भारत सरकारने २१ नोव्हेंबर २०२५ पासून जुने कामगार कायदे जे आहेत ते रद्द केले आणि नवीन ‘लेबर कोड्स’ अर्थात कामगार सहिता लागू केली. या सुधारणांमुळे कामगारांचे पगार, कामाचे तास आणि सामजिक सुरक्षा याबात ते बदल होणार आहेत तर नेमके काय बदल होणार आहेत तर ते जाणून घेऊया…
कामाचे तास आणि सुट्ट्या:
सर्वप्रथम आपण जाणून घेवूया कि आठवड्याला एकूण किती कामाचे तास असतील आणि किती सुट्ट्या असतील तर कामाचे तास हे ४८ तास असतील असं निश्चित केल गेलाय. कंपनीत एकूण 8 ते १२ तास दिवसातून काम असेल म्हणजेच काय तर 8 तासाचे काम १२ तास केले तर चार दिवसात तुम्ही ४८ तास काम करताय. त्यामुळे तुम्हाला तीन दिवस जे आहे ते सुट्टी मिळू शकते.
सरकारचा प्लान काय ?
चार दिवस कामाचे, तीन दिवस सुट्ट्यांचे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. युरोपातील काही देशात हा पॅटर्न लागू आहे. आता भारतात नवीन कामगार संहिता लागू करण्यात आली. त्यात मोदी सरकारने याविषयीचे मोठे संकेत दिले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया…
‘फोर डे’ विकचे सकारात्मक परिणाम:
जगातील काही देशांमध्ये जसे जपान, स्पेन आणि जर्मनीतील कंपन्यांमध्ये ४-दिवसीय कार्य संस्कृती प्रचलित केली गेली.
कार्यालयीन तसेच हेल्थी वर्क कल्चरमुळे उत्पादनात आणि आरोग्यावरील खर्चात मोठी कपात झाल्याचे समोर आले.
येथे आठवड्यातील तीन दिवस सुट्टीचे ज्याचे चांगले परिणामही दिसून आले.
कामगार अन् रोजगार मंत्रालयाचे संकेत काय ?
कामगार आणि रोजगार मंत्रालयाची 12 डिसेंबर रोजी अधिकृत सोशल मीडिया X या हँडलवर एक पोस्ट या पोस्टमध्ये, मंत्रालयाने चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या शक्यतेची पुष्टी केलीये.
मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार, या 48 तासांच्या मर्यादेत राहून 4 दिवसांचा कामाचा आठवडा शक्य आहे.
नवीन कामगार संहितेत एका आठवड्यात जास्तीत जास्त 48 तासांच्या कामाची मर्यादा निश्चित जो पूर्वीपासूनचा नियम आहे.
12 तासांची दैनंदिन शिफ्ट:
4 दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यासाठी सरकारची एक प्रमुख अट निश्चित ज्या आस्थापना आणि त्यांचे कर्मचारी यासाठी तयार असतील, त्यांना एका दिवसात 12 तासांची शिफ्ट करावी लागणार.
अशा प्रकारे 4 दिवसांत 48 तासांची कामाची मर्यादा पूर्ण होईल आणि उर्वरित 3 दिवस कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टया मिळेल.
कर्मचारी आणि आस्थापना यांच्या परस्पर संमतीने हा बदल लागू करण्यास कायदेशीर अडचण येणार नसल्याचे मंत्रालयाचे स्पष्टीकरण.
ब्रेक आणि ओव्हरटाईमचे नियम:
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या माहितीनुसार, 12 तासांच्या दैनंदिन कामाच्या पाळीत कर्मचाऱ्यांना अनिवार्यपणे ‘ब्रेक’ देणे बंधनकारक असेल.
तसेच, जर कर्मचाऱ्यांने आठवड्यातील 48 तासांपेक्षा जास्त काम केले, तर त्यांना सध्याच्या नियमानुसार ओव्हरटाईमचे दुप्पट पैसे द्यावे लागतील.
सामान्य पगार नियम:
कर्मचाऱ्यांचा सामान्य म्हणजेच बेसिक पगार जो आहे तो त्याच्या CTC च्या 50% असणे अनिवार्य आहे.
बेसिक पगार वाढल्यामुळे भविष्य निर्वाह निधी (PF) आपण ज्याला म्हणतो यामुळे हातात येणारा पगार हा काहीसा कमी असू शकतो पण त्याचा फायदा हा निवृत्ती नंतर आपल्याला होणार आहे.
