महाराष्ट्र वनरक्षकमध्ये 12,991 पदांची मेगा भरती 2025..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

वनरक्षक भरती 2025 ही निसर्ग व पर्यावरण सेवेसाठी उत्कृष्ट संधी आहे. यामार्फत तुम्हाला सरकारी नोकरी ची उत्तम संधी मिळते. यामध्ये लेखी परीक्षा, डॉक्युमेंट, शारीरिक चाचणी व गुणांवर आधारित अंतिम निवड अशा चार टप्प्यांमधून उमेदवारांची अंतिम निवड होते.वनरक्षक भरती 2025 महाराष्ट्र विद्यार्थीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. वनरक्षकच्या 12,991जागा या ठिकाणी रिक्त आहे सध्याच्या कंडिशनला आणि येणाऱ्या दिवसांमध्ये वनरक्षकची या ठिकाणी भरती निघत आहे 12,991 जागांसाठी ही भरती निघणार आहे आणि वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण फक्त बारावी पास लागते महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातल असाल तर मुलामुलींना अर्ज करता येणार आहे. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 60 पैकी जे पासिंग ठेवण्यात आली आहे. वनरक्षक भरतीमध्ये फक्त 60 पैकी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, डब्लएस, एनटीओ, ओपन, एसईबीसी कोणत्या कॅटेगरीचे असाल तर आपण पेपर पास असतो. डायरेक्ट आपल्याला ग्राउंडसाठी बोलवल जाते आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. एक लक्षात ठेवा तर जास्त चान्स आहे वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे.

कोणत्या महिन्यामध्ये वनरक्षकची भरती पडणार आहे. तर वनरक्षकची जी ही भरती आहे, ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास याठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये ही भरती निघण्याची याठिकाणी दाट शक्यता आहे. भरती निघण्याच जे कारण आहे कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असणार आहे महानगरपालिका झालं, जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं तर ह्या निवडणुका समोर चालून असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर याच्या अगोदरच जे वनरक्षकची जाहिरात आपल्याला याठिकाणी पाहायला भेटणार आहे.

१) अर्ज करण्यासाठी पात्रता:

  • वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर पात्रता आहे. तर काय काय पात्रता आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
  • वनरक्षक भरतीमध्ये दहावी बारावी पास पाहिजे.
  • महाराष्ट्रातील मुल मुली फॉर्म भरू शकता.
  • वनरक्षक भरतीमध्ये सायन्स,कॉमर्स कुठलीही शाखा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. आर्ट असाल तर तुम्हाला अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोन पैकी एक विषय असेल तरच आपल्याला वनरक्षक मध्ये अर्ज करता येईल.
  • वयमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत वयमर्यादा आहे. तसेच एससी एसटी कॅट्यागरीचा विद्यार्थी असेल तर 18 ते 32 पर्यंत यामध्ये अर्ज करू शकता.

२) वनरक्षक भरती लेखी परीक्षा:

वनरक्षक भरतीची लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (CBT Test) द्वारे घेण्यात येईल. त्यासाठी खालील विषय व त्यानुसार गुण असेल.

३) लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी होईल (DV) आणि खालील कागदपत्रे असणे आवश्यक असतील.

  • शैक्षणिक प्रमाणपत्र (१२वी किंवा समकक्ष)
  • ओळखपत्र (Aadhar/PAN/Passport)
  • जात प्रमाणपत्र (जर लागू असेल)
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • नोकरीस पात्रतेसाठी लागणारी इतर कागदपत्रे
  • जर कोणत्याही उमेदवाराकडे आवश्यक कागदपत्रे नसतील, तर त्याची निवड रद्द केली जाऊ शकते.

४) शारीरिक चाचणी (Physical Test)
कागदपत्रे पडताळणीनंतर झाल्यानंतर लगेच पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. यामध्ये उमेदवारांची शारीरिक क्षमता, उंची, वजन, छाती यांची तपासणी होईल.

  • शारीरिक चाचणी Physical Test Details
    पुरुष:
  • धावणे: 5 Km (17 मिनिटे) किंवा नियमांनुसार
  • उंची: किमान 163 सेमी
  • छाती: 79 सेमी (फुगवून 84 सेमी)
  • लांब उडी (Long Jump): किमान 4 मीटर
  • महिला:
  • धावणे: 3 Km (12 मिनिटे) किंवा नियमांनुसार
  • उंची: किमान 150 सेमी
  • लांब उडी (Long Jump): किमान 3 मीटर
  • शारीरिक चाचणीसाठी एकूण 80 गुण आहेत.

5)अंतिम निवड व गुणवत्ता यादी:

वनरक्षक भरतीमध्ये लेखी परीक्षा (120 गुण) व शारीरिक चाचणी (80 गुण) या दोन्ही टप्प्यांतील गुण एकत्र करून Final Merit List तयार केली जाईल.परीक्षा तयारी पुस्तके ज्यांचे एकूण गुण सर्वाधिक असतील, त्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी पात्र ठरवले जाईल.वनरक्षक भरती 2025 ही निसर्ग व पर्यावरण सेवेसाठी उत्कृष्ट संधी आहे. यामार्फत तुम्हाला सरकारी नोकरी ची उत्तम संधी मिळते. यामध्ये लेखी परीक्षा, डॉक्युमेंट, शारीरिक चाचणी व गुणांवर आधारित अंतिम निवड अशा चार टप्प्यांमधून उमेदवारांची अंतिम निवड होते.

अभ्यास कसा करायचा:

जे विद्यार्थी अभ्यास याठिकाणी करत असाल तर आपल्याला याठिकाणी अभ्यास कशा प्रकारे करायचा ते तर पहा तुम्ही काय करताय आपण सर्व विषयचे वेगवेगळे पुस्तक वाचतो जस मराठी व्याकरणच वेगळ पुस्तक वाचणार, जीकेच वेगळ वाचणार आहे, त्याचबरोबर गणिताच वेगळ वाचणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीच वाचणार आहे. तर एवढं मोठं आपण वाचल्यापेक्षा जे महत्वच आहे एवढंच या ठिकाणी वाचा म्हणजे सांगायचं एवढेच की महत्त्वाच या ठिकाणी तुम्हाला वाचायच आहे जर समजा लवकर आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल वनरक्षक भरतीमध्ये पेपरामध्ये आपल्याला चांगले गुण जर घ्यायचे असेल.

तर महत्वाच आपल्याला या ठिकाणी अभ्यास कुठून करायचं तर पहा जे टीसीएस कंपनी आहे ती वनरक्षक भरतीचा पेपर घेते आणि टीसीएस कंपनीचा एक लक्षात ठेवा की हे जे आहे. पेपरला जे मागच्या वर्षी प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते आणि त्याच्या मागच्या वर्षी पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते तेच प्रश्न रिपीट करते टीसीएस कंपनी वनरक्षक भरतीचा जो पेपर हा तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे प्रॅक्टिस सेट आपल्याला या ठिकाणी वाचायचे आहे जे मागील वर्षी पेपर सेट झाले जे मागील वर्षी जेवढ्या पण प्रश्नपत्रिका संच आहे तर त्या या ठिकाणी वाचायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *