नोंदणी व मुद्रांग विभाग महाराष्ट्र याच्यामध्ये 284 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. एकूण 284 जागा आहेत बघा शिपाई गट ड पदाची ही भरती आहे तसेच यासाठी दहावी पास हे तुमचं शिक्षण असणं गरजेच आहे आणि या ठिकाणी वयाची अट पाहून घ्या या ठिकाणी अर्ज करण्याच्या दिवसापासून म्हणजेच आजपासून म्हणजेच 22 एप्रिल पासून तुमचं वय हे 18 ते 38 वर्ष तुमचं असलं पाहिजे तसेच जर तुमची कास्ट मागासवर्गी असेल तर त्यासाठी तुम्हाला पाच वर्षाची सोड दिलेली आहे.
तसेच याची नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फी म्हणजे या ठिकाणी पाहून घ्या. जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला 1000 रुपये फी आहे. तसेच तुम्ही बाकीच्या कास्ट मध्ये असाल राखीव प्रवर्ग किंवा अनाथ मध्ये असाल तर तुम्हाला याठिकाणी ₹900 ऑनलाईन फी लागणार आहे. तसेच या ठिकाणी महत्त्वाची तारख या ठिकाणी पाहून घेऊ. याची ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 10 मे 2025 राहणार आहे.
सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता https://ibpsonline.ibps.in/igrcafeb25 या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. ऑनलाईन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचून ऑनलाईन (Online) पद्धतीनेच https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25 या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत, सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
परीक्षा शुल्क –
- खुल्या प्रवर्गाच्या उमदेवारांसाठी रु 1000/-
- मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रु 900/-
- अनाथ उमेदवारांसाठी रु 900/-
- माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनीक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
- फक्त ऑनलाईन पध्दतीनेच परीक्षा शुल्क स्विकारले जाईल.
- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परिक्षा शुल्क ना परतावा (Non-refundable) आहे.
- परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची (पावती) प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
परीक्षा केंद्र :
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परीक्षेची रुपरेषा वेळापत्रक/परीक्षाकेंद्र/ बैठक क्रमांक इ. बाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहिल, याबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- उमेदवाराला परीक्षा तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व संबंधित ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- ऑनलाईन परीक्षेचे (Computer Based Test) आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातुर, मुंबई आणि कोंकण विभागातील खालील नमुद विविध शहरांमध्ये केले जाईल. उमेदवाराने निवड केलेल्या परीक्षाकेंद्रात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज नोंदणी:
- उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/grosfet:25 या संकेतस्थळावर जाऊन “Click here for New Registration” या पर्यायावर क्लिक करा जेथे एक नवीन स्क्रीन उघडेल.
- अर्ज नोंदणी करण्यासाठी, नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा (Click here for New Registration) टेंब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदगी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा.
तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस. एम. एस. देखील पाठविला जाईल.
- जर उमेदवार एकाब वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट (Save & Next) टैब निवडून आधीच एंटर (Enter) केलेला डेटा जतन करू शकती. ऑनलाइन अर्ज “सबमिट (Submit) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी सेवा जाणि नेक्स्ट (Save & Naat) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा, दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी (COMPLETE REGISTRATION BUTTON) बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही/करणे शक्य होणार नाही.
- उमेदवाराचे नाव किया त्याचे तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
- तुमचे तपशील सत्यापित करा (Validate your details) आणि पालन करा आणि पुढील” (Save & Next) बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतम करा.
- फोटो आणि स्वाक्षरी स्कैनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्यांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
- नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन” (Proview) टॅबवर क्लिक कना,
१. आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा’ (COMPLETE REGISTRATION)
- पैमेंट” (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट” (Subma) बटणावर क्लिक करावे.
परीक्षा शुल्क भरणे: ऑनलाइन मोड:
- डेबिट कार्ड (RuPay/Visa/Master Card/Maestro), केडिट कार्ड, इंटरनेट बैंकिंग, IMPS, कॅश कार्डस्, मोबाइल वॉलेट वापरून पेमेंट केले जाऊ शकते.
- व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, एक ई-पावती तयार होईल.
- ई- पावती तयार न होणे अयशस्वी की प्रदान दर्शविते.
- उमेदवारांनी ई-पावती आणि की तपशील असलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.
- छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड (Upload of Photo/Signature)
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने खाली दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार त्याचा/तिचा फोटो, स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
- छायाचित्र प्रतिमा (रुंदी 4.5cm x उंची 5.5cm)
- छायाचित्र अलीकडील पासपोर्ट शैलीचे रंगीत चित्र असणे आवश्यक आहे.
- हलक्या रंगाच्या, शक्यतो पांढन्या, पार्श्वभूमीच्या विरुद्ध घेतलेले असावे.
- परिमाण 200 x 230 पिक्सेल (प्राधान्य)
- फाइलचा आकार 20 kb ते 50 kb दरम्यान असावा,
- स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 50 k० पेक्षा जास्त नसावा.
स्वाक्षरी:
1.अर्जदाराला काळ्या शाईच्या पेनने पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी करावी लागेल. स्वाक्षरी कॅपिटल अक्षरांमध्ये नसावी. 2.परिमाण 140 x 60 पिक्सोल (प्राधान्य). 3.फाइलया आकार 10kb ते 20kb दरम्यान असावा, स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार 200 पेक्षा जास्त नाही याची खात्री करा. 4.संबंधित लिंकवर क्लिक करा ‘छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा (Upload of Photo/Signature). 5.तुमचा फोटो, स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय तुमचा ऑनलाइन अर्ज नोंदणीकृत होणार नाही. 6.छायाचित्रातील चेहरा किंवा स्वाक्षरी अस्पष्ट असल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. 7.ऑनलाइन अर्जामध्ये छायाचित्र स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर उमेदवारांनी प्रतिमा स्पष्ट आहेत आणि योग्यरित्या अपलोड केल्या आहेत हे तपासावे. 8.उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की अपलोड करावयाचा फोटो आवश्यक आकाराचा आहे आणि चेहरा स्पष्टपणे दिसला पाहिजे.
अभ्यासक्रम :

एकूण जागा व समांतर आरक्षण तक्ता :
