुद्धा एका बॉक्समध्ये पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि या हत्तेचं कोड सुटलं कारण होतं एक लव ट्रँगल दोन मैत्रिणींचा एकच बॉयफ्रेंड बीड मधलं हे प्रकरण नेमकं आहे काय होमगार्ड महिलेसोबत नेमकं काय घडलं पाहूयात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 20 ऑगस्टला एक तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीनुसार अयोध्या राहुल भरकटे ही 26 वर्षांची महिला मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती.
अयोध्या मूळच्या गेवराई तालुक्यातल्या लुखासमला गावातल्या पण त्या सध्या राहायला होत्या बीड मधल्या अंबिका चौकात इथे राहून त्या पोलीस भरतीची तयारी करत होत्या मुळात काही महिन्यांपूर्वीच त्या होमगार्ड म्हणून रुजू झाल्या होत्या. गेवराई मध्ये त्या ड्युटीवर सुद्धा होत्या पण त्यांच स्वप्न होतं पोलीस होण्याचं गेवराई बीड असा प्रवास करून नियमितपणे आपली ड्युटी करून त्या पोलीस भरतीच्या तयारीत सुद्धा कोणतीही कसर सोडत नव्हत्या अयोध्या यांच चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं त्यांना तीन वर्षाची मुलगी सुद्धा आहे पण लग्नानंतर अयोध्या यांच्या पतीच अपघातीनिधन झालं त्यामुळे आपल्या मुलीला सासरी ठेवून त्यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली होती पण अचानक त्यांच्या कुटुंबीयांकडून त्या बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली.
बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली. पण तपासाला दोन दिवस झाले तरी अयोध्या यांचा तपास लागत नव्हता. पण त्यांच्याबद्दल पोलिसांना एक माहिती मिळाली होती ती म्हणजे त्या मैत्रिणीकडे राहायला गेल्या होत्या. पोलिसांनी तपासाचा फास आवळायला सुरुवातच केली होती तेवढ्यात एक धक्कादायक बातमी मिळाली. बॉक्स सापडल्याची. गुरुवारी सकाळी पोलिसांना पांगरी गावाजवळच्या मोठ्या नाल्यात बॉक्स आढळल्याचा फोन आला. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचलं बॉक्समध्ये सापडलेल्या मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांना हत्या झाल्याचा संशय आला. त्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमॉ्टम साठी शासकीय रुग्णालयात पाठवला पण हत्तेमागच कारण स्पष्ट झालं नव्हतं पण पोलिसांचा तपास सुरू होता आणि या तपासतूनच पोलिसांनी एका संशयत महिलेला अटक केली.
हीच ती महिला होती जिच्याकडे अयोध्या भरकटे बेपत्या होण्यापूर्वी राहण्यासाठी गेल्या होत्या. पोलिसांनी या महिलेकडे चौकशी केली आणि तिने हत्तेची कबूली दिली. अयोध्या वरकटे यांची हत्या अत्यंत निर्गुणपणे करण्यात आली होती पण त्यापेक्षा जास्त निर्दयीपणे त्यांच्या मृतदेहाची वेलेवाट लावण्यात आली होती. पोलीस भरतीची तयारी करत असताना अयोध्या वरकटे यांची वृंदावनी खरमाडे या 35 वर्षांच्या महिलेशी ओळख झाली.
ओळखीच रूपांतर मैत्रीत झालं कारण या दोघी एकाच गावाच्या होत्या. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार ही महिला सुद्धा अंबिका चौक परिसरात राहायला होती. या दोघींची चांगलीच मैत्री जमली होती पण अयोध्या आणि वृंदावणी यांच्यात एका कारणावरून वाद झाले हे कारण होतं बॉयफ्रेंड दोघींचाही एकच बॉयफ्रेंड राठोड आडनावाच्या एका तरुणाशी वृंदावणीचे प्रेम संबंध होते पण याच राठोडशी मागच्या काही दिवसात अयोध्या यांचीही जवळीक वाढली होती ही गोष्ट अर्थातच वृंदावणीला पसंत नव्हती त्यातूनच दोघींमध्ये मतभेद झाले पण या सगळ्याला विचित्र वळण लागलं ते वृंदावणीने केलेल्या प्लॅन नंतर
वृंदावणीने अयोध्या यांना घरी राहण्यासाठी बोलावलं अयोध्या सुद्धा मैत्रीवर विश्वास ठेवून घरी राहायला गेला पण या विश्वासामुळेच त्यांचा घात झाला. रात्रीच्या वेळी वृंदावणीने अयोध्या यांना गुंगीच औषध पाजलं औषधाचा इफेक्ट जाणवला आणि काही वेळात अयोध्या बेशुद्ध पडल्या यानंतर वृंदावणीचा पुढचा प्लॅन ऍक्टिव्ह झाला या प्लॅनमध्ये तिने मदत घेतली आपल्या मुलाची मुलाच्या मदतीने तिने अयोध्या यांचा गळा दाबला आणि त्यांचा खून केला पण खून केल्यावरही पुढचा प्रश्न महत्त्वाचा होताच या मृतदेहाच करायचं काय पण वृंदावणीन या गोष्टीचा प्लॅनिंग सुद्धा
आधीच केलं होतं इथेही तिने मदत घेतली आपल्या मुलाची वृंदावणीच्या मुलान आपल्या ओळखीच्या च्या व्यक्तीकडून एक बाईक आणली होती. हीच बाईक या दोघांनी मृतदेहाची विलेवाट लावण्यासाठी वापरली. दोघांनीही आधी अयोध्या यांचा मृतदेह बांधला. त्यानंतर आधीच आणून ठेवलेल्या बॉक्समध्ये तो मृतदेह भरला आणि हा बॉक्स बाईकवर टाकून सुरू झाला मृतदेहाचा प्रवास. रात्रीच्या वेळीत सुरू झालेला हा प्रवास फार लांबचा नव्हता फक्त पाच ते सात किलोमीटर अंतरावर हा प्रवास संपला. आधीच ठरवल्याप्रमाणे वासनवाडीच्या पुढे पांगरी गावाजवळच्या नाल्यात हा बॉक्स टाकून देण्यात आला. नाला आकाराने प्रचंड मोठा होता त्यामुळे वृंदावने आणि तिच्या मुलाला वाटलं खून पचून जाईल मृतदेह कुणाच्याच हाती लागणार नाही पण त्यांचा हाच ओवर कॉन्फिडन्स अंगाशी आला गुरुवारी सकाळी या बॉक्स मधून प्रचंड दुर्गंधी सुटली स्थानिक नागरिकांना हा बॉक्स सुद्धा दिसून आला त्यांनी या गोष्टीची माहिती पोलिसांना दिली आणि बॉक्स उघडल्यावर अयोध्या यांचा मृतदेह सापडला.
पोलिसांनी वृंदावणीसह तिला हत्या करण्यात आणि मृतदेहाची वेलेवाट लावण्यात मदत करणाऱ्या आणखीन तीन जणांनाही अटक केली असून या प्रकरणात आणखी गुणाचा सहभाग आहे का या प्रकरणाला दुसरा कुठला अंगल आहे का याची तपासणी सुरू आहे. वृंदावणीन आपणच हत्या केल्याची कबूली दिली असून या हत्येमागच कारण ठरलाय या दोन्ही मैत्रिणींचा एकच बॉयफ्रेंड आपल्याच बॉयफ्रेंड सोबत आपली मैत्रीण अयोध्याचीजवळीक असणं वृंदावणीला पचलं नाही आणि त्यातून तिने पाऊल उचललं ते थेट खुनाचं असा खून ज्यामुळे अयोध्याचं कुटुंब उध्वस्त झालं. पतीच्या निधनानंतर मुलीचा सांभाळ करत होमगार्डमध्ये भरती झाल्यानंतरही पोलीस भरतीसाठी जीव तोडून प्रयत्न करणं अयोध्या यांच्या स्वप्नाचा दुर्दैवी अंत झाला.