देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे प्रयागराज भूमीवर कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता ज्या कारणाने आगमन होते, ते निमित्त म्हणजे महाकुंभमेळा! कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे आणि जगभरातून लाखो भाविक यात सहभागी होतात.कुंभ मेळा तीन प्रकारवा असतो. अर्थ कुंभ, कुंभ आणि महाकुंभ अर्थ कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षानी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभये आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षापर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवीं कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते.
कुंभमेळा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव आहे. हा मेळा दर बारा वर्षांनी भारतातील चार पवित्र नद्यांच्या संगमावर भरतो. या नद्यांमध्ये गंगा, यमुना, सरस्वती आणि गोदावरीचा समावेश होतो. कुंभमेळ्यात भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि देवतांची पूजा करतात.भारतातील सर्वात मोठा आणि पवित्र धार्मिक मेळा म्हणजे महाकुंभ. हा मेळा दर १४४ वर्षांनी भरतो आणि या वर्षी तो प्रयागराजमध्ये होत आहे.
कुंभमेळ्याचे महत्त्व:
- धार्मिक महत्त्व: कुंभमेळा हिंदू धर्मातील एक पवित्र कार्यक्रम आहे. मान्यतेनुसार, देवांनी अमृतकुंभातून अमृत पाजताना काही थेंब पृथ्वीवर पडले होते आणि तेथेच कुंभमेळे भरतात.
- सांस्कृतिक महत्त्व: कुंभमेळा हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या मेळ्यात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन आणि कलाकारांच्या सादरगी होतात.
- सामाजिक महत्त्व: कुंभमेळा हा एक सामाजिक कार्यक्रम देखील आहे. या मेळ्यात लोक एकत्र येतात, एकमेकांना भेटतात आणि नवीन मित्र बनवतात.
कुंभमेळ्याची सुरुवात कधी झाली :
असे सांगतात, की अगस्ती ऋषीनी दिलेल्या शापामुळे देव शक्तीहिन झाले. मग पुढे अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आली.समुद्र मंथन बारा दिवस चालले, ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष होत. अमृत प्राप्त झाले, ते दानवापासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृतकुंभ घेऊन पलायन केले. या पलायना दरम्यान ते ज्या ठिकाणी लपलेती चार ठिकाणं म्हणजे हरी द्वार,प्रयाग ,उज्जैन व नाशिक! या ठिकाणी हे अमृतकुंभ ठेवल्या गेल्याने या चार स्थानांना महत्व प्राप्त झाले. या चार ठिकाणी देव ज्या वेळी थांबले त्या वेळी असणारे ग्रहमान लक्षात घेऊन त्या योगावर पुढे कुंभमेळा भरु लागला!
कुंभमेळा कुठे भरतो?
कुंभमेळा भारतातील चार ठिकाणी भरतो:
- प्रयागराज (अलाहाबाद): गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम
- हरिद्वार: गंगा नदी
- उज्जैन: शिप्रा नदी
- नाशिक: गोदावरी नदी
महाकुंभ २०२५ कुठे आणि कधी पर्यंत असणार आहे?
- कुठे असणार: प्रयागराज (आलाहाबाद), उत्तर प्रदेश
- कधीपासून कधीपर्यंत असणार : १३ जानेवारी २०२५ पासून २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत
- महाकुंभ २०२५ मध्ये काय होणार?
- पवित्र स्नान: भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात.
- धार्मिक अनुष्ठान: विविध प्रकारची धार्मिक अनुष्ठाने पार पाडली जातात.
- सांस्कृतिक कार्यक्रम: संगीत, नृत्य, नाटक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- धार्मिक प्रदर्शन: धार्मिक ग्रंथ, मूर्ति आणि इतर धार्मिक वस्तूंचे प्रदर्शन भरते.
- साधू संमेलन: देशभरातून आलेले साधू एकत्र येतात.
- महाकुंभ २०२५ का पहावे?
- आध्यात्मिक अनुभव: कुंभमेळा हा एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव आहे.
- भारतीय संस्कृती: या मेळ्यात आपल्याला भारतीय संस्कृतीची विविधता आणि समृद्धी पाहण्याची संधी मिळते.
- सामाजिक एकता: हा मेळा लोकांना एकत्र आणतो आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे.
महाकुंभ २०२५ चे महत्त्व:
- अद्वितीय खगोलीय घटना: या वर्षीचा महाकुंभ खूपच विशेष आहे कारण यावेळी ७ ग्रह एका रांगेत येणार आहेत. यामुळे या महाकुंभाला ‘अमृत महाकुंभ’ असे म्हणतात.हा मेळा दर १४४ वर्षांनी भरतो आणि या वर्षी तो प्रयागराजमध्ये होत आहे.
कुंभमेळ्याची भौगोलिक पार्श्वभूमी :
प्रत्येक ठिकाणचा कुंभयोग निरनिराळा असून तो पुढीलप्रमाणे येतो : (१) प्रयाग – मकर राशीत चंद्र-सूर्य, वृषभ राशीत गुरू आणि अमावास्या तिथी असता (२) हरद्वार – गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असता (३) नासिक – गुरू सिंह राशीत आणि चंद्र-सूर्य कर्क राशीत असता (४) उज्जयिनी – सूर्य आणि गुरू अनुक्रमे तुला आणि वृश्चिक राशीत असता. प्रयागमधील कुंभपर्वात मकर संक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे आहेत. त्यापैकी अमावास्या हे प्रमुख पर्व असून त्याला ‘पूर्णकुंभ’ हे नाव आहे गुरूला राशिचक्र भोगण्यास बारा वर्षे लागत असल्यामुळे, दर बारा वर्षांनी कुंभयोग येतो. कुंभपर्वाच्या वेळी प्रयागादी क्षेत्रांत स्नान केले असता, अनंत पुण्यलाभ होतो, ह्या भावनेने लाखो भाविक लोक तसेच शेकडो मठाधिपती व साधुसंत, आपापल्या घोडे, उंट, हत्ती इ. सरंजामासह त्या त्या ठिकाणी जमतात.सूर्याभोवती भ्रमण करणारे नऊ ग्रह एका रेषेत येतात त्यावेळी सूर्याचे किरण ज्या स्थानावर पडतात तिथे कुंभमेळ्याचे औचित्य असते असे मानले जाते.
कुंभमेळ्यात विविध आखाड्यांच्या साधू मंडळींचा सहभाग हे याचे वैशिष्ट्य असते आणि तो अविभाज्य भाग मानला जातो. कुंभमेळ्यात विविध आखाडे आणि साधू यांचे विशेष महत्त्व असते. या उत्सवात विविध साधू आणि त्यांचे आखाडे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. होम-हवन, वैदिक मंत्रांचे पठण, प्रवचने, लोकांना उपदेश करणे असे अनेक विविध उपक्रम पहायला मिळतात.
आखाडा संकल्पना’-
कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आखाड्याचे सदस्य असतात. काही साधू स्वतंत्रपणेही सहभागी होताना दिसतात. शैव ,वैष्णव , नाथपंथी. असे आखाडे आहेत.मुस्लिम शासकांच्या आक्रमणापासून हिंदू धर्माचे तसेच हिंदू तीर्थक्षेत्र स्थळांचे रक्षण करण्यासाठी असे आखाडे निर्माण झाले असे मानले जाते. सैनिकांच्या समूहाप्रमाणे या आखाड्यांचे नियम, आचरण असते. कुंभमेळ्यात या सर्व आखाड्यांच्या साधूंचे विशेष आदराने स्वागत केले जाते, त्यांना सेवा – सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
अशा भव्य महाकुंभ मेळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे, ही आपल्यासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे.