अमेरिका, इजराईल आणि इराण यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष आता भीषण होत चाललाय. या युद्धामुळे संपूर्ण मध्यपूर्वेतल वातावरण अक्षरशः ढवळून निघालय. आता ही फक्त एक राजकीय लढाई राहिलेली नाहीये तर यात निष्पाप लोकांचाही बळी जातोय. हे कटू वास्तव आता समोर येतय. या युद्धाच्या ज्वाळा आता भारत आणि भारतीयांनाही लागतायत. दरम्यान इराणच्या मिनाब भागातल्या एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात 160 पेक्षा अधिक विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जगभरात संताप व्यक्त केला जातोय. दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत भीती आणि अस्थिरतेच वातावरण निर्माण झालय. या पार्श्वभूमीवर इरानन बदला घेण्याची भूमिका घेत हॉर्मस सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला.
जगातली मोठ्या प्रमाणात तेल वाहतूक याच मार्गाने होत असल्यामुळे या निर्णयाचे परिणाम जागतिक स्तरावर जाणवू लागलेत. याच मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवरही हल्ले होतायत. नुकतच ओमानच्या एका तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यात काही नाविकांचा मृत्यू झाला आणि त्यामध्ये भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी हजारो भारतीय मध्यपूर्वेत राहतात. पण या अचानक भडकलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय तिथे अडकलेत. तर काहींना आपला जीवही गमवावा लागलाय. म्हणूनच या युद्धात आतापर्यंत किती भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय ते भारतीय नेमके कोण होते आणि या संघर्षात एकूण किती जीवितहाणी झाली आहे याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा.
इजराईल आणि अमेरिकन संयुक्त कारवाई करत इराणवर मोठा हल्ला केला आणि त्यानंतर मध्यपूर्वीतली परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर हे युद्ध आणखी भडकल असून दोन्ही देश आता उघडपणे एकमेकां विरोधात उभे ठाकलेत. एकीकडे अमेरिका आणि इजराईलन स्पष्टपणे सांगितलंय की पुढचे 40 दिवस युद्धासाठी आम्ही तयार आहोत तर दुसरीकडे इरान देखील सतत प्रति उत्तर देतय त्याच्यामुळे मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतीय नागरिकांनाही बसू लागलाय;
दरम्यान या संघर्षाची झळ भारतीयांनाही बसती आहे या युद्धाशी संबंधित एका भीषण हल्ल्यात दीक्षित सोळंकी या 25 वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झालाय दीक्षित सोळंकी हा मूळचा गुजरात मधल्या दिवला रहिवासी होता त्याच्या त्याचे वडील अमृतलाल सोळंकी हे मच्छीमार व्यवसाय करतात. काही वर्षांपूर्वी दीक्षित कामानिमित्त मुंबईत स्थायक झाला होता आणि कांदिवली परिसरात राहत होता.
नोकरीसाठी तो ओमानमध्ये एका तेलवाहू जहाजावर काम करत होता. ही घटना ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून सुमारे 52 नॉटिकल माईल्स अंतरावर घडली. एमकेडी व् नावाच्या ऑईल व्हेसलवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन हल्ला केला. हा ड्रोन जहाजाला धडकला आणि मोठा स्पोट झाला. यातच इंजिन रूमला आग लागली आणि या भीषण स्पोटात दीक्षित सोळंकीचा मृत्यू झाला.
या घटनेपूर्वी एक दिवस आधी हॉर्मसच्या सामुद्रधुनीत एमव् स्कायलाईट या जहाजावरही हल्ला झाला होता. या हल्ल्यात बिहार मधले कॅप्टन आशिष कुमार आणि राजस्थान मधले दिलीप सिंह यांना देखील आपला जीव गमवावा लागलाय. हे दोघेही त्या तेलवाहू जहाजावर काम करत होते. मिळालेल्या माहितीनुसार उमानच्या खाडीत असलेल्या स्कायलाईट नावाच्या तेल टँकरवर अचानक हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यानंतर जहाजावर भीषण आग लागली स्पोट आणि आगीमुळे परिस्थिती इतकी भयंकर झाली की दोन्ही भारतीयांचे मृतदेह पूर्णपणे जळाले होते. नंतर बचाव पदकांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले. कॅप्टन आशिष कुमार हे बिहारचे रहिवासी होते ते तीन भावांमध्ये सर्वात मोठे होते त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही साधीच आहे त्यांच्या वडिलांचा व्यवसाय वकिलीचा आहे आशिष नुकतेच 20 जानेवारीला मर्चंट नेवी सामील झाले होते आणि त्यांची पहिली नियुक्ती दुबई इथे झाली होती.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 22 फेब्रुवारीला ते ओमानकडे जाणाऱ्या स्कायलाईट जवार या टँकरवर होते. आशिष यांच्या मागे त्यांच कुटुंब आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा फक्त पाच वर्षांचा मुलगाही आहे जो अजूनही आपल्या वडिलांची वाट बघतोय. माध्यमांशी बोलताना आशिष यांच्या भावान सांगितलं की एक मार्चला बातम्या आणि सोशल मीडियातून त्यांना या हल्ल्याची माहिती मिळाली. ही बातमी ऐकताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुसरीकडे राजस्थानच्या नागोर जिल्ह्यातल्या खिनवाटना गावचे रहिवासी दिलीप सिंह हे देखील या जहाजावर चालक दलाचे सदस्य म्हणून काम करत होते. त्यांनी 22 जानेवारी पासून या टँकरवर आपली ड्युटी सुरू केली होती. पीटीआयच्या माहितीनुसार हल्ला झाला त्यावेळी आशिष कुमार आणि दिलीप सिंह जहाजाच्या पुढच्या भागात उभे होते.
त्यामुळे स्फोटाचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसला आणि या भीषण घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर आता एक गोष्ट स्पष्टपणे समोर येतीय मध्यपूर्वेत सुरू असलेल्या या युद्धाचा फटका आता भारतीय नागरिकांनाही बसू लागलाय नोकरीसाठी परदेशात गेलेल्या या तरुणांचे अशा प्रकारे प्राण जाणं ही अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी घटना मानली जातीय त्याचबरोबर अमेरिका, इजराईल आणि इरान यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज सहावा दिवस आहे.
इराणवर झालेला हल्ला आणि नुकसान
अमेरिकेने इरानवर केलेल्या हल्ल्याला आता जवळपास 100 तास पूर्ण झालेत. या काळात इजराईल आणि अमेरिकेने मिळून इरानवर पाच हजाराहून अधिक बॉम्ब टाकल्याचा दावा केला जातोय. तसच इरानच्या जवळपास 20 युद्ध नौकाही उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती समोर येतीय. या हल्ल्यांमध्ये एक हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातय. दुसरीकड इरानही या हल्ल्यांना जोरदार प्रति उत्तर दिलंय.
इरानन मध्यपूर्वेतल्या नऊ देशांमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं सांगितलं जातय. त्यामुळे हा संघर्ष आता आणखी व्यापक होण्याची भीती व्यक्त केली जातीय. दरम्यान बुधवारी अमेरिकेने श्रीलंकेजवळ भारताच्या दिशेने परतणाऱ्या इरानच्या आय आर आयएस देना या युद्धनौकेवर हल्ला केला आणि हे जहाज बुडाल्याची माहिती समोर आली. हा हल्ला हिंदी महासागरात झाला असल्यामुळे काही विश्लेषकांनी याकड भारतीय समुद्री क्षेत्राच्या जवळ अमेरिकेची लष्करी हालचाल वाढल्याच उदाहरण म्हणून बघितलय.
मात्र या सगळ्या युद्धामध्ये सगळ्यात धक्कादायक आणि माणुसकीला काळीमाफ असणारी घटना म्हणजे इराण मधल्या शाळकरी मुलींचा मृत्यू इराणच्या मिनाप भागात एका शाळेवर मिसाईल हल्ला करण्यात आला या हल्ल्यात तब्बल 165 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी ही भीषण घटना घडली होती. इरानियन रेड कन्सेंट सोसायटीने ही आकडेवारी जाहीर केली आहे या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात असून निरपराध मुलींचा अशा प्रकारे मृत्यू होणं ही अत्यंत वेदनादायक बाब मानली जातीय दरम्यान आता या युद्धाची व्याप्ती हळूहळू वाढताना दिसतीय आणि त्याचा फटका इतर देशांनाही बसू लागलाय त्यात भारताचाही समावेश असल्याचं दिसून येतय खरं तर आखाती देशांमध्ये लाखो भारतीय नोकरी व्यवसाय आणि इतर कामांसाठी राहतात त्यामुळे या संघर्षामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही आता गंभीर बनू लागलाय.
भारतीय नागरिकांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली;
आतापर्यंत या युद्धाशी संबंधित घटनांमध्ये तीन भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. जर हे युद्ध आणखीन लांबलं तर त्याचे परिणाम आखाती देशांमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या भारतीयांवरही होऊ शकतात अशी भीती आता व्यक्त केली जातीय. त्यामुळे भारतातल्या त्यांच्या कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे त्यामुळे मध्यपूर्वेतल्या काही भागात परिस्थिती गंभीर होत चालल्यामुळे तिथल्या भारतीय नागरिकांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे विशेषतः इरानमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये विद्यार्थी पर्यटक आणि नोकरीनिमित्त गेलेले नागरिक यांचा समावेश आहे या सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची आणि मदत करण्याची विनंती भारत सरकारकडे केली आहे त्यामुळे आता सरकार पुढे कोणती पाऊल उचलतय आणि अडकलेल्या भारतीयांना कशी मदत करत याकडे सगळ्यांच लक्ष लागलय.


