ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलसाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलसाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही; घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स होणार रिन्यू
जर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स २०२६ मध्ये संपणार असेल तर आता काळजीची गरज नाही भारत सरकारने प्रक्रिया अधिक सोपी आणि ऑनलाइन केली आहे, त्यामुळे बहुतांश कामे घरबसल्या पूर्ण करता येतात.

ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील केली जाणार आहे तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेली नवी वाहतूक नियमावली काय आहे पाहूयात लायसन्स साठी आरटीओ मध्ये हेलपाटे मारण्याची आता गरज राहणार नाहीये, मोटर ड्रायव्हिंग स्कूलला चाचणी घेण्याचे अधिकार देण्यात आले, नव्या नियमात वैध परवान्याशिवाय वाहन चालवल्यास दंड ठोठावला जाणार आहे लायसन्स साठी अर्ज करताना आता कमी कागदपत्र लागणार.

घरबसल्या ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कसे रिन्यू करायचे ?

sarathi.parivahan.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

तुमचे राज्य निवडा

Driving Licence Services → Renewal of DL वर क्लिक करा

DL नंबर, जन्मतारीख आणि Captcha भरा

पुढील टप्पे:

अर्ज फॉर्म पूर्ण करा

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

→ ओळख पुरावा

→ पत्ता पुरावा

→ फोटो आणि स्वाक्षरी UPI / Net Banking / Card द्वारे शुल्क भरा

जर गरज पडली तर..

Biometric किंवा Document Verification साठी जवळच्या RTO मध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.

ठरलेल्या दिवशी मूळ कागदपत्रांसह भेट द्या.

DL कधी मिळेल?

अर्ज क्रमांकाने Status Online Track करता येतो

१५ ते ३० दिवसांत Smart DL कार्ड पत्त्यावर पोस्टाने येते.

ऑफलाइन DL नूतनीकरणाचा पर्याय:

जर ऑनलाइन नको असेल तर

जवळच्या RTO कार्यालयात भेट द्या

Form 9 आणि आवश्यक Medical Form भरा.

आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा

शुल्क भरा

काही दिवसांत DL पोस्टाने मिळतो.

दंड टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर अर्ज करा;

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी परीक्षा द्यायला आरटीओ ऑफिसला जावं लागणार नाही;

आपल्याला कोणत्याही गाडीचं ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तर त्याची जी परीक्षा आहे ती द्यायला आपल्याला आरटीओ ऑफिसला जावं लागत होतं आणि त्यामध्ये मग आपला बराचसा वेळ वाया जात होता पण आता लायसन्स काढायला आपल्याला आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही तर भारत सरकारने आरटीओ च्या नियमांमध्ये बदल केला आहे आणि आता आपल्याला हे नियम लागू होतील त्यानंतर मग आपल्याला लायसन्स काढायला आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही मग आता आपल्याला लायसन्स कुठे मिळणार आणि त्यासाठी पैसे किती लागणार तर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा द्यायला आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही तर…

आता आपण ही परीक्षा आपल्या जवळच्या कोणत्याही सर्टिफाइड ड्रायव्हिंग स्कूल मधून देऊ शकतो त्यानंतर मग ती परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिलं जाईल त्या प्रमाणपत्राच्या आधारे मग तुम्हाला आरटीओ कडून ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जाईल त्याचबरोबर आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये सुद्धा सुलभता आणलेली आहे म्हणजे आता कोणत्याही प्रकारचं लायसन्स काढायचं आहे त्या प्रकारासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची यादी आधीच तुम्हाला दिली जाणार आहे आता बघा आपल्याला ड्रायव्हिंगची टेस्ट तर खाजगी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये द्यायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *