चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे केंद्रातल्या मोदी सरकार मधले तीन किंग मेकर या तिघांच्या मदतीशिवाय मोदींचे सरकार टिकू शकत नाही हे वास्तव आहे पण गेल्या वर्षभरापासून या तिघांच्या नाराजीच्या बातम्या सातत्याने येत आहेत मध्यंतरी एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या शिंदेनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेटही घेतली होती इकडे भाजप आणि नितीश कुमार यांच्यातल्या कुरकुरीच्या बातम्याही सातत्याने येत असतात भाजपला बिहारमध्ये लवकरात लवकर आपला मुख्यमंत्री हवाय यासाठी पक्ष नितीश कुमारांकडे एक्झिट प्लॅन मागत असल्याचं बोललं जातय.
त्यातच आता भाजपचे सर्वात मोठे सहकारी चंद्रबाबू नायडू ही मोदींवर नाराज असल्याच्या बातम्या येतायत गेल्या काही दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे नायडू भाजप नेतृत्वावर प्रचंड नाराज असून ते योग्य संधीची वाट पाहत असल्याचं बोललं जातय पण चंद्रबाबू नायडू मोदींवर एवढे नाराज का आहेत आणि ते खरंच योग्य संधीची वाट पाहतायत का? ही संधी काय असू शकते सगळं जाणून घेऊया या माहितीमधून…
चंद्रबाबू नायडू मोदींवर नाराज असल्याच्या चर्चा का सुरू झाल्यात?
सगळ्यात आधी चंद्रबाबू नायडू मोदींवर नाराज असल्याच्या चर्चा का सुरू झाल्यात ते पाहू या सगळ्याची सुरुवात होते देशात झालेल्या इंडिगो विमान कंपनीच्या क्रायसिस पासून गेल्या 10 दिवसांपासून देशभरात इंडिगोची विमान सेवा ठप्प पडली रोज इंडिगोच्या शेकडो फ्लाईट कॅन्सल होतायत. कित्येक डिले होतायत. याचा फटका लाखो प्रवाशांना बसलाय.
अशा प्रकारच संकट याआधी कधीही निर्माण झालेल नाही. यासाठी जेवढा दोष इंडिगो कंपनीला दिला जातोय तेवढाच दोषी मोदी सरकार मधले नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनाही ठरवलं जातय. नायडू यांच्या मंत्रालयाने ही वेळ का येऊ दिली असे प्रश्न आता विचारले जात आहेत. त्यातच दबक्या आवाजात राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जाते. या सगळ्यामुळे चंद्रबाबू नायडू यांच्यावर दबाव निर्माण होतोय. राममोहन नायडू हे सध्याच्या मोदी सरकारमधले सर्वात तरुण मंत्री आहेत. 2024 मध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या सहकार्याने मोदी सत्तेत आले त्यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालय नायडू यांच्या पक्षाला दिलं. पक्षाकडून राममोहन नायडू यांना या मंत्रीपदाची संधी देण्यात आली.
राममोहन नायडू हे चंद्रबाबू नायडूंच्या अत्यंत जवळचे आहेत. राममोहन यांचे वडील येरा नायडू आणि चंद्रबाबू नायडू हे पूर्वीपासूनचे मित्र. यरा नायडूंच्या मृत्यूनंतर राममोहन हे चंद्रबाबूंच्या मदतीनेच राजकारणात पुढे आले. चंद्रबाबू नायडूंचे चिरंजीव नारा लोकेश आणि राम मोहन नायडू हे सुद्धा चांगले मित्र म्हणजे एक प्रकारे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत पण आता इंडिगो क्रायसिस मुळे राम मोहन नायडू यांच्यावर सगळ्या बाजूने दबाव वाढत असताना ते मोदी सरकारमध्ये एकटे पडल्याचे चित्र निर्माण होत आहे या क्रायसिस साठी मोदी सरकार ऐवजी एकट्या राम मोहन नायडूंना जबाबदार धरलं जातय. त्यातही भाजपकडून त्यांच्या बचावाला कोणीही येत नाहीये. त्यामुळे चंद्रबाबू नायडू भाजपवर नाराज असल्याचं बोललं जातय.
तसं पाहिलं तर याआधी जेव्हा जेव्हा देशात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत त्यावेळी त्या खात्याच्या मंत्र्यांच्या बचावासाठी मोदी किंवा अमित शहा स्वतः पुढे आले आहेत. 2023 मध्ये ओडिशाच्या बालासोर इथं भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातानंतर स्वतः मोदींनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याच्या मागणीने चांगलाच जोर धरलेला. मोदींनी वैष्णव यांचा राजीनामा घ्यावा असा दबाव वाढत होता पण मोदींनी त्यांचा बचाव केला. अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. महत्त्वाचं म्हणजे 2024 मध्ये एनडीए पुन्हा सत्तेत आल्यावर अश्विनी वैष्णव यांनाच रेल्वे मंत्री बनवण्यात आलं म्हणजेच काय तर भाजप नेतृत्वाचा वैष्णव यांना पूर्णपणे पाठिंबा आहे पण अशा प्रकारचा पाठिंबा राम मोहन नायडूंना मिळताना दिसत नाहीये.
आताही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते पण सरकारमधून कोणीही त्यांच्या बचावाला येत नाहीये इंडिगो क्रायसिस बाबत मोदी एकदाही नायडू यांच्याशी बोललेले नाहीत भाजप कडून हे जाणून-बुजून केलं जात असल्याची भावना सध्या टीडीपी मध्ये आहे यामुळे चंद्रबाबू नायडूंसह त्यांच्या पक्षातले अनेक नेते भाजपवर नाराज असल्याचं बोललं जातय.
चंद्रबाबू नायडू यांच्या मोदींवरच्या नाराजीच दुसर कारण:
चंद्रबाबू नायडू यांच्या मोदींवरच्या नाराजीचा आणखी एक कारण आहे ते म्हणजे त्यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी आंध्रप्रदेशात चर्चा आहे की नायडूंचे विरोधक असलेले जगनमोहन रेड्डी हे हळूहळू भाजपच्या जवळ जात आहेत. तसं पाहिलं तर जगन्मोहन रेड्डी हे एनडीए मध्ये अधिकृतपणे सहभागी नाहीत. मात्र त्यांनी गेल्या काही वर्षात अनेक मुद्द्यांवर भाजपला साथ दिली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगन मोहन यांनी इंडियाला समर्थन दिलं होतं. चंद्रबाबू नायडू आणि जगन मोहन रेड्डी यांच्यात 36 चा आकडा असल्याचे म्हणलं जातं. गेल्या वर्षी रेड्डी यांना हटवूनच नायडू आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते. पण आता जगनमोहन भाजपच्या जवळ जात असल्याचं दिसतंय.
ऑक्टोबरच्या शेवटी न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताच्या संसदेचे एक शिष्ट मंडळ गेलं होतं. या शिष्ट मंडळात सरकारन जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाचे खासदार पी व्ही मिथुन रेड्डी यांचाही समावेश केला होता. रेड्डी यांचा वायसआर काँग्रेस आंध्रप्रदेशात विरोधी पक्षात असतानाही सरकारन त्यांच्या खासदाराला शिष्ट मंडळात संधी दिल्यानंतर उलटसुलट चर्चा झाली होती. त्यातच आता इंडिगो क्रायसिस दरम्यान राममोहन नायडू यांच्या बाबत भाजप कडून जी भूमिका पाहायला मिळतेय त्यामुळे चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष आणखीन नाराज झाल्याचं बोललं जातय. त्यामुळे नायडूंचा तेलुगू देस मत योग्य संधीची वाट पाहत असावा जर राजकीय अभ्यासकांना वाटतंय.
नितीश कुमार यांचा जेडीयू सुद्धा भाजपवर नाराज:
बरं फक्त चंद्रबाबू नायडूच नाही तर इकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू सुद्धा भाजपवर नाराज असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला. निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले पण आता भाजपला बिहारमध्ये लवकरात लवकर आपला मुख्यमंत्री हवा असल्याचे सांगितलं जातय.
त्या दृष्टीने पक्षान पावलं टाकल्याचेही दिसतय. यांना 20 वर्षात पहिल्यांदाच नितीश कुमार यांना बिहारच गृहमंत्रीपद सोडावं लागलं. भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे हे पद देण्यात आलय. नितीश कुमार यांना बिहारमध्ये आपल्या पक्षाचा आणखी विस्तार करायचा आहे पण भाजप त्यांच्या एक्झिट प्लॅनची तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत.
नितीश कुमार आणि अमित शहा यांच्या तणाव असल्याच्या बातम्याही नितीश यांच्या शपथविधी सोहळ्याच्या आधी आल्या होत्या. नितीश कुमारांना बिहारमध्ये एनडीएचा नेता निवडण्यात आलं त्यावेळी अमित शहा तिथे उपस्थित नव्हते एकूणच नितीश कुमार हे सुद्धा पूर्णपणे भाजपच्या बाजूने नाहीयेत त्यांचे पंख छाटण्याचं काम भाजप कडून केलं जात असल्यानं ते सुद्धा योग्य संधीची वाट पाहत असल्याची चर्चा आहे सध्या तरी इंडिगो क्रायसिसच्या मुद्द्यावरून चंद्रबाबू नायडू आणि त्यांचा पक्ष मोदींवर नाराज असल्याचं दिसतय भाजपन ज्या प्रकारे राममोहन नायडू यांना एकट पाडलय त्यावरून त्यांच्या पक्षात नाराजी आहे आता ही नाराजी कुठवर राहते आणि यामुळे मुळे केंद्रात काही मोठी घडामोड घडते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

