नोकरदार महिलांच्या मुलांसाठी एक महत्त्वाची बातमी कारण नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना आणली जाणार आहे मुलांच्या संगोपनाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. पहिल्या टप्प्यात 345 केंद्र सुरू होणार आहेत महायुती सरकारन नोकरदार महिलांना ही मोठी भेट दिलेली आहे. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात आता पाळणा योजना सुरू होणार आहे. नोकरदार महिलांच्या जीवनाला नवी ताकद देणारी त्यांच्या मुलांसाठी सुरक्षित आणि पोषणयुक्त वातावरण तयार करण्यासाठी ही योजना आणली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जाणार असून नोकरदार मातांच्या मुलांच्या संगोपनाची मोठी जबाबदारी आता शासन उचळणार आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यात 345 पाळणा केंद्र सुरू होणार आहेत आणि यासाठी मिशन शक्ती अंतर्गत केंद्र व राज्य शासन अनुक्रमे 60चा या हिश्याने निधी उपलब्ध करून देणार आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक पालकाला आपल्या बाळाची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न पडलेला असतो अनेकदा कामामुळे किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे बाळाला वेळ देता येत नाही पण यावर एक खास उपाय आहे आणि तो केंद्र सरकारने आणलेला आहे एक महत्त्वाचा योजनेमधून तुम्हाला माहित आहे का केंद्र सरकार एक अशी योजना चालवत आहे जी तुमच्या बाळासाठी एक सुरक्षित आणि प्रेमळ घर तयार करायला मदत करते. या योजनेला पाळणा योजना असे म्हणतात.
सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी पाळणा योजना सुरू असेल. महिन्यातील 26 दिवस आणि रोज साडेसात तास हे पाळणा घर सुरू राहणार आहे. त्यामुळे कर्मचारी महिलांसाठी आणि त्यांच्या लहानग्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. ही योजना नेमकी काय आहे आणि याचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो हेच आपण आज जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर केंद्र सरकारची जी पाळणा योजना आहे तर ती राज्य सरकारने राज्यात राबवण्यासाठी एक शासन निर्णय देखील पारित केलेला आहे आणि तो शासन निर्णय देखील आपण समजून घेणार आहोत. तुमचं बाळ जरी दिवसभर घरात एकट असेल किंवा तुम्हाला त्याला दिवसभर सांभाळायला कोणी नसेल तर काळजी करू नका ही योजना तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकते. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
योजनेची उद्दिष्ट:
या योजनेची उद्दिष्ट काय आहे नेमकी तर ही योजना कामावर जाणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या मुलांना सुरक्षित वातावरण सांभाळण्यासाठी मदत करते. यात सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण असतं बाळासाठी पौष्टिक आहार प्रदान केला जातो आणि शैक्षणिक खेळ आणि क्रियाकल्प सुद्धा या योजने अंतर्गत दिल्या जातात. पहिल्या आणि दुसऱ्या लसीकरणाची नोंदणी सुद्धा या पाळणा योजने अंतर्गत केली जाते किंवा आता ही पाळणा कशा पद्धतीने असणार आहे जशी तुमची अंगणवाडी तशाच पद्धतीने हा पाळणा असणार आहे.
पाळनामध्ये कोणकोणत्या सुविधा दिल्या जाणार:
आता या पाळणामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सुविधा किंवा तुमच्या बाळाला कोणकोणत्या सुविधा या दिल्या जाणार आहेत तर झोपण्याच्या सुविधांसह डे केअर सुविधा असणार आहे. त्यानंतर तीन वर्षाखालील बालकांसाठी पूर्व उद्दीपन आणि तीन ते सहा वर्षाच्या बालकांसाठी पूर्व शालेय शिक्षण सुद्धा याच्यामध्ये प्रदान केल जाणार आहे. त्यानंतर पूरक पोषण आहार स्थानिक स्तरावर मिळणार आहे, त्यानंतर वाढीचे निरीक्षण आणि सहनियंत्रण हे देखील याच्यामध्ये असणार आहे, आरोग्य तपासणी आणि लसीकरण सुद्धा पाळणा अंतर्गत बाळाला दिलं जाणार आहे.
आता केंद्र सरकार मागोमाग राज्य सरकारने सुद्धा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेल आहे. केंद्र शासनाच्या सूचना विचारात घेऊन पाळणा सुरू करण्यात यावे राज्यात. त्यानंतर पाळणा ची जागा पुरेशी असावी साधारण स्वयंपाक घर आणि बालकांना खेळण्यासाठी हॉल अशा किमान दोन खोल्या असावेत. त्यात प्रति बालक सहा ते आठ चौरस फूट याप्रमाणे खेळण्यासाठी पुरशी जागा असणं गरजेचे आहे. पाळणा स्वच्छ हवेसर व प्रकाशमय असावेज वीज पुरवठा उपलब्ध असणं सुद्धा गरजेचे आहे. त्यानंतर पाळणामध्ये नियमित पिण्याचे पाणी असणं गरजेच आहे. बालस्नेही संसालय वीज इत्यादी भौतिक सुविधा या केंद्र शासनाच्या सूचनाप्रमाणे उपलब्ध करून देण्यात याव्या या राज्य सरकारने आता जे स्थानिक प्रशासन आहे तर स्थानिक प्रशासन अंगणवाडीच्या प्रशासनाला या सूचना किंवा या निर्देश त्यांनी दिलेले आहेत.
पाळणा योजनेत बालकांना खाण्याच्या कोणत्या गोष्टी दिल्या जाणार:
आता पाळणा योजने अंतर्गत बालकांना खाण्यापिण्याच्या कोणकोणत्या गोष्टी दिल्या जाणार तर पाळणारतील बालकांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये पुरेपूर पोषणयुक्त असणं गरजेचे आहे. त्यानंतर याकरिता तीन वेळा अहार सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण गरम शिजवलेले आणि तीन संध्याकाळचा नाश्ता देण्यात यावा. त्यानंतर तीन ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना अंगणवाडीतील सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण व पाळणा निधीतून संध्याकाळचा नाश्ता ज्यामध्ये दूध, अंडी केली स्थानिक उपलब्धीनुसार इतर फळे याचा समावेश असतो. असण गरजेच आहे. त्यानंतर पाळणामधील बालकांचे वजन महिन्यातून एकदा घेऊन त्याबाबतची विहित नोंद असणं गरजेचे आहे.
पाळणामध्ये नोंद केलेल्या सर्व बालकांची आरोग्य तपासणी सरकारी रुग्णालयातील नोंद्रीकृत वैद्यकीय व्यवसाय डॉक्टरांनी दर तिमाही किमान एकदा केली पाहिजे. त्यानंतर पाळणामध्ये आवश्यक ते प्रथम उपचार साहित्य असावे त्यातील औषधांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. खेळांचे अत्यावश्यक साहित्य आणि अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षणासाठी अध्यापन शैक्षणिक साहित्य जे बालकांद्वारे थेट हटार जाऊ शकते ते बालकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून दिले तर अशा पद्धतीने राज्यात आता केंद्र सरकारची पाळणा योजना राबवण्यात येणार आहे पाळणा योजने अंतर्गत जे मातापिता कामावर जाता आणि त्यांच्या बाळाला सांभाळण्यासाठी कोणी नसतं तर ही पाळणा योजना त्यांच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकते. ते आपल्या बाळाला तिथं पाळणामध्ये देऊन ते आरामात कामाला जाऊ शकतात आणि पाळणामध्ये तुमच्या बाळाची सगळी केअर ही केली जाणार आहे.
शहरातील पालकांसाठी महत्वपूर्ण:
प्रामुख्याने शहरी भागामध्ये ज्या महिला नोकऱ्या करतात पण त्यांना त्यांच्या घरी कोणी नसतं लहान मुलाला सांभाळायला आणि मग अशा परिस्थितीत ते खाजगी पाळणाघरमध्ये ठेवतात तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पैसेही द्यावे लागतात आणि सुरक्षितेचा प्रश्न आपण पाहिलाय की अनेक वेळा याबाबतच्या बातम्या समोर आलेल्या आहेत सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत की पाळणाघरमध्ये खाजगी ज्या महिला चालक असतात त्या मुलांवर अत्याचार करतात त्यांना मारहान करताना व्हिडिओज आलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय महिला व बालविभागाच्या वतीने घेतलेला आहे.
शहरी भागात ज्या महिला असतील त्यांच्यासाठी आता हे शासनातर्फे पाळणाघर असेल त्याच्यामध्ये ज्या मदतनीस असतील ज्या महिला असतील त्यांना शासन वेतन दिलं जाणार आहे. साधारणत 5000 पासून ते 35000 पर्यंत वेतन महिलांना त्या जिथे तेथे संभाळ करणाऱ्या महिला असतील त्यांना दिलं जाईल. साधारणत एका महिला एका पाळणाघरमध्ये एक 25 ते 26 लहान मुलांना एकत्रित ठेवल जाणार आहे पण शहरी भागांमधल्या महिलांसाठी अतिशय उपयोगी अशी योजना आहे आपणास माहित आहे की ग्रामीण भागामध्ये आशा वर्कर असेल किंवा ज्या महिला ज्या खालच्या सेविका असतात त्यांच्या माध्यमातून ज्या लोकांना शाळेत पाठवण मुलांना जमत नाही अशाठिकाणी या आशावाडी वाडी चालिका आलेल्या असतात पण अशाच धरतीवर वर मुंबईमध्ये पाळणा घरे फार गरजेचं होतं की ज्याला कोणीतरी रिस्पॉन्सिबल असेल कारण की याच्यावर नियंत्रण आणणार असं कुठलही धोरण नाहीय पण एखादा शासनाच्याच वतीने जर या योजना राबवल्या जात असतील तर याचा फायदा शहरी भागातल्या जो नोकरदार महिला आहेत त्यांना एक मोठा दिलासा देणार आहे शहरी भागातल्या आणि हे कधी सुरू होत याची अर्थातच महिला वाट पाहत असतील.