घरातच निघाले देशद्रोही ! (पाकसाठी हेरगिरी करणारे कोण?) जाणून घ्या सविस्तर..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

ऑपरेशन सिंदूर नंतर हेरगिरी आरोपाखाली तीन राज्यांमधून 8 जणंना अटक झालीय. यापैकी 4 आरोपी हरियाणाचे 3 पंजाबचे तर 1 जण उत्तर प्रदेशचा आहे. शत्रू हा सीमेच्या पलीकडे नाही तर खरा शत्रू आपल्या घरात आहे. प्रश्न हा आहे की ज्योती सारखे असे किती जण आहेत जे आपल्या आजूबाजूला खातात भारताचं काम करतात पाकिस्तानच प्रेम संवाद शांती अशा शब्दांचा वापर करून देशामध्ये खोटे निगेटिव्ह पसरवतात पोलिसांकडे तिनं लिखित कबूलनामा दिलाय की ती पाकिस्तानची एजंट म्हणून काम करत होती आणि त्यानंतर तिच्यासारख्या आणखी आठ जणांना पोलिसांनी आता अटक केलेली आहे जे सगळे या ज्योतीला मदत करत होते. एक युटुबर ते पाकिस्तानची हँडलर हे बनलेल्या ज्योतीन देशासोबत मोठी गद्दारी केलेली आहे. कशासाठी तर पैशासाठी जगभरात फुकट फिरण्यासाठी अयाशीसाठी सो कॉल्ड पाकिस्तानी बॉयफ्रेंड साठी हे असे गद्दार आज आपल्यातही असतील पण त्यांना ओळखायचं कसं सीमेवरचा शत्रू दिसतो तो समोरून हल्ला करतो तो परवडला पण हे ज्योती सारखे शत्रू देशद्रोही गद्दार फक्त पैशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आपला देशही विकू शकतात.

1]ज्योती मल्होत्रा:

चेहरा भोळा लफडी सोळा ज्योती मल्होत्रा साठी ही म्हण एकदम फिट बसते. युटबर ज्योती मल्होत्रा ही व्हिडिओ मधून पाकिस्तानच गुणगान करते आणि सोबतच भारताची अत्यंत महत्त्वाची माहिती ती पाकिस्तानला पुरवते. पोलिसांनी तिला अटक केलेली आहे. ज्योती मल्होत्रा या व्यक्ति न नेमकं काय कांड केलंय सगळी स्टोरी तुम्हाला काळिल माहितीवरून कळेल, ज्योती मल्होत्रा 33 वर्षाची ट्रॅव्ल ब्लॉगर यूटूब वरती तिच ट्रॅव्ल विथ ज्योति या नावाचा एक चॅनल आहे 3 लाख हजार तिचे फॉलोवर्स आहेत मुळचि हरियाणाच्या हिसारची आहे पण तिच्या चॅनलवरचा कंटेंट पाकिस्तानचे गोडवे गाणार आहे एवढा की ती भारतीय नाही तर पाकिस्तानची आहे की काय एवढा संशय येण्या इतका तिच पाकिस्तानवर इतकं प्रेम आहे.
पाकिस्तानच्या हाय कमिशन सोबत इफ्तार पार्टी जोडल्याचा तिचा एक लॉग आहे. पाकिस्तान मधील हिंदू मंदिर कटासराज मंदिर तिथला तिचा एक लॉग आहे त्यातून तिला सांगायचं की बघा पाकिस्तान किती सेक्युलर देश आहे. आणि दुसरीकडे भारतातल्या मिलिटरीशी संबंधित सिक्रेट इन्फॉर्मेशन तिन पाकिस्तानला पुरवलेली आहे. हा सगळा अजेंडा ती दानिश नावाच्या एका पाकिस्तानी बॉयफ्रेंड सोबत करत होती.
जो तिला लग्नाच आमिष दाखवत होता. पाकिस्तानला पाठवत होता तिची सगळी मदत करत होता तिचं राहणं खाणं फिरणं सगळं काही लव जिहादचा हा सगळा प्रकार आहे. कारण ती याच दानिश सोबत इंडोनेशियाला सुद्धा गेलेली होती. अय्याशीसाठी देश धर्माला विकणाऱ्या ज्योतीला तुम्ही काय म्हणाल दानिशला सोडा तो त्याच्या देशासाठी काम करत होता पण ज्योतीच काय करायचं जी आपल्या देशात इथेच राहते इथेच खाते आणि आपला देश विकायलाही मागे पुढे बघत नाही हा सगळा तिचा अजेंडा हिसार पोलिसांनी हाणून पाडला कारण ती भारतीय असूनही पाकिस्तानची जासूस म्हणून गुप्तहेर म्हणून काम करत होती. हिसारच्या सिव्हिल लाईन पोलिसांनी ज्योतीला अटक केलेली आहे. ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 च्या अंतर्गत सेक्शन 34 च्या नुसार ही कारवाई झाली. म्हणजे शत्रूराष्ट्रासाठी हेरगिरी करणं देशातली अत्यंत सेन्सिटिव्ह माहिती पुरवणं यासारखी कलम तिच्यावरती लावण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच भारतीय न्यायसंहिता 152 नुसार देशाची सोरेनिटी युनिटी इंटेग्रिटीला धक्का पोहोचेल अशी माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा तिच्यावरती आरोप आहे.
पाकिस्तानी इंटेलिजन्स एजंट सोबत तिने ती माहिती शेअर केलेली आहे. आता हे सगळं कसं घडलं एक भारतीय युटुबर पाकिस्तानची एजंट कशी बनली ते मी तुम्हाला सांगतो. ज्योती मल्होत्राला 2023 पाकिस्तानला जायचं होत. खरं तर ज्योती याआधी देखील पाकिस्तानला जाऊन आलेली होती. त्यावेळी बनवलेल्या व्हिडिओत देखील ती पाकिस्तानच गुणगान करत होती. तिला पाकिस्तान सोबत एक सॉफ्ट रिलेशनशिप बनवायची होती.
2023 च्या सुरुवातीला तिला पुन्हा एकदा पाकिस्तानला जायचं होतं दिल्ली मधल्या पाकिस्तानी हाय कमिशन मध्ये विझा प्रोसेस साठी ती पोहोचली तिथेच तिला पाकिस्तानी अधिकारी एहसान उर रहीम ज्याला सगळे दानिश म्हणतात तो भेटला आता हा दानिश म्हणायला पाकिस्तानी विझा प्रोसेस करणारा अधिकारी पण होता पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचा हँडलर ज्योती आणि दानिशच भेटणं होतं बोलणं होतं मग चॅटिंग आणि मग तो थोडा इमोशनल मामला झाला दोघांची इश्कबाजी सुरू झाली ज्योतीला पाकिस्तानला जाऊन व्हिडिओ बनवायचे असतात दानिश तिला पाकिस्तानच्या काही लोकांचे नंबर देतो जे पाकिस्तानी मिलिटरीशी संबंधित होते काही
आयएसआय च एजंट देखील होते त्यांच्यासोबत ज्योतीची ओळखपाळक होते ज्योती 2023 पाकिस्तानला दोनदा जाऊन आली तिला एक मोठी रक्कम सुद्धा देण्यात आली तिच राहणं खाणं पिणं फिरणं सगळा खर्च फक्त पाकिस्तानच नाही तर जगभरामध्ये फिरण्याचा सगळा खर्च पाकिस्तान आयएसआय एजंट करत होता. पैशासाठी तर ज्योती हे सगळं करतच होती पण दुसर कारण म्हणजे पाकिस्तानी दानिश सोबतचे तिचे प्रेमसंबंध दानिश सोबत ती देशविदेशात फिरायची तिसर कारण होतं ब्रेन वॉश आजपर्यंत आपण धर्मासाठी माती भडकवल्याचे प्रकार पाहिले पण ज्योतीला पाकिस्तान कस सेक्युलर आहे अमन की आशावाला देश आहे हे दाखवण्यासाठी ब्रेन वॉश केला गेला ज्योती ही एका अर्थाने पाकिस्तानची हेर बनली होती कारण या सगळ्यात वाहाबत जात तिने देशासोबत धोकेबाजी केली अली अहवान आणि त्यासोबत शाकीर उर्फ राणा शहबाज आणि इतरही आयएसआय एजंटच्या ती संपर्कात होती. आरोप असा आहे की इंडियन मिलिट्री अँड बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर राजस्थान पाकिस्तानच्या सीमेवरच्या सैन्यतळांचे फोटोज व्हिडिओज ती आयएसआयला पाठवत होती. जे अतिशय सेन्सिटिव्ह होते. स्ट्रॅटेजिक इन्फॉर्मेशन आपल्या मिलिटरीच्या रस्त्यांची माहिती रूट्सची माहिती सर्वेलन्स पॅटर्न म्हणजे भारताची सुरक्षा कशी आहे ही सगळी माहिती ज्योतीन या पाकिस्तानी हँडलरला पुरवली. धक्कादायक तर हे आहे की ही माहिती व् टेलिग्राम स्नपचॅट याद्वारे दिली गेलेली आहे म्हणजे कोणालाही संशय येणार नाही. ज्यांना पाठवले त्यांचं नावही बदललेलं होतं कॉन्टॅक्ट नंबर जे सेव्ह केलेले होते त्यांची नाव होती अरुणभई नादिया दीदी वगैरे वगैरे म्हणजे कोणीही संशय घेणार नाही.
पण तिचे हे काळे धंदे फार दिवस चालले नाही. देशाशी गद्दारी करणारी ज्योती अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली. तिला पाच दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवलं जाईल. पोलीस कसून चौकशी करतीलच. याच दरम्यान तिचा सगळा डिजिटल डेटा म्हणजे फोन्स असतील लॅपटॉप असतील ते सगळे चेक केले जातील. तिचे अकाउंट डिटेल्स देखील तपासले जातील. कोणत्या मार्गाने कसा तिने पैसा कमवलेला आहे वळवलेला आहे कोणती माहिती दिलेली आहे कोणते फोटोज शेअर केलेले आहेत हे सगळं समोर येईल.
पण चिंताजनक बाब ही आहे की ज्योती ही तर या सगळ्या मोहिमेतली फक्त एक छोटा भाग होती यांच एक मोठं नेक्सस आहे अशा अनेक ज्योती असू शकतात ज्या भारताची सेन्सिटिव्ह माहिती पाकिस्तानला पुरवतात आता माहिती अशीही मिळतीय की याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंजाबच्या मलकोटलाची एक विधवा महिला जिच नाव आहे मुजाला ती सुद्धा विझासाठी दिल्ली मधल्या पाकिस्तानी उच्चालयात गेलेली होती तेव्हा याच दाणिशन तिला व्ट वरून टेलिग्राम वरती स्विच व्हायला सांगितलं कारण टेलिग्राम वरचा जो डाटा आहे तो ट्रॅक करता येत नाही नंतर तोच सगळा प्रकार जो ज्योती सोबत झाला. हा दानिश लग्नाचा आमिष दाखवतो रोमँटिक रिलेशनशिप बनवतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही एक मोठी चेन आहे सिक्युरिटी इंटेलिजन्स म्हणण आहे की ज्योती ही फक्त एक प्यादा आहे अशा अनेक ज्योती असू शकतात तिच्यासारख्याच आणखी सहा जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे ज्यात काही इन्फॉर्मर म्हणजे माहिती पुरवणारे फंड हँडलर्स म्हणजे पैसा पुरवणारे आणि त्यासोबतच लोकल फॅसिलेटर्स म्हणजे तुम्हाला जे काही लागेल ते सगळी सुविधा पुरवणारे लोक असे सहा जण पोलिसांनी पकडलेले आहे तर या ज्योती सारख्यांच नेमकं काय काम असायचं तर सॉफ्ट प्रो पाकिस्तान नरेटिव् ऑनलाईन क्रिएट करायचा व्हिडिओज बनवायचे जी ज्योती अतिशय योग्यपणे करत होती.

2] देवेंद्रसिंग ढिल्लन :

  • पटियाला येथील खालसा कॉलेज चा
  • वय 25 वर्ष देवेंद्र फेसबूकवर पिस्तूल आणि बंदुका घेऊन फोटो पोस्ट करायचा.
  • तो मागच्या वर्षी नोंव्हेंबर मध्ये पाकिस्तानला गेल्याचे उघडकीस आले.
  • आयसआयला पटियाला लष्करी तळाची गुप्तहेर माहिती पुरवली.

3]नोमान इलाही:

  • हरियानामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.
  • 24 वर्षीय नोमान हा पाकिस्तानमधील एका आयसआय हँडरच्या संपर्कात होता.
  • नोमान हा उत्तर प्रदेश चा रहिवासी आहे.

4]अरमान:

  • 23 वर्षीय अरमान ला हरियनातील नूह येथून अटक.
  • भारत-पाकिस्तान तनावादरम्यान पाकिस्तानला गोपनीय माहिती पाठवत होता.

5]शहजाद:

  • उत्तर प्रदेशातील रामपूर येथे राहणारा हा व्यवसायाने व्यापारी होता.
  • राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती आयसआय हँडलर्सन दिली.
  • शहजादणे अनेक वेळा पाकिस्तानला ही भेट दिली.
  • मसाले, कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या बेकायदेशीर तसक्रीमध्येही सहभागी.

6]मोहम्मद मूर्तझा अली:

  • गुजरात पोलिसानी जालंधर येथून अटक केली.
  • मोहम्मदने स्वतः एक मोबाइल अॅप तयार केले.
  • अॅप मधून भारतीय न्यूज चॅनेलच्या कव्हरेजची माहिती पाकला पुरवली.
  • तेच्याजवळ 4 मोबाइल आणि 3 सीम कार्ड देखील सापडले.
  • पककडून 40 लाख रुपये बँकेत आले.

7]गजा आणि 8]यामिन मोहम्मद:

  • पंजाबमधून गजा आणि यामिन मोहम्मद यांना अटक.
  • दोघांवरही आयएसआय साठी हेरगिरी केल्याचाही आरोप.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *