राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ (Twitter) खात्यावरून लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या लाभार्थी भगिनींनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी. वेळेत e-KYC न केल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो!
महिला व बालविकास विभागाने आज लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा शासन निर्णय आज महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे. ज्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींना पाच मागणे त्यांनी पूर्ण करून दिलेल्या आहेत. ज्यामध्ये लाडक्या बहिणींना आता येणाऱ्या जानेवारी महिन्यापासून अत्यंत महत्त्वाचा फायदा होणार आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्रित येणार:
लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नसतील तर तुमच्यासाठी महत्त्वाच्या पाच मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आणि शेवटची तुमच्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे केव्हा मिळणार याची तारीख देखील आलेली आहे.
आता हा जो शासन निर्णय आहे पाहू शकता 14 डिसेंबर 2025 म्हणजेच आज सकाळी 8 वाजता आलेला आहे आणि लाडक्या बहिणींसाठी याच्याबद्दलची अपडेट अजूनही माहित नाही आहे. आता या शासन निर्णयामध्ये लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून नोव्हेंबर व डिसेंबर 2025 या दोन महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा हप्ता तसेच गॅस सिलेंडर अनुदान 830 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याबाबत तसेच लाडकी बहीण योजनेशी संबंधित महिलांना मांडलेल्या पाच प्रमुख मागण्या दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी मान्य झालेल्या आहेत आणि त्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी हे 15 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.
लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी:
लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापासून त्याचा लाभ मिळणार आहे पण तो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतची तारीख आहे त्यामुळे त्यांनी सांगितलेले सगळे नियम अटी पाळून सगळे कागदपत्र गोळा करून दिलेल्या या तारखेमध्ये तुम्ही ते सगळे फॉर्म भरायचे आहेत सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी कोणते त्यांनी पाच मागण्या या ठिकाणी मंजूर केलेल्या आहेत आता शासन निर्णयामध्ये आपल्याला पुढील प्रमाणे ने महाराष्ट्र शासनाने आणि महिला व बाल विकास विभागाने घेतलेले सगळे अर्ज किंवा त्यांनी दिलेल्या आपल्याला पाच मुद्देच्या मागण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत.
देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींना हप्त्याला लेट झाल्यामुळं आम्ही त्यांना गॅस सिलेंडरचा अनुदान ₹830 देखील याच महिन्यामध्ये देणार आहोत म्हणून लाडक्या बहिणींना या डिसेंबर महिन्यामध्ये टोटल लाडकी बहीण योजनेचे 3000 आणि 830 गॅस सिलेंडरचे असे टोटल 3830 रुपये हे त्यांच्या बचत बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.
३१ डिसेंबर २०२५ नंतर काय होणार?
e-KYC अपूर्ण असलेल्या लाभार्थी महिलांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो.
अपात्र लाभार्थी योजनेतून आपोआप वगळले जातील.
केवळ पात्र महिलांनाच आर्थिक लाभ मिळेल.
e-KYC न केल्यास हप्ता थांबणार का?
होय.
जर e-KYC वेळेत पूर्ण केली नाही तर पुढील हप्ता मिळण्यास अडथळा येऊ शकतो किंवा तो पूर्णपणे थांबवला जाऊ शकतो.
अपात्र लाभार्थी वगळले जाणार का?
होय.
e-KYC मुळे अपात्र महिलांची नोंद आपोआप रद्द होईल आणि पात्र भगिनींना कोणताही अडथळा न येता लाभ मिळेल.
e-KYC करण्याची सोपी पद्धत -घरबसल्या पूर्ण करा:
https://ladakibahin .maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
होमपेजवर ई-केवायसी किंवा Aadhaar Linkage पर्याय निवडा.
तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणी क्रमांक अचूक भरा.
सबमिट केल्यानंतर आधारशी लिंक मोबाईलवर OTP येईल.
OTP टाकून पडताळणी पूर्ण करा.
प्रक्रिया यशस्वी झाल्यावर स्क्रीनवर कन्फर्मेशन मेसेज दिसेल.
लक्षात ठेवा – ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे!
सरकारी नोकरी किंवा चारचाकी वाहन असल्यास लाभ मिळेल का?
नाही.
खालील परिस्थितीत लाभ मिळणार नाही.
कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्यास.
निवृत्ती वेतन घेत असल्यास.
चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर असल्यास.
आयकर भरणारा सदस्य असल्यास.

