घरातील गणपती स्थापनेविषयी विशेष माहिती..! गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

देव हा भक्त भक्तीचा भुकेला असतो आपण किती शुद्ध अंतकरणाने मनापासून ही पूजा करतोय हेच सर्वात जास्त महत्त्वाच आहे आपला भाव सर्वात जास्त महत्त्वाचा आहे कोणीही असेल तरी त्यांनी मनात श्रद्धा ठेवावी कारण कोणतीही पूजा आपण अगदी मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते “भोळी भाबडी माझी सेवा मान्य करा गणपती देवा“…

बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आलेली आहे त्यामुळे या दिवशी आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचा आगमन होणार आहे पण या दिवशी नेमका आपल्याला कोणत्या वेळेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे त्यामुळे आज मी तुम्हाला श्री गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सांगणार आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकारय करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे कारण शुभ मुहूर्तावर केलेले कोणतेही चांगले कार्य पूजा जास्त लाभदायक असते. तसेच ती शुभफळ देते त्यामुळे शक्य झालं तर आपण ही पूजा नक्कीच शुभ मुहूर्तावर करावी.

“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्यशु सर्वदा”

गणपतीची स्थापना केव्हा करायची?

तर या वर्षीची चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजून 54 मिनिटानी सुरू होते आणि बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजून 44 मिनिटानी समाप्त होते आपण गणपती बाप्पांची स्थापना ही चतुर्थी तिथीलाच करत असतो. 27 ऑगस्ट रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तुम्ही स्थापना करू शकता पण लक्षात घ्या की गणेशाची स्थापना म्हणजे पूजा आपल्या घरातली त्यामुळे तुम्ही सूर्योदयापासून दुपारी एक दोन ते तीन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत घरातल्या गणपती स्थापना करू शकता त्याला राहुकाळ शुभ चौगडी याच काही गरज नाही गणपती हा विघ्नहर्ता गजानन नाही त्यामुळे शुभ मुहूर्तावरती फक्त पहिल्या प्रहरामध्ये स्थापना करा मूर्ती कोणत्यादिवशी आणायची मूर्ती ही तुम्ही आदल्या दिवशीही आणू शकता सोयीनुसार अथवा दुसऱ्या दिवशी देखील सकाळी सकाळी आणू शकता.

गणपतीची सोंड डावी असवी की उजवी:

गणपतीची जी सोंड आहे ती डाव्या सोंडीची मूर्ती आणायची का उजव्या सोंड्याची आणायची पहिल्यांदा लक्षात ठेवा. आपण जो गणपती बाप्पा स्थापना करतो आणि त्याच्या दुकान गणपतीचे जे स्टॉल्स लागलेले असतात तिथे कुठेही तुम्हाला उजव्या सोंडेची मिळत नाही कारण सगळ्यांना माहिती उजव्या सोंडेशाच्या गणेशाची जी एक पूजा किंवा त्याच्या काही महत्त्वाचे प्रथा म्हणतो ते सोवळ पाळण्याची खूप म्हणजे थोडक्यात उजव्या सोंड्याच्या गणपती हा खूप समजलेला आहे कारण त्याच्या जे काही शोडोपचार पूजा आहे त्याचे नियम खूप आहेत त्यामुळे डाव्या सोंडेच्याच गणेशाची स्थापना मूर्तीची आपल्याला करायची आहे.

गणपतीची मूर्ती कोणत्या रंगाची असावी:

गणपतीची जी मूर्ती आहे त्याचा पूर्ण लाल रंग चालतो का अशी गोष्ट आहे की गणपती आपण जसा बघतो श्री गणेश जसा आपण बघतो तशीच मूर्ती आपल्या घरामध्ये असावी शेंदूर फासलेला संपूर्ण लाल असा जो काही शेंद्री गणपती आहे तो देवळामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो तो तसाच असणं गरजेचं नाहीये पिवळा पितांबर शाल नेसलेला उत्तम छानपैकी धोतर सर्व आभूषण अलंकार मस्तपैकी जो स्किन कलर त्याच्यावरती आपल्याला चंद्राकार असेल कोणत्याही प्रकारचा नाम असेल म्हणजे लहानपणापासून जो आपण गणपती बघतोय तशीच गणेशाची मूर्ती आपल्या घरी आणणं खूप गरजेचं आहे त्यामुळे एकाच कलर मध्ये शक्यतो आणू नका आणि अजून एक मला असं जाणवतं की आपण बरेच वेगळ्या पद्धतीने गणपतीच्या मूर्त्यांचा आकार बघतो की मोरावर बसलेला आहे, कृष्णाचा आकारातला आहे, शंकराच्या आकारातला आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये प्रकार आहेत तुम्हाला जो आवडेल तो आणू शकता त्याला असा कुठला विशेष हे नाहीये की तुम्ही याच आकारातला गणपती आणला पाहिजे.

किती दिवस गणपती बसवायचा?

किती दिवस गणपती बसवायचा आहे की दीड दिवस आहे तीन दिवस आहे का पाच दिवस आहे का सात दिवस का दहा दिवस आहे हे तुमच्या प्रथेवरती अवलंब करू शकता इथे कुठेही असं लिहिलेल नाहीये की आपण दीड दिवसाचा बसवा किंवा दहा दिवसाचा बसवा आधी तुमची सोय बघा पूर्वापार तुमच्याकडे जर अशी गोष्ट चालत आली असेल की तो दीड दिवसाचा आहे आणि तुम्हाला पाच दिवसाचा करायचा कुणाला विचारायची गरज नाहीये, गणेश उपासना करायची गणपती तुमच्या घरात जितके जास्त दिवस असेल तितके जास्त दिवस तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहेत.

गणेश उत्सवच १० दिवसच का केला जातो? तर गणेशाचं जे तत्व आहे ते पृथ्वीवरती या 10 दिवसांमध्ये अति जागृत असतं गणेश तर आपल्या पाठीशी आहे गणपती बाप्पा आपल्याबरोबरच कायमचा पण दहा दिवस इथे जागृत असतो त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपल्याला पाच दिवस, दीड दिवस, तीन दिवस कितीही दिवस तुम्ही करू शकता कोणालाही विचारायची गर गरज नाहीये तुम्ही जास्त करा कमी करा तुमच्या श्रद्धेवर आणि तुमच्या उपासनेवर आणि तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे.

पहिल्यांदाच गणपती बसवायचा असेल तर काय करावे?

पहिल्यांदा गणपती बसवायचा असेल तर काहीही वेगळं करायचं नाहीये म्हणजे त्या दिवशी संकल्प करावा लागतो होम हवन कराव लागतं पहिल्यांदाच आम्ही गणपती बसवतोय म्हणून काही वेगळी पुण्यावचन कराव लागतं गुरुजींना बोलून असं काहीही नाही गणेशाची स्थापना तुम्ही नवविवाहित आहात तुमचा नवीन संसार आहात तुम्ही स्वतःच्या घरात पहिल्यांदा स्थापन करताय त्यावेळेला फक्त गुरुजींना बोलवा गुरुजींना बोलून तुम्ही विविध विधिवत जी पूजा असते ती पूजा करून तुम्ही करू शकता वेगळं काही त्याला असं मोठं विधी करायची काही गरज नाहीये.

घरीच स्थापना करावी की गुरुजी पाहिजेत:

घरच्या घरीच स्थापना करावी की गुरुजी पाहिजेत लक्षात घ्या ब्राह्मणाला कधीही दक्षिणा देणं हे पुण्याचं काम आहे. त्यामुळे आपण गुरुजींना बोलू शकतो नसेल तर तुम्हाला माहिती असेल तर पुस्तकात वाचून देखील तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता खूप मोठा अस काही त्याला नाहीये विधिवत तुम्ही करू शकता पुढे आता हा जरा महत्त्वाचा गोष्टी आहे की गणपती घरी आणला आणि मूर्ती भंग पावली एखादा हात तुटला क्रॅक गेला कधीतरी काय होतं की पाटाला थोडासा क्रॅक जातो गणपती बाप्पाच्या पायाला कुठेतरी होतं मुकुट असतो तिथे कुठेतरी काहीतरी होतं आणताना होतं हे पूर्वी होत नव्हतं या पाच वर्षात व्हायला लागले कारण पूर्वी काय होतं भक्कम अशा प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बाप्पा बनायचे आता निसर्ग च्या सगळ्या या गोष्टींची आपत्ती निसर्गावरची टाळण्यासाठी निसर्गाचे प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती करून आपण काय केले शाडूचाच बाप्पा घरी बसवायचा आपण ठरवतोय आणि आपण अप्लाय करतो की त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती यांच्यावर आता बंदी पण आहे आणि विकायला कमी आहेत.

मातीचा गणपती असल्यामुळे त्याची भक्कमता आहे ती थोडीशी कमी आहे त्यामुळे काय होतं चुकून एखादा टच लागला तर एखादं पार्ट तिथे कट होऊ शकतो किंवा तुटू शकतो आता मला सांगा ही कुठलीही गोष्ट तुमच्या आयुष्यात अशुभ नाहीये म्हणून तुम्ही दुर्लक्ष करा ती मूर्ती विसर्जन करा आणि लगेचच दुसरी मूर्ती आणा आणि स्थापन करा डोक्यात काहीही विषय ठेवायचा नाही बर आपण मुद्दामून केल का आपण कुठे टच केली का मूर्ती नाही ना डोक्यातन पहिले विषय काढून टाका कारण लक्षात ठेवा हे एकटेक्निकल फॉल्ट आहे बरोबर त्यामुळे आपण काय करायचं की शाडूची मूर्ती आणताना खूप काळजीपूर्वक काढायचे तुम्ही कार मधन आणताय किंवा टू व्हीलर मध आणता किंवा जसं काय आणता काळजी घ्या आणि ठेवताना करताना काण एकदा गणपतीची स्थापना तिथं म्हणजे तुमच्या घरी पाटावरती चौरंगावरती आणून आपण स्थापना केली की मग काय होणार आहे ज्या दिवशी विसर्जन करायचे तेव्हाच हलवायचे.

विसर्जन कुठे करावे?

विसर्जन कुठे करावे घाटावरती का आपण घरी करू शकता. कॉर्पोरेशनने महानगरपालिकेने जिल्हा परिषदेने जे हौद केलेले आहे त्या हौदा वरती विसर्जन करा नसेल तर घरी सुद्धा बादलीमध्ये गणपती बाप्पाच विसर्जन आपण विधिवत करू शकतो कारण शाडूची मूर्ती आहे पाण्यात विसर्जन होऊ शकते आणि मग त्याचं काय करायचं ती माती तुम्ही पुन्हा मातीमध्ये मिसळू शकता अनेक जण झाडाला घालतात पण रंग असतात कलर असतात त्यामुळे झाडात योग्य नाहीये शक्यतो जिथे तुम्हाला माती मिळते तिथे तुम्ही त्याच विसर्जन मातीचे विसर्जन तुम्ही शेतात मातीत करू शकता.

घरात कोणी गरोदर असेल तर..

घरात जर कोणी गरोदर असेल तर मूर्ती ही आपण विसर्जन करायची ठेवायची काय करायचं लक्षात घ्या हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा भावनेशी कनेक्टेड आहे याच मी तुम्हाला क्लियर उत्तर असं देतोय तुमच्या मनाला जे वाटेल ते करा कारण इथे विधान कुठे लिहिलेलं नाहीये की आपण गणपती हा घरात कोणी जर प्रेग्नंट असेल तर विसर्जन करावा का नाही मला कुठे सापडलेल नाहीये अलीकडच्या पुस्तकामध्ये वेगवेगळे निदान सांगितलेत त्यामुळे लक्षात ठेवा जर तुमच्या घरामध्ये गरोदर महिला असेल घरामध्ये कितवाही महिना चालू असेल आणि गणपती बाप्पाची स्थापना करायची तर शक्यतो वर्षभर गणपती बाप्पा विसर्जन करू नका. असं मला वाटतं कारण मनाचं समाधान म्हणून बाकी काही नाहीये गणपती बाप्पानी आजपर्यंत कोणाचं वाईट केलेल नाहीये केल ते चांगलंच केलय एक वर्षभर आशीर्वाद असू दे पुढच्या वर्षी विसर्जन करू कारण डोक्यात आपल्या मनाला कोण सांभाळणार मनाला कोण सांगणार त्यामुळे आपल्या मनाचा समाधानासाठी ही गोष्ट नक्की करा विसर्जन करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *