मावळातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील ३५ वर्षे जुना पुल जीर्ण झाल्याने नवीन पुलाला निधी मंजूर झाला मात्र, कार्यारंभ आदेश मिळूनही काम सुरू झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्या पुलावरून वाहतूक बंद करण्याचे आदेशही पाळण्यात येत नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच निष्पापांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
कुंडमळा परिसरात संरक्षण विभागाचा मिसाइल प्रकल्प असून, संरक्षण विभागानेच पहिल्यांदा शेलारवाडीकडून इंदौरीकडे जाण्यासाठी लोखंडी साकव पूल बांधला होता. तो अपूर्ण होता. दोन्ही बाजूस उतार असल्यामुळे पावसाळ्यात नदीला जास्त पाणी आले की, तो उपयोगास येत नव्हता. त्यामुळे देहूरोडकडून इंदोरीमार्गे किंता देहूरोडकान देहूगाव, सांगृहीं ते कॅडबरी कंपनीमार्गे कुंडमळा आणि कान्हेवाहीकडे जावे लागत होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने १९९३ मध्ये संपूर्ण पूल उभारण्यात आला होता. नंतर त्यावर तत्कालीन खासदार अण्णा ओशी आणि तत्कालीन आमदार दिवंगत आमदार दिगंबर भेगडे यांच्या प्रयत्नातून वीस लाखाचा खर्च करण्यात आला होता.
साकव पूल जुना झाल्याने पुलावरून जाण्यास बंदी आहे. तसे फलकही पुलाच्या दोन्ही बाजूला आहेत. मात्र, बंदी आदेश धुडकावून पर्यटक पुलावर जातात. काहीजण पुलावरून दुचाकीही दामटतात. वीकेंड पर्यटनामुळे शनिवारी, रविवारी गर्दी वाढते. दुर्घटना घडण्यास रविवारच्या सुट्टीनिमित्त मोठ्चा संख्येने आलेले कारणीभूत ठरले. पर्यटक राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा. येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिले आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत बचावकार्याला वेग देण्याचे, एनडीआरएफच्या तुकडचा, अग्निशमन दल, रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच, त्यांनी या संदर्भात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले.
अजित पवार, उपमुख्यमंत्री पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
दहा दिवसांपूर्वीच निघाला मनाई आदेश:
अपचात झालेला कुंडमळा पूल जीर्ण अवस्थेमुळे दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आला होता. ३५ वर्षे जुना पूल असल्याने पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. त दुरुस्तीसाठी निधीही मंजूर झाल्याचे समजते. त्याच्या पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी सांगितले की, दहा दिवसांपूर्वीच पर्यटकांनी अशा थोकादायक ठिकाणी जाऊ नये, असा आदेश प्रशासनाकडून काढण्यात आला होता. ५ लाख रुपयांची मदत: ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात पर्यटकांवर घाला : पावसाळी पर्यटनाचा अतिउत्साह बेतला जिवावर, पाणी बघण्यासाठी प्रवेशबंदी असलेल्या पुलावर शंभर ते दीडशे पर्यटक चढले; दुचाकी गाड्याही चढवल्या पर्यटकांसह कोसळला कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल, इंद्रायणीत अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले.
नवीन पूल कधी होणार?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने साकव पुलाजवळच नवीन पूल उभारण्याचे नियोजन होते. प्रस्तावित पूल १७० मीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा आहे. त्यासाठी आठ कोटीचा निधी मंजूर आहे. दहा जूनला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.
अत्यंत अरुंद लोखंडी साकव कुंडमळा हे तळेगाव दाभाडे शहरापासून जवळ असलेले पावसाळी पर्यटनस्थळ आहे. इंद्रायणी नदीतील कातळामध्ये नैसर्गिकरीत्या तयार झालेले खोलगट पाण्याचे कुंड, रांजणखळग्यांमुळे या परिसरास कुंडमळा म्हटले जाते. नदीवर जुना अत्यंत अरुंद लोखंडी साकव आहे. त्याच्या दोन्ही बाजू सिमेंटच्या पुलाने जोडल्या आहेत. या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात.
लोखंडी सांगाड्याखाली काही पर्यटक अडकल्याची शक्यता:
पूल कोसळला तेव्हा पुलाखालीही काहीजण बसले होते. पूल कोसळल्याने त्याखाली काही जण दबले गेले असण्याची शक्यता आहे. सायंकाळी क्रेन आणून सांगाडा काढण्याचे काम सुरू होते.
सायंकाळी एनडीआरएफचे पथक आल्यानंतर बचावकार्यास गती आली. अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी १५ रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या.चौकशी समिती स्थापन, कठोर कारवाई करणार या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समितीची स्थापना करण्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी केली. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. दुपारी ३.३० वाजता… कुंडमळा हे पुण्यापासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे. मुंबईकडे जाताना, एक्सप्रेस वेवर प्रवेश करण्यापूर्वी मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये हे ठिकाण लागते. येथे कुंडमळा धबधबा लोकप्रिय आहे.
पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांनी व्यक्त केले दुःख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून माहिती घेतली आणि दुःख व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री – पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय कुख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन:
इंद्रायणी नदीतकोसळलेल्या कुंडमळा पुलाचा लोखंडी सांगाडा बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला तीन क्रेन बोलावण्यात आल्या. मात्र, त्यांच्याकडून सांगाडा बाहेर निघाला नाही. त्यानंतर जास्त क्षमतेची क्रेन मागविण्यात आली. तोपर्यंत अंधार झाला होता. त्यामुळे विद्युत दिव्यांच्या प्रकाशात सांगाडा हलविण्याचे काम सुरू होते.
क्रेनच्या साह्याने सांगाडा बाहेर काढण्यात अडचणी येत असल्याने कटरच्या साह्याने सांगाडा कापण्यात आला. त्यानंतर मोठ्या क्षमतेच्या क्रेनच्या साह्याने सांगाडा नदीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पुलाच्या सांगाड्याखाली काहीजण अडकले होते. बचाव पथकांनी त्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढले. तसेच सायंकाळपर्यंत दोन मृतदेह काढण्यात आले. त्यात एका मुलाचा मृतदेह असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढली असून, प्रवाह प्रचंड.

पूल कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट:
या पुलाची बांधणी किती वर्षापूर्वी झाली होती, त्याची देखभाल कितपत केली जात होती, याबाबत सध्या काहीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. २४ तास मदतकक्ष सुरू: तहसील कार्यालय, मावळ येथे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत २४ तास मदत कक्ष कार्यरत आहे.
पस्तीस वर्षे जुना पूल जीर्ण झाला; निधी आला पण…
‘सार्वजनिक बांधकाम’च्या दुर्लक्षामुळे गेले निष्पाप जीव इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील ३५ वर्षे जुना पूल जीर्ण झाल्याने नवीन पुलाला निधी मंजूर झाला. मात्र, कार्यारंभ आदेश मिळूनही काम सुरू झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्या पुलावरून वाहतूक बंद ठेवण्याचे आदेशही पाळण्यात येत – नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच निष्पापांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. येथे संरक्षण विभागाचा मिसाइल प्रकल्प असून, संरक्षण विभागानेच पहिल्यांदा शेलारवाडीकडून इंदोरीकडे जाण्यासाठी लोखंडी साकव पूल बांधला होता. तो अपूर्ण होता. दोन्ही बाजूस उतार असल्यामुळे नदीला जास्त पाणी आले की, तो उपयोगास येत नव्हता. त्यामुळे देहूरोडकडून इंदोरीमार्गे किंवा देहूरोडकडून देहूगाव, सांगुर्डी ते कॅडबरी कंपनीमार्गे कुंडमळा, कान्हेवाडीकडे जावे लागत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने १९९३ मध्ये संपूर्ण पूल उभारण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने साकव पुलाजवळच नवीन पूल उभारण्याचे नियोजन होते. प्रस्तावित पूल १७० मीटर लांबीचा व ७.५ मीटर रुंदीचा आहे. त्यासाठी आठ कोटीचा निधी मंजूर आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन दहा जूनला कार्यारंभ आदेश दिला होता. त्यासाठी बारा महिन्यांची मुदत दिली आहे.
नऊ सिमेंटचे खांब:
नदीच्या पात्रात खडक अधिक आहे. त्यामुळे त्यावर सिमेंटचे स्ट्रक्चर उभारले आहे. पुलाची लांबी शंभर मीटर आहे. त्यासाठी शेलारवाडीच्या बाजूने सात, तर दुसऱ्या बाजूने दोन सिमेंटचे खांब आहेत. त्यावरून लोखंडी खांब टाकून पूल जोडला होता. त्याची रूंदी तीन मीटर आहे.नदीच्या पलीकडील बाजूच्या दोन खांबांमधील अंतर अधिक होते. त्यामुळे पुलाला हादरे बसत होते. पूल दुरुस्त करावा, अशी मागणी होत होती.