ग्रामसभेत हे 5 प्रश्न विचारलेच पाहिजेत..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

आमच्या गावातील पुढारी आमचा ऐकतच नाहीत. सगळा कारभार अगदी मनमानी पद्धतीने करतात. अशा पद्धतीची एक सर्वसामान्य तक्रार सर्वच गावांमध्ये बहुतांश प्रमाणात आपल्याला दिसून येते. मात्र असं नेमकं का होतं कारण ग्रामपंचायतीच्या कार्याच्या बाबतीत किंवा ग्रामसभेचे अधिकार याच्या बाबतीत लोक जागृत नसतात.

विशेषतः नव्या पिढीला ग्रामसभेचे अधिकार काय आहेत याबद्दल अजिबात माहिती नसते. आणि आपण या माहितीमध्ये हेच जाणून घेणार आहोत की ग्रामसभेला अधिकार काय आहेत? ग्रामसभा म्हणजे नेमकं काय? आणि ग्रामसभेमध्ये आपण कोणते प्रश्न विचारले पाहिजेत? जेणेकरून आपला गावाच्या कारभारावरती अंकुश राहील.

ग्रामपंचायत म्हणजे नेमकं काय?

सुरुवातीला आपण पाहूया की ग्रामपंचायत म्हणजे नेमकं काय आणि ग्रामसभा म्हणजे नेमकं काय? तर ग्रामपंचायत ही एक घटनात्मक संस्था आहे आणि संविधानाद्वारे स्थापित झालेली आहे. म्हणजे पूर्वीचा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 असेल आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 याच्या अन्वये ग्रामपंचायतींची स्थापना झालेली होती. ग्रामपंचायतीच्या पातळीवरती म्हणजे गावाच्या पातळीवरती ग्रामपंचायत, तालुक्याच्या पातळीवरती पंचायत समिती आणि जिल्ह्याच्या पातळीवरती जिल्हा परिषद अशा पद्धतीची ही थ्री टायर किंवा त्रिस्तरीय व्यवस्था आहे आणि याच्या माध्यमातून गाव असेल तालुका असेल आणि जिल्हा पातळीवरचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार पाहिला जातो.

ग्रामसभा म्हणजे नेमकं काय?

ग्रामसभा म्हणजे नेमकं काय हे पाहणं सुद्धा महत्त्वाच आहे कारण ग्रामसभे व्याख्या माहिती असेल तरच आपल्याला समजतं की ग्रामसभेमध्ये कोण सहभागी होऊ शकतं किंवा कोण सहभागी होऊ शकणार नाही तर ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील सर्व मतदार म्हणजेच गावाच्या हद्दीतील सर्व मतदार हे ग्रामसभेचे सदस्य असतात किंवा सभासद असतात आणि जे गावाच्या मतदार यादीमध्ये ज्यांची नाव आहेत असे सर्व लोक ग्रामसभेला उपस्थित राहू शकतात मात्र ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये जी काही मतदार यादी असेल किंवा गावाची मतदार यादी असेल याच्यामध्ये नाव नसलेला एखादा जर ग्रामसभेमध्ये उपस्थित राहिला तर त्या ग्रामसभेचे सरपंच किंवा अध्यक्ष त्या संबंधित व्यक्तीला ग्रामसभेमधून बाहेर सुद्धा काढू शकतात. अशा पद्धतीचा अधिकार त्यांना आहे.

ग्रामसभा नेमकी कशी बोलवली जाते नियम काय आहेत?

पहिला नियम :- आता ही ग्रामसभा नेमकी कशी बोलवली जाते याचे सुद्धा काही नियम आहेत म्हणजे दोन ग्रामसभांमधील अंतर चार महिन्याचा असू नये अशा पद्धतीचा एक नियम आहे शिवाय ग्रामसभेची नोटीस जी काढली जाते ग्रामपंचायतीकडून ती किमान सात दिवस आधी काढली पाहिजे आणि त्यामध्ये नोटीस काढलेला दिवस ते ग्रामसभेचा दिवस याच्यामध्ये सात दिवसाचा अंतर असलं पाहिजे अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा नियम आहे.

दुसरा विषय :- म्हणजे ग्रामसभेमध्ये जे विषय मांडले जातात ते विषय एक तर सरपंच ठरवतात कोणते विषय मांडायचे आणि दुसऱ्या पद्धतीचे एक विषय असतात ते म्हणजे ऐनवेळी येणारे विषय तर ऐणवेळी येणारे विषय आहेत ते ग्रामसभेच्या पूर्वी दोन दिवस ग्रामपंचायतीला कळवणं आवश्यक असतं सरपंच किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना की आपल्याला हे ऐनवेळी विषय घ्यायचे आहेत अशा पद्धतीचा एक अर्ज ग्रामपंचायतीला सादर करणं आवश्यक आहे दोन दिवस आधी अशाप्रकारे दोन प्रकारचे विषय ग्रामसभेमध्ये चर्चेला घेतले जातात.

आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा तीन ग्रामसभा महत्त्वाच्या आहेत 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर या तीन ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे आणि याच्याशिवाय चौथी एक ग्रामसभा घेतलीच पाहिजे अशा पद्धतीचं बंधन आहे आणि याशिवाय जर अधिकच्या ग्रामसभा घ्यायच्या असतील तर विशेष ग्रामसभा संबंधित ग्रामपंचायत बोलवू शकते त्यासाठी साठी नागरिक सुद्धाग्रामपंचायतीकडे अर्ज करू शकतात.

आपल्या महाराष्ट्रमध्ये जवळपास 27,951 ग्रामपंचायती आहेत. असा डेटा ग्राम विकास विभागाने दिलेला आहे. म्हणजे या ग्रामपंचायतीचा कारभार चालणं किती महत्त्वाचा आहे कारण आजही आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये आहे. नागरीकरणाचा झपाटा वाढलेला आहे. स्थलांतराचा मुद्दा समोर आहे. यामुळे काही युवक आता रोजगाराच्या निमित्ताने शहरामध्ये स्थलांतरित जरी झाले असतील तरी प्रत्येकजण हा कुठेतरी गावगाड्याशी निगडीत असतो आणि आपल्या गावामध्ये काहीतरी सकारात्मक विकास काम झाली पाहिजेत असं प्रत्येकाला वाटत असतं.

ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करायचा कसा आणि नेमके प्रश्न कसे विचारायचे याची टेक्निकल माहिती बऱ्याचदा युवकांना नसते नागरिकांना नसते त्यामुळे प्रश्न विचारले जात नाही आणि जिथे प्रश्न विचारला जात नाही तिथे कारभारामध्ये सुधारणा होत नाही त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार सुधारायचा असेल तर प्रत्येकाने ग्रामसभेला उपस्थित राहिलं पाहिजे प्रश्न विचारले पाहिजेत मात्र ग्रामसभेमध्ये कोणते प्रश्न विचारले पाहिजेत याच्याबद्दलच आता आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाचं म्हणजे या ग्रामसभेला शासकीय कर्मचारी गावाच्या हद्दीमध्ये काम करणारे शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्रामपंचायतीचे कर्मचारी या सगळ्यांनी उपस्थित राहणं आवश्यक असतं.

कोणकोणत्या कर्मचाऱ्यांनी ग्रामसभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे?

आता आपण पाहूया की कोणकोणत्या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या या ग्रामसभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे तर मंडळी गावच्या ग्रामसभेला वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी गाव कामगार तलाठी मुख्याध्यापक यासोबतच पोलीस पाटील गावाच्या हद्दीत कार्यरत असलेले वायरमन आरोग्य सेवक आरोग्य सेविका आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका कृषी सहाय्यक यासोबतच रेशन दुकानदार विद्युत सेवक जलसेवक स्वच्छता ग्रहाचे कर्मचारी यासोबतच सर्व विषय समित्यांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहणं आवश्यक असतं.

आणि या सर्व शास शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा ग्रामसभेमध्ये विचारला जाऊ शकतो म्हणजे वायरमनच एखादं काम जर चुकत असेल तर त्याला विचारणा केली जाऊ शकते किंवा जेसांगितलेले सर्वच शासकीय निमशासकीय कर्मचारी आहेत किंवा ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील यांच्या कार्यपद्धती बाबतचे प्रश्न आणि त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठीच्या काही सूचना असतील तर त्यांना ग्रामसभेमध्ये देता येऊ शकतात ग्रामसभेमध्ये विचारू शकतो असा दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ग्रामनिधी किती जमा झाला आणि त्या ग्रामनिधीचा विनियोग कसा झाला आता ग्राम निधी म्हणजे काय तर ग्रामपंचायतीला दोन प्रकारचा निधी जमा होत असतो एक म्हणजे घरफळा आणि पाणीपट्टी तर या घरफळाचा निधी आणि पाणीपट्टीचा निधी याचा विनियोग खर्च कशा पद्धतीने झाला याच्यासाठीची विचारणा ग्रामसभेमध्ये करता येऊ शकते.

बऱ्याचदा ग्रामपंचायतींमध्ये काय होतं की लिकेज कुठेतरी दिवाबत्तीची सोय वायर बदलणे बल्ब बदलणे अशा पद्धतीने कारणं सांगून बऱ्याचदा भ्रष्टाचार केला जातो निधी मुरवला जातो आणि ग्राम निधी हा थेट गावा गावातील सदस्यांच्या गावातील जे लोक असतात यांच्या खिशातून तो जात असतो त्यामुळे या ग्राम निधीचा विनियोग कसा झाला त्याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झालेला नाही ना त्याची खातर जमा लोक करून घेऊ शकतात नागरिक यासाठीचे प्रश्न विचारू शकतात आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गावात होत असलेल्या विकासकामांबाबतची माहिती सुद्धा नागरिक या ग्रामसभेमध्ये विचारू शकतात म्हणजे आमदार फंड किती आला? खासदारांच्या माध्यमातून काही निधी आला का? याशिवाय जिल्हा नियोजन म्हणजे

डीपीडीसीचा निधी काही आला का?

डीपीडीसीचा निधी काही आला का? याचा प्रश्न विचारू शकतात. शिवाय विकास आराखडा जो वर्षाच्या सुरुवातीला एक विकास आराखडा केला जातो आर्थिक वर्षाच्या सुरुवातीची पहिली जी ग्रामसभा असते त्याच्यामध्ये एक गावाचा विकास आराखडा तयार केला जातो आणि या विकास आराखड्यावरती वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी पडत असतो आता साधारण सोवा वित्त आयोग आहे 17वा वित्त आयोग येईल पुढच्या वेळी तर अशा पद्धतीने हा निधी येत असताना या निधीचा विनियोग कशा पद्धतीने होतोय कामांचा विकास कामांचा दर्जा कशा पद्धतीने राखला जातोय याची सुद्धा तपासणी केली जाऊ शकते आणि त्याबाबतचे प्रश्न विचारले जाऊ शकतात.

गावामध्ये एकूण निधी किती आला?

गावामध्ये एकूण निधी किती आला आणि त्याच्यामधील खर्च किती झाला आणि शिल्लक किती आहे याबाबतचे प्रश्न सुद्धा ग्रामसभेमध्ये विचारले जाऊ शकतात.

रोजगार हमीची काम:

यासोबतच ग्रामसभेमध्ये रोजगार हमीची काम म्हणजे रोजगार हमीच्या माध्यमातून आज अनेक गावांमध्ये विहिरींची काम सुरू असतात शेत रस्ते पानंद रस्ते यासोबतच जनावरांचे गोठे याची सुद्धा काम सुरू असतात आणि या रोजगार हमीतील कामांची माहिती घेता येऊ शकते यासोबतच नवीन काही काम सुचवायचे असतील काही काही काम मंजूर करून घ्यायचे असतील तर याच बाबतच्या सूचना सुद्धा ग्रामसभेमध्ये करता येऊ शकतात.

गावांतर्गत रस्ते सांडपाण्याची व्यवस्था:

आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जो ग्रामसभेमध्ये उपस्थित केला जाऊ शकतो तो म्हणजे गावांतर्गत रस्ते सांडपाण्याची व्यवस्था दिवाबत्तीची सोय शिक्षणाच्या सुविधा अंगणवाडीच्या सुविधा याबाबतचे प्रश्न सुद्धा या ग्रामसभेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि याबाबतीत जर काही सुधारणा सुचवायच्या असतील तर त्या ग्रामपंचायतीला सुचवता येऊ शकतात तर ग्रामपंचायतीच्या कारभारात सुधारणा आवश्यक असेल आणि आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे असं जर प्रत्येकाला तळमळीने वाटत असेल तर उद्या 15 ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक युवकान प्रत्येक नागरिकांना उपस्थित राहिलं पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *