गनिमी कावा इतिहासात अनेकदा ऐकलेला शब्द पण सध्या हा शब्द चर्चेत आहे तो मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील बुधवारी 27 ऑगस्टला अंतरवाली सराठी मधून मुंबईच्या दिशेने निघाले त्यांच्या आंदोलनाच्या नियोजनानुसार ते गुरुवारी रात्री आझाद मैदानावर पोहोचतील असं ठरलं होतं पण मनोज जरांगे पाटील यांचा ताफा प्रचंड होता जो ठीक ठिकाणी होणाऱ्या स्वागतामुळे आणि मोठ्या गर्दीमुळे हळूहळू पुढे सरकत होता त्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले की मुंबईत गर्दी उसळेल असं सांगितलं जात होतं पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसलं म्हणून जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईत पोहोचण्या आधीच मुंबईत मराठा बांधवांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. वाहनांच्या रांगा जरांगे पाटलांच्या ताफ्यात असल्या तरी त्याआधीच मुंबईत कित्येक ठिकाणी मराठा बांधव दिसत होते. सकाळी आठ वाजताच आझाद मैदानावर पाच हजारांपेक्षा जास्त आंदोलकांची गर्दी होती.
पण जरांगे आझाद मैदानात दाखल होण्याआधीच त्यांचा ताफा मुंबईत पोहोचण्याआधीच मुंबईत मराठा बांधवांची एवढी गर्दी कशी जमा झाली मुंबईत पोहोचण्याचा गनिमिकावा मराठा आंदोलकांनी कसा जमवला सगळ्यांचे लक्ष ताफ्याकडे असताना मराठा बांधवांनी चकवा कसा दिला पाहूयात आता एक गोष्ट समजून घ्यावी लागते ती म्हणजे असा गनिमय कावा का गरजेचा होता तर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुक्रवारी नऊ ते सहा एवढ्याच वेळेसाठी परवानगी दिली आहे.
आझाद मैदानावर एका वेळी 5000 आंदोलकांनाच थांबता येईल म्हणून जरंगे पाटील पाच गाड्यांच्या ताफ्यासह आझाद मैदानावर प्रवेश करू शकतील अशा अटी पोलिसांनी घातल्या होत्या सोबतच शुक्रवारी सकाळी आझाद मैदानाच्या दिशेने मराठा बांधवांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता तेव्हा मुंबई पोलिसांनी वाडीबंदर जवळ हा गाड्यांचा ताफा अडवला पण तरीसुद्धा मराठा आंदोलक आझाद मैदानावर जाण्यासाठी ठाम होते त्यामुळे गाड्या तिथेच सोडून त्यांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला पण पोलिसांनी ताफा अडवला असला तरी सकाळी 9:00 वाजेपर्यंतच पार्किंग साठी नियोजित असलेल्या जागा फुल झाल्या होत्या.
मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले तेव्हा त्यांच्यासोबत 3000 गाड्या होत्या पण त्या गाड्या पार्किंग पर्यंत पोहोचण्याआधीच पार्किंग फुल झालं आणि दक्षिण मुंबई पूर्णपणे जाम झाली हे सगळं घडलं ते मराठा आंदोलकांनी केलेल्या गनिमी काव्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याआधीच नियमांचे पालन करण्यात येईल असं सांगितलं होतं पण तरीही त्यांच्या ताफ्यात असलेल्या शेकडो गाड्या हजारो मराठा बांधव बघतात एवढ्या लोकांना गाड्यांना मुंबईत एन्ट्री मिळणार का आझाद मैदानावर नेमकी गर्दी किती होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण इथेच दिसून आला तो मराठा आंदोलकांचा गणिमी कावा.
मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येत होते तेव्हा अंतरवाली सराठी मधून निघताना त्यांच्यासोबत मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यांमधले आंदोलक जोडले गेले त्यानंतर ते पुण्यात पोहोचले तेव्हा पुणे, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या ताफ्याशी जोडले गेले त्यामुळे प्रत्येक ठिकाणावरून आंदोलक त्यांच्याशी जोडले जात होते त्यामुळे मुंबईत इतक्या प्रचंड संख्येने एकाच वेळी आंदोलक कसे दाखल होणार एकाच वेळी एवढ्या गाड्यांना मुंबईत प्रवेश मिळणार का हा प्रश्न होता या प्रश्नाचे उत्तर मराठा आंदोलकांनी नियोजनाच्या माध्यमातून आणि गणिमी काव्यामधून दिलं म्हणून जरंगे पाटील गुरुवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले तिथे त्यांनी शिवजन्मस्थळाचे दर्शन घेतलं पत्रकारांशी संवाद सुद्धा साधला पण त्याच वेळी त्यांच्या ताफ्यात असलेल्या अनेक गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या होत्या या गाड्यांमध्ये फोर व्हीलरचा समावेश होताच पण मोठ्या प्रमाणावर ट्रक आणि टेम्पो सुद्धा मुंबईच्या दिशेने जात गुरुवारीच मुंबईत दाखल झाले या आधीच पोहोचलेल्या.
मराठा बांधवांनी रस्त्याच्या कडेला गाड्या लावून ट्रक आणि टेम्पो लावून त्यातच मुक्काम ठोकला कित्येक आंदोलकांच्या जेवणाची सोय वाशीच्या एपीएमसी मार्केट मधून करण्यात आली. या सगळ्याचे नियोजन आधीच करण्यात आलं होतं त्यामुळे जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच मराठा आंदोलकांनी मुंबईत जाम केली होती. गणिमी काव्याने मराठे मुंबईत शिरले होते. जरांगे पाटलांच्यास्वागतासाठी जसे मुंबईतले स्थानिक मराठा बांधव जमले होते तसेच आधी पोहोचलेले मराठा बांधव सुद्धा सज्ज होते.
पुणे जिल्हा आणि आजूबाजूच्या भागांमधून निघालेल्या गाड्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत थांबल्या आणि आधीच निघालेल्या गाड्या मुंबईत पोहोचल्या त्यामुळे मुंबई सकाळी जाम झाल्याचे चित्र निर्माण झालं. पण जशी गाड्यांची गर्दी मुंबईच्या रस्त्यांवर होती तशीच गर्दी मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर सुद्धा झाली होती. सोलापूर, मनमाड आणि राज्यातल्या इतर ठिकाणांवरून थेट रेल्वेने मुंबईला येण्याचे मेसेज अनेक मराठा आंदोलकांपर्यंत पोहोचले होते. त्यानुसार कित्येक ठिकाणांवरून रेल्वेने गुरुवारी रात्रीच मराठा बांधव मुंबईत पोहोचायला सुरुवात झाली होती. मुंबईत पोहोचलेल्या कित्येक मराठा बांधवांनी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरच मुक्काम केला. त्यानंतर ते पाई किंवा लोकलने आझाद मैदानाच्या दिशेने निघाले. त्यामुळे फक्त मनोज जरांगे यांच्या ताफ्यातूनच नाही तर रेल्वे मार्गांचा वापर करतही मराठे मुंबईत शिरले.
जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्याआधीच मुंबईत आलेल्या मराठा बांधवांमुळे आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करण्याआधीच मुंबईत जाम झाली होती. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती. मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत मुंबईत दाखल झालेल्या गाड्या रस्त्यांवर थांबल्यान ही वाहतूक कोंडी अजूनच वाढली. तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना पोलिसांनी नेमून दिलेल्या जागांवर गाड्या पार्क करा.
पोलिसांना विचारा साहेब पार्किंग कुठे आहे दोन तासात मुंबई मोकळी करा असं सांगितलं त्यानंतर लागलीच ठीक ठिकाणच्या गाड्या निघाल्या पण आंदोलकांनी आझाद मैदानाबाहेर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेरही गर्दी केली होती आणि तिथे सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली. आझाद मैदानात जवळपास 5000 आंदोलक थांबले होते पण त्यापेक्षा काही पटींनी जास्त आंदोलक मुंबईच्या रस्त्यांवर सुद्धा होते ही गर्दी जमवण शक्य झालं होतं मराठे गनिमी काव्याने मुंबईत शिरल्यामुळे आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मालवाहू टेम्पोतून येणाऱ्या आंदोलकांना पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक आंदोलकांना आपल्या गाड्या आधीच सोडाव्या लागल्या. साहजिकच त्यांच्या जेवणापासून इतर नियोजनापर्यंत अनेक प्रश्न उभे राहिले पण मुंबईत गणनिमी काव्याने आदल्या दिवशीच आलेल्या टेम्पो आणि ट्रकमध्ये जेवण बनवायला सुरुवात झाली आणि ते जेवण मोठ्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांना देण्यात आलं इथेही आंदोलकांची सोय करण्यात गणिमिकावा महत्त्वाचा ठरला.
आझाद मैदानावर समोर बसलेल्या मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगे पाटील यांनी जे वाशीपर्यंत पोहोचले आहेत त्यांनी आज वाशीतच मुक्काम करा. त्यानंतर उद्या सकाळी आझाद मैदानात या असं सांगितलं. सोबतच आंदोलनाला मिळालेल्या परवानगीनुसार एका वेळी 5000 आंदोलकच आझाद मैदानावर थांबू शकतील पण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आज 5000 उद्या 5000 आणि परवा 5000 आंदोलक आझाद मैदानावर येतील अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे त्यामुळे सगळ्यांचे लक्ष गाड्यांच्या ताफ्यावर केंद्रित असलं तरी मराठ्यांनी गणिमी कावा करत इतर मार्ग वापरत मुंबई दणाणून सोडली आहे असंच सध्याच चित्र आहे आता मागण्या मान्य करून घेण्यात किंवा आंदोलनाला मुदतवाढ मिळवण्यात जरांगे पाटील यशस्वी होणार का आणि या गणिमी काव्यामुळे मुंबईत जमलेली गर्दी गुलाल उधळत माघारी फिरणार का याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेला आहे.