छत्रपती संभाजीनगरचे राहुल औताडे चार ऑगस्टला हर्सूल पोलिसात तक्रार दाखल करतात तक्रारी त्यांनी आपला भाऊ आणि संघटनेचा शहराध्यक्ष सचिन अवताडेच्या बेपत्ता असल्याची माहिती दिलेली दरम्यान 12 ऑगस्टला अहिल्यानगरच्या मुंगी गावात गोदावरी नदीच्या तीरावर सचिनचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडतो त्याच्या मानेवर चाकून वार केल्याचे निशाण होते त्यामुळे त्याची हत्या करून नदीत फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो पोलिसांकडून वेगाने तपासाची सूत्र फिरवली गेली आणि 17 तारखेला मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. प्रेम संबंधात अडथळा असल्यान त्याची हत्या करण्यात आली आहे.
यात संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष भारती दुबे पाटील आणि तिच्या दोन साथीदारांचा समावेश आहे. पण सचिन भारतीच्या प्रेम संबंधात काय अडथळा निर्माण करत होता त्याचं आणि भारतीचं नातं काय होतं? हत्तेच्या रात्री तिच्या फ्लॅटवर काय घडलं याची संपूर्ण माहिती सांगणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा राजकीय दृष्ट्या मोठा महत्त्वाचा इथल्या अनेक तरुणांनी स्थानिक पातळीवर संघटनांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली आहे. त्यातच एक आहेत
अशोक वाघ पाटील. काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या संघटनेची स्थापना केली. त्यांच्या या संघटनेत शहराध्यक्ष म्हणून सचिन पुंडलिक औताडे हा 32 वर्षांचा तरुण काम करत होता. त्याचा हर्सूलच्या शिवनेरी कॉलनीत घर होत. शेती आणि प्लॉटिंग हा त्याचा व्यवसाय.
सचीन आणि भारतीची ओळख कशी झाली थोडक्यात:
सचिन औताडेची जवळपास चार वर्षांपूर्वी त्याची भारती दुबे पाटील नावाच्या महिलेशी ओळख झाली. ती विवाहित होती. पण मागच्या अनेक वर्षांपासून पतीपासून विभक्त राहायची. सिडकोच्या कॅनॉट प्लेस मधल्या एका अपार्टमेंट मध्ये तिचा फ्लॅट होता. ती सुद्धा संघटनेत काम करायची तिला संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. सचिन आणि भारती एकाच संघटनेत काम करत असल्यान ते एकमेकांच्या संपर्कात आले ज्यानंतर त्यांच्यात वारंवार भेटीगाठी होऊ लागल्या त्यातूनच त्यांची ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्रीतून अनैतिक संबंधांना सुरुवात झाली.
माध्यमांमध्ये देण्यात आलेल्यामाहितीनुसार भारती ही सचिन सोबत गेल्या चार वर्षांपासून संबंधात होती. पण त्याच्या व्यतिरिक्त तिचे इतरही काही पुरुषांशी संबंध होते. ज्याला सचिनचा विरोध असायचा. याच कारणावर तो वारंवार तिच्याशी वाद घालत होता. 30 जुलैला सचिन हा आपली दुचाकी एमएच 20 एफ 5651 ने भारतीच्या फ्लॅटवर गेला त्याने पार्किंग मध्ये आपली दुचाकी लावली आणि दुपारी भारतीच्या चार चाकी गाडीने ते दोघे जालण्याच्या एका लग्न समारंभात गेले समारंभ पार पडल्यानंतर संध्याकाळी साडेहा सात च्या दरम्यान संभाजीनगरात ते परत आले त्यानंतर त्यांनी कॅनट मधल्या एका वाईन शॉप मधून दारू खरेदी केली तिथून ते दोघं भारतीच्या फ्लॅटवर गेले.
काही वेळान तिथे दुर्गेश मदन तिवारी नावाचा आणखी एक तरुण आला तो खुलताबाद तालुक्यातल्या वडद गावचा राहणारा होता माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भारती लोकांना त्यांची ओळख करून देताना तो आपला मामे भाऊ आहे असं सांगायचे तर स्थानिक सूत्रांकडून असं सांगण्यात आल की तो तिच्या मावस भावाचा मुलगा होता पण पुढे सचिन भारती आणि दुर्गेश तिघ दारू पिण्यासाठी बसले त्यानंतर मध्यरात्री भारतीन अफरोज खानला सुद्धा फ्लॅटवर बोलावून घेतल. तो शहरातल्या कटकट दरवाजाच्या भागात राहतो त्याचा प्लॉटिंग तसच वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय याच व्यवसायातून त्याची आणि भारतीची मैत्री झालेली 30 31 जुलैच्या रात्री हे चौग फ्लॅट क्रमांक 201 मध्ये दारू पिले दरम्यान भारती आणि सचिन यांच्यात वाद झाला पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनन पुन्हा भारतीकडे इतर पुरुषांच्या संबंध न ठेवण्याचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला त्यातूनच त्या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली हा वाद इतका वाढला की हानावरी पर्यंत गेला भारती दुर्गेश आणि अफरोजन सचिनला बेदम मारहाण केली आणि त्याच्या गळ्यावर चाकून वार करत त्याला कायमच संपवून टाकलं.
मृतदेहाची विल्लेवाट कशी लावली?
सचिनचा खून केल्यानंतर आता त्याच्या मृतदेहाची विल्लेवाट लावणं गरजेचं होतं 31 जुलैच्या पहाटे या तिघांनी एका प्लास्टिकच्या ताडपत्रीत सचिनचा मृतदेह गुंडाळला आणि अफरोजच्या चार चाकी गाडीत टाकला तिथून ते गाडी घेऊन ते 55 किलोमीटर दूर असलेल्या पैठणला गेले गोदावरी नदीच्या पुलावर त्यांची गाडी थांबली आणि पुलावरून मृतदेह खाली पाण्यातफेकण्यात आला त्यानंतर भारती आणि दुर्गेश एका दिशेन तर अफरोज वेगळ्या दिशेने फरार झाला.
दुसऱ्या दिवशी सचिन घरी न आल्यामुळे त्याच्या पत्नीला चिंता सतावत होती. त्यांनी याबद्दल आपले दिर राहुल औताडेना सांगितलं सुरुवातीला राहुल यांना वाटलं की आपला भाऊ संघटनेच्या कामानिमित्त अशोक वाघ यांच्या सोबत गेला असेल यापूर्वी सुद्धा तो त्यांच्यासोबत चार चार दिवस महाराष्ट्रावर फिरलाय त्यामुळे एक दोन दिवसात तो घरी येईल असं त्यांना वाटलं पण सचिन काही घरी आला नाही त्यामुळे चार तारखेला त्यांनी अशोक वाघ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सचिन घरी परतला नाही तो तुमच्या सोबत आहे का अशी विचारणा केली पण त्यांनी याबाबत नकार दिला राहुल यांना चिंता जी आहे ती वाढत होती त्यामुळे त्यांनी चार ऑगस्टला हर्सूल पोलीस स्थानकात आपल्या भावाच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली राहुल औताडेनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिन औताडेचा शोध सुरू झाला.
त्याच दरम्यान 13 ऑगस्ट रोजी अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातल्या मुंगी गावात एक मृतदेह सापडला हा मृतदेह गोदावरी नदीत वाहत आला होता आणि कुजलेल्या अवस्थेत होता त्यावर चाकून वार करण्यात आले होते आणि त्याची ओळख पटवणं देखील अवघड जात होत पोलिसांनी मृतदेहाची अवस्था पाहून जागेवरच त्याचे शवविच्छेदन केले आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तोपर्यंत एक बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती शेवगाव पोलिसांनी हर्सूल पोलिसांना दिली त्याच आधारावर राहुल औताडे शेवगावला गेले तिथे मृताच्या मानेवर डाव्या बाजूने भक्ती आणि हातावर सचिन नावाचा टॅटू असल्याचं कळालं त्यावरून हा मृतदेह सचिन औताडेचा होता हे स्पष्ट झालं पण सचिनचा खून कोणी केला याचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याचा आव्हान पोलिसांसमोर उभ होत दरम्यान राहुल औताडेना सचिन आणि भारतीचा मित्र असलेल्या प्रशांत महाजन सांगितलं ते दोघं 30 जुलैला जालन्याला एका लग्न समारंभात गेले होते. राहुलन ही माहिती पोलिसांना दिली त्या आधारावर भारतीच्या फ्लॅटच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते तपासण्यात आल जवळपास 80 सीसीटीव्ही फुटेजेस तपासल्यानंतर भारती, दुर्गेश आणि अफरोज एका ताडपत्रीत मृतदेह घेऊन जाताना दिसली.
तसच 31 जुलै पासून ती आपल्या फ्लॅटवर परतली नसल्याच सुद्धा समोर आलं आता तर हे स्पष्ट होतं की भारतीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने सचिन अवताडे यांची हत्या केली आहे आता या आरोपींचा शोध बाकी होता 16 ऑगस्टला पोलिसांना खबर लागली की भारतीने आपल्या एका मित्राला कॉल केलाय त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राची चौकशी केली आणि त्याच्याकडून संबंधित मोबाईल क्रमांक घेऊन तो ट्रेस केला. बुलढाणा जिल्ह्यातल्या साखर खेरडा गावाचे लोकेश शासन जे आहे ते त्यांना मिळालं त्यानुसार 16 तारखेच्या रात्री पोलिसांनी साखर खेडा गावात जाऊन भारती आणि दुर्गेशला ताब्यात घेतल तिच्या एका नातेवायकाच्या शेतात ते लपून बसले होते तर अफरोज खान हा अद्यापही फरार असून तो काही दिवसांपूर्वीच चिखलठाण्याच्या वाहन खरेदी विक्री बाजारात असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे सध्या त्याचा शोध सुरू आहे.
दरम्यान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ पाटील आणि सचिनचा भाऊ राहुल औताडेनी फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी तसच या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. सध्या शेवगाव पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करता आहेत. महाराष्ट्र भूमीच्या टीमन पोलीस निरीक्षक संतोष संतोष मुटकुळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितलं की आज भारती दुबे पाटील आणि दुर्गेश मदन तिवारीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तर अफरोज खानचा शोध अजूनही सुरू आहे.