28 जानेवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. लो विजिबिलिटी असल्याने लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाला असावा असा प्रथम दर्शनी अंदाज वर्तवण्यात आला आणि प्रत्यक्षदर्शींनी विमान रणवेला टच झाल्यावर उलटलं आणि बाजूच्या माळराणावर कोसळलं असं सांगितलं. तर एका सीसीटीव्ही मध्ये विमान लँडिंगच्या वेळेसच हवेत एका बाजूला कल्ल्याचं दिसत होतं.
त्यामुळे लँडिंग आधीच विमानात तांत्रिक बिगाड झाला होता की लो विजिबिलिटी मुळे किंवा अन्स्टेबल अप्रोच मुळे अपघात झाला हा प्रश्न होता. ज्याच उत्तर अर्थातच चौकशीतून तपासातून मिळणार आहे. पण अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासात आता सीआयडी ची एन्ट्री झाली आहे. पण सीआयडी का क्राईम इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंटला नेमकी कोणती जबाबदारी दिली आहे. ब्लॅक बॉक्स सापडल्याचं सांगण्यात येत असलं तरी ब्लॅक बॉक्स मधली माहिती कधी समोर येईल? अपघातामागच्या कारणांची चौकशी नेमकी कशी होणार? समजून घेऊयात…
29 तारखेला अजित पवारांवर बारामतीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा कार्यकर्त्यांचा मोठा जनसागर उसळला होता. ज्यांना वेळेत पोहोचता आलं नाही ते रात्री उशिरा जाऊन अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणचे दर्शन घेत होते. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आलेल्या कार्यकर्त्यांची चाहत्यांची पावलं अपघात स्थळी सुद्धा वळत होती. पण 29 तारखेच्या दुपारीच अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी करण्यात येईल अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. ज्या रात्री खऱ्या ठरल्या कारण अपघात स्थळी कुणीही जायला बंदी घालण्यात आली आहे अशा स्पष्ट सूचना बारामती स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या.
अपघाताच्या तपासात आता सीआयडी ची एन्ट्री झाली आहे;
मुळात गुरुवारी 29 तारखेच्या सकाळीच राज्य सरकारने सीआयडीला चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सीआयडी च पथक बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एडीआर च म्हणजेच क्सीडेंटल डेथ रिपोर्टची चौकशी करणार आहे अशी माहिती सीआयडीचे डायरेक्टर जनरल सुनील रामानंद यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सीआयडीने तपासाला सुरुवात केली असून अपघात स्थळी कोणालाही जाऊ दिलं जात नाहीये याआधीच फॉरेन्सिक टीमने अपघात स्थळी जाऊन काहीपुरावे गोळा केले आहेत.
पण आता सीआयडी या सगळ्यात नेमकी काय चौकशी करणार तर सीआयडीच्या टीमने बारामती तालुका पोलीस स्टेशन मधला एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट आपल्या ताब्यात घेतला आहे सोबतच बारामती मधल्या इतर काही ऑफिसेसलाही भेट दिली आहे अजित पवारांचे विमान कोसळण्यामागचं नेमकं कारण काय याचा तपास सीआयडी करणार नाही तर त्यांच्या तपासाचा हेतू हा एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट केसची चौकशी करणे हा असेल राज्य सरकारने याबद्दलचा विस्तृत चौकशी अहवाल मागवला आहे आम्ही केसच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करून हा चौकशी अहवाल सादर करू अशी माहिती सुनील रामानंद यांनी दिली आहे.
विमान कोसळल्यानंतर नेमकं काय घडलं?
सीआयडी या केसमध्ये फॉरेन्सिक अहवाल, एटीसी लॉग आणि प्राथमिक तपास याची सखोल चौकशी करणार आहे. विमान प्रवासाच्या शेवटच्या काही मिनिटात आणि विमान कोसळल्यानंतर नेमकं काय घडलं? पायलट आणि एटीसी मध्ये काय बोलणं झालं हे उलगडण्याचं काम सीआयडी करणार आहे. पण या तपासात कुठलीही शक्यता गृहीत धरली जाणार नाही आणि प्रत्येक शक्यतेचा अंदाज घेऊन सखोल माहिती घेऊनच हा तपास केला जाईल असही सीआयडीच्या वतीने सांगण्यात येतय.
पण जर सीआयडी विमान अपघाताच कारण शोधणार नसेल तर हे कारण कसं पुढे येणार तर सीआयडीचे डायरेक्टर जनरल सुनील रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार एआयबी आणि डीजीसीएची टीम अपघातामागच्या कारणांची चौकशी करणार आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी एआयबी आणि डीजीसीएच्या टीम मधले काही सदस्य हे घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी पुरावे गोळा केले.
एआयबी आणि डीजीसी एकत्र विमान अपघात नेमका का झाला शोधणार:
महत्त्वाचं म्हणजे ब्लॅक बॉक्स सुद्धा ताब्यात घेतला. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान अपघाताच्या चौकशीसाठी डीजीसीए मधल्या तीन सदस्यांची विशेष समिती तयार केली आहे. मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार एआयबी टीम डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन म्हणजेच डीजीसीएच्या तीन सदस्यांची विशेष टीम हे अपघात झाला त्याच दिवशी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्यासोबत एआयबी चे प्रमुख सुद्धा होते. या टीमने अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स त्याच दिवशी ताब्यात घेतला. एविएशन एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो अर्थात एआयबी च कामच हवाई अपघातांची चौकशी करणं आणि त्यामागची कारण शोधण आहे त्यामुळे एआयबी आणि डीजीसी एकत्र मिळून विमान अपघात नेमका का झाला लो विजिबिलिटी हे कारण होतं की लँड झाल्यावर गडबड झाली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या तपासातून समोर आणणार आहेत.
अपघाताची कारणं काय याबद्दलचे अंदाज?
अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणं काय याबद्दलचे अंदाज लावले जात असताना एक अंदाज चर्चेत आला तो म्हणजे बारामतीच्या रणवेवर असलेल्या अपुऱ्या सुविधा आता याबद्दल केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त विमानाला मोठी आग लागली होती. आग इतकी भीषण होती की बचाव कार्य करायला कुणाला पुढेही जाता आलं नाही. त्यात बारामती विमानतळावर पुरेशी अग्निशमन व्यवस्था नसल्यानं पाणी संपल्याने आग विजवण्यात अडथळे आले अशा बातम्या आल्या.
काही प्रत्यक्षदर्शींनी आम्ही पाण्याच्या बादल्या आणून आग विजवण्याचे प्रयत्न केले असाही दावा केला. याबद्दल नायडू यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा रनवे प्राथमिकतेन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट साठी वापरला जायचा एफटीओ म्हणजेच फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन साठी ज्या सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा या रनवेवर होत्या हा रनवे एन एसओपी म्हणजेच नॉन शेडुल ऑपरेटर्स परमिटच्या अंडर येतो व्यावसायिक उड्डाणांसाठी हा रनवे वापरला जात नाही अशी माहिती नायडू यांनी दिली पण अजित पवारांसारखे व्व्हीआयपी इथे लँड होत असतील तर इथे पुरेशा सुविधा का नव्हत्या व्यावसायिक एक एअरपोर्टवर असतात तशा सिस्टीम्स इथं का नव्हत्या तर याबद्दल नायडू म्हणाले की जर एनएसओपी रनवेला कमर्शियल एअरपोर्ट म्हणून परवानगी द्यायची असेल तर काही अटेंची पूर्तता करावीच लागते आणि त्याची खात्री सुद्धा केली जाते.
पण हा रनवे मुख्यत्वे फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर साठीच वापरला जात होता यावरून इथं अग्निशमन दलाचे जवान का नव्हते किंवा खराब हवामानाची स्थिती असताना लँडिंग साठी मदत करणारी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम का नव्हती? मॅन्युअल लँडिंग का करावं लागलं याचा अंदाज लावता येतो. पण अर्थात आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावं यासाठी कुठली यंत्रणा होती याच उत्तर तपासामधूनच समोर येणार आहे.
महत्त्वाचा मुद्दा आहे तो ब्लॅक बॉक्सचा;
आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो ब्लॅक बॉक्सचा. विमानात सीव्हीआर म्हणजेच कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आणि एफडीआर म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर असे दोन ब्लॅक बॉक्स असतात. त्यातून फ्लाईट लँड होताना पायलट्समध्ये काय बोलणं झालं होतं? कुठले निर्णय घेण्यात आले? पायलट्सला नेमका काय प्रॉब्लेम जाणवला होता? याची माहिती सीबीआर मधून मिळते.
तर एफडीआर मधून विमानाचा स्पीड, विमानामध्ये झालेला बिघाड, विमानाचे ब्रेक, थ्रस्ट लँडिंगच्या वेळची स्थिती असा सगळा डेटा एफडीआर मधून मिळतो. सोबतच जर डीव्हीआर शाबुत असेल तर डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डरच्या माध्यमातून कॉकपिट मध्ये काय घडलं याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळतं पण यात असलेली एक मुख्य समस्या म्हणजे अपघात झाला त्याच दिवशी ब्लॅक बॉक्स मिळाला असला तरी त्याच्यामधून डेटा मिळवायला बराच वेळ लागू शकतो.
जर ब्लॅक बॉक्सला कुठलेही डॅमेज झालं नसेल तर दोन ते चार आठवड्यांमध्ये हा डेटा मिळू शकतो आणि जर आगीमुळे किंवा अपघातामुळे ब्लॅक बॉक्सला नुकसान झालं असेल तर साधारण वर्षभराचा वेळ सुद्धा लागू शकतो. त्यातही ब्लॅक बॉक्स मधला डेटा भारतात रिव्हील होत नाही तर ब्लॅक बॉक्स परदेशात नेऊन तो रिव्हील करण्याचं काम केलं जातं त्यामुळे आता सुरू असलेल्या चौकशीत आधी एआयबी आणि डीजीसीएचा रिपोर्ट समोर येईल पण हा अंतिम रिपोर्ट नसेल ब्लॅक बॉक्स मधला डेटा हाती लागल्यावर त्याच विश्लेषण करून विमानाचा अपघात नेमका का झाला हे स्पष्ट करण्यात येईल केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांनी आम्ही नियोजित वेळेत तपास पूर्ण करू अशी वाही दिली आहे तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा प्रत्येक बाबतीत पूर्ण सहकार्य केल जाईल याची खात्री दिली त्यामुळे सीआयडी ची एंट्री झाली असली तरी सीआयडी क्सीडेंटल डेथ रिपोर्ट आणि प्राथमिक तपासाची चौकशी करेल तर एआयबी आणि डीजीसी च्या टीम कडे जबाबदारी असेल अपघाताची नेमकी कारणं समोर आणायची.


