मराठा समाजाला आरक्षण मिळालं. आता ते मनोज जरांगे पाटलांनी जेवढं काही पाच ते सहा दिवस उपोषण केलं होतं याच्या आधी त्यांनी शिंदे गटाकडून त्यांना एक नवा जीआर मिळाला होता त्यानंतर आता काल एक नवा जीआर मिळाला आणि त्या जीआरच्या माध्यमातन मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटरच्या नियमानुसार आता एक नव आरक्षण पुन्हा एकदा त्यांना मिळत आहे. हैदराबाद गॅझेटर नुसार आता कुणबी प्रमाणपत्र हे नव्याने पुन्हा एकदा मिळणार आहे त्या गॅझेटरच्या नियमात जेवढे लोक बसतील त्या सगळ्यांना याच्या आधी शिंदे गटाच्या समितीने जे वाशीमध्ये जरंगे पाटलांना गुलाल लावला होता त्यानंतर सगळ काही पुन्हा एकदा कुणबी नोंदी सगळ्या मराठ्यांच्या निघाल्या मराठा समाजाच्या पण अनेकांनी त्यानंतर काढलं हे सगळं की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले वगैरे पण अजूनही अनेकांना माहित नाहीये की कुणबी प्रमाणपत्र कस मिळवायचं मुद्दा काय कुणबी प्रमाणपत्र कसं मिळवायचं आणि ते प्रमाणपत्र पुरावा कसा शोधायचा.
पहिली गोष्ट की कुणबी प्रमाणपत्राचा तुमचा किंवा तुमच्या वंशावळीचा तुमच्या आजी पंजांचा खापरपंच यांचा पुरावा कसा शोधायचा तो मिळाल्यानंतर ते कुणबी प्रमाणपत्र काढायला कागदपत्र कोणती लागतात तर मी आज तुम्हाला त्या संदर्भात सगळ सांगणार आहे की प्रमाणपत्र कसं काढायचं कुणबी प्रमाणपत्र त्यासाठीचा पुरावा कसा शोधायचा.
जरांगे पाटील असं म्हणत होते की मी जे काही सगळं बोललेलो आहे. जे काही माझं सगळं बोलणं झालं मी जीआर जो काढला त्या जीआर च्या माध्यमातून असं अनेकांना वाटते की हा जीआर चुकीचा आहे त्याच्यामध्ये त्रुटी आहेत काही शब्द वगैरे फेरफार झालेले आहे शासकीय शब्द थोडेसे फसवे असू शकतात अनेकांना वाटतं पॉईंट असा याच्यामध्ये आहे की त्यांचं म्हणणं अजूनही असं आहे की सुरुवातीला मी अनेकांना टोचतो अनेकांना वाटत की माझा निर्णय फसलेला आहे पण नंतर अनेकांना फायदा होतो ही त्यांची भूमिका आता याच्या मार्फत त्यांनी अनेकांना संयम पण ठेवायला लावलेला आहे थोडं थांबा सगळ्यांना फायदा होईल. एक एक टप्प्याटप्प्याने सगळ्या आपण तिथं या गोष्टी आपण आणणार आहोत आता हे सगळं झालं त्यांचा बोलण्याचा एक मुद्दा झाला याच्यामध्ये आता आपला मुख्य मुद्द्याकडे आपण वळूयात.
मराठा समाज आहे, ज्यासाठी जरांगे पाटलांनी आंदोलन केलं आणि ते आंदोलन एका कारणासाठी केलं होतं की त्यांना ज्या कुणबी नोंदी आहेत त्या मिळवायच्या आहेत आणि ज्याच्या आधारे आज बहुतांश मराठा आणि कुणबी हे सगळे एकच असल्याचे अनेक कायदेशीर पुरावे आजही उपलब्ध आहेत. मात्र आजपर्यंत म्हणजे शासनाच्या ह्या सगळ्या आरक्षण धोरणात मराठा समाज हा खुल्या गटात होता तर कुणबी समाज हा ओबीसीच्या्या प्रवर्गामध्ये विभागला गेला होता जो आजही आहे. आता याच्यामध्ये कस की तुम्हाला जर पुराव्यानुसार कुणबी प्रमाणपत्र हव असेल तर आता ते उपलब्ध होतय.
आता त्यासाठी मराठा गटातून अनेक जण ओबीसी वर्गात सुद्धा जाऊ शकतात हा त्याचा एक फायदा मराठा समाजाला होत आहे. आता तो दाखला कसा काढायचा काय करायचं त्याची पूर्वतयारी कशी असावी कागदपत्रे जमवायत कशी ती प्रक्रिया कशी असते ते समजून घेऊयात.
पहिली गोष्ट अशी की कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या तारीख लक्षात घ्या आणि वर्ष लक्षात घ्या 13 ऑक्टोबर किंवा 1967 या दिनांकाच्या आधी जन्मलेल्या किंवा त्या दिवशी जन्मलेल्या त्या वर्षी जन्मलेल्यारक्त नातेसंबंधातील कोणत्याही तुमच्या नातेवायकाची कुणबी जात असल्याचे सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणं आवश्यक आहे आणि रक्त नातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील चुलते काय कोण कोण आहेत बघा तुमचे नातेदार, नातेवाईक सगळे तुमचे वडील, तुमचे चुलते, आत्या, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, वडिलांचे चुलते वडिलांचे जे काही एकूण सक्के किंवा चलत भाऊ बहिणी ज्यांच्याशी तुमचे नाते दर्शवणारी एक वंशावळ काढता येते अशी भावकी इत्यादी या सगळ्या वरीलपैकी कुणाचाही कुणबी असल्याचा पुरावा मिळवण्यासाठी हे सगळे तुम्ही प्रयत्न करू शकता. आता इतके नातेसंबंध दिलेले आहेत म्हणजे फार अगदी मागच्या पिढ्यापर्यंत हे तुम्ही कुठलीही वंशावळी त्यांची काढू शकता त्याच्यात जर कोणी गुण लाव असेल तर ते तुम्ही ते शोधू शकता आता.
पुरावा कसा शोधायचा :
तर पहिली गोष्ट की या सगळ्याचा कोणाचाही तुम्हाला रक्तसंबंधातील ज्यांचा कोणाचा शोधायचा आहे त्या सगळ्यांचा कोणाचाही शोधत असताना नातेवायकाचा प्राथमिक जो शाळा प्रवेश आहे त्याचा निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबीन भाषी नोंद काहीही पाहायच आहे.
त्यानंतर दुसरा पॉईंट हा लक्षात घ्या की तुमच्या स्वातंत्र्यपूर्व काळात गावात कोतवाल बुक किंवा गाव नमुना जो नंबर 14 मध्ये प्रत्येकाचा त्या काळात जन्म मृत्यूची नोंद त्यामध्ये जातीची ठेवली जातात असायची त्यानंतर पूर्वी या नोंदी धरम हा महा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या त्यानंतर मात्र 1 डिसेंबर 1963 पासून ज्या एकूण कोतवालाचे जे काही पद महसूल विभागाकडे वर्ग करण्या सगळं हे सगळं आलं होतं आणि एकूणच मंडळी त्यानंतर या नोंदी ठेवण्याच काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आलं त्यापुढे असं म्हणतय सरकार की त्यामुळे सर्वप्रथम आपण रक्तसंबंधातील नातेवायकांचा जन्म किंवा मृत्यूच्या ज्या गावात झाला असेल आता ते गाव कोणत्या तहसील कार्यक्षेत्रात येते हे पहिलं तपासावे त्यानंतर संबंधित तहसीलकार्यालयातर् अर्ज करून आपण रक्तसंबंधातील नातेवायकांचे नाव असणाऱ्या गाव नमुना नंबर 14 ची किंवा त्या कोतवाल बुकची ही नक्कल मागणी करावी आणि नक्कल मागणी प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये त्यांची कुणबी नोंद का हे शोधावी.
तिसरा पॉईंट याच्यातून सुद्धा काही असेल त्यानंतर पुढचा एक पॉईंट असा आहे की हे सगळं झाल्यानंतर तुमच्या त्या एकूण कुळातील जुन्या महसूली कागदपत्रांपैकी वारसा नोंदी सहा ड नोंदी त्यानंतर तुमची एक जमीन वाटप नोंदी सातबारा उतारे आठ अ चे उतारे फेरफार खरेदी खत भाडे पट्टा तुमचा एकूण जो काही सगळा आहे तो सातबारा अमलात येण्याच्या आधी सगळं असणारं कडही पत्र तुमचं बाकीच सोडपत्र खासरा पत्र हक्क पत्र किंवा इतर कोणतही या संबंधातलं जे पत्र असेल जे महसूल कागदपत्रांमध्ये रक्त संबंधातील कोणत्याही नातेवायकाच कुणबी ज्यामध्ये या सगळ्या मध्ये सुद्धा आणि इतर कुठल्याही कागदपत्रांमध्ये सुद्धा ज्याचा कुणबी असा उल्लेख आहे ते पहिलं शोधायचा आहे आणि त्यानंतर त्या कागदपत्राची तुम्ही एक प्रत ही काढून घ्यायची ही तुमच्याकडे ठेवायची आहे ती पुरावा म्हणून आपण हे पुराव्या संदर्भात बोलतोय त्याच्यामुळे ्याचा एक पुढचा मुद्दा आणखीन पुराव्याचा या सगळ्याचा असा असणार आहे की साधारण मंडळी तुमच्या रक्तसंबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास त्यांच्या सर्विस बुकच्या पहिल्या पानावर त्या संबंधित शासकीय किंवा निमशासकीय
कार्यालयाने त्या नातेवायकाची कुणबी जात नोंदणी केली असल्यास त्या सर्विस बुकचा साक्षांकित केलेला एक उतारा तुम्ही घ्यायचा आहे. तुमच्या रक्तसंबंधातील नातेवायकांने अगोदरच त्यांचा कुणबी दाखला काढला जर असेल तर त्याचा तो कुणबी दाखला आणि समाज कल्याण खात्याच्या छानणी समितीने वैध हे ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र ही कागदपत्रे देखील कुणबी असल्याचा पुरावा म्हणून चालू शकतात. आपण जुन्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंत असे पुराव्यापर्यंत असे त्याचे एक मुद्दे आहे तर हे मुद्दे पहिले लक्षात घ्या आता हे झाले पुरावे कसे शोधायचे याबद्दलची माहिती.
आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ती बघूया:
साधारण जे आवश्यक कागदपत्रे आहेत त्याच्यात पहिला आपला जो मुद्दा आहे तो आहे तो म्हणजे कुणबी जातीचा पुरावा आणि तो असा आहे की वर जे आता तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये अर्जदाराचा किंवा रक्तसंबंधामधील नातेवायकाचा कुणबी जातीचा पुरावा जर संबंधित नातेवाईक जर मृत असेल तर त्याच्या मृत्यूचाही दाखला काढा याच्या पुढचा मुद्दा असा साधारण तुमचा रहिवासी पुरावा आहे तर अर्जदार किंवा त्याचे त्या रक्तसंबंधातील नातेवाईक यांचे 13 ऑक्टोबर 1967 किंवा या दिनांकाच्या आधीपासून सर्वसाधारण किंवा कायमस्वरूपी वास्तव्य असलेल्या ठिकाणचा लेखी रहिवासी दाखला. तिसरा बघा तुमचा अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या या सगळ्या एकूण रक्तसंबंधातील नातेवायकांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचा बोनाफाईड सर्टिफिकेट त्याच्यावर दोन्हींवर जन्मतारीख व जन्मस्थान याचा उल्लेख असणं आवश्यक आहे त्या कागदपत्रामध्ये तुमचा चौथा जो मुद्दा आहे कागदपत्राचा त्याच्यामध्ये तुमचा एक कोणताही ओळखीचा पुरावा लागेल कोणताही एक ज्याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो असणार आहे आधार कार्ड चालेल आत्ताच मतदान ओळख पत्र चालेल तुमच पॅन कार्ड चालेल त्याच्यामध्ये ड्रायविंग तुमच लायसन्स सुद्धा चालेल किंवा तत्सम अधिकृत आपली ओळखपत्र असतात, ज्याच्या आधारे आपण आपली ओळखपत्र म्हणून तिथे प्रेझेंट होतो. ती ही आणि अजून कोणतीही गव्हर्नमेंट ओळखपत्र तुम्हाला लागतील कागदपत्रांमध्ये आता पत्त्याचा तुमचा एक तुमचा ऍड्रेस एक प्रॉपर द्यायचा आहे.
आता याच्यामध्ये अर्जदाराचे रेशन कार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, सातबारा किंवा आठ उतारा असेल किंवा फोन बिल असेल पाणीपट्टी किंवा घरपट्टीची एक प्रत असेल ज्याच्यामध्ये जे सगळं प्रॉपर असेल आता याच्यानंतर पुढे आणखीन अस आहे की साधारण तुम्ही ज्याचा जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा जो विहितनमुन्यातील अर्ज व त्यावर १० रुपयांचे कोर्ट फी स्टॅमप तिकीट किंवा अर्जदाराचा फोटो आता त्यानंतर पुढचा मुद्दा येतो कागदपत्रांसाठीचा की ज्याच्यामध्ये तुमचा 100 रुपयांच्या एका त्या स्टॅम्पवर 100 रुपयाचा स्टॅम्प लक्षात घ्या.
त्या एका स्टॅम्पवर पेपरवर अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जाती बाबत आणि रक्तसंबंधातील ज्या नातेवायकाचा कुणबी जातीचा पुरावा सादर केलेला आहे ही कागदपत्रे आत्ताची सगळी मी तुम्हाला सांगितली ही कागदपत्रे पुराव्यानंतर तुम्हाला तो पुरावा काढायला लागणार आहेत.
कुणबी दाखला काढण्यासाठी तीन महत्त्वाचे टप्पे कोणते :
टप्पे पहिला तुम्हाला पुरावा कसा शोधायचा तर पुरावा शोधल्यानंतर आवश्यक कागदपत्रे तुम्ही जमा करायचे आहेत जी कागदपत्रे जमा करायची ती कशी जमा करायची त्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही कुणबी दाखला हा काढू शकता आता या साधारण सगळ्या प्रोसेस मध्ये मी तुम्हाला आता सगळ्या प्रोसेस सांगितल की कसं सगळं करायचं आहे. याच्यामध्ये अस आहे की साधारण हैदराबाद गॅजेट जे आता लागू झालेल आहे जरांगे पाटलांकडून कालच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सगळं सांगितलं की आम्ही सरसकट काही देऊ शकत नाही. जरांगे पाटलांनी आम्ही काही कायदेशीर त्रुटी आणि ज्या काही अडचणी आहे त्या आम्ही समजून सांगितल्या पण सरसकट आम्ही देऊ शकत नाही पण गॅझेटच्या नियमानुसार गॅजेट ईयरच्या नियमानुसार आम्ही हे सगळं आरक्षण लागू करत आहोत आणि त्यानुसार ते आता सगळं लागू होत आहे.
आठ मधल्या सहा गोष्टी मान्य झाल्यात दोन गोष्टी मागे ठेवलेल्या आहेत या सगळ्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राचा तो लोकांना लाभ होत आहे. आजही शिंदे समितीने 2021 ला जरांगे पाटलांना गुलालला लावून जे काही सगळं पुढं कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली त्यानंतर आता पुन्हा एकदा हैदराबाद गॅजेटर नुसार मराठा समाजाला 1963 सालच्या आधीपासूनच्या 67 सालच्या आधीपासूनच्या ज्या काही सगळ्या नोंदी आहेत त्या तारखेपासूनच्या सगळ्या नोंदी कुणबीच्या आहेत. धन्यवाद…
