लाडक्या बहिणीसाठी योजना आणली; परंतु लाडक्या भावासाठी काय, असे लोक म्हणू लागले. यामुळे आम्ही लाडक्या भावासाठीदेखील योजना चालू करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे – म्हणाले, जो बारावी पास झाला आहे, त्याला सहा हजार रुपये. जो डिप्लोमा झाला आहे, त्याला आठ हजार रुपये. ज्याची पदवी पूर्ण झाली आहे, त्याला महिन्याला दहा हजार रुपये सरकार देणार आहे. तो वर्षभर ज्या कंपनीत ॲप्रेंटिसशिप करेल, त्या कंपनीकडे सरकार विद्यावेतन जमा करणार आहे. त्याला तेथे नोकरीही मिळेल, उद्योजकांनाही तज्ज्ञ मनुष्यबळ मिळेल.
राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.शिंदे साहेबांनी उल्लेख केलेल्या या योजनेचा राज्यातील तरुणांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले आहे. तरुणांनी या उद्योगस्नेही योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. यासाठीच्या विविध अपडेट्स सच-बात-है कडून लवकरच आपणास प्राप्त होतील. अधिक माहितीसाठी आमचा मोफत व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा.
Ladla bhai yojna