“अहिल्यानगर” मधलं केलवड कोऱहाळे गाव 16 ऑगस्टच्या दुपारी या गावात एक विचित्र प्रकार घडला दुपारी साधारण एक वाजल्यापासून रात्री साडे आठनऊ पर्यंत गावातल्या विहिरीजवळ लोकांची प्रचंड गर्दी जमली होती त्याचं कारण होतं विहिरीत आढळलेला एका चिमुकलीचा मृतदेह या चिमुकलीचा मृतदेह विहिरीत तरंगत होता या चिमुकली सोबत नक्की काय घडलं असेल हा प्रश्न होता त्यामुळे गावकरी त्याबद्दल चर्चा करायला लागले तोवर त्याच विहिरीवर आणखी दोन मृतदेह तरंगताना दिसले थोडा वेळ गेला आणि मग अजून दोन मृतदेह दिसून आले एकाच गावात एकाच विहिरीत एवढे मृतदेह सापडल्याने गावकऱ्यांच्या मनात भीतीच वातावरण निर्माण झालं. गावकरी आणि तिथल्या राहता पोलिसांनी तब्बल आठ तास विहरीतून मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम चालवली. 40 फूट कोल मिरीच पाणी त्यात तरंगणारी मृतदेह आजूबाजूला गावकऱ्यांची गर्दी आणि विहरीच्या बाजूलाच उभी असलेली एक संशयास्पद टू व्हीलर जस जसा तपास पुढे सरकत गेला तस तसं उलगडत गेलं एक थरका पुडवणार सत्य विहरीतून बाहेर आले तब्बल पाच मृतदेह त्यात चार मृतदेह हे लहान लेकरांचे होते तर एक मृतदेह एका 35 वर्षाच्या माणसाचा होता हा माणूस होता अरुण काळे आणि ती चारही चिमुकली लेकरं ही त्याचीच मुलं.
जेव्हा या घटनेचा तपास पोलिसांनी केला तेव्हा या पाच ही मृत्यू मागचं एक धक्कादायक कारण समोर आलं एका बापान आपल्यासोबत आपल्या चारही लेकरांना विहिरीत ढकलून एवढ्या क्रूर पद्धतीने का संपवलं पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला.
या घटनेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे बघूया :
कुऱहाळे गावात असलेल्या शेतात मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन येत असतात. 16 ऑगस्टलाही मेंढपाळ त्या भागात होते. त्यातले दोन मेंढपाळ साडेबारा च्या दरम्यान विहिरीवर पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना धक्का बसला कारण विहिरीच्या पाण्यावर एका चिमुकलीचा मृतदेह तरंगत होता. तो मृतदेह पाहून दोघं मेंढपाळ घाबरले. चिमुकली सोबत काही बरं वाईट झालं असेल असं त्यांना वाटलं त्यांनी लगेच गावचे पोलीस पाटील सुरेश गमे यांनाही गोष्ट सांगितली.
सुरेश यांनी लगेच राहता पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीनचव्हाण, पोलीस उपाधीक्षक शिरीश वमने हे पोलिसांच्या टीम सह घटनास्थळी दाखल झाले. शिर्डी आणि राहता नगरपरिषदेच्या आपत्ती निवारण पदकालाही बोलवण्यात आलं. शेतातल्या विहिरीकडे जाताना पोलिसांना आधी एक टू व्हीलर दिसली. आजूबाजूला जमलेल्या लोकांना पोलिसांनी या गाडीबद्दल विचारलं तेव्हा त्यातल्या कोणाची ही गाडी नसल्याचं लोकांनी सांगितलं गाडी संशयास्पद वाटली म्हणून पोलिसांनी लगेच टेक्निकल टीमच्या मदतीने त्या गाडीची माहिती काढली. ही गाडी रजिस्टर होती शीला अरुण काळे या महिलेच्या नावावर. पोलिसांनी लगेच त्या महिलेला फोन लावला तुमची गाडी या शिवारात सापडली तेव्हा शिला काळेने सांगितलं की ही गाडी तिच्या नवऱ्याची आहे आणि 15 ऑगस्ट पासून तिच्या चार मुलांना घेऊन तो बेपत्ता आहे शीलाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना हा मृतदेह तिच्या मुलीचा असू शकतो असं वाटलं म्हणून खात्री करण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाचा फोटो शीला पाठवला.
मृतदेहाचा फोटो बघून शीला धक्काच बसला कारण तो मृतदेह तिच्याच मुलीचा होता. शीला कडून पोलिसांना मृतदेहाची खात्री पडली पण त्यांच्या डोक्यात शीलाच एक वाक्य फिरत होतं ते म्हणजे तिचा नवरा चारही मुलांना घेऊन बेपत्ता आहे त्यातल्या एका मुलीचा मृतदेह अशा अवस्थेत सापडला मग बाकीची तीन मुलं कुठे असतील त्यांच्या सोबतही असाच काही प्रकार तर झाला नसेल ना शिवाय त्यांच्या वडिलांची म्हणजेच अरुण गाळेची गाडी इथेच आहे म्हणल्यावर तो आणि त्याची बाकीची तीनही मुलं इथेच कुठेतरी असतील असं पोलिसांना वाटलं आणि त्यांनी आजूबाजूला शोधाशोध सुरू केली. बाकीच्या तीन मुलांचे मृतदेह सुद्धा विहिरीत नसतील ना असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलीस पुन्हा जेव्हा मृतदेह सापडलेल्या विहिरीकडे आले तेव्हा त्यांना काही वेळात तिथे अजून दोन लहान मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. पोलिसांना जो संशय होता तसच घडलं होतं.
ही बातमी आता गावात वाऱ्यासारखी पोहोचली होती. त्यामुळे शेतातल्या विहिरीकडे पोलिसांसह गावकऱ्यांची गर्दी जमली. त्या दोन लहान मुलांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस जेव्हा गेले तेव्हा विहिरीत असलेल्या पाण्यामुळे आणि शेवाळामुळे ते मृतदेह हातातून निसटले आणि पुन्हा विहरीत खोलवर खाली गेले. आता विहीर पाण्याने भरलेली. शिवाय विहिरीची खोलीही जास्त होती.
साधारण 35 ते 40 फूट खोल त्या विहिरीत पाणी होतं त्यामुळे तळाला गेलेले मृतदेह काढणं हा मोठा टास्क होता. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी एक खाट आणली या खाड्याला चारही बाजूने दोरी बांधण्यात आली आणि ही खाट खाली विहिरीत सोडण्यात आली. गावातलाच एक माणूस विहिरीमध्ये उतरला आणि या खाड्याच्या माध्यमातून बाकीचे मृतदेह शोधू लागला. बराच वेळ गेला.
विहिरीच्या तळाला नक्की कोणत्या बाजूला मृतदेह आहे हे कळत नव्हतं शेवटी बऱ्याच वेळानंतर एक मृतदेह वर आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मृतदेह आधी तरंगणाऱ्या लहान मुलांचा नव्हता तर तो मृतदेह त्यांचा बाप अरुण काळेचा होता. त्याच्या मृतदेहाचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले होते साधारण पाच साडेपाच च्या दरम्यान पोलिसांना अरुण काळेचा मृतदेह मिळाला पण इथ हा तपास अजून थांबला नव्हता कारण पोलिसांना शोधायचे होते तीन लहान मुलांचे मृतदेह संध्याकाळची वेळ झाली सगळीकडे अंधार झाला शिवाय ज्या शेतातल्या विहिरीत हे मृतदेह होते तिथे पाऊस पडल्यामुळे आजूबाजूला गाळा तयार झाला
मृतदेह शोधणं अजून कठीण झालं संध्याकाळी सात च्या दरम्यान एका छोट्या मुलाचा मृतदेह वर आला त्यानंतर साडेत आणि आठ ला अजून दोन मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना आणि गावकऱ्यांना यश आलं रात्री आठ वाजता पोलिसांची ही शोध मोहीम थांबली अरुण काळेन आपल्या चार मुलांसह स्वतःला संपवल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं पण असं का झालं याचा पोलीस शोध घ्यायला लागले आणि यातून या मागच्या कारणाचा उलगडा झाला.
अहिल्यानगर मधल्या श्रीगोंदा तालुक्यातील चिखली गोरेगाव मध्ये अरुण काळे राहत होता. त्याची पत्नी शीला काळे आणि चार लहान मुलं असा त्यांचा संसार. आठ वर्षांची मोठी मुलगी शिवानी आणि तीन मुलं प्रेम वीर आणि कबीर अशी त्यांच्या मुलांची नाव त्यातील दोन मुलं अरुणने मेहकळी फाट्याजवळ असलेल्या वीरभिद्र आश्रमशाळेत शिकायला ढवली होती पण अरुण आणि शीला मध्ये मात्र नेहमी वाद व्हायचे शीला पोलिसांना सांगितल्याप्रमाणे अरुण शिलाला मारहाण करायचा तो रोज घरी आला की दोघांच भांडण व्हायचं पण आठवड्याभरापूर्वी हे भांडणटोकायला गेलं आणि रागाच्या भरात ४ ऑगस्टला शिला घर सोडून तिच्या माहेरी येवल्याला निघून गेली. शिला माहेरी जाताना तिन तिच्या दोन लहान मुलांना तिच्या सोबत नेलं होतं पण 11 तारखेला अरुण येवल्याला गेला आणि त्या दोन लहान मुलांनाही त्यान आश्रमशाळेत शिकायला पाठवलं चारही मुलं एकत्र राहतील शिकतील असं अरुणच म्हणणं होतं त्यान शीला लाही आपल्यासोबत येण्याची विनंती केली पण शीलाचा राग गेला नव्हता.
तिन तेव्हाही परत घरी यायला नकार दिला. अरुणला वाटलं की हा नेहमीसारखाच वाद आहे राग शांत झाला की शीला परत येईल पण शीला तिच्या निर्णयावर ठांब होती तेव्हा संतापलेल्या अरुणन तिला वेगवेगळ्या धमक्या द्यायला सुरुवात केली. 15 ऑगस्ट या दिवशी अरुणने शीला फोन केला तू जर परत आली नाहीस तर मी आपल्या चारही मुलांसोबत स्वतःला संपवेन अशी धमकी त्याने शीलाला दिली. आता गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अरुणच्या या धमक्या शीलाला काय नवीन नव्हत्या पण तरीही या धमकीमुळे शीला थोडी घाबरली.
तिने लगेचच मुलं ज्या आश्रमशाळेत शिकत होती त्या आश्रमशाळेत फोन केला आणि तिथल्या शिक्षकांना मुलांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देऊ नका असं सांगितलं पण तो वर उशीर झाला होता. अरुण आधीच मुलांना घेऊन तिथून निघून गेला होता. अरुण 15 ऑगस्टचा ध्वजारोहण झाल्यावर आश्रमशाळेत गेला. सुट्टी आहे तर मुलांना त्यांच्या आईकडे नेतो आणि त्यांचा हेअर कट करून आणतो असं शिक्षकांना सांगून तो मुलांना आश्रमशाळेतून घेऊन गेला. आता स्वतः वडीलच मुलांना घेऊन जाण्यासाठी आल्यान आश्रमशाळेतल्या शिक्षकांनी जास्त चौकशी केली नाही. त्यांनी मुलांना अरुण सोबत सोडलं आणि अरुण टू व्हीलर वरून मुलांना येवल्याच्या दिशेने घेऊन गेला. मुलं ही खुश होती कारण त्यांना त्यांचे वडील घ्यायला आले होते. पण या चिमुकल्यांच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती.
आश्रमशाळेतून निघाल्यावर अरुण शीला फोन करत होता पण शीला अरुणचा नंबर ब्लॉक केला होता. आधीच भांडण त्यात शीला घर सोडून गेली होती. परत यायलाही नकार देते आणि आता फोनवरही आपल्याला ब्लॉक केलं या सगळ्याचा संताप अरुणला अनावर झाला. रागाच्या भरात अरुणन शिर्डी बायपास रोडला असलेल्या कोराळे गावच्या बाजूलात्याची गाडी थांबवली. मुलही गाडीवरून खाली उतरली अरुण पुढे चालायला लागला आणि त्याच्या मागे मुलं जायला लागली. आता पुढे काय करायचं हे सगळं अरुणच्या डोक्यात पक्क होतं त्याने बरोबर रस्त्याच्या बाजूला शेतात असलेली विहीर पाहून गाडी उभी केली होती. अरुण विहिरी जवळ आला तशी मुलही त्याच्या मागोमाग तिथे पोहोचली तेव्हा कसलाही विचार न करता अरुणनन एक एक करून आपल्या चारही मुलांना विहिरीत टाकलं आपले बाबा आपल्यासोबत काय करतायत हे कळण्याचा वेळही त्या मुलांना मिळाला नाही.
त्यांना आरडाओरडा करण्याची किंवा तिथून पळून जायची संधीही अरुणन दिली नाही मुलांना विहिरीत टाकल्यावर अरुणन स्वतःचा एक हात आणि पाय दोरीने बांधून घेतला आणि स्वतःही विहरीत उडी मारली वडिलांसह त्याच्या चारही चिमुकल्या मुलांचा शेवट झाला. 15 ऑगस्टला ही घटना घडल्यानंतर 16 ऑगस्टला हे मृतदेह वर तरंगायला लागल्यावर त्याबद्दल सगळ्यांना माहिती मिळाली आता पोलिसांच्या प्राथमिक तपासात तरी बायकोवर असलेल्या रागातून अरुणन आपल्यासह त्याच्या मुलांना संपवल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय पण या प्रकरणामागे आणखी कारण आहे का या पाचही जणांच्या मृत्यूमागे शीला किंवा त्याच्या सोबतच्या कोणाचा हात तर नाही ना याचा शोध पोलीस घेतात. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद…!