GST 2.0 काय स्वस्त.. काय महाग..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 3 सप्टेंबरला एक मोठी घोषणा केली. सीतारामन यांनी जीएसटी च्या दरांमध्ये बदल केला असल्यास जाहीर केलं देशात 2017 जीएसटी लागू झाला होता तेव्हापासून जीएसटी मध्ये टॅक्सचे एकूण चार स्लॅब होते पण आता आठ वर्षांनी यात मोठे बदल करण्यात आलेत. नव्या बदलानुसार जीएसटी मधले दोन स्लॅब रद्द करण्यात आलेत. म्हणजेच इथून पुढे आता जीएसटीत फक्त दोनच स्लॅब असतील. जीएसटी लागू झाल्यापासून करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल आहेत. जीएसटी चे नवीन दर हे 22 सप्टेंबर पासून लागू होतील. या नव्या दरांचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार आहे. नव्या दरांमुळे अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार असून काही वस्तूंवर तर शून्य जीएसटी आकारण्यात येणार आहे.

जीएसटी मधले हे बदल नेमके काय आहेत? जीएसटी मध्ये आता कोणते दोन स्लॅब असतील? यामुळे कोणत्या वस्तू स्वस्थ आणि कोणत्या वस्तू महाग होतील? याचा सामान्य वर्गाला काय फायदा होणार आहे? सगळ्याचीच माहिती आपण जाणून घेऊयात. राजधानी दिल्लीत बुधवारी 3 सप्टेंबरला जीएसटी कौन्सिलची 56 वी बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे नव्या टॅक्स स्लॅबचा. जीएसटी मध्ये इतके वर्ष चार टॅक्स स्लॅब होते. 5%, 12%, 18% आणि 28% पण नव्या बदलानुसार जीएसटी मधले 12% आणि 28%चे स्लॅब रद्द करण्यात आलेत. त्यामुळं आता इथून पुढे जीएसटी मध्ये 5% आणि 18% हे दोनच प्रमुख स्लॅब असतील. या स्लॅब मध्ये बहुतेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आलाय. याशिवाय लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी वेगळा स्लॅब असेल. हा स्लॅब 40 टक्क्यांचा आहे. जीएसटीतले हे सर्व बदल येत्या 22 सप्टेंबर पासून लागू होतील.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. जीएसटी परिषदेत हे सर्व निर्णय एक मताने घेण्यात आले. यासाठी मतदान घेण्याचीही वेळ आली नाही. त्यामुळे नियोजित दोन दिवसांची बैठक ही एका दिवसातच संपवण्यात आली असं सीतारामन यांनी सांगितलं.

जीएसटी स्लॅब बदलाचा परिणाम सर्वसामान्यांवर कसा होणार:

जीएसटी स्लॅब मध्ये जे बदल करण्यात आले त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर कसा होणार ते पाहू. जीएसटी स्लॅब मधल्या बदलानंतर 28%चा स्लॅब रद्द करण्यात आला असून त्या स्लॅब मधल्या बहुतेक वस्तू 18 टक्क्यांच्या स्लॅब मध्ये आणण्यात आल्यात. तर 12 टक्क्यांचा स्लॅब रद्द करून त्यातल्या अनेक वस्तू पाच टक्क्यांच्या स्लॅब मध्ये आणल्यात. काही वस्तूंवरचा जीएसटी तर शून्य टक्के करण्यात आला आता नव्या बदलानुसार कोणत्या स्लॅब मध्ये कोणत्या वस्तू असतील ते पाहू.

नव्या बदलानुसार पाच टक्के स्लॅब मधल्या वस्तू:

नव्या बदलानुसार जीएसटी च्या पाच टक्के स्लॅब मधल्या वस्तू पुढील प्रमाणे असतील केसांच तेल, शाम्पू, टूथपेस्ट, टॉयलेट साबण, टूथब्रश, शेविंग क्रीम, लोणी, तूप, चीज, दुगजन्य पदार्थ, नमकीन, भांडी, दुधाच्या बाटल्या, नॅपकिन्स, लहान मुलांसाठी क्लिनिकल डायपर, शिलाई मशीन आणि त्याचे पार्ट्स, थर्मामीटर, मेडिकल ग्रेड, ऑक्सिजन, सर्व डायग्नोस्टिक किट, ग्लुकोमीटर ,चश्मा, ट्रॅक्टर टायर, ट्रॅक्टरचे पार्ट्स, कीटकनाशक, ठिबक सिंचन प्रणाली, स्प्रिंकलर, मासे, साखर, चॉकलेट, कोको, पावडर, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, नुडल्स, बिस्किट, जाम, जेली, मुरंबा, काजू, काजू पेस्ट, सुकामेवा, केक, साठवलेला भाज्या, फळ, आईस्क्रीम, सायकल, हस्तकलेच्या वस्तू, बांबूचे फर्निचर, कंगवे, छत्र्या, अडीच रुपयापर्यंतचे कपडे आणि चपला या सर्व वस्तूंवर आता पाच टक्के टॅक्स लावला जाईल.

याशिवाय हॉटेल रूम बुकिंग वरचा जीएसटी सुद्धा 12 टक्क्यावरून पाच टक्क्यापर्यंत कमी करण्यात आलाय जर रूमच भाड दररोज साडे हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर हा नवा दर लागू होईल सोबतच सौंदर्य आणि आरोग्य सेवा जसं की जिम, सलून, योगा सेंटर यांच्यावरचा जीएसटी सुद्धा 18 टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय.

18% स्लॅब मध्ये कोणकोणत्या वस्तू असतील:

नव्या बदलानुसार जीएसटी च्या 18% स्लॅब मध्ये कोणकोणत्या वस्तू असतील ते पाहू यामध्ये सर्वसामान्यांच्या कामाच्या अनेक वस्तू आहेत 1200 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या पेट्रोल एलपीजी आणि सीएनजी कार 1500 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या डिझेल आणि डिझेल, हायब्रिड कार तीन चाकी वाहन 350 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या मोटरसायकली वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहन एअर कंडिशनर्स एलईडी आणि एलसीडी, टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर, डिश वॉशर, वॉशिंग मशीन 2500 रुपयापेक्षा जास्त किमतीचे रेडीमेड कपडे, ग्राफिक पेपर, सिमेंट, कोळसा या सर्ववस्तूंवर आता 18% जीएसटी लागू होणार आहे.

लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी जीएसटी मध्ये 40% चा वेगळा स्लॅब:

या दोन स्लॅब शिवाय लक्झरी आणि हानिकारक वस्तूंसाठी जीएसटी मध्ये 40%्यांचा वेगळ्या स्लॅबचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. या स्लॅब मधल्या वस्तूंवर इथून पुढे 40% जीएसटी लागू होईल. या स्लॅब मध्ये पान मसाला, सिगरेट, गुटखा, तंबाखू, बिडी, कॅफेन युक्त ड्रिंक्स, अल्कोहोल नसलेली ड्रिंक्स, स्मोकिंग पाईप, रिवॉल्वर, पिस्तूल, 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या मोटरसायकली खाजगी विमान, बोटी, कॅसिनो, जुगार, घोड्यांच्या शर्यती, लॉटरी आणि ऑनलाईन मनी गेमिंग यांचा समावेश आहे. या सर्व गोष्टींवर आधी 28% जीएसटी लागू होता जो आता 40% करण्यात आलाय.

अनेक वस्तूंवरचा टॅक्स 0% करण्यात आलाय:

नव्या जीएसटी बदलानंतर अनेक वस्तूंवरचा टॅक्स 0% करण्यात आलाय. यामध्ये 33 प्रकारची जीवनरक्षक औषध, कॅन्सरची औषध, दुर्मीळ आजारांची औषध, वैयक्तिक जीवन विमा, आरोग्य पॉलिसी, नकाशे, चाट, ग्लोब, पेन्सिल, शार्पनर, क्रेऑन, अभ्यासाची पुस्तकं, नोटबुक, खोडरबर, पॅक केलेल दूध आणि पनीर, पिझ्झा ब्रेड, खाकरा, चपाती, पराठे यांचा समावेश आहे.

पॉलिसी धारकांना कसा होईल फायदा:

सरकारन विमा प्रीमियम बाबत मोठं पाऊल उचलत पर्सनल लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम वरचा 18% जीएसटी थेट शून्य टक्क्यांच्या स्लॅब मध्ये आणलाय. याचा अर्थ असा की येत्या 22 सप्टेंबर पासून पॉलिसी होल्डरला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. 2017 देशात जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच विम्यावर ही कपात करण्यात आली आहे. हा बदल सर्व पर्सनल युलिप प्लॅन, फॅमिली फ्लोटर प्लन, सीनियर सिटीजन्स प्लन आणि टर्म प्लनवर लागू होईल.

सरकारन इन्शुरन्स प्रीमियम वरचा कर रद्द करावा अशी मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती. यानुसार आता सरकारन हे बदल केलेत. आता याचा फायदा पॉलिसी धारकांना कसा होईल तर समजा एखाद्या व्यक्तीचा पॉलिसी प्रीमियम दर महा 20 हजार रुपये होता तर आतापर्यंत तिला 18% दरान 3600 रुपय टॅक्स भरावा लागत होता. म्हणजेच हा टॅक्स जोडून त्या व्यक्तीला 23,600 रुपये भरावे लागत होते पण आता यावर जीएसटी 0% झाल्यान कराचा हा अतिरिक्त खर्च वाचेल आणि फक्त मूळ प्रीमियमच भरावा लागेल त्याचप्रमाणे जर एखाद्याचा प्रीमियम 10000 रुपये असेल तर त्याचे वरचे 1800 रुपये वाचतील 0% जीएसटी मुळे आता लोकांना विमा खरेदी करणं अधिक परवडणार ठरणार आहे.

आता या सगळ्या बदलाचा सरकारच्या तिजोरीवरही परिणाम होणार आहे. निर्मला सीतारामन यांनी म्हटलय की रोजच्या वापरातल्या वस्तूंवरचा कर कमी केल्यान सुरुवातीला महसूलावर परिणाम होऊ शकतो. एसबीआयच्या रिसर्च नुसार यामुळे दरवर्षी 85 हजार कोटी रुपयांच्या महसूलाचा नुकसान होऊ शकतं. पण निर्मला सीतारामन यांच्या मते लॉंग टर्म मध्ये वस्तूंची खरेदी वाढून त्याद्वारे ही भरपाई केली जाईल.

शिवाय 40% स्लॅब मधल्या लक्झरी आणि हानिकारक वस्तूद्वारे सुद्धा सरकारला चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की यावर्षी दिवाळीला सर्वसामान्यांना मोठी भेट मिळणार आहे. सरकार जीएसटी मध्ये सुधारणा आणते ज्याचा फायदा सामान्य लोकांना होईल असं मोदींनी सांगितलं होतं. पण सरकारन दिवाळी ऐवजी 22 सप्टेंबरला म्हणजेच नवरात्राच्या पहिल्या दिवसापासूनच जीएसटी मध्ये बदलाची घोषणा करून सर्वसामानांना मोठं गिफ्ट दिलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *