हरितालिका पूजा.. शुभ मुहूर्त, कोणी, कशी आणि का करावी? सविस्तर माहिती..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

ओम नमः शिवाय गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असते. यंदा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत. त्यामुळे हरतालिकेच व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतं अशी हरतालिकेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे बघणार आहोत. हरतालिकेचे व्रत सौभाग्यवती स्त्रियांसोबतच कुमारिका पण करू शकतात.

पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले. आणि तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून जगभरातील मुली, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचे व्रत करू लागल्या असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो यासाठी हे हरतालिकेचे व्रत करतात.

पूजेसाठी लागणारे साहित्य:

तर आता आपण हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया हरितालिकेच्या पूजेमधील सर्वात महत्त्वाचं साहित्य आहे ते म्हणजे वाळू या दिवशी वाळूचा महादेव बनवून त्यांची पूजा करणं हा या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर या ठिकाणी वाळू स्वच्छ धुऊन घ्यायची आहे.

त्याबरोबरच झाडांची पाने देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तर यामध्ये ना मी चिक्कू, आघाडा, बेलाची पानं त्याबरोबरच इथे पेरूची पान, सीताफळ, रामफळ, डाळिंब आणि दुर्वा थोडक्यात काय आपल्याला यामध्ये फळ झाडं, फुलं झाडं बेल,आघाडा दुर्वा यांचा समावेश असावा तर हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल त्याबरोबरच महादेवांची पूजा आहे त्यामुळे बेलाची पाने, पांढरी फुले त्याबरोबर बरोबर विड्याची पाने, आघाडा, दुर्वा गणपती बाप्पांसाठी, पिवळी फुले, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फुल घ्यायचे आहे आणि नैवेद्यासाठी पाच प्रकारची फळं किंवा तुमच्याकडे असेल ती फळ घेऊ शकता. दोन समया, वाती आणि तूप घालून घ्यायच्या आहे तुम्ही तुपाचा एखादा वेगळा असा दिवा पण घेऊ शकता. समयी पण लावू शकता.

पूजा साहित्यामध्ये स्वच्छ पाणी, पंचामृत, नैवेद्यासाठी वेगळं पाणी, महादेवांसाठी भस्म त्याबरोबरच हळदी, कुंकू, अक्षता, चंदन घेतला आहे गूळ खोबरे त्याबरोबरच गणपतीचे प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे घंटा, कापूर, धूप, अगरबत्ती त्याबरोबरच काही विड्याच साहित्य घ्यायचं आहे पांढरी वस्त्रमाळ त्यासोबतच रंगीत वस्त्रमाळ देखील घ्यायची आहे माचिस आणि या दिवशी आपण महादेवांबरोबर पार्वतीची ही पूजा करतो त्यामुळे पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार घ्यायचे आहेत. तर मिळेल तेवढं साहित्य हरतालिकेच्या पूजेसाठी घ्यायचं आहे. पण ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे शेवटी भाव महत्त्वाचा असतो तुमच्याकडे यापैकी जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी मनोभावी पूजा केली तरीही आपल्याला या पूजेचे फळ मिळू शकतं.

पूजा कशी करावी?

हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे या दिवशी तुम्ही केस पण धुऊ शकता त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन कपडे घालायचे आहेत यावेळी तुम्ही साजे शृंगार पण करू शकता त्यानंतर आपली घरातली रोजची देवपूजा करून मग आपण ही हरतालिकेची पूजा मांडू शकतो. देवासमोर जागा असेल तर तिथे पण पाठ मांडून तुम्ही ही पूजा करू शकता किंवा दुसरीकडे पूजा मांडायची असेल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ मांडावा पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत.

पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदीकुंकू लावायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे. पण लक्षात ठेवा वाळू आपण पूजेसाठी वापरणार आहोत म्हणून ती स्वच्छ धुऊन घ्यावी नाही तर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अति उत्तम या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे. आता अनेक जणांना असं वाटेल की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर मग आम्ही त्या पिंडीची पूजा करू शकतो का? पण नाही हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूचीच पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्यांचीच पूजा करायची आहे.

हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा. या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीच पाटावरती काढणार आहोत महादेवांपुढे नंदी तर हवाच तर नंदी काढायचा आहे त्याबरोबरच आपल्याला गणपती सुद्धा मांडायचा आहे महादेवांसमोर जो उभ्या आकाराचा वाळूचा ढग करायचा आणि त्याची नांदी म्हणून पूजा करायची. त्याच्याच बाजूला आपला गणपती असेल तसेच पार्वती माता तिच्या सखींसह आपल्याला काढायची आहे. कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या च्या सखींसोबत केली होती म्हणून तिच्या सखी सुद्धा आपण काढणार आहोत. तर आपण वाळूच्या अशा दोन हरतालिका गौरी बनवायच्या आहेत. तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण मांडू शकता नसेल तर काही हरकत नाही आपल्याला वाळूचे लिंबा एवढ्या आकाराचे ढक करून ठेवायचे आहेत आणि त्याचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून करणार आहोत.

तसेच पाटाच्या कडेने वाळूची बॉर्डर पण तयार करून घेऊ शकता. तर आपण पाटावर जी महादेवाची पिंड काढलेली आहे तर पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपण महादेवाची पिंड बनवायची आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा दिव्याची हळद-कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची दिव्याला नमस्कार करायचा “दिव्या दिव्या दीपकार, कानी कुंडलमोती हार, दिव्याला पाहून नमस्कार” हा साधा सोपा श्लोक तुम्ही म्हणू शकता.

त्यानंतर पूजेची सुरुवात करतो आपण गणेश पूजनाने तर त्यासाठी एका ताम्हणामध्ये गणपती म्हणून सुपारी घेतली आहे तुम्ही गणपतीची देवघरातील मूर्ती पण घेऊ शकता सर्वात आधी गणपतीला आपण शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत त्यानंतर तीन पळी पंचामृत घालायचा आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचा आहे. “वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा” श्री गणेशाय नमः जर तुम्ही देवपूजा करतानाच गणपतीचे पूजन केलं असेल तर ही वेगळी सुपारी मांडण्याची गरज नाही देवपूजा झाली की तुम्ही पाटावरती लगेच फक्त एवढीच पूजा मांडू शकता सुपारी न मांडता तर आता आपण विधिवत पूजा करतोय त्यामुळे सुपारी मांडयची आहे. गणपतीच प्रतीक म्हणून तर आता पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदीकुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची पूजा करूया गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा आणि लाल फूल अर्पण करायचा आहे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे श्री गणेश देवताभ्य नमः नैवेद्यम समर्पयामी गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा आहे.

आता आपण महादेवाची पूजा करणार आहोत पण हा वाळूचा महादेव आहे त्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृताचा वापर आपल्याला करता येणार नाही त्यामुळे तुम्ही फुलान पाणी शिंपडलं तरी पण चालेल किंवा थोडसं पाणी किंवा पंचामृत तुम्ही अभिषेक म्हणून घालू शकता शुद्धोदक स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी महादेवांवरती तसेच गणपती नंदी आणि पार्वती मातेलाही स्नान घालायचा आहे शेवटी पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायच आहे शुद्धोदक स्नानम समर्पयामी महादेवांना भस्म लावायचा आहे अक्षता अर्पण करायच्या आहेत इकडे गणपती आणि नंदीलाही हळदीकुंकू वाहून घ्यायचा आहे आणि पार्वती मातेला आणितिच्या सखीलाही हळदीकुंकू वाहायचा आहे सर्वांना अक्षता वाहायचे आहेत फुले अर्पण करायची आहेत महादेवांना पांढरी फुले अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे पांढरी फुले अर्पण करावीत त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ महादेवांना घालायची आहे आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि पार्वती माता आणि तिच्या सखीला घालायची आहे.

बाकी तुम्ही महादेवांना वाहण्यासाठी जे काही घेतलं असेल ते मनोभावे अर्पण करावे बेलपत्र ही या पूजेमध्ये खूप महत्त्वाचा आहे महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे तर बेलपत्र आपल्याला पालथ वाहायचा आहे त्याबरोबरच धोत्र्याच फळ धोत्र्याच फूल घेतलेला आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्याला या पूजेसमोर दोन विडे ठेवायचे आहेत एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा महादेव पार्वतीचा तर इथे आपण एकावर एक अशी दोन विड्याची पाने ठेवली आहेत आणि त्यावर जे विड्याच साहित्य घेतलं होतं ते ठेवून घ्यायच आहे. खारीक खोबरं हळकुंड बदाम सुपारी नानं एवढं साहित्य आहे त्या विड्यावरती पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल वाहायची आहेत.

त्यानंतर आपण माता पार्वतीला सौभाग्याच वान अर्पण करू तर आपल्याला बाजारामध्ये एक पुडी मिळते त्यामध्ये सर्व साहित्य असतं हळदी कुंकू, काळे मणी, हिरव्या बांगड्या, टिकली, आरसा त्यासोबतच इथे यामध्ये ओटीच साहित्य पण आहे तर हे सौभाग्याच वान आपण माता पार्वतीला अर्पण करायचा आहे. गजरा देखील ठेवला आहे त्यानंतर या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाच्या आहेत ती या पत्री आपण शिवपिंडीवर म्हणजे महादेवांवरती ठेवणार आहोत या पत्री पूर्ण पिंडीवरती आपल्याला ठेवायच्या असतात ज्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो तर त्याच पद्धतीने आपल्याला पत्री देखील पिंडीवरती पालथ्या ठेवायच्या असतात. महादेवाची पिंड नाही दिसली तरी चालेल ती पूर्ण झाकूनच जात असते या पत्री ठेवल्यावरती या पत्रींमध्ये काही फळ, झाडं, फुलं, झाडंदुर्वा, बेल, आघाडा यांचा समावेश असावा.

त्या पत्रींवरती देखील आपल्याला भस्म हळदी कुंकू वाहायचा आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप ओबाळून घ्यायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे तर पाण्याने मधल्या दोन बोटाने पाण्याच मंडल करायचा आहे आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे इथे मी नैवेद्यामध्ये काही फळं आणि पंचामृत घेतला आहे तर तीन वेळा त्याभोवती पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी अशाप्रकारे नैवेद्य दाखवायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे स्त्रिया असतील असतील तर मला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे आणि मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे. पूजा झाल्यावर हरतालिकेची कहाणी वाचायची आहे आणि महादेवांची आरती करायची आहे ही हरतालिकेची पूजा करत असताना आपल्याला ओम उमामहेश्वर देवताभ्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *