BSF सीमा सुरक्षा दलात ३५८८ पदांची मेगा भरती..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

 बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 ही जाहीर झालेली आहे. तर यामध्ये टोटल 3588 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सीमा सुरक्षा दल (BSF) मार्फत देशभरातील पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी केली जाणार असून, विविध ट्रेड्समधील कॉन्स्टेबल पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी 26 जुलै 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून 25 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख असणार आहे.

वयाची अट काय आहे? शैक्षणिक पात्रता काय आहे? निवड प्रक्रिया कशी असणार आहे? ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख काय असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे? येथे मी तुमचं ग्राउंड कसं होणार आहे? कुठले कुठले महत्त्वाचे कागदपत्रे आहे ते तुम्हाला लागणार आहेत? काय आहे महत्त्वाची सूचना याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

वय मर्यादा:

  • तर सर्वात अगोदर आपण वयाची अट या भरती भरती प्रक्रियेमध्ये काय असणार आहे आपण ते पाहून घेऊया तर बघा 25 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत तुमचं वय हे 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे.
  • इथे वय मर्यादा ही 18 ते 27 वर्ष दिलेली आहे.
  • एससी आणि एसटी कॅटेगरी साठी पाच वर्षे वयावर सूट दिलेली आहे तसच ओबीसी कॅटेगरी वाल्यांसाठी तीन वर्ष वयसूट येथे देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता:

  • तर या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर या भरती प्रक्रियेमध्ये जेवढ्या काही जागा आहेत. त्या सर्व पोस्टसाठी दहावी पास असणे हे आवश्यक आहे.
  • आणि तुम्ही ज्या फिल्डसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात तर त्यामध्ये तुमचा आयटीआय असणं गरजेच आहे.

पदाचे नाव आणि रिक्त जागा:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1.कॉन्स्टेबल ( ट्रेड्समन )३५८८
एकूण३५८८

पुरुष:

क्र. पदाचे नाव/ट्रेड पद संख्या

1 कॉन्स्टेबल (कॉबलर) – 65
2 कॉन्स्टेबल (टेलर) – 18
3 कॉन्स्टेबल (कारपेंटर) – 38
4 कॉन्स्टेबल (प्लंबर) – 10
5 कॉन्स्टेबल (पेंटर) – 05
6 कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) – 04
7 कॉन्स्टेबल (पंप ऑपरेटर) – 01
8 कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर) – 01
9 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)- 599 10 कॉन्स्टेबल (वॉशर मॅन) – 320
11 कॉन्स्टेबल (बार्बर) – 115
12 कॉन्स्टेबल (स्वीपर) – 652
13 कॉन्स्टेबल (वेटर) – 13

महिला:
14 कॉन्स्टेबल (कॉबलर) – 02
15 कॉन्स्टेबल (टेलर) – 01
16 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)- 38
17 कॉन्स्टेबल (वॉशर मॅन) – 17
18 कॉन्स्टेबल (कुक) – 82
19 कॉन्स्टेबल (स्वीपर) – 35
20 कॉन्स्टेबल (बार्बर) – 06

शारीरिक पात्रता:

पुरुष:

  • पुरुषांसाठी उंची – 165 cm असणं आवश्यक आहे.
  • छाती 75 cm आणि इन्फ्लांटेड म्हणजे फुगवून जास्त 5 सेंटीमीटर असणे हे आवश्यक आहे.
  • धावणे 5 km हे 24 min मध्ये

महिला:

  • उंची – 155 सेंटीमीटर असणार आहे.
  • धावणे – 1.6 km म्हणजे 1/2 km 850 min.

अर्ज पद्धत:

उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

अर्ज शुक्ल:

SC/ST/EWS –फी नाही
General/OBC/EWS100/-

महत्वाच्या तारीख:

अर्ज करण्याची शेवटची तारीख आपण तारीख काय आहे ते बघून घेऊया तर अर्ज सुरू होण अर्ज भरण्याची तारीख ही 26 जुलै 2025 पासून अर्ज भरण्याची सुरू आहे आणि शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2025 ही असणार आहे

  • अर्ज सुरु: 26 जुलै 2025
  • शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2025

अभ्यासक्रम:

बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती तर यामध्ये आपल असणार आहे पेपर तर पेपर आपला 100 मार्काचा असणार आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा ज्यामध्ये

  • जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे
  • गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे.
  • बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे.
  • हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे.

एकूण 100 मार्काचा आपला यामध्ये पेपर असणार आहे आणि दोन तास वेळ आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे.

निगेटिव्ह मार्किंग: पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही.

भरती प्रक्रियेची निवडप्रक्रिया कशी आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया तर मागील वर्षी प्रमाणे जर आपण यामध्ये माहिती पाहिली तर सर्वात अगोदर लेखी परीक्षा होईल, फिजिकल टेस्ट होईल, त्यानंतर ट्रेड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होईल मग उमेदवारांची अंतिम निवड यादी ही जाहीर होईल.

  • लेखी परीक्षा
  • फिजिकल टेस्ट
  • ट्रेड टेस्ट
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल एक्झामिनेशन होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *