घरात मोठा दादा असतो तेव्हा त्याच्या वयाने मोठं असल्यामुळे आपल्याला ऐकाव लागतं ही आपली भावना असते तो रागावला की आपल्याला पण राग येत असतो तो चुकला की त्याला नाव ठेवता येत असतं तो करत असलेले कष्ट हे त्याचं कर्तव्य वाटत असतं त्याची अधूनमधून भीती पण वाटत असते पण तोच दादा जेव्हा या जगात नसतो तेव्हा हसत्या खेळत्या घरात एक कायमची भीती घर करू लागते दादा असतो तेव्हा जाणवत नाही पण दादा गेल्यावर जाणवतं आपला आधार हरवलाय.
अजित दादा गेले हे महाराष्ट्राला एवढ्या सहजासहजी मान्य होणार नाही. एक आजोबा सारखे म्हणतायत की ही बातमी खोटी निघावी विमान अपघाताचे फोटो आलेत आता बातमी कशी खोटी असेल त्यांचं म्हणणं होतं की मीडियात एवढ्या बातम्या खोट्या निघतात ही पण एक बातमी खोटी निघाली तर कोणता आभाळ कोसळणार आहे पण आभाळ कोसळल महाराष्ट्राचे स्पष्ट आणि रोकठोक दादा गेले माजी मुख्यमंत्री वसंत दादांनंतर राज्यात लोकप्रिय असलेले दादा एकच अजित दादा मंत्रालयात जाणारा सामान्य माणूस असू दे किंवा तिथला अधिकारी असू देत प्रत्येक जण सांगायचा दादांनी सांगितलंय काम होणार होणारच नाही होणार तर नाही होणार पण दादा कधी खोट आश्वासन देणार नाहीत.
दादांच्या जवळच्या लांबच्या प्रत्येक कार्यकर्त्याला दादांचा फटकळ पण स्पष्ट स्वभाव आवडायचा दादांनी मला कसं झापलंय असं कौतुकाने सांगणारे अनेक कार्यकर्ते आज महाराष्ट्रात आहेत त्याला कारण आहे दादांनी झापलं तरी उद्या काम तेच करणार आहेत याची खात्री होती पण आता काम घेऊन जायचं कुणाकड दादा कधीच मीडियाला पत्रकारांना नियमित भेट भेटणारे किंवा नियमित भेटी पाठवणारे नव्हते त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या आरोपांना जितकी प्रसिद्धी मिळाली तेवढी त्यांच्या खुलाशांना कधी मिळाली नाही दादांची बाजू कायम दुर्लक्षित राहिली.
दादांनी करोडो लोकांना मदत केली;
दादांनी करोडो लोकांना मदत केली लाखो लोकांची काम केली हजारो लोकांना उभं केलं शेकडो लोकांना उद्योगपती, कंत्राटदार, आमदार, खासदार केलं नोकऱ्या लावून देणं दवाखान्याची मदत करणं अशी काम ते अगदी नेहमी नियमित करायचे पण या गोष्टीची त्यांनी कधी चर्चा केली नाही. लोकांनी सुद्धा दादांच्या भाषणातली वाक्य काढून रील्स बनवल्या लाखोनी लाईक्स मिळवले. पण दादांनी काम काय केलं हा विषयफार चर्चेत आणला नाही.
कारण आपलं काम करणं हे दादांचं कामच आहे हा विश्वास होता. दादान लोक सुरुवातीपासूनच लोकांची काम करतानाच पाहत आलेत. ते कधी गाणी ऐकत बसलेत कविता ऐकत बसलेत असं पार घडायचं नाही स्टेजवर खुर्चीत बसलेले असताना सुद्धा लोक त्यांच्याकडे कुठला ना कुठला अर्ज घेऊन आलेले दिसायचे घरातला आपला मोठा भाऊ जसा जबाबदार आल्यावर काम करू लागतो त्याला कायम तसच बघण्याची सवय आपल्याला लागते आणि ते त्याचं कर्तव्यच आहे असं वाटायला लागतं घरातला दादा असतो त्याच्याकडन कायम अपेक्षा असतात त्या मनाने कौतुक तसं फार वातत्याच्या वाट्याला येत नाही अजित दादा महाराष्ट्राचे असे दादा राहिले ज्यांच्याकडन लोकांना कायम आपलं काम होण्याची अपेक्षा असायची.
आज बातमी देताना मीडिया हळहळतोय. डोळे पाडावले. कुणीतरी चारित्र्यवान ठरावं म्हणून कुणाच्यातरी चारित्र्याच्या चिंध्या करायच्या हे आता राजकारण झालय. या राजकारणाचा भाग म्हणून अजित दादांवर सोयीच्या वेळी आरोप झाले जेव्हा गरज पडली तेव्हा त्याच अजित दादांना सच्चा मित्र म्हणून मांडीला मांडी लावून बसवलं गेलं राजकारण्यांनी हे सगळं करणं हा त्यांच्या राजकारणाचा भाग पण दादांनी कधी मीडियाला आपली प्रतिमा हणन केल्याचा जाब विचारला नाही. मीडियाने सुद्धा कधी या गोष्टीची खंत व्यक्त केली नाही. कायम दादांभवती एक संशयाच धुक राहील याची या राजकारणान काळजी घेतली. घाऊक दरात विकास पुरुष अस बिरुध वाटल्या जाण्याच्या काळात दादांनी केलेल्या विकासकामांना तेवढा न्याय मिळाला नाही. पिंपरी चिंचवडचा कायापालट करणाऱ्या दादांचा जनता कायम आदरान उल्लेख करायची तेवढा माध्यमात झाला नाही.
दादांची लोकप्रियता त्यांच्या कामान, कार्यकर्त्यांच्या प्रेमान वाढत गेली;
बारामती गेली काही वर्ष दादा एक हाती घडवत होते. आपल्या स्वतःच्या घराचे इंटेरियर करावं तेवढ्या आत्मीयतेन आणि काळजीन बारामतीची प्रत्येक गोष्ट दादा करत होते. पुण्याच्या प्रत्येक प्रश्नात दादा बारकाईने लक्ष घालत होते. त्यांच्याभोवती कुठल्याही शहरात शेकडो लोकांचा घोळका कायम असायचा. छोटा एखादा पुढारी आला तरी मोठे मोठे बुके घेऊन येणारे कार्यकर्ते आपण बघतो. पण दादा आले की लोकांच्या हातात बुके कमी आणि अर्ज जास्त असायचे. लोकांनी आणलेले कामाचे अर्ज हेच दादांना आवडणारे मुके होते. अमुक कामाला पैसे नाहीत अस मीडियाला थेट सांगणारे ते अर्थमंत्री होते. अजित दादा हे देशाच्या राजकारणात सध्या एकमेव असे नेते असतील ज्यांनी आपली लोकप्रियता पत्रकारांच्या जीवावर मिळवलेली नव्हती. दादांची लोकप्रियता कायम त्यांच्या कामान आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमान वाढत गेली.
घराला आपला दादा असतो तेव्हा जाणवत नाही पण दादा नसतो तेव्हा जाणवतं की आपण काय गमावल आज संपूर्ण राज्यात आपलं घरातलं माणूस गेले अशी जी भावना आहे यामुळेच महाराष्ट्र धर्माला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न झाला किंवा केंद्राने महाराष्ट्रावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आपला एक रोकठोक माणूस सत्तेत आहे ही सामान्य माणसाला आशा होती ती आता संपली सत्तेत असून सुद्धा शाहू फुले आंबेडकरी विचारांचा वारसा उघडपणे मिरवणारा आणि आपल्या कृतीतून सुद्धा पुरोगामी असणारा नेता आज महाराष्ट्रातन गेलाय राजकारणात सुमारांची दहशत वाढत असताना त्यांना धाक असणारा एकमेव दादा आता आपल्यात नाही आता जाणीव होतीय की तिजोरीच्या चाव्या दादांच्या हातात आहेत ही राज्यातल्या शेतकरी कष्टकरी लोकांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती.
आता जाणीव होतीय…
आता जाणीव होतीय की सत्तेत असून सुद्धा भारतीय जनता पक्षाला सुद्धा खडे बोल सोनवणारा नेता आज आपण गमावलाय. आता जाणीव होतीय की आपला दादा नसणं ही एका घराला जशी कमकुवत करणारी घटना असते त्यापेक्षा जास्त एका राज्याला आपला दादा नसणं ही जास्त नुकसान करणारी घटना असते. सहकाऱ्यांना व्यसनापासून दूर रहा असं सांगणारा यंत्रणेला भल्या पहाटे जाग करणारा प्रसंगी ओरडणारा प्रसंगी खळखळून हसणारा खऱ्या अर्थाने दादा असतो आणि हा दादा माणूस आज आपल्यात नसणं हे खूप वेदनादायी आहे ही कोणाची नजर लागली आपल्या महाराष्ट्राला अर्थसंकल्प सादर व्हायच्या काही दिवस आधी आपला अर्थमंत्रीच जावा हे दुःखद आहे
आज तरी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाला शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पातला अर्थ हरवल्याची भावना झालीय सगळ्यात वाईट वाटतय आज ते शरद पवारांसाठी या वयात या नेत्याला आणखी किती दुःख पचवाव लागणार आहे बापाच्या वयाच्या माणसाला घरातला दादा माणूस गेल्याच पाहणं हे किती वेदनादायी असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही महाराष्ट्र आज मीडियामध्ये व्यक्त होतोय दादा किती मोठे होते पण मनात म्हणतो की हे मोठेपण सांगण्यात आजवर आपण कमी पडलो गेल्या कित्येक वर्षात मुख्यमंत्री होण्याची सर्वार्थाने ताकद असणारा एकमेव नेता ज्याला आपण कायमच उपमुख्यमंत्री ठेवलं.

