ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून 0% व्याज दरानं तब्बल एक लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. नुकतीच वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली आणि यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे अशा महिलांना एक लाख रुपये मिळणार आहे आणि तेही शून्य व्याज दराने. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने महिलांना शून्य टक्के व्याज दराने एक लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय झालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना तसेच विविध मंडळा अंतर्गत सुरू असलेल्या योजनांमार्फत शासन महिलांचे आर्थिक सबलीकरण करत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना आर्थिक साक्षर करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून वैयक्तिक व सामूहिक कर्ज देऊन त्यांना उद्योग व व्यवसाय उभरण्यासाठी मदत केली जाईल तसेच पर्यटन संचालनालय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत विविध वैयक्तिक व गट कर्ज योजना राबविण्यात येतात यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी 0% इतक्या अल्पव्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना सूक्ष्म लघु उद्योजक बनवून त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद केले. मुंबई बँकेच्या विशेष कर्ज धोरण अंतर्गत वैयक्तिक व गटाला एक लाख व त्यापेक्षा जास्त कर्ज 9% दराने आदा करण्यात येईल. मुंबई शहर आणि उपनगर येथे 16 लाख इतके लाभार्थी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले अर्थात या ठिकाणी अगोदर 9 टक्के इतक्या अल्पव्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर मात्र शून्य टक्के व्याज दराने हे कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण धनेकर यांनी दिलेली आहे.
लाभार्थी महिला जर या चार महामंडळांच्या योजनेत बसत असतील तर या महिलांना 0% व्याजदरात ते कर्ज उपलब्ध होऊ शकतं आणि कालच्या बैठकीत अशा प्रकारचा शासन निर्णय करण्याचा निर्णय झाला माननीय मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले. या ठिकाणी अगोदर 9% व्याजदराने हे कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार होतं. त्यानंतर मात्र 9% टक्के च्या ऐवजी आता शून्य टक्के व्याज दराने हे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता धारक आहेत लाभार्थी आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु सध्या ही योजना जी आहे ती फक्त मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणीच लागू केलेली आहे. भविष्यामध्ये ती संपूर्ण महाराष्ट्रत देखील लागू होऊ शकते. परंतु सध्या मात्र ही योजना जी आहे मुंबई शहर आणि उपनगर येथे लागू आहे इथं 16 लाख इतके लाभार्थी आहे आणि या 16 लाख लाभार्थी महिलांना सध्या तरी या योजनेचा लाभ मिळणार आहे. भविष्यात मात्र कदाचित ही योजना जर संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाली तर नक्कीच ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत तर त्या महिलांना देखील उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी या जे शून्य टक्के व्याज दर आहे या 0% व्याजदराने जर हे कर्ज उपलब्ध झाले तर नक्कीच त्यांना देखील त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास हातभार लागू शकेल.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा:
आपण अतिशय महाराष्ट्रात चर्चेत असलेली योजना त्या योजनेविषयी बोलणार आहोत तो चर्चेचा विषय म्हणजे माझे लाडकी बहीण योजना आणि यातच या योजनेतून मिळणारे कर्ज हा फार चर्चेचा विषय सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी 50,000-1 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याचा विचार करतय. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत. तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्या ऐवजी त्या भगिनीला त्यांनी 50 हजार ते 1 लाख रुपये द्यायचे आणि हप्ता ्याच्यातून त्यांचा जाईल.
मुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी नुकताच घोषणेमध्ये या योजनेतर्फे महिलांना कर्ज सुद्धा देण्याची सुविधा आणि करणार आहोत अशी घोषणा केली आणि त्या घोषणानंतर सर्वत्र लाडक्या बहिणींना आनंद झालेला आहे. त्यांना जे काही कर्ज भेटेल त्यातून छोटासा व्यवसाय करू शकतिल. त्यांच्या घरात काही आर्थिक अडचण असेल ते त्या दूर करू शकतील मुलांच्या शाळेचा खेळ असतील किंवा त्यांना इतर जो काही पैसा खर्च करायचा असेल तर ते करू शकते म्हणजे एक प्रकारे या महिलांना आर्थिक पाठभर देण्याचं आणि त्यांना सक्षम बनवण्याचे एक प्रकारचे साधन आहे. ज्यावेळेस दादांनी या कर्जाची घोषणा केली त्यावेळेस सर्वत्र महिलांमध्ये आनंदाचे भरून आले, की नाही आता आम्हाला कर्ज मिळणार आहे, आणि मग त्यांनी त्यांचे स्वप्न रंगवण्यास सुरुवात केली आणि महत्त्वाचं कारण असे सांगितले आहे की कर्ज शासन त्यांना देणार आहेत त्याचा जो अभ्यास येतो त्यातूनच तो कट होणार आहे तोपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीची ही योजना शासन लवकरात राबवणार आहे.
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार या महायुती सरकारकडून ही योजना राबविण्यात येत आहे. आणि कर्जाची योजना ही लवकरच येणार आहे तर चला आता आपण या योजनेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे तो अर्ज काय असेल किंवा हा अर्ज भरताना कोणते कागदपत्र पाहिजे ही योजना कधी लागू होईल अर्ज कशा प्रकारे मिळेल याची पात्रता काय असेल ही सर्व माहिती दिली आहे.
अर्ज भरण्यासाठी पात्रता काय असेल:
माझी लाडकी बहीण कर्ज योजना कशी आहे त्यासाठी पात्रता काय त्यासाठी कोणत्या कागदपत्रांचे आपण पूर्तता करायला हवं आणि या कर्जासाठी आपण कशा पद्धतीने अर्ज करणार त्याची माहिती बघूया.
- सर्वप्रथम अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. लाडके बहीण अंतर्गत या योजनेमध्ये ती जी महिला आहे ती लाभार्थी असावी.
- महिला सरकारी नोकरी नसलेल्या कुटुंबातून असावी. म्हणजे त्या कुटुंबामध्ये इतर कोणताही सदस्य हा सरकारी नोकरीमध्ये नको आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 म्हणजे दोन लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे त्याच्यावरती असू नये.
- त्यानंतर कुटुंब आयकर दाता नसावा म्हणजे, कोणताही कुटुंबातील जो सदस्य असेल तो इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
- कुटुंबाकडे ट्रॅक्टर सोडून इतर कोणत्याही वाहन नसावे.
- कर्ज घेण्यासाठी बँक आधी तुमचं सिबिल स्कोर चेक करत असतो, आणि तो सिबिल स्कोर चांगला असावा.
- महिलेचा जे बँक खाता आहे, ते आधार कार्डशी लिंक असावे.
काय-काय कागदपत्रे लागणार आहेत?
- सर्वप्रथम आहेत त्या महिलेचा आधार
- त्यानंतर बँकेचा पासबुक आणि त्या बँकेच्या सहा महिन्याचं स्टेटमेंट सुद्धा आपल्याला लागणार आहे.
- आणि त्या महिलेचा पासपोर्ट फोटो.
- त्याचा त्या महिलेचा मोबाईल नंबर.
असे कागदपत्रे आपल्याला या कर्जासाठी लागणार आहे.