महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

महाराष्ट्रातील गरीब घरातील मुलींसाठी एक अशी योजना ठरली आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महत्त्वाची एक योजना आहे. याचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे आणि आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे.

लेक लडकी योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक सामाजिक योजना आहे ज्याचा उद्देश मुलींना जन्मापासून शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आहे. या योजनेअंतर्गत, जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा सरकार तिच्या आईला काही हप्त्यांमध्ये आर्थिक मदत देते. ही मदत मुलीच्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी आहे. या योजनेने समाजात मुलींना समान हक्क देण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलले आहे.

लेक लाडकी योजना अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी चालू झालेला आहे. या योजने अंतर्गत मुलींच्या भविष्यासाठी एक लाख दहा हजार रुपये एवढी जी रक्कम आहे ही टप्प्याटप्प्याने भेटत असते आणि ही जी रक्कम आहे तुम्हाला पाच टप्प्यामध्ये भेटत असते. तर या अर्जासाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे. कागदपत्रे काय काय लागणार आहे पात्र मुली कोण कोण राहणार आहे संपूर्ण लेक लाडकी योजने अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र ते जाणून घेणार आहोत. आता आपण पहिल्या हप्त्यासाठीच म्हणजे नवीन अर्ज भरत आहोत तर आपल्याला इथ पहिल्या हप्त्यावरती टिक करून घ्यायची आहे. आता कोणी जर पहिला हप्ता घेतला असेल, किंवा काही हप्ते थकीत असेल तर इथं तुम्ही दुसरा किंवा तिसरा चौथा असे हप्ते निवडू शकतात. आता आपण पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करणार आहोत आता वैयक्तिक माहिती आपल्याला भरायची आहे.

योजनेचा काय लाभ होणार?

या योजनेचे कोणते कोणते लाभ आपल्याला मिळणार आहे ते आपण येथे थोडक्यात पाहून घेऊ. तर आपल्याला मुलीच्या जन्मवेळी 5000 रुपचे अनुदान भेटेल. त्यानंतर शाळेत प्रवेश घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य आपल्याला दिले जाणार. उदाहरणार्थ पहिलीला, सहावीला, 11वीला इत्यादी वर्गात. त्यानंतर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर आणि लग्न न करता शिक्षण चालू ठेवल्यास एक रक्कम 75000 रुपया पर्यंत आपल्याला देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची पात्रता आणि लाभ होते जी आपल्याला लेक लाडकी योजनेमध्ये पाहायला मिळणार आहे.

पात्रता:

आता या लेक लाडकी योजनेमध्ये आपल्याला कोणती पात्रता लागणार आहे ते आपण पाहून घेऊ.

  • लाभार्थी मुलगी ही महाराष्ट्रात जन्मलेली असावी.
  • त्यानंतर आई-वडील दोघांचे पण उत्पन्न मिळून वार्षिक एक लाखाच्या आत असावे.
  • त्यानंतर पहिली किंवा दुसरी मुलगी असावी.
  • त्यानंतर मुलगी 18 वर्षापूर्वी विवाह करत नसल्याची हमी आपल्याला द्यावी लागणार आहे.

अर्जप्रक्रिया:

आपल्याला अर्ज जो आहे तो अर्ज ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय इथे करता येतो. म्हणजेच ऑफलाइन अर्जप्रक्रिया असेल तर त्यासाठी तुम्हाला एक अर्ज देण्यात येईल तो तुम्ही भरून जमा करायचा आहे. तर खाली दिल्याप्रमाणे अर्ज तुम्ही भरू शकता.

  • आता आपले आपत्ये पहिले आहेत,की दुसरे ते आपण निवडायचे आहेत.
  • लाभार्थ्यांच संपूर्ण नाव टाकायच आहे.
  • आधार क्रमांक टाकायचा आहे.
  • त्याच्यानंतर इथं लाभार्थ्यांचे पालक जे आई किंवा वडील यांचे संपूर्ण नाव टाकून घ्यायच आहे.
  • त्यांचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे.
  • सोबतच चालू मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे.
  • अपडेटसाठी मेल आयडी पण तुम्ही इथे देऊ शकतात.
  • आता या फॉर्म सोबत तुम्हाला आधार कार्डची प्रत जोडायची आहे.
  • या फॉर्मची प्रत तुम्ही हा फॉर्म डाऊनलोड करायचा आहे.
  • तुम्ही सध्या जिथे राहतात तो पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे. इथं पोस्ट ऑफिस जिल्हा तालुका पिनकोड किंवा रोड रस्ता गावाचं नाव तिथं तुम्ही इथे त्याच्यासमोर लिहू शकतात.
  • आता तुम्हाला इथं मोबाईल नंबर द्यायचा आहे. आधारला लिंक असेल तो.
  • अर्ज करत आहे तर पहिल्या आपत्त्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. आता इथं टीप बघू शकतात पहिल्या हपट्यासाठी, तिसऱ्या हप्त्यासाठी की दुसऱ्या हप्त्यासाठी. दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंबाचे नियोजन प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे. इथे तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र द्यावे लागतात.
  • आता अर्ज करत आहे आता इथं बघू शकतात की अर्ज करण्याच्या वेळेस तुम्हाला बँक तपशील द्यावा लागतो. आता इथं पहिले बँक खाते क्रमांक टाकायचा आहे.
  • आता त्याच्यानंतर तुम्हाला आयपीएससी कोड टाकायचा आहे, शाखा कोणती आहे त्या शाखेच नाव टाकायचा आहे.
  • प्ले क्लार्ड योजने अंतर्गत कोणत्या टप्प्यासाठी लाभ घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करत आहात तर आपल्याला हे सिलेक्ट करायचा आहे. पहिला हप्ता पाहिजे.
  • आता ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहे त्या दिवशीचे इथ दिनांक टाकून घ्यायचा आहे.
  • ज्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज करत आहात त्या ठिकाणाच नाव परत इथ लाभार्थीचे जे पालक आहेत त्यांची सही करू शकतात.

अर्जासोबत काय काय कागदपत्र जोडायची आहे:

  • लाभार्थ्यांचा जन्म दाखला.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसाव एक लाखाच्या आत असलेले उत्पन्नाचा दाखला लागणार आहे.
  • लाभार्थ्याच्या आधार कार्डची झेरॉक्स लागणार.
  • पालकाच्या आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे.
  • बँक पासबुक लागणार आहे बँक पासबुकची पहिल पान जे असत ज्यावरती आपला फोटो आणि बँकचा सही शिक्का किंवा अकाउंट नंबर दिसतो त्याचे तुम्हाला एक झेरॉक्स लागतील.
  • राशन कार्ड पिवळे अथवा केशरी राशन कार्ड यांची दोन्ही साईडची झेरॉक्स लागणार आहे जर ओळखपत्र असेल मतदान कार्ड ते पण तुम्हाला जोडायच असेल तर ते जोडू शकतात.
  • त्याच्यानंतर इथे जर शाळेमध्ये शिक्षण घेत असेल लाभार्थी तर त्यांचा बोनाफाईड देऊ शकतात.
  • आता कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं असतं.
  • अंतिम लाभार्थी अवविवाहित असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र ते पण इथे जोडून द्याव लागत.

आता तुम्ही 11 नंबरच पेज आहे त्यावरती जर आला तर अंगणवाडीतील सेविका यांना भरायची माहिती आता इथ तुम्हाला कोणतीही माहिती भरायची नाही आधी अंगणवाडी सेविका यांचे नाव येणार अंगणवाडी सेविका यांचा मोबाईल नंबर केंद्राचे नाव येणार परत केंद्राचा क्रमांक येणार, नोंदणी असलेले दिनांक, गावाचे नाव, शहराचे नाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड हे येणार आता पुढे काही महत्त्वाच्या माहिती आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आता इथं जे सलग्न कागदपत्राची तपासणी यादी आता काय असत. तुम्ही जे जे डॉक्युमेंट जोडले आहेत अंगणवाडी सेविका आहे ते डॉक्युमेंट चेक करतात ते असेल तर होय वरती क्लिक करतात नसेल तर नाही. त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका यांनी सादर केलेला दिनांक इथे येते ठिकाण येत अंगणवाडी सेविका यांना इथं सही करावी लागते इथ तुम्हाला सही करायची गरज नसते. आता इथे पर्यवेक्षिका यांनी भराव्याची माहिती इथं देण्यात येत असते ज्यांचं नाव असत त्यांची माहिती इथं देण्यात येत असते त्यांच्यानंतर इथं पर्यवेक्षका यांचे नाव आणि स्वाक्षरी आणि जे शिक्का असतो तो तुम्हाला इथं मिळत असतो. आता इथं बघू शकता आता हे महत्त्वाचं असत. आता इथून कापा असा एक पार्ट आहे फॉर्मचा तर तुम्हाला हा पार्ट सांभाळून ठेवायचा आहे.

ज्या पण अंगणवाडी च्या सेविका असतील त्यांच्याकडून या फॉर्म सोबत हे जे पेज आहे 12 नंबरच याची ही जी पावती आहे ही तुम्हाला कापून घ्यावा लागते. म्हणजेच तुम्हाला पुढचा जर हप्ता भेटला नाही किंवा काही प्रॉब्लेम असले किंवा काही अडथळ आला हप्त्यामध्ये जर तुम्ही अपात्र ठरला तर तुम्हाला ही पावती देऊन काही जर प्रॉब्लेम असतील त्या फॉर्ममध्ये ते सॉल्व करायला जी अडचण असते ती अडचण येत नाही. आता अंगणवाडीच्या सेविका यांचे नाव येथ अंगणवाडीचा जो क्रमांक असतो कोड असतो तो इथे येतो. ज्या गावांमध्ये अंगणवाडी आहे शहरांमध्ये आहे त्याचा इथं ऍड्रेस येत असतो जस की तालुका जिल्हा राज्य महाराष्ट्र राहत असतं आता इथे लाभार्थ्यांचे नाव आता जे लाभार्थी आहे. त्यांचं नाव टाकलेल असत इथं आता दिनांक ते देत असतात त्याच्यानंतर इथे अंगणवाडी सेविका यांचे नाव सही शिक्का एवढं घेऊन तुम्हाला ही पावती दिल्या जात असते. ही पावती तुम्हाला घेऊन सांभाळून ठेवायची आहे आणि अशा काही प्रकारे तुम्ही लेकलाडकी योजनेसाठी अर्ज करू शकतात. आणि प्रत्येक मुलगी यासाठी पात्र राहू शकते तुमच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये कोणाला अर्ज करायचा असेल तर अशा काही प्रकारे तुम्ही अर्ज करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *