नागपंचमी २०२५…! (कहाणी नागदेवताची)

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

ओम नमः शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो, नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सन आहे. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते.

हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पुजले जातात. नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे. भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात. यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे. श्रावण महिना हा शिव पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते.

या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते. ज्या व्यक्तींना काल सर्प दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष देखील नाहीसे होतात. नागपंचमी हा सन श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला येत असतो. बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात तर काही ठिकाणी नाग चतुर्थीच्या दिवशी उपवास केला जातो.

घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते. नागदेवतेला हळदीकुंकू लावले जाते काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते. नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवद्य दिला जातो. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची देखील प्रथा आहे.

सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात. आता झोका का खेळतात यामागे देखील एक कारण आहे जसा जसा झोका पुढे जातो तस तशी आपल्या भावा

ची प्रगतीही होत जाते आणि जसा जसा झोका हा मागे येतो तसेच आपल्या भावावरती जे काही संकट येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते म्हणून नागपंचमीच्या दिवशी महिला झोका या आवर्जून खेळतातच आपल्याला या दिवशी पाच झोके तरी कमीत कमी खेळायचेच आहे.

नागपंचमीच्या दोन कथा आहे :

  • नागपंचमीच्या ब्राह्मण सुनेची
  • नागपंचमीच्या शेतकऱ्याची

कहाणी नागपंचमीची ब्राह्मण सुनेची :

एका नागोबा देवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरच कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरा होऊन यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कुठून आला पुढे त्यान मुलीला विचारलं तिनही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणान तिची रवांगी केली त्या वेषधारी मामान वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा त्या मुलीला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिऊन गेली केले हातातला दिवा खाली पडला पोरांची शिप भाजली नागिन रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचू पुढे ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोर मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशान तिन मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सोड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिना आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाचीचित्र काढली त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्ल बघत होती सरते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातला सर्व राग घालवला. मनात तिच्या विषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथे वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोळ प्रसन्न झाला.

कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची :

आठपाठ नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्यप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगता नांगता काय झालं वारुळात जी नागाची नाग कुल होती त्यांना नांगराचा फळ लागला लवकरच ती मेली काही वेळाने नागिन आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाही इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याच नांगरान माझी पिल्ल मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वश करावा असं मनात आणलं फोपावताच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकीस सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला ला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले. पुढे तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिसली होती ती तर त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईन पाटावर नाग नागे नऊ नाग कुळ काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवद्य दाखवला आहे. नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदान पूजा करून प्रार्थना करत आहे. तोही नागिन तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधानी पावली. चंदनात आनंदान लोळली. इकडे जी प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिन डोळे उघडले.

पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिहू लागली. नागिन म्हणाली भिहू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांचउत्तर दे सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीन पुजत आहे. आपल्या व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिन तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसाच्या तोंडून अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिन झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापान विचारलं हे व्रत कसं करावं मुलीन व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला.

|| नागपंचमीच्या सर्वांना खूप खुप शुभेछ्या ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *