नरेंद्र मोदी नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधान बनण्याच्या चर्चा का होतायत ?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

 आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वित प्रवेश केला पण या 75 वर्षात महाराष्ट्राचा एकही नेता देशाचा पंतप्रधान झाला नाही यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते अगदी आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत महाराष्ट्राला फक्त पंतप्रधान पदाची आशा दाखवली गेली आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त आशाच राहिली आहे आता पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात तसेच माध्यमांमध्ये होताना दिसते कारण फडनवीस यांच केंद्रात जाण्याबाबतच वक्तव्य आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आलेले संकेत यामुळे मोदींचा पुढचा उत्तराधिकारी कोण होणार अशी चर्चा रंगती आहे.

यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच नाव सुद्धा अग्रस्थानी आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पंतप्रधान पद भूषवणं सोपं नाही कारण या स्पर्धेत अजून मोठमोठ्या बड्या नेत्यांची नाव सुद्धा चर्चेत आहेत. मोदींच्या उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत कोणकोणते नेते आहेत फडनवीस खरच पंतप्रधान होऊ शकतात का आणि पंतप्रधान पदाच्या या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फडनविसांच्या समोर नेमकी कोणती आव्हान आहेत याचीच माहिती आज आपण घेणार आहोत.

देवेंद्र फडणवीस खरच पंतप्रधान होऊ शकतात का?

कारण पहिले:

सगळ्यात पहिल्यांदा आपण देवेंद्र फडणवीस खरच पंतप्रधान होऊ शकतात का? याची काही कारण पाहूयात. आता फडनवीस पंतप्रधान होऊ शकतात याच पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडनवीस यांना असलेली आर एसएस ची पार्श्वभूमी फडनवीस यांचा चेहरा राज्यातला प्रमुख भाजप चेहरा आहे त्यांना भाजपचे वैचारिक मार्गदर्शक असल्याच देखील बोललं जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तसा विश्वास देखील आहे तसच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांना पसंत करतात माहितीच्या विधानसभेतील दणदणीत विजयानंतर देवेंद् फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रीय सहयोग संघाचा पाठिंबा होता. अस देखील बोल बोललं जात होतं.

खरं तर केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या त्यांच्या जवळीकतेमुळेच नाही तर निवडणुकीत भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊन मिळवलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे त्यांना मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालं असं देखील बोललं जातं पण देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय संयोजक संघाशी असलेली जवळता नाकारता येत नाही कारण देवेंद्र फडणवीस लहानपणापासूनच आरएसएस च्या कुशीत वाढलेले नेते आहेत त्यामुळे लहानपणापासूनच देवेंद्र फडणवीस यांची नाळ आरएसएस सोबत जोडली गेली आहे त्यात आर एसएस मुख्यालय नागपूरमध्ये असल्यामुळे आणि देवेंद्र फडणवीसांचा जन्म सुद्धा नागपूरमध्ये झाल्यामुळे फडनविसांना पंतप्रधान पदासाठी आर एसएसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढते. आणि काही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपचा पंतप्रधान ठरवत असताना अंतिम निर्णय आर एसएसचा असतो असं देखील बोललं जातं.

दुसरं कारण:

त्यानंतर आता दुसरं कारण म्हणजे फडनविसांची संकटमोचक म्हणून असलेली ओळख मंडळी मागील काही वर्षापासून राज्यातल राजकारण हे फोडाफोडीच राजकारण म्हणून उदयास आलाय त्यामुळे कधी कोणता पक्ष फुटेल आणि कधी कोणता पक्ष सत्तेत येईल हे सांगणं कठीण झालय. या परिस्थितीत देखील देवेंद्र फडणवीस भाजपसाठी नेहमीच संकटमोचक म्हणून वेळोवेळी उभे राहिले आहेत. 21 ऑक्टोबर 2019 रोजी एकाच फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात 288 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत एकूण 61% मतदान झालं होतं. निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. परंतु ऐन सरकार स्थापन करायच्या वेळेस दोन्ही पक्षात मतभेद झाले आणि या मतभेदानंतर युती विसर्जित झाली आणि राजकीय संकट निर्माण झालं.

त्यावेळी कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली परंतु 23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तथापी या दोघांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला आणि 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी या नवीन युती अंतर्गत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद देऊन सरकार स्थापन केलं पण फडणवीस अजूनही शांत नव्हते ते फक्त संधीच्या शोधात होते आणि ती संधीदिली एकनाथ शिंदे यांनी त्याचं झालं असं.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्यान उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फड फडनवीस यांच्या सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले आणि भाजप शिवसेना युतीन भाजप पुन्हा सत्तेत आलं परंतु यावेळी फडनवीसांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं पण त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना एक संयमी आणि संकटमोचक नेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांच्या या त्यागाचाच फायदा त्यांना केंद्रात होण्याची शक्यता आहे.

तिसरं कारण:

यातला आता तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे फडणवीसांची प्रशासनावरील असणारी पकड आणि प्रभावी व्यवस्थापन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभाग घेतलाय आणि अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत ज्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जे जपानी तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आला आहे त्याचबरोबर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेटू नागपूर गोवा एक्सप्रेसवे जो राज्याला सागरीबंद्रांशी आणि बाह्य व्यापाराशी जोडणारा मार्ग ठरलाय न्यू नागपूर इंटरनॅशनल बिझनेस सेंटर अशा मोठ्या प्रकल्पामुळे आणि फडनविसांच्या या प्रयत्नांमुळे तसेच फडनविसांची उत्तम हिंदी इंग्लिश आणि मराठी या भाषेवर असलेली पकड यामुळे त्यांना एक प्रभावी व्यवस्थापक देखील बोललं जातं आणि म्हणूनच पंतप्रधान मोदींनंतर फडनवीस प्रभावी दावेदार आहेत असं बोललं तरी वावग ठरणार नाही.

चौथं कारण:

आता यातलं चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे फडनविसांची एक सर्वसमावेक चेहरा म्हणून असलेली इमेज. देवेंद्र फडणवीस हे एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून पुढे आलेले नेते आहेत त्यांना आर एसएस ची पार्श्वभूमी असली तरी देखील त्यांच्याकडे कट्टर हिंदुत्ववादी म्हणूनच पाहिलं जात नाही त्यांनी सुरुवातीपासूनच एक सर्वसमावेशक नेता म्हणून काम केलय त्यामुळे कट्टर हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीचे अजित पवार असतील किंवा बिहारचे नितीश कुमार असतील हे मित्रपक्ष सुद्धा फडनविसांना पंतप्रधान म्हणून पसंती देऊशकतात याशिवाय दलित ओबीसी मतदारांमध्ये सुद्धा त्यांची बऱ्यापैकी हवा आहे त्यामुळे एकूणच सॉफ्ट हिंदुत्वाच्या जीवावर त्यांना संधी मिळू शकते.

पाचव कारण आहे ते म्हणजे फॅक्टर मंडळी मोदींच्या उत्तराधिकारी बनण्याच्या रेसमध्ये असलेल्या नेत्यांमध्ये एक तरुण नेतृत्व म्हणून फडनवीस यांच्याकडे पाहिलं जातं योगी आदित्यनाथ अमित शहा हे सगळे वयाच्या रेसमध्ये तुलनेन खूप वयस्कर आहेत त्यामुळे एक तरुण नेता देशाचा पंतप्रधान व्हावा असं अनेकांना वाटतं पण काही राजकीय विश्लेषकांच असं पण मत आहे की हे सगळं वाटतय तेवढं सोपं नाही कारण फडनविसांना पंतप्रधान पदाचा दावेदार जरी बोललं जात असलं तरी त्यांच्या या दावेदारीला आव्हान देखील तितकीच खूप आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असलेली आव्हान:

चला चला तर मग देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असलेली आव्हान नेमकी कोणती आहेत त्यावर एक नजर टाकूयात यातलं पहिलं आव्हान म्हणजे प्रादेशिक मर्यादा मंडळी देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रात त्यांना चांगली प्रसिद्धी देखील मिळाली परंतु पंतप्रधान पदाचा आवाका मोठा असल्यामुळे फडणवीसांना इतर राज्यात हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाहीये.

2014 मध्ये मोदीला आली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण आता त्या लेवलची प्रसिद्धी मिळवणं फडनविसांसाठी आव्हान असणार आहे. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ, अमित शहा, नितीन गडकरी अशा बड्या नेत्यांच देखील फडनविसांसमोर आव्हान असणार आहे. एवढंच नाही तर अजून एक महत्त्वाचा आव्हान म्हणजे देशभरातलं जातीय समीकरण. भाजपच राजकारण हे ओबीसी मतदारांच्या आजूबाजूला जास्त फिरत त्यामुळे भाजपला ओबीसी मतदारांना नाराज करून कोणतही पाऊल उचलता येणार नाही याशिवाय देवेंद्र फडणवीस हे एक ब्राह्मण नेते आहेत त्यांना जर पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली तर ओबीसी दलित मतदार नाराज होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

योगी शहा सुद्धा या स्पर्धेत गेम चेंजर ठरणार आहेत कारण दिल्लीला जाणारा रस्ता युपी मधून जातो असं बोललं जातं म्हणजेच पंतप्रधान निवडी बाबत युपीला ला जास्त प्राधान्य दिलं जातं त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच 2029 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होतात की अजून कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *