युवा वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे चांगल्या नोकरीसाठी किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. मात्र तुमच्याजवळ पदवी नाही तर मग नोकरी कशी मिळणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका कारण एका आयटी कंपनीन तरुणांना पदवी शिवाय नोकरीची ऑफर दिली आहे पाहूया कोणाची आहे ही संकल्पना पदवीशिवाय मिळणार नोकरी जोहो आयटी कंपनीची नवी ऑफर पद्मश्री श्रीधर बेंबूंची अनोखी संकल्पना सध्या कुठलीही नोकरी मिळवण्यासाठी दहावी बारावी पासचा निकष हा केव्हाच इतिहास जमा झाला आता चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर संबंधित क्षेत्रातील पदवी असणं अनिवार्य आहे.
पण तुम्हाला गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी मिळवायची असेल तर तीही आता पदवीशिवाय मिळणार आहे. होय कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण आता जगातील प्रतिष्ठित आयटी कंपनीचे सहसंस्थापक श्रीधर बेंबूंनीच तसं आवाहन केलय. ते नेमकं काय म्हणालेत पाहूया…
पद्मश्री श्रीधर बेंबूंची अनोखी संकल्पना?
जोहो मध्ये नोकरीसाठी कॉलेजची पदवी आवश्यक नाही असं त्यांनी म्हटलं. तसच त्यांनी आपल्या कंपनी व्यवस्थापकांना पदवीची अट जाहिरातीतून काढून टाकण्याच्या सूचना केल्या. यावेळी हुशार अमेरिकन विद्यार्थी आता कॉलेजमध्ये जात नाहीत असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आणि यामुळे मोठ्या कर्जाशिवाय तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करणं शक्य असल्याचही बेंबू म्हणतायत. तसच त्यांनी पालकांनी या बदलत्या नोकरीच्या दृष्टिकोनाकडे लक्ष द्यावं असही आवाहन केलय.
इतकी मोठी घोषणा करताना बेंबू यांना तेनकासी मध्ये त्यांनी 19 वर्षाच्या वयोगटातील तांत्रिक टीम सोबत काम केल्याचाही अनुभव सांगितलाय म्हणून त्यांनी औपचारिक पदवीपेक्षा कौशल्य क्षमता आणि प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावर जोर देत इतर कंपन्यांना देखील या सांस्कृतिक बदलात सहभागी होण्याचा आवाहन केलय.
मात्र बदलत्या काळासाठी बेंबू यांचा हा फक्त सल्ला आहे बेंबू हे खुद्द पदवीधर इलेक्ट्रिकल इंजिनियर असून त्यांनी मास्टर्स आणि डॉक्टरेटही पूर्ण केलेल आहे त्यामुळे हे फक्त आवाहन असून त्यांनी हा विचार मांडलाय पदवी न करता इतर कुठेही नोकरी मिळेल असा ठोस निर्णय अद्याप झालेला नाही त्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची असेल तर त्यास पदवीच शिक्षण घ्यावच लागणार आहे.
श्रीधर बेंबू यांनी जुन्या विचारसरणीला सरळ आव्हान दिलं;
भारतात आजही लाखो पालकांची एकच धारणा असते- चांगली डिग्री म्हणजे चांगलं करिअर. पण Zoho चे सह-संस्थापक श्रीधर बेंबू यांनी या जुन्या विचारसरणीला सरळ आव्हान दिलं आहे. त्यांच्या मते, प्रतिभा कोणत्याही डिग्रीपेक्षान मोठी असते. म्हणूनच Zoho मध्ये नोकरी मिळवण्यासाठी B.Tech, B.Sc किंवा MBA असणं अजिबात आवश्यक नाही. कंपनी स्पष्ट सांगते – “We hire for skills, not degrees.”
श्रीधर बेंबू यांनी अलीकडच्या चर्चेत पालकांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला – “डिग्रीच्या दबावामुळे किती मुलं ताण, कर्ज आणि स्पर्धेत अडकतात, हे आपण कधी पाहिलं आहे का?” ते म्हणतात, आज जगभरातील अनेक हुशार विद्यार्थी कॉलेज टाळून : थेट कौशल्य शिकतात, प्रोजेक्टस करतात आणि उत्तम करिअर घडवतात. भारतातही हीच लाट आता येऊ लागली आहे.
Zoho गेली अनेक वर्षे अशा मुलांना उचलून धरत आली आहे जे कदाचित पारंपारिक शिक्षणाच्या स्पर्धेत मागे राहिले असतील. इंग्लिश कमी असो, गावातील मुलगा असो, आर्थिक परिस्थिती साधी असो – कंपनीला फक्त एकच गोष्ट हवी असतेः शिकायची तयारी आणि सातत्य. अशा अनेक तरुणांनी आज Zoho मध्ये लाखोंची कमाई करणारी जबाबदार पदे मिळवली आहेत.
श्रीधर बेंबू यांचा सोपा संदेश;
श्रीधर बेंबू यांचा संदेश सोपा आहे: “Talent is everywhere, opportunity should be too.” डिग्री नसेल तर दारं बंद होत नाहीत; कौशल्य असेल तर नवीन दारं उघडतात. भारतीय पालकांनीही हा बदल स्वीकारण्याची वेळ आली आहे कारण शिक्षणाचं खरं मूल्य गुणपत्रिकेत नाही, तर मुलाच्या वाढीत आणि कर्तृत्वात आहे. जस श्रीधर बेंबू यांनी सुरू केलेली ही विचारांची क्रांती भारतीय तरुणांना एक नवीन आत्मविश्वास देते स्वप्नं मोठी ठेवा, कौशल्य शिका, आणि भविष्य स्वतः घडा.
