चंद्रग्रहण 2025..भारतात कोणी व कसे पाळावे? संपूर्ण माहिती.. वेळ आणि नियम..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

आपण 7 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर या दिवशी लागणाऱ्या आणि जे भारतात दिसणार आहे या चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. चंद्रग्रहण म्हणजे काय? चंद्रग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आहेत, पूर्ण जगात हे चंद्रग्रहण किती वेळेपर्यंत दिसणार आहे, त्याचप्रमाणे गर्भवतीने हे पाळायचे की नाही आणि याचा सूतक काळ लागणार आहे का? सूतक काळ हा कधीपासून लागणार आहे आणि कशाप्रकारे हे चंद्रग्रहण आपल्याला पाळायच ही सगळी माहिती धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या आपण बघणार आहोत. हे या वर्षीच सगळ्यात मोठं ग्रहण आहे. व्ॅलिड ग्रहण आहे म्हणजे हे दिसणार आहे आणि पूर्ण जगातल्या 77 टक्के लोकांना म्हणजे जवळजवळ सात अरब लोकांना हे ग्रहण पूर्णपणे पाहता येणार आहे. 7 सप्टेंबरच या वर्षीच हे दुसरं चंद्रग्रहण आहे आणि हे भारतामधून दिसणार आहे.

हे चंद्रग्रहण रविवारी म्हणजे या दिवशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला आपल्या इथे दिसणार आहे. या दिवशी चंद्र लाल रंगाचा दिसणार आहे यालाच ब्लड मून अस देखील संबोधल जात या चंद्रग्रहणाचा सूतक काळ मान्य होणार आहे. पण तो कशा पद्धतीने गर्भवतीने पाळायचा हे देखील सांगणार आहे आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे धार्मिक कार्यावर या खगोलीय घटनेचा प्रभाव पडणार आहे आता 2025 च पहिलं जे चंद्रग्रहण होत 14 मार्चला होळीच्या दिवशीच ते भारतातून दिसलं नव्हतं आता हे चंद्रग्रहण भारतात मान्य होणार आहे. भारतात दिसणार आहे म्हणून भारतासह जिथे जिथे हे दिसणारे त्या सगळ्या देशांमध्ये या चंद्रग्रहणाची उत्सुकता लागलेली आहे. ग्रहण या खरंतर खगोलीय घटना आहे त्याचप्रमाणे चंद्रग्रहण ही सुद्धा जेव्हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि या सावलीमुळे चंद्र अंशतः किंवा पूर्णतः झाकला जातो या घटनेला चंद्रग्रहण असं म्हणतात. आता हे जे ग्रहण आहे हे खग्रास चंद्रग्रहण आहे.

7 सप्टेंबरला जे चंद्रग्रहण दिसणार आहे ती खगोल प्रेमींसाठी खरच एक रोमांचकारक घटना आहे. आता आपण या ग्रहणाच्या अचूक वेळा आणि सुतक काळाची वेळ बघूया. बऱ्याच ठिकाणीवेगवेगळ्या वेळा तुम्हाला बघायला मिळतात परंतु घाबरून जायचं कारण नाही कारण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात ही माहिती दिली जाते जसं की चंद्रग्रहणाचा स्पर्श मध्य मोक्ष भारतामध्ये सुरुवात आणि भारतामध्ये शेवट तसेच पूर्ण जगातली सुरुवात आणि जगामध्ये या ग्रहणाचा शेवट कधी होणार आहे, कुठल्या देशातून हे ग्रहण कधी संपणार आहे.

भारतामधून कधी दिसणार आहे?

भारतातल्या वेळा बघू या जगभरातल्या वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या वेळी हे ग्रहण दिसतं तर हेच अगदी सोप करण्यासाठी भारतामधून कधी दिसणार आहे आणि भारतातली याची वेळ काय आहे. हे मी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे हे ग्रहण 7 सप्टेंबरला म्हणजे रविवारी रात्री 9:57 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 12 वाजल्यानंतर 8 तारीख लागते म्हणून 8 तारखेच्या मध्यरात्री 1:27 मिनिटांनी हे ग्रहण आपल्या इथे संपणार आहे म्हणजेच काय तर हे ग्रहण 9:57 सप्टेंबरला रात्री ते मध्यरात्री 8 सप्टेंबर एक वाजून 27 मिनिटापर्यंत हे ग्रहण आपल्याकडे आहे.

सूतक काळ कधी लागतो?

आता तुमच्या मनातला प्रश्न सूतक काळ कधी लागतो तर हा सूतक काळ जो आहे हा रविवारी म्हणजे 7 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 37 मिनिटापासून चालू होणार आहे ते मोक्ष काळापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत म्हणजे 8 सप्टेंबर मध्यरात्री 1 वाजून 27 मिनिटापर्यंत हा सूतक काळ आणि सूतक वेळ पाळायचा आहे परंतु आजारी माणसं, वृद्ध, गर्भवती आणि लहान मुलं यांच्यासाठी हे ग्रहण या ग्रहणाची जी सूतक वेळ आहे ही 7 सप्टेंबरला म्हणजे रविवारी सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटापासून चालू होईल ते मोक्षकाळापर्यंत म्हणजे ग्रहण सुटेपर्यंत मध्यरात्री 1 वाजून 27 मिनिटापर्यंत असणार आहे.

ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे:

आता आपण बघूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे हे ग्रहण भारतात तर दिसणारच आहे परंतु त्याचप्रमाणे हे ग्रहण इतर देशांमध्ये जसं की हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये, युरोप मध्ये दिसणार आहे. न्यूझीलंड, पश्चिमी आणि उत्तरी अमेरिकेमध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागात हे ग्रहण दिसणार आहे. आता या सगळ्या वेळा ज्या आहेत या मी फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलेल्या आहेत परंतु गर्भवती किंवा इतर कुणीही ग्रहणामुळे तुमच्या जीवनावर तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असा विचार करू नये कारण ग्रहण ही एक शास्त्रीय खगोलीय घटना आहे.

पूर्वी चंद्राला किंवा सूर्याला राहू केतूने गिळला आहे म्हणून अचानक अंधार पडलाय किंवा अचानक चंद्र सूर्य गायब झालाय अशा पद्धतीची धारणा होती आणि त्याचा विपरीत परिणाम होतो असं मानलं जाईल परंतु आता आपल्याला माहिती आहे की हे एक खगोलीय घटना आहे. आणि कशामुळे होते त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या गर्भातल्या बाळावर गर्भवती असाल तर याच्यात काही विपरीत परिणाम होईल चुकून काही गोष्टी घडल्या तर असं विपरीत होईल हे मनातून काढून टाका गर्भवती असाल किंवा आजारी, वृद्ध असाल तर अगदी स्ट्रिक्टली हे ग्रहण पाळण्याची गरज नाही.

अगदी काही गोष्टी तुम्ही शिथिल केल्या, नाही पाळल्या जसं की गर्भवतीने लघवीला जाणं, खाणं, पिणं या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या नाही केल्या बराच काळ तुम्ही पाणी नाही प्यायलात, अन्न नाही खाल्लात तर डीहायड्रेशन होऊ शकतो. बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या गोष्टी म्हणजे मोठ्यांचं ऐकल्याचं समाधान मिळावं त्याचप्रमाणे धार्मिक दृष्ट्या काही केल्याचे समाधान मिळाव यासाठी म्हणून तुम्ही या काळात जे पठनपाठन करायचे असतात ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी करू शकता तुमच्या मनात भीती राहू नये म्हणून अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा, देवीचे स्तोत्र अशा पद्धतीचे स्तोत्र म्हणू शकता.

परंतु अगदी कठोरपणे एका जागी बसून राहायचं, कुठे जायचं नाही, आडी टाकून बसायचं नाही, चाकुसरी वापरायची नाही अशा पद्धतीच्या गोष्टी कृपया करू नका ही सगळी माहिती ही मी फक्त तुमच्या नॉलेजसाठी दिलेली आहे त्यामुळे याने घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही.

चंद्रग्रहणाचे वैशिष्ट्य:

यावेळेसच्या चंद्रग्रहणाचे वैशिष्ट्य हे आहे की ते भाद्रपद पौर्णिमेला आलेला प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. पण भाद्रपद पौर्णिमेला यंदा चंद्रग्रहण आहे जे कुंभ राशीत आहे आणि याच राशीत सध्या राहू सुद्धा आहेत समसप्तक स्थानी सिंह राशीत सूर्य केतु आणि बुध आहेत त्यामुळे बुधादित्य राजयोगात 2025 मधल हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडत सावलीतून जातो तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होतं खग्रास ग्रहणामध्ये पृथ्वीच्या गडत सावली आल्यामुळे चंद्र खरं तर गडप व्हायला हवा निदान काळा तरी दिसायला हवा परंतु तसं होत नाही पृथ्वीने सूर्य किरण आडवले तरी पृथ्वी भोतालच्या वातावरणात शिरणारे किरण चंद्रापर्यंत पोहोचतातच आणि त्यामुळे चंद्र तांबूस दिसतो मुख्यतः वातावरणातील बदलामुळे चंद्र काही वेळा पृथ्वीच्या छायेत असूनही चंद्राला ग्रहण लागले आहे की नाही हे सहजी कळू नये इतका तो प्रकाशित दिसतो.

असं 19 मार्च 1848 रोजी झालेल्या चंद्र ग्रहणात घडलं होतं खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी एक तास 42 मिनिट असतो. स्पर्शापासून म्हणजे चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून मोक्षापर्यंत अर्थात ग्रहण सुटेपर्यंत जास्तीत जास्त तीन तास 48 मिनिट एवढा काळ जाऊ शकतो. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असल्यामुळे चंद्रग्रहणात चंद्राचा पृथ्वीच्या सावलीतील प्रवेश अर्थात स्पर्श चंद्रबिंबांच्या पूर्व बाजूकडून होतो अर्थात मोक्ष चंद्रबिंबाच्या पश्चिम बाजूस होतो. लागोपाठच्या अमावसेला सूर्यग्रहण होऊ शकतं परंतु लागोपाठच्या पौर्णिमांना चंद्रग्रहण होऊ शकत नाही.

चंद्रग्रहणाच्या काळामध्ये काय करायला हवे:

या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये आपली साधना उजळून घ्यावी. जे मंत्र तुम्हाला माहिती आहेत त्या मंत्रांचा जप अवश्य या चंद्रग्रहणाच्या काळात करावा त्यामुळे मंत्रांमधील शक्ती जागृत होते. त्याचबरोबर स्तोत्र सुद्धा चंद्रग्रहणाच्या काळात वेगवेगळी म्हणावी. त्या स्तोत्रांमध्ये असणाऱ्या शक्तीचा लाभ सुद्धा आपल्याला त्यामुळे होतो. ग्रहणाबद्दल कुठलीही अंधश्रद्धा नक्कीच बाळगू नये परंतु ग्रहणामध्ये जास्तीत जास्त साधना मात्र नक्की करावी उपासना मात्र नक्की करावी. खगोलशास्त्र अभ्यासकांसाठी आणि सामान्य लोकांसाठीही एक दुर्मीळ संधी आहे. यानंतरच पुढचं चंद्रग्रहण थेट 3 मार्च 2026 ला होणार आहे. त्यामुळे हे चंद्रग्रहण नक्कीच खास असणार आहे. चंद्रग्रहणाच्या काळामध्ये घरात असलेल्या पाण्यात तुळशीपत्र टाकलं जातं त्यामुळे पाणी दूषित होत नाही असं म्हणतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान करून यथाशक्ती दान केलं जातं. चंद्रग्रहणा दरम्यान संयम राखून जप आणि ध्यान केल्याने अनेक पटीने पुण्याचा लाभ होतो. ग्रहण काळात डोक्यावर तेल लावणे, भोजन करणे या गोष्टी वर्जित सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर चंद्रग्रहणा दरम्यान कुठलही नवीन काम सुरू करणं टाळावं शुभ काम कुठलही करू नये. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *