दादांच्या विमानाचा पायलट शेवटच्या क्षणी का बदलला?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

28 जानेवारीच्या सकाळी अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी आली अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह पाच जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला त्यानंतर दिवसभर या अपघाताची नेमकी कारणं काय याबद्दल अंदाज लावले जात होते लो विजिबिलिटी मुळे पायलट कडून झालेली चूक तांत्रिक बिघाड रनवे ओवरशूट अशा अनेक गोष्टी चर्चेत आल्या सोबतच विमान कंपनीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले जर लो विजिबिलिटी होती तर पायलटने लँडिंगचा निर्णय लांबवला का नाही असाही प्रश्न विचारण्यात करण्यात आला पण या सगळ्यात आता एक महत्त्वाची माहिती समोर येते.

त्यानुसार अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचे पायलटन कमांड असलेले सुमित कपूर हे अजित पवारांच्या विमानाचे पायलट असतील हे त्यांना काही तास आधी सांगण्यात आलं होतं ठरलेला पायलट ट्रॅफिक मध्ये अडकल्यानं पण नेमकं काय घडलं सुमित कपूर यांना शेवटच्या क्षणी जबाबदारी का देण्यात आली त्यांच्या मित्रांकडून काय मागणी करण्यात आली पाहूयात या माहिती मधून…

अजित पवार यांचा अपघात इतका भीषण होता की त्यात विमानात असलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये पायलटन कमांड असलेल्या सुमित कपूर यांचाही समावेश होता. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार विमानाच्या पायलटने पहिला लँडिंग अटेम्प्ट करताना लो विजिबिलिटी मुळे गो अराऊंड करण्याचा निर्णय घेतला म्हणजेच विमान रनवेवर न उतरवता विमानाने पुन्हा हवेत घिरट्या घालायला सुरुवात केली. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या लँडिंग अटेम्प्ट वेळी कॅप्टन सुमित कपूर यांनी आधी लो विजिबिलिटीमुळे रनवे क्लियर दिसत नसल्याचं सांगितलं होतं पण त्यानंतर लागलीच त्यांनी रनवे दिसत असल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांना एटीसी कडून लँडिंगची परमिशन मिळाली आणि लँडिंग अटेम्प्ट करतानाच त्यांचा अपघात झाला.

पायलटन कमांड असलेल्या सुमित कपूर:

त्यानंतरच सुमित कपूर यांची जोरदार चर्चा सुरू झाली. कपूर हे मुळचे दिल्लीचे 1990 च्या दशकात ते सहारा एअरलाई्स मध्ये पायलट म्हणून रुजू झाले त्यानंतर त्यांनी जेट एअरवेज मध्ये सुद्धा पायलट म्हणून काम केलं त्यानंतर त्यांना बोइंग 737 चे एक्झामिनर म्हणून जबाबदारी मिळाली. नागरी विमान वाहतुकीमध्ये एक्झामिनर ही जबाबदारी मिळणं हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

सुमित कपूर यांच काम बिनसूक असल्यामुळे त्यांना ही जबाबदारी मिळाली होती. सुमित हे इतर पायलटचे ट्रेनिंग आणि कामासाठी सुद्धा जबाबदार होते. मागच्या पाच वर्षांपूर्वी त्यांनी व्हीएसआर एविएशन कंपनी जॉईन केली त्यांना एकूण 16500 फ्लाइंग अवर्सचा अनुभव होता. थोडक्यात सुमित कपूर हे प्रचंड अनुभवी होते त्यातही ते लियरजेट फोर फ हे विमान उडवत होते त्या विमानाचे ते एक्सपर्ट म्हणून ओळखले जायचे पण याच विमानाचा अपघात झाला आणि त्यात सुमित कपूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांच्या हातात असलेल्या ब्रेसलेट वरून त्यांची ओळख पटवण्यात आली. गुरुवारी दिल्लीच्या पंजाबी विभाग भागात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पण त्यावेळी त्यांच्या मित्रांनी सुमितंना मिळालेल्या जबाबदारी बद्दल काही दावे केले.

अजित पवारांचे विमान उडवण्याची जबाबदारी ही दुसऱ्याच पायलटवर होती:

त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की त्या दिवशी सकाळी अजित पवारांचे विमान उडवण्याची जबाबदारी ही दुसऱ्याच पायलटवर होती. पण तो पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आणि त्यानंतर व्हीएसआर कंपनीकडून सुमितंना अजित पवारांच्या विमानाच सारथ्य करण्यास सांगण्यात आलं. उड्डाणाच्या अगदी काही तासा आधी सुमित त्यांना आपण पायलट असणार आहोत याची माहिती समजली आणि त्यानंतर त्यांनी उड्डाण केलं असा दावा त्यांच्या मित्रांनी केला आहे त्यामुळे अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा पायलट ऐनवेळी बदलण्यात आल्याच्या चर्चा आता होताना दिसतायत.

या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुमित कपूर यांच्या मित्रांनी या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे त्यांच म्हणण आहे की सुमित हे प्रचंड अनुभवी पायलट होते त्यामुळे त्यांच्याकडून निष्काळजीपणा किंवा चूक होण्याची शक्यता अत्यंत कमी विमानात बिगाड होता का याची तपासणी केली पाहिजे आणि मगच निष्कर्ष काढला पाहिजे कारण सुमितंना विमानाच्या उड्डाणापेक्षा दुसरं काही आवडायचं नाही ते हे काम प्रचंड मन लावून करायचे त्यामुळे त्यांच्याकडून मिस जजमेंट होण्याची शक्यता कमी आहे असं त्यांच्या मित्रांच म्हणणं आहे.

सुमित कपूर यांच्यावर ऐनवेळी विमान उडवण्याची जबाबदारी:

एका बाजूला सुमित कपूर यांच्यावर ऐनवेळी विमान उडवण्याची जबाबदारी येणं त्यांच्या मित्रांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगणं या गोष्टींची चर्चा असताना सुमित कपूर यांचा इतिहास सुद्धा चर्चेत आलाय. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार कॅप्टन सुमित यांच्यावर याआधी ड्युटीवर असताना मध्यप्राशन केल्याचे दोन गुन्हे दाखल झाले होते. पहिली घटना 2010 मध्ये घडली होती. 13 मार्च 2010 ला दिल्ली ते बेंगलोर उड्डाणापूर्वी सुमित कपूर हे दारूच्या नशेत आढळले होते.

मेडिकल टेस्ट मध्ये त्यांची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर संबंधित एअरलाइन्सन त्यांना नोकरीतून काढून टाकलेलं. यानंतर 7 एप्रिल 2017 ला दिल्ली ते गुहाटी उड्डाणापूर्वी त्यांची अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. अशा प्रकारची दुसरी घटना असल्यामुळे हे विमान सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर मानून सिव्हिल एविएशन अथॉरिटीने त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित केलं होतं त्यानंतर त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलं मग सुमित कपूर यांनी काही काळ फ्रीलान्स पायलट म्हणून काम केलं 2020-21 मध्ये ते व्हीएसआर एविएशन मध्ये पायलट म्हणून रुजू झाले.

सुमित यांचा मुलगा आणि जावई सुद्धा पायलट म्हणूनच कार्यरत आहेत. सुमित हे काही दिवसांपूर्वीच ॉंग मधून परत आले होते. त्यांचं कुटुंबीय फेब्रुवारीमध्ये नवीन घरात शिफ्ट होणार होतं त्याचीच तयारी सुरू होती. सुमित पुढच्या दोन ते तीन वर्षात रिटायर होणार होते त्या दृष्टीने त्यांनी प्लॅनिंग सुद्धा केलेलं पण त्याआधीच विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्यासोबत कोपायलट म्हणून उड्डाण्याची जबाबदारी असलेल्या शांभवी पाठक यांना 500 फ्लाइंग अवर्सचा अनुभव होता त्यामुळे अनुभव जबाबदारी आणि अचूकता यात सुमित कपूर ज्येष्ठ होते आता चौकशीत अपघाताच कारण पायलटच मिसजमेंट आहे की विमानात तांत्रिक बिघाड झाला होता की वेगळंच कारण आहे हे समोर येईल सोबतच ऐनवेळी सुमित कपूर यांना जबाबदारी देण्यात आली का आली असेल तर ती का देण्यात आली सुमित यांना पुरेशी विश्रांती मिळाली नव्हती का असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत त्यामुळे चौकशीत आणि तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *