गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. शेतकरी म्हणला की संकटाशी दोन हात करण आलंच त्यांच्यावर अनेक आपत्ती ह्या येत असतात मग त्या आसमानी असो की सुलतानी असो परंतु आज शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे अनेक संकट त्याच्यावर येत असतात आणि या संकट काळात सरकार फूलाफुलाची पाकळी त्याच्या पाठीमागे उभा राहण्याच काम करत असतं आणि या नेमक्या योजनेत या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्याला कशा प्रकारे मदत करतं आणि त्यासाठी आपण कोणती प्रक्रिया राबवायला हवी त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात, याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या योजनेमध्ये बघणार आहोत. ही जी योजना आहे ही शेतकरी अपघात अनुदान योजना आहे.
जर शेतकऱ्यावर काही संकट आलं आणि त्यामध्ये त्याला जर अपंगत्व असो किंवा मृत्यू जर आला तर शेतकऱ्याला मदत दिल्या जाते ती मदत मिळवण्याची पद्धत कशी आहे ही आज आपण ही शेतकरी वर्गासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती कशी पोहोचेल याची देखील आपण या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. तर यासाठी लाभार्थी पात्रता त्यांनी सांगितलेली आहे तर या योजनेचा लाभ कोणा कोणाला होऊ शकतो.
तर वहतीधारक खातेदार शेतकरी म्हणजे ज्याच्या नावावर शेती आहे असा शेतकरी आणि ज्याच्या नावावर शेती नाही, असा कुटुंबातील एक सदस्य मग तो त्याची पती पत्नी आई वडील मुलगा मुलगी होऊन कुणी असू शकतं ते आणि किती वयाची अट आहे तर 10 ते 75 वर्ष 10 ते 75 वयोगटातील जे कुटुंबातील सदस्य असतील त्या शेतकऱ्याच्या हे या योजनेसाठी पात्र ठरतात. तर या ठिकाणी वारसदार कोण कोण राहील शेतकऱ्याचा जर अपघातग्रस्ताची पत्नी किंवा पती पतीपत्नीसाठी ही विमा हा जो आहे इन्शुरन्स हा लागू राहील. त्यानंतर त्याची अविवाहित मुलगी त्यानंतर मुलगा आई-वडील आणि सून शिवाय अन्य कायदेशीर वारसदार यांना ही अपघातग्रस्तासाठी जी काही विमा रक्कम जी मिळते शासनाकडून ही मिळू शकते.
योजनेचा लाभ केव्हा होईल?
योजनेमध्ये समाविष्ट बाबी आता बघा शेतकऱ्याला अनेक संकट येत असतात. कधी वीज कोसळून मरण येतं, कधी त्याचा अॅक्सीडेंट होतो, वाहन अपघात होतो, त्यानंतर कधी कधी साप चावल्याने, विंचू चावल्याने किंवा एखाद जनावरा चावल्याने रेबीज देखील होऊ शकतो तर अशा अपघातामधून शेतकऱ्याचा हा मृत्यू होऊ शकतो, आणि अशा अपघातग्रस्त शेतकऱ्याला ही मदत दिल्या जाते.
त्याचबरोबर कोणत्या बाबतीत मदत केल्या जात नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय नैसर्गिक मृत्यू नैसर्गिक मृत्यू जर झाला तर ही तुम्हाला रक्कम मिळणार नाही त्याच्यानंतर विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व त्याच्यानंतर जर तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न जर करत जर असाल तरी सुद्धा तुम्हाला ही मदत मिळणार नाही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रयत्न जर जाणीवपूर्वक स्वतःला जखमी जर केलं तरी सुद्धा भेटत नाही गुन्ह्याच्या उद्देशाने म्हणजे काय एखादा गुन्हाचा उद्देश होता तुमचा तो करायचा होता तुम्हाला मध्येच तुमचा अपघात झाला तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही.
त्यानंतर जर आमली पदार्थाच्या आम्लाखाली म्हणजे काय जर तुम्ही काय ड्रिंक वगैरे केलेली असेल दारू पिऊन जर तुमचा अपघात जर झाला तर तुम्हाला ती रक्कम मिळणार नाही त्यानंतर भ्रमिष्टपणा, त्याच्यानंतर शरीरांतर्गत रक्तस््राव, तुम्ही मोटर अपघातात विमा भेटतो म्हणून जर तुम्ही मोटराची शर्यत लावत जर असाल आणि त्याच्यात जर अपघात जर झाला, तरी सुद्धा तुम्हाला ती रक्कम मिळणार नाही. त्यानंतर युद्ध सैन्यातील नोकरी आणि जवळच्या लाभधारकाकडून जर खून जर झाला जर असेल तर तुम्हाला ही विम्याची रक्कम मिळत नाही. अनुदान तुम्हाला मिळणार नाही या गोष्टी देखील आपण लक्षात घ्यायच्या आहे.
आवश्यक कागदपत्रे:
त्यानंतर या योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्र कोणती लागतात तर सगळ्यात पहिला आहे.
- सातबारा
- तुमच्या मृत्यूचा दाखला
- त्यानंतर शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नंबर सहा क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
- त्यानंतर तुमचे ओळख म्हणून तुमची टीसी आधार किंवा निवडणूक ओळखपत्र ज्या कागदपत्राद्वारे तुमची म्हणजे वय आणि ओळख तुमची निर्माण होईल असं कोणतही एक कागदपत्र लागेल.
- प्रथम माहिती अहवाल स्थळ पंचनामा पोलीस पाटील माहिती अहवाल याच्यात काय तुमचा पोलीस
- चौकशी मार्फत तुमच्या मृत्यूची चौकशी होणार आहे त्याच्यामुळे तो अहवाल तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक वेळेस लागणार आहे.

योजनेची वैशिष्टे:
आता या योजनेत अंतर्गत नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळते ते बघा जर तुमचा अपघाती मृत्यू जर झाला शेतकऱ्याचा तर त्याला मिळतात दोन लाख रुपये आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांचे अपघात झाले परंतु ही योजना फारशी कोणाला माहित नसल्यामुळे आपण या योजनेपासून वंचित राहिलेलो आहे त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती त्यानंतर अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव जर निकामी जर झाले तरी दोन लाख रुपये मिळतात अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी जर झाला एक पाय एक हात एक डोळा याच्यापैकी काही जर गेल तुमच एखादा अवयव तरी तुम्हाला किती दोन लाख रुपये इथ मिळणार आहे आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे तर या ठिकाणी तुम्हाला एक लाख रुपये मिळतील तर यासाठी आता पुढे पद कार्यपद्धती पण सांगितलेली आपण ते कशा पद्धतीने मिळवायच.
कुठला अपघात झाला तर कुठली कागदपत्रे हवी:
आपण आता बघूया की कुठला अपघात झाल्यानंतर कुठली कागदपत्र त्याच्या सोबत जोडायची याची सुद्धा माहिती याठिकाणी दिलेली आहे जर तुमचा रस्ता रेल्वे अपघात जर झाला, तर तुम्हाला इन्क्वेस्ट पंचनामा म्हणजे चौकशी पंचनामा पोलिसांनी केलेला त्याच्यानंतर पोस्टमार्टमचा अहवाल विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविता चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटर वाहन पर म्हणजे जर तुमचा अपघात झाला तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन पाहिजे जर तुम्ही जर वाहन चालवत जर असाल तर त्याच्यानंतर पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला जर तुमचा पाण्यात बुडून जर मृत्यू जर झाला चौकशी अहवाल पोस्टमॉर्टम अहवाल बुडून बेपत्ता झाल्यास प्राथमिक माहिती अहवाल आणि क्षतीपूर्ती बंदपत्र आवश्यक असत
त्यासाठी त्यानंतर जंतुनाशक म्हणजे जर तुम्ही फवारणी करताना जर तुमच्या अंगावरती जर काय औषध वगरे उडाल आणि त्याच्यातून तुमचा अपघात जर झाला मृत्यू जर झाला, तर तिथ सुद्धा तुम्हाला चौकशी अहवाल पोस्टम अहवाल आणि रासायनिक विश्लेषण अहवाल तो तुम्हाला मिळून जातो. त्याला त्यानंतर विजेचा धक्का बघा आपल्याला आपलं कायम तिथ संबंध येतो मोटर चालू करायला जाणं बंद करणं आणि पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो करंट बसून मृत्यू होण्याचे अनेक प्रकरण आपण ऐकतो तर त्यासाठी सुद्धा चौकशी अहवाल आणि पोस्टमार्टमचा अहवाल तुम्हाला लागतो.
वीज पडून मृत्यू जर शेतात तुम्ही आहेत पावसाळ्याच्या दिवसात विजा पडतात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तिथे सुद्धा पोस्टमार्टम अहवाल आणि तुम्हाला चौकशी अहवाल गरजेचा आहे. त्यानंतर सर्पदंश म्हणजेच साप चावला, विंचु चावला त्याच्यातून जर तुमचा जर मृत्यू जर झाला, तर तरी चौकशी अहवाल पोस्टमार्टम वैद्यकीय उपचारापूर्वी निधन झाल्याने पोस्टमार्टम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याच प्रमाणपत्र जर तुमचा आधीच मृत्यू झाला पोस्टमॉ्टमर नाही जर केल तुम्हाला कळत साप मृत्यू झाला तर तुम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तुम्हाला त्यांच्या स्वाक्षरीनुसार घेणे आवश्यक असतं. त्यानंतर जनावराच्या हल्ल्यामुळे म्हणजे आता याच्यात काय रेबीज होऊ शकतो, तुम्हाला एखादा जनावरा चावल्यामुळे जखमी मृत्यू आणि जनावरा जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे म्हणजे तुमची डेड बॉडी भेटत नाही अशा वेळेला काय तर औषधोपचाराची कागदपत्र म्हणजे जनावर चावल तुम्ही नंतर औषध उपचार घेतले त्याच्यावर त्याचे जी काही कागदपत्र असतील ती द्या वैद्यकीय अधिकाऱ्याच प्रमाणपत्र लागेल चौकशी अहवाल लागल पोस्टमार्टम लागल आणि क्षतीपूर्ती बंदपत्र आवश्यक आहे.
त्याच्यासाठी त्याच्यानंतर दंगलीच शक्यतो जात जाऊ नका दंगलीत आणि करे जाऊ नका परंतु बाय चान्स गेले तुम्ही तरी तुम्हाला आण मृत्यू जर झाला तर तुम्हाला चौकशी अहवाल पोस्टमार्टम अहवाल आणि दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे म्हणजे पोलिसांकडे सगळे रिपोर्ट असतात की कोण कोण दंगलीत समाविष्ट होतं कोण नव्हतं कोण चुकून गेलं कोणाचा मृत्यू झाला तर त्याचा एक अहवाल तुम्हाला लागेल दंगलीच याचा मृत्यू झाला म्हणून ते प्रमाणपत्र भेटल तुम्हाला त्यानंतर, बाळपणातील मृत्यू बाळपणात मृत्यू जर झाला, तर वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागेल स्वाक्षरी त्यांच्या प्रति स्वाक्षरी सॉरी
अन्य कोणताही अपघात जर झाला तर चौकशी अहवाल पोस्टमॉर्टम अहवाल आणि पोलिसांचा अंतिम अहवाल तर अशा पद्धतीने वेगवेगळी कागदपत्र वेगवेगळ्या अपघातासाठी लागतात खूप उपयुक्त माहिती आतापर्यंत तुमच्यापर्यंत कोणीच पोहोचवली नाही त्यानंतर अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावे जर अपंगत्व आल तरचा विषय आता ते मृत्यूच पाहिल आपण आता अपंगत्व आता निकामी जर झाला अवयव तर डॉक्टरांचा अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याची नोंद असण आवश्यक आहे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र जिल्हा शैल्य चिकित्सक यांचे प्रति स्वाक्षरीत कायम अपंगत्वाच प्रमाणपत्र ते देखील भेटत हे तुम्हाला जोडाव लागणार आता काय वरील कागदपत्र मूळ किंवा राजपत्रित अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेले अथवा स्वयं साक्षांकित असल्यास ग्राह्य धरण्यात येईल स्वयं साक्षांकित देखील चालतात सेल्फ अटेस्टेड मृत्यू कारणाची नोंद सक्षम प्राधिकाऱ्याने स्पष्ट केली असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल या कागदपत्राच्या म्हणजे काय की फवारणी करतानी जर तुमच्या अंगावर जर औषध जर सांडला आणित्याच्यातून तुमचा जर मृत्यू वगैरे होत जर असेल आणि विसरावर काही गरज नाही. जर तुम्हाला एखाद्या प्राधिकाऱ्याने म्हणजे जो काही अधिकारी आहे त्याने जर स्पष्ट नोंद जर केली की याचा मृत्यू या कारणामुळे झालेला आहे तर त्यावेळेस तुम्हाला अहवालची गरज नाही मित्रांनो तुम्ही बळजबी औषध घ्याल तर तुम्हाला हे विमा भेटणार नाही कारण आत्महत्या आत्महत्याला ही योजना लागू नाही आण आत्महत्येचा पाऊल उचलू नका.
मंजूर कसा करायचा विमा आणि त्याच्यासाठी कोणती कार्यपद्धती:
आपण कुठकुठल्या कशा कशा पद्धतीने याची पूर्तता करायची तर आता तुम्हाला कागदपत्र सांगितली त्याच्यापैकी ज्या कारणास मृत्यू झालेला असेल त्या कारनुसार त्याची समोर तुम्हाला कागदपत्र सांगितलेली ती गोळा करायची आणि काय करायची मृत्यूनंतर 30 दिवसाच्या आत तालुका कृषी अधिकाऱ्याकडे नेऊन त्याच्यानंतर काय तर त्या ठिकाणी महसूल अधिकारी पोलीस अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच पथक तुम्हाला भेट देईल आणि त्याची चौकशी करील त्यांना हे काय करण आहे ज्या दिवशी तुम्ही अहवाल सादर कराल त्याच्यानंतर आठ दिवसाच्या आत त्यांना ही चौकशी करावी लागते त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी काय करतात प्राप्त झालेल्या विमा प्रस्तावाची छानणी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव तहसीलदाराकडे पाठवतात म्हणजे आता ही चौकशी झाली. मग यांचे काय आता जे काही प्रकरण जे असतील त्याच्यातले जे जे पात्र प्रकरण जे असतील ते चौकशी म्हणजे त्याची तपासणी करतात, आणि तहसीलदाराकडे पाठवतात त्याच्यानंतर तहसीलदारच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये 30 दिवसाच्या आत संबंधित शेतकरी शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल म्हणजे 30 दिवसाच्या आत तुम्हाला अहवाल सादर करायचा आहे.
त्याच्यानंतर हे पथक तुमच्या घरी भेट देईन आठ दिवसाच्या आत त्याच्यानंतर ते तहसीलदाराकडे प्रस्ताव सादर होईल आणि त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती तुम्हाला तुमच्या बाबत निर्णय घेईल तुम्हाला मदत देण्याबाबत आणि त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत अपघातग्रस्त शेतकरी वारसदारांच्या बँक खात्यात ईसीएस द्वारे निधी अदा करण्यात येईल तर ही जी माहिती आहे अत्यंत उपयुक्त आहे आपल्या शेतकरी बांधवासाठी कारण काहीना काही कारणाने दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू होत असतात. तर जर आपल्याला ही माहिती असली तर आपण आपल्या शेजाऱ्याला, गावकऱ्याला शेजारी शेजारच्या गावातल्या नातेवायकाला, या माध्यमातून आपण मदत करू शकतो. म्हणून आपण या योजनेचा व्यवस्थित रित्या अभ्यास करून कोणती कागदपत्र आहे व्यवस्थित आपण याचा अभ्यास करायचा आहे. आणि या योजनेचा लाभ आपल्या जवळच्या लोकांना मिळवून द्यायचा आहे.
खरं तर अशा घटना घडायला नको कोणालाही मृत्यू यायला नको परंतु काय करणार शेतकऱ्याच जीवन आहे शेतकऱ्यामागे अनेक संकट असतात. आणि त्याच्यात त्याला कधी मृत्यू येईल सांगता येत नाही, त्याच्यामुळे जर असे जे मृत्यू होतात त्याच्यामधून आपण त्याच्या कुटुंबाला हा छोटासा हातभार लावू शकतो.