निर्दयी बाप… लेकीचा घात..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे माध्यमिक शिक्षक असलेल्या पित्याने मुलगी साधना (वय १७) हिला जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली. याप्रकरणी वडील धोंडीराम भगवान भोसले याला रविवारी अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलीची आई प्रीती धोंडीराम भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

मृत साधना ही आटपाडीत बारावीला विज्ञान शाखेत शिकत होती. तर वडील हे नेलकरंजी गावातच खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. साधना हिला बारावीत चाचणी परीक्षेतकमी गुण मिळाले. वडील धोंडीराम भोसले यांना हे समजताच ते संतापले. शुक्रवारी रात्री ९:३० च्या सुमारास साधना हिला घरातच लाकडी खुंट्याने अंगावर जागोजागी मारहाण केली. बारावीतील चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले? म्हणून धोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात हा अमानुष प्रकार केला. या मारहाणीत साधना ही गंभीर जखमी झाली. त्यातच साधनाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या अंत्यविधीनंतर आई प्रीती भोसले यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

नेमक काय घडल सविस्तर माहिती:

खाजगी क्लासेस मध्ये सरावाच्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून आपल्या मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादाय घटना सांगली मध्ये घडली मृत्यू झालाय साधना भोसले असे त्या मुलीचं नाव आहे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात हे घटना घडली असून साधना आटपडी मध्ये बारावीचा शिक्षण घेत होती वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तिची तयारी सुरू होती तिला डॉक्टर करण्याचं कुटुंबीयांचं स्वप्न होतं. त्यासाठी खाजगी शिकवणी तिला लावली होती या शिकवणी मध्ये एक सराव परीक्षा झाली तर तिला कमी गुण मिळाल्यामुळे वडील चिडले कमी गुण का मिळाले असा सवाल विचारात वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केली या मारहाणीनंतर या मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वडील धोंडीराम भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे.मारहाण करणारा बाप हा देखील एक शिक्षक आहे.

अत्यंत धक्कादायक माहिती ही म्हणावी लागेल. वडिलांनी घरामध्ये जो जात असतो तो जात्याचं लाकडी दांडा घेतला आणि जबरदस्त अशी मरहाणी केली आणि या मरहाणी मध्ये ती अगदी निपचित पडली मात्र वडिलांनी त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं तिला उपचाराला वेळीच दाखल केला नाही. आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर सांगली जिल्हा हा हादरून गेलेला आहे. कारण ही जी परीक्षा आहे ती कोणती महत्त्वाची परीक्षा नव्हती कारण सरावच परीक्षा होती, आणि सराव परीक्षेमध्ये कमी जास्त मार्क पडले जाऊ शकतात आणि त्यातच सुधारणा करून पुन्हा नव्या परीक्षेला येते जास्त मार्क पडले जाऊ शकतात मात्र वडील शिक्षक सुद्धा त्यांना गोष्टी आहेत त्या समजावून घेतल्या नाहीत.

आई सुद्धा लोकप्रतिनिधी आहे गावामध्ये आई ने सुद्धा या गोष्टी समजावून घेतल्या नाहीत. आणि दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आईने स्वतःच आपल्या नवऱ्याच्या विरोधात त्या मुलीच्या वडिलांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिलेली आहे आणि त्यावरून या आता वडिलांवरती कारवाई आहे ती पोलीस करताना पाहायला मिळणार आहे. एकूणच पाहायला गेलं तर शिक्षणासाठी किंवा कमी मार्क साठी जे आहे ते मुलांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार आहे, तो हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यांमध्ये झाल्याचा आपणाला दिसून येत आहे. या घटनेनंतर सगळीकडे हळहळ आहे ते व्यक्त केली जाते आता पोलीस या सगळ्याच्या मुळाशी जाऊन किंवा या घटना पुन्हा घडणार नाही यासाठी आहे ते काही गोष्टी उपाययोजना हाती घेतात का हे सुद्धा लक्षात येणार आहे.

नामांकित शिक्षक म्हणून लोक ओळखायचे:

वडील धोंडीराम भोसले काय त्यांची पार्श्वभूमी आहे शिक्षकी पेशांमध्ये काम करत असताना अशा प्रकारचं वर्तन आणि स्वतःच्या विद्यार्थी मुली बाबत हे अजिबातच अपेक्षित नाहीये त्यामुळे एकूणच शिक्षकी पेशा असलेल्या या वडिलांकडून झालेल्या ही कृत्य खरंतर खरच निंदणीय आहे.

वडील जे आहे ते नामांकित शिक्षक आहेत, आणि त्यांची शिक्षण संस्था आहे ते शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा ते नाव असलेले शिक्षक म्हणून ओळखले जाते. गावामध्ये सुद्धा त्यांचं वलय आहे त्यांनी पत्नीला सुद्धा ग्रामपंचायतीचे सरपंच केलं होतं त्यावरून या कुटुंबाचा अंदाज आणि या वडिलांचा अंदाज आहे, तो येऊ शकतो मात्र असं असताना स्वतःच्या मुलीला समजून घेण्याची कुवत आहे ती त्यांच्यामध्ये दिसून आली नाही, खरंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रती कशा पद्धतीने वागाव हे वेगळं सांगण्याची गरज नाही मात्र आपल्या मुलीच्या प्रती सुद्धा हा शिक्षक आहे तो या विद्यार्थी ते म्हणून तिच्याकडे बघितलं नाही किंवा बाप म्हणून सुद्धा बघितलं नाही खरोखर बापाच्या मुलीच्या वरती किती जीव असतो ते वारंवार अनेक घटनातून आपण पाहत असतो मात्र या मुलीला मारहाण करण्याचे धाडस या बापानं दाखवलं निर्दयी बाप असं म्हणावं लागेल आणि या मारहाणी मध्ये आहे त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि खरंच या घटनेनंतर सांगली जिल्हा पूर्णपणे हादरून गेलेला आहे केवळ जे कारण होतं ते सराव परीक्षेमध्ये कमी मार्क मिळालेले खरंतर या विद्यार्थिनीला दहावी मध्ये 95% मार्क मिळाले होते बारावी मध्ये सुद्धा ती याच गुणांना आहे ती उत्तीर्ण झाली असती मात्र वडिलांनी अति महत्वकांक्षा नडली.

शिक्षण तज्ञांनचे मत:

हेरंब कुलकर्णी पालकांची मुलं जर त्यांच्या प्रेमातून जन्मले असतील तर हे जग खूप वेगळा झाला असता असे जे कृष्णमूर्तींचे प्रसिद्ध वाक्य आहे तेव्हा पालकांचे मुलांवर प्रेम नाही तर पालकांचे फक्त आपल्या अपेक्षांवर प्रेम आहे माझी महत्वकांक्षा जर तू पूर्ण केली तरच मी तुझ्यावर प्रेम करेल अन्यथा मी तुझा बळी घेईल या टोकाला हे पालकांचे महत्त्वकांक्षच प्रेम गेलेल आहे आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की हे मारणार एक शिक्षक आहे की ज्या शिक्षकांना खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणजे काय हे समजून सांगायचं आहे पण तो शिक्षक जरी असलं तरी आपल्या समाजाचे एकूण कंडिशनिंग बळी आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागते आणि खर म्हणजे ही परीक्षा म्हणजे काय नीट ची अंतिम परीक्षा नव्हती ती फक्त पूर्व परीक्षा होती आणि काही गोष्टी आशा ऐकायला आल्या आहे की ती मुलगी वडिलांना असं म्हणाली की तुम्हाला पडले होते का इतके मार्क तुम्ही कलेक्टर झालात का अस बोलण्यामुळे देखील वडील आणखी चिडले आणि त्यांनी आणखी मारहाण ही केलेली आहे.

तसं जर बोललो असेल तर त्या मुलीची काही चूक नाही कारण पालक आपली स्वतःची क्षमता बघतात मुलांवर मात्र आपल्यापेक्षा लादत राहतात आपली स्वप्न त्यांच्यावर लाजतात समाजामध्ये ज्या काही प्रतिष्ठित गोष्टी आहे त्या प्रतिष्ठित गोष्टींचा हव्या असते धरतात तर याचा तर याचा हा बधी आहे यातला क्रौर्य जे आहे ते सगळ्यांना हादरून टाकणार आहे पण यानिमित्ताने मला एक वेगळा मुद्दा सांगावसं वाटतं की आपण समाधान डॉक्टर होणं इंजिनियर होणार क्लास वन अधिकारी होणार या गोष्टीला जे अवस्त महत्व दिलय तर या अवस्था महत्त्वाचे सुद्धा अप्रत्यक्ष हा परिणाम असतो एक साधा शेतकरी होणं एक चांगला माणूस होण याला आपण जितकं महत्त्व देऊ देत नाही परंतु आपण यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर ज्या प्रकारे आपण सगळेजण त्यांना सगळ्यांना डोक्यावर घेतो किंवा डॉक्टर इंजिनिअरच्या या सगळ्या नेटच्या परीक्षांना जे करतो याचा परिणाम आहे की म्हणून जय कृष्णमूर्ती असे म्हणतात आपलं शिक्षण हे किडलेला आहे कारण ते आपल्याला यशाची पूजा करायला शिकवतं.

पालकांसाठी महत्वाचा संदेश:

मुलांना त्यांच्या अपयशासह आणि मर्यादा सहज स्वीकारण्याची तयारी पालकांनी दाखवणे किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे तू जसा आहे तसा मी तुला स्वीकारतो या प्रकारची मानसिकता आपल्याला समाजामध्ये घडवावी लागेल आणि म्हणून या मुलीवर बळी हा प्रत्येक जण प्रत्येक पालक आपल्या मुलांचा थोडा थोडा बळी घेतच असतो ही बातमी फक्त मुलगी फक्त मृत्यू पडलेली आहे परंतु त्या नावाचा जो बळी आहे ही सगळीच मुलं आज समाजात आहेत.

आपले मुले पुढे वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ शकतात पण आपल्या मुलांच्या क्षमता काय आहेत मुलांची आवड काय आहे ते पालकांनी तो कल लक्षात घेयला हवा. त्या प्रकारे ते मुलांना देणार आणि कलाच्या दृष्टीने त्यांना पुढे नेण्यासाठी आपल्याला करावे लागेल आणि या घटनेतील आरोपीला शिक्षक आहे. त्यामुळे असं वाटतं की ज्यांनी या पाठाचे प्रबोधन समाजाचं करायचं तेच जर याच्यातले गुन्हेगार असतील तर मग कुणाकडे आपण अपेक्षणी पाहायचे मुलांना सुद्धा आणि पालकांना सुद्धा अगदी सर्वसामान्य पालक त्यांच्याकडूनं आपण हे एक वेळ ग्राह्य धरू शकतो की त्यांच्याकडन अशी कृती झाली. मात्र तुम्ही म्हणताय तसं हे आणखी धक्कादायक आहे की ज्याच्याकडूनं ही कृती झाली ते पालक सुद्धा एक शिक्षक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *