एकनाथ शिंदे सत्तेबाहेर पडतील? 2 डिसेंबरला नेमकं काय घडणारं?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

कालपासून एका चर्चेला उदाहरण आले ती चर्चा म्हणजे दोन डिसेंबर नंतर काय होणार आहे त्याचं कारण ठरलय ते म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक विधान कणकवलीतल्या राडाबाबत प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे खरं तर रवींद्र चव्हाणांची शैली म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त आपल्या भाषणातन मुलाखतीतन ते कधी आक्रमक बोलत नाहीत त्यामुळे रवींद्र चव्हाणांचे हे विधान अधिक गंभीरपणे पाहिलं जाऊ लागले विशेष म्हणजे रवींद्र चव्हाणांची तक्रार घेऊन एकनाथ शिंदे थेट दिल्लीला गेले होते.

त्यानंतर आठवड्याभरातच थेट दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे हे विधान आल्याने ते महत्त्वाचं ठरतय. शिवाय इतक मोठं विधान रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सोबतच्या चर्चेशिवाय करणार नाहीत हे सुद्धा तितकच खर आहे साहजिकच दोन तारखेनंतर नेमकं काय घडणार आहे शिवसेनेत तिसरी फूट पडणार आहे का की एकनाथ शिंदे सत्तेबाहेर जाणार आहेत की यातलं काहीच होणार नाहीये आणि हे सगळं होण्यासाठी दोन तारखेची वाट का पाहिली जातीय समजून घेऊया…

दोन तारखेला नेमकं काय आहे?

आता दोन तारखेला नेमकं काय आहे तर दोन तारखेला राज्यातल्या नगरपरिषदांच्या निवडणुकांच मतदान आहे. दोन तारखेनंतर म्हणजे नगरपरिषदेचे मतदान पार पडल्यानंतर यानंतर कोणकोणत्या निवडणुका आहेत तर यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय राज्यातल्या जवळपास सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

यामध्ये मुंबई सह मुंबई परिसरातल्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर यांच्यासह छत्रपती, संभाजीनगर, नाशिक, पुणे अशा महानगरपालिका आहेत. आता याच महानगरपालिकांच नाव घेण्याची कारण म्हणजे इथल्या अनेक महानगरपालिकांमध्ये शिंदे गट आणि भाजप यांची ताकद तुल्यवळ आहे. त्यामुळे इथे युती करून हे दोन्ही पक्ष लढणार आहेत की स्वतंत्रपणे एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेला येतो.

अर्थात त्यासाठी 2 डिसेंबरची आणि नगरपालिकांच्या मतदानाची वाट पाहण्याची काहीच आवश्यकता दिसत नाही. पण मग रवींद्र चव्हाणांनी या तारखेचाच दाखला नेमका का दिलाय तर त्याचं कारण आहे ते म्हणजे तळ कोकणातला हा थोडक्यात समजून घ्यायचा झाला तर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राण्याचा बालेकिल्ला इथे केसरकर ते लियसे विरोधक राण्यांच्या विरोधात पेरले गेले पण मोठ्या राण्यांच्या समोर सगळ्यांनी माना टाकल्या हेच सत्य वरच्या बाजूला म्हणजे रत्नागिरीत सामंत बंधूंच प्रस्थ वाढलं त्यांनी सुद्धा नारायण राण्यांना विरोध करण्याच धोरण स्वीकारलं पण आज वरच्या राजकारणात नारायण राणेना थेट नडणं अशक्यच ठरत होत.

मागच्या लोकसभेत सामंत बंधूंनी राणेना डावळण्याचे प्रयत्न देखील केले पण राणे निवडून आले आता या समांतरच दुसरं राजकारण घडत होतं ते राणे कुटुंबातच भाजप मधन राज्याच्या राजकारणात मातंबर ठरू लागले स्वतःची हिंदुत्ववादी इमेज सुद्धा तयार करू लागले पण राजकारणात नितेश पेक्षा सीनियर असणारे निलेश राणे मात्र मागे पडत होते.

निलेश राणेंना मानणारा एक वर्ग सुद्धा होता. त्यांना सुद्धा आपण बॅकफुटला पडत चालल्याची भावना त्यांच्या मनात तयार होत होती. आता इथे निलेश राणेच्या खांद्यावरती हात ठेवला तो एकनाथ शिंदेनी त्यांनी निलेश राणेना तिकीट दिलं आणि तब्बल दहा वर्षांनी निलेश राणेच्या अंगाला गुलाल लागला. दरम्यानच्या काळात सामंत आणि चव्हाण यांची जोडी पालकमंत्री म्हणून राण्याचे महत्त्व कमी करत होती.

त्यातूनच चव्हाणांनी कुठल्याही परिस्थितीत कणकवली शिंदे सोबत युती करायची नाही हे धोरण स्वीकारलं त्याचं खरं कारण राण्यांच्या घरात फूट पाडण्याची रणनीती आहे हेच बोललं गेलं याला उदय सामंत यांच देखील बळ होतं असं सांगण्यात येत आता त्यातनच ही धुसफूस वाढली आणि निलेश राणे एक प्रकारे राणे कुटुंबात बाहेर पडले सांगायला आता शिंदे गट विरुद्ध भाजप असं सांगण्यात येत असलं तरी इथं सामंत चव्हाण यांच्या समीकरणातन राण्यांच्या घरात पडलेली फूट आणि नितेश राणे ना आपल्याकडे खेचून घेणं हेच राजकारण झालय असं बोललं जातय असो..

फूट होणार आहे का? शिंदे बाहेर पडणार आहेत का?

तर दोन तारखेनंतर काय घडणार आहे? फूट होणार आहे का? शिंदे बाहेर पडणार आहेत का? मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे या चव्हाणांच्या स्टेटमेंट मागच मुख्य कारण कणकवलीची इलेक्शन इतकच आहे पण असं असलं तरी त्यांचं विधान हे पूर्ण युती संदर्भात होतं. त्यामुळे राज्यातल्यावर सुद्धा याचा फरक नक्कीच पडणार आहे हे कन्फर्म आहे आता या तळ कोकणातल्या राजकारणातच आपल्याला भविष्यातली समीकरण दिसतात ती म्हणजे चव्हाण आणि उदय सामंत यांच असणार साटलोटप एकीकडे सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढतायत पण त्याच वेळी रत्नागिरीत मात्र शिंदे गट आणि भाजप यांची युती आहे.

भाजपन इथं कुठलाही आक्रमकपणा न दाखवता सामंत म्हणतील तेच धोरण स्वीकारलेल आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी निलेश राणेनी घरचा विरोध स्वीकारलेला आहे. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या उदय सामंतांनी मात्र रवींद्र चव्हाणांसोबत सहानुभूतीच धोरण स्वीकारलय अर्थात शिवसेनेतली तिसरी फूट उदय सामंत त्यांच्या नेतृत्वातच होणार अशा ज्या काही चर्चा होतात त्यांची पेरणी इथेच झालेली आहे का असं म्हणायला या समीकरणांमुळे शंका राहते.

आता तळ कोकणातन आपण जातोय ते मुंबई परिसरातल्या राजकारणाकडे रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदे नको आहेत पण ते कुठे नको आहेत तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत याव्यतिरिक्त इतर मुंबई परिसरातल्या इतर महानगरपालिकांमध्ये देवेंद्र फडणवीसांना सुद्धा एकनाथ शिंदे नको आहे त्याच महत्त्वाचं कारण म्हणजे इथली विकास काम आणि येणारा निधी मुंबई ही एक महानगरपालिका झाली पण मुंबई परिसरातल्या नवी मुंबई ठाणे पनवेल कल्याण डोंबिवली मीराभंदर वसई विरार भिवंडी अशा सात महानगरपालिका आहेत.

या महानगरपालिकांमध्ये काहीही करून शिंदेना बाजूला ठेवणं हेच भाजपच आजच टार्गेट आहे. त्यापैकी ठाण्यामध्ये शिंदेना डावलता येणार नाही पण ठाणे वगळता इतर कुठल्याही महानगरपालिकेत शिंदेना घुसू न देणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. आता यामागचं एक कारण म्हणजे या परिसरातले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट विकास काम हे आहेच याशिवाय मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वाढणारी आमदार खासदारांची संख्या हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे.

त्यामुळे भाजपसोबत या भागातल्या महानगरपालिकांमध्ये शिंदे गटाचा शिरकाव झाला तर एकनाथ शिंदेंच वर्चस्व आणि आर्थिक रसत कायम राहते. सध्या ती तोडणं हा भाजपचा प्रमुख अजेंडा आहे असं बोललं जातय. आता दुसरीकडे काहीही करून प्रसंगी तडजोड स्वीकारून महानगरपालिकांमध्ये युतीत सत्ता मिळवण्याचा अजेंडा एकनाथ शिंदे यांचा आहे. सध्या तरी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी ते तयार नाहीयेत आणि जर लढलेच तर ठाणे महानगरपालिके व्यतिरिक्त हातात इतर काही येणार नाही याची जाणीव त्यांना आहे.

पर्यायाने एकनाथ शिंदे आपली पॉवर दाखवण्याचा प्रयत्न करतायत पण अमित शहांकडन तडजोड करून घेणं या पलीकडे त्यांच्या सुद्धा हातात काही आहे असं म्हणता येत नाही. पण ही सगळी बार्गनिंग पॉवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित लढतात का? काँग्रेस महाविकास आघाडीत सहभागी होणार की आपला स्वतंत्र लढण्याचा निर्णय कायम ठेवणार यावरती ठरणार आहे.

एक तर मुंबई महानगरपालिका भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. इथे शिंदेना सोबत घ्यावच लागणार आहे. तर शिंदे एकट्या मुंबईवरती आजूबाजूच्या सात महानगरपालिकांची गणित आखून आपली आर्थिक रसद कायम ठेवू शकतात. इथं ठाकरेंचं मूल्य काय राहतं? सर्वेतन ठाकरे कितपत जागा घेऊ शकतात यावरती भाजप आपली समीकरण आखेल. कारण ठाकरे बंदूक जर एकत्र आले.

एकनाथ शिंदे बाहेर पडतील का?

मराठी फॅक्टर चालू लागला तर भाजपला एकनाथ शिंदेची गरज भासणार आहे आणि याच आधारावर एकनाथ शिंदे पुन्हा आपलं मूल्य वाढवत बार्गेनिंग करताना दिसतील अर्थात 2 डिसेंबर नंतर काय होणार याची सुरुवात झाली आहे ती तळ कोकणातन इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिसल्या एक तर एकनाथ शिंदे यांचा उजवा हात समजले जाणारे उदय सामत यांनी रवींद्र चव्हाणांसोबत तडजोड केली आहे याचा अर्थ एकनाथ शिंदे गटात फुटीची बिज रोवली गेली आहेत आणि इथेच आपल्याला दुसरी गोष्ट सुद्धा दिसली आहे ती म्हणजे इथे निलेश राणे हे एकनाथ शिंदे साठी मैदानात उतरलेत अशी माणसं सुद्धा शिंदेनी टिकवून ठेवली आहेत.

आता राहता राहिला मुद्दा एकनाथ शिंदे बाहेर पडतील का तर नाही शिंदेना बाहेर पडायचं नाही आणि अमित शहांना सुद्धा शिंदेना सोडायचं नाहीये कारण तसं झालं तर राज्यातलं देवेंद्र फडणवीसांच महत्त्व वाढतं याशिवाय केंद्रातल्या सहयोगी पक्षांना चुकीचा मेसेज जातो पण हे जपत शिंदेना मिळेल तिथे डॅमेज करायचं धोरण सुद्धा सोडायचं नाहीये त्यामुळे तिसरी फूट किंवा सत्तेबाहेर यापेक्षा तारीख तारीख म्हणत हे असंच चालू राहील आणि क्रमाक्रमाने एक तर शिंदे डॅमेज होत जातील किंवा आपली पकड मजबूत करत जातील असं म्हणता येतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *