भारताने अखेर पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा योग्य तो बदला घेतलेला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये नऊ ठिकाणी रात्री एअर स्ट्राईक केलेला आहे. पहेलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालेला होता त्याच्यानंतर भारत सरकारने आक्रमक पण संयमी भूमिका घेतलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला चोक उत्तर दिला जाईल असा इशारा पाकिस्तानला दिलेला होता.
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी इतका उशीर का केला जातोय असा प्रश्न विचारला जात होता त्यावेळेस सांगितलं होतं की सरकारकडून पूर्ण प्लॅनिंग करूनच योग्य ते उत्तर दिलं जाईल आणि आज भारताने पाकिस्तानवर तिथल्या दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार हल्ला केलेला आहे आज आपण माहिती घेऊयात या ऑपरेशन सिंदूरची भारताने कसा स्ट्राईक केला याच्यातून साध्य काय झालं कुठे स्ट्राईक केला आजसाठी काय काय सूचना आहेत आणि पाकिस्तानची प्रतिक्रिया काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊत.
पहेलगाम हल्ल्याच्या 15 दिवसानंतर भारतान पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांवरती एअर स्ट्राईक केलेला आहे. रात्री दीड ते दोन दरम्यान भारतान भवालपूर, मुरीदके बाग, कोटली आणि मुजफराबाद येथे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक केलेला आहे.
भारतीय वायुसेनेनं हे हल्ले करण्यापूर्वी देशभरामध्ये 300 ठिकाणी मॉकड्रिल केलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी थेट पाकिस्तानामध्ये घुसून दहशतवाद्यांना मारलेल आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा भारताने दिलेला होता आणि त्यानुसार कारवाई करत भारत सरकारन आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे. ही तीच ठिकाण आहेत जिथून भारतावरती दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती. पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तानुसार भवालपूर मधील हवाई हल्ल्यामध्ये 30 जणांचा मृत्यू झालेला आहे भारताने केलेल्या या स्ट्राईक मध्ये लष्कर आणि जयशचे मुख्यालय उद्धवस्त करण्यात आलेल आहे. भारताने 24 शिपनास्त्र डागली वृत्त संस्था एएनआय ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलेल आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्रभर या ऑपरेशन सिंदूर वरती लक्ष ठेवून होते.
इंडियन आर्मी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत माता की जय म्हणत या संदर्भात पोस्ट सुद्धा केलेली आहे. पहेलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवरती जी एअर स्ट्राईक केलेली आहे त्याच्यामध्ये दहशतवादी तळांना मुख्य लक्ष करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पाकिस्तानची बंबेरी उडाली कारण की अचानक हा हल्ला झाला.
पहेलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी देशभरातून मागणी केली जात होती आणि सरकारन या संदर्भात पाकिस्तानला चोक प्रत्युत्तर मिळेल असं सांगितलं होतं या एअर स्ट्राईक मध्ये पाकिस्तानच्या तिथल्या दहशतवाद्यांच्या ठाण्यांना टार्गेट करण्यात आलेला आहे पण त्यांच्या लष्करी ठाण्यांना टार्गेट करण्यात आलेलं नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलेल आहे
दहशतवादी तळांना संपवणं आणि दहशतवाद उकडून टाकणं हा या स्ट्राईक मागचा हेतू असल्याचं सांगण्यात आलेल आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने लाहोर आणि अनेक एअरपोर्ट बंद केलेले आहे. भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये ब्राह्मोस मिसाईलचा वापर केला गेला. तसंच राफेल आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला गेला असल्याचं सांगितलं जाते.
आता ब्राह्मोस मिसाईल जी आहे ती प्रिसाईज टार्गेटिंग साठी ओळखली जाते म्हणजे ज्या ठिकाणी टार्गेट निश्चित केलेल आहे बरोबर त्याच ठिकाणी ही मिसाईल स्ट्राईक करत असते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने एलओसी वरती जोरदार गोळीबार सुरू केलेला आहे. भावलपूर सह अन्य प्रमुख दहशतवाद्यांचे अड्डे असलेल्या ठिकाणी भारताकडून ही कारवाई केली गेलेली आहे.
आता जे नऊ ठिकाण आहेत जिथे एअर स्ट्राईक करण्यात आली ते ठिकाण आहेत बहावलपूर, मुरीदके, सरजाल/तेहरा कला , भिंबर, शावई नाला कॅम्प , कोटली, मरकज सैयदणा बिलाल, सियालकोट आणि मुजफराबाद आता याच्यातल मुरीद के जो आहे हा दहशतवादी तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावरती इथे लष्करे तैयबाचा तळ होता मुंबईवरती जो 261चा दहशतवादी हल्ला झालेला होता त्याच्याशी या संघटनेचा संबंध होता नंतर गुलपूर हा दहशतवादी तळ एलओसी पूछ राजोरी पासून जवळ जवळपास 35 किलोमीटर अंतरावरती आहे लष्कर कॅम्प सवई पीओकेच्या तंगधार सेक्टरमध्ये 30 किलोमीटर आत आहे बिलाल कॅम्प हा जैश -ए मोहम्मदचा लॉन्च पॅड आहे हा तळ दहशतवाद्यांना सीमे पलीकडेपाठवण्यासाठी वापरला जात होता कोटली हे सुद्धा एलओसी पासून 15 किलोमीटर अंतरावरती इथे लष्कराचा तळ होता 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सामावून घेण्याची याची क्षमता होती नंतर आहे बर्नाला कॅम्प हा दहशतवादी तळ एलओसी पासून 10 किलोमीटर अंतरावरती आणि सर्जाल कॅम्प सांबा कठोर समोर इंटरनॅशनल बॉर्डर पासून 8 किलोमीटर अंतरावरती हा जैश-ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठीचा तळ होता.
मरकस सुभानल्लाह :
जैश-ए मोहम्मद (बहावलपूर पंजाब पाकिस्तान) हे मर्क जैश-ए मोहम्मद चे ऑपरेशनल मुख्यालय म्हणून काम करते 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याची योजना इथून आखली गेली होती पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना या कॅम्प मध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते..
मरकस तैयबा :
2000 मध्ये सुरू झालेल्या मरकस तय्यबा हे अल्मा मॅटर आणि लष्करेचे सर्वात महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे हे नांगल सहदान मुरिधके शेखपुरा पंजाब पाकिस्तान येथे आहे
सर्जल/तेहरा कलान :
जैश-ए मोहम्मद शेखर गड नारोवाल पंजाब पाकिस्तान हे जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घोस खोरीसाठी जय श्री मोहम्मदचे मुख्य प्रशिक्षण केंद्र आहे हे केंद्र सर्जल परिसरातील तेहराकलन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आहे जेणेकरून त्याचा खरा उद्देश लपून राहील
मेहमुना जोया फॅसिलिटी:
हीजबुल मुजाहिदींनाचा एचएम मेहमुना जोया तळ हा पाकिस्तान मधील सियालकोट जिल्ह्यातील हेड मराला भागात कोटली भुट्टा सरकारी रुग्णालयाजवळ आहे दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या आयएसआयने दहशतवाद्यांसाठी पायाभूत सुविधा लपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर सरकारी इमारतीमध्ये अशा केंद्राची स्थापना केली आहे
मरकज अहले हदीस बरनाला:
लष्कर ए तोयबा, भिवर जिल्हा पीओके मर्कजहले हदीस बरनाला हे पीओके मधील लष्करे तोबाच्या महत्त्वाच्या मरकच पैकी एक आहे पुंछ राजौरी रियासी सेक्टर मध्ये लष्करे तोबांच्या दहशतवाद्यांमध्ये घुसखोरी करण्यासाठी आणि शस्त्रास्त्रे दारूगोळा पुरवण्यासाठी याचा वापर केला जातो मरकझ बरनाला शहराच्या बाहेर कोठे जमेल रस्त्यावर आहे.
मरकज अब्बास:
जैश-ए-मोहम्मदचे मरकज साईदना हजरत अब्बास बिन अब्दुल मुतालीम मरकज अब्बास हे मोहल्ला रोली धारा बायपास रोड कोठली येथे आहे हे कुठली मिलिटरी कॅम्पच्या अग्रेस दोन किलोमीटर आहे.
मस्कर राहिल शाहिद:
हिजबुल मुजाहिद्दीन कोठली पिओ जेके कुठली जिल्ह्यातील माहुली पुली निरपुर कोठले रस्त्यावरील माहुली नाल्यावरील पूल पासून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर असलेले मस्कर राहील शाहिद हे हिजबुल मुजाहिद्दीन एचएम च्या सर्वात जुन्या ठिकाणांपैकी एक आहे हा कॅम्प डोंगराळ भागात आहे आणि त्यात डायरेक्ट शस्त्रे आणि दारूगोळा ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चार खोल्या कार्यालय आणि दहशतवाद्यांचे निवासस्थान आहे
शवाई नालाह कॅम्प :
हे एल इ टी च्या सर्वात महत्त्वाच्या कॅम्पपैकी एक आहे आणि ते लष्कर येतोयबा, कॅडरची भरती नोंदणी आणि प्रशिक्षण यासाठी वापरले जाते हे कॅम्प 2000 च्या सुरुवातीपासून सुरू आहे
मरकज सय्यदना बिलाल :
मुजफ्फराबाद येथील लाल किल्ल्यासमोरील पीओके मध्ये जयेश ए मोहम्मद चे मुख्य केंद्र आहे जम्मू कश्मीरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणाचा वापर जेइएम च्या दहशतवाद्यांसाठी ट्रांजिट कॅम्प म्हणून केला जातो कोणत्याही वेळी या ठिकाणी 50 ते 100 दहशतवादी राहतात.
मेहमुना कॅम्प जो सियालकोट जवळचा आहे हा हिजबुल मुजाहिदनचा दहशतवादी प्रशिक्षण तळ होता आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावरती म्हणजे हे जे महत्त्वाचे ठिकाण आहेत त्यांच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने सुद्धा कारण की तिथे दहशतवादी होते तर इथे हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला या स्ट्राईक मध्ये केवळ दहशतवादी तळांनाच टार्गेट करण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एक संयुक्त लष्करी कारवाई होती ज्याच्यामध्ये भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि हवाई दल या सर्वांनी एकत्रितपणे काम केलेले एकत्रित पणे स्ट्राईक केलेली आहे भारताने मसूद अजरच्या भवलपूर मधील मुख्यालयाला लक्ष केलेलं आहे या हल्ल्यामध्ये त्याच मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत पाकिस्तानच्या माध्यमांनी याची पुष्टी सुद्धा केलेली आहे या हल्ल्यात जैश-ए 50 दहशतवादी मारले गेलेलेत याशिवाय भारतानं मुरीदकी येथील लष्कराच्या तळाला सुद्धा उद्वस्त केलेले आहे.
या हल्ल्यामध्ये लष्कर आणि जैश-ए अनेक टॉप कमांडर ठार झालेले आहेत. मात्र या हल्ल्यामध्ये मसूद अजहर आणि हाफिज सैद मारले गेले किंवा नाही याची माहिती अजून काही समोर आली नाही. संरक्षण मंत्रालयाने सुद्धा म्हटलेल आहे की आमची कारवाई ही एका ठिकाणी केंद्रित होती काय करायचं हे स्पष्ट होतं वाद निर्माण करण्यापासून आमची ही स्ट्राईक दूर आहे वाचलेली आहे आम्ही कोणत्याही पाकिस्तानच्या लष्करी तळांवरती ठिकाणांवरती हल्ला केलेला नाही भारतान ठिकाणांची निवड करण्यामध्ये आणि उद्ध्वस्त करण्यामध्ये योग्य ती अचूकता दाखवलेली आहे संयम सुद्धा दाखवलेला म्हणजे बघा हल्ले कुठे झाले तर दहशतवादी तळांवर पाकिस्तानच्या लष्कराच्या तळांवरती हल्ले केलेले नाहीत पाकिस्तान आता या हल्ल्यानंतर बिथरलाय सीमेवरती त्यांनी सीज फायरच उल्लंघन केलेल आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला युद्धाची धमकी दिलेली आहे सियालकोट आणि
लाहोर एअरपोर्ट 48 तासांसाठी बंद करण्यात आलेला आहे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आलेली तर पाकिस्तानन सकाळी 10 वाजता महत्त्वाची बैठक सुद्धा बोलवलेली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दावा केलेला आहे की या हल्ल्या दरम्यान पाकिस्तानी सैन्यान पाच भारतीय लढाऊ विमान पाडलेली आहेत. मशिदींनाही लक्ष करण्यात आलेले पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौका उद्ध्वस्त केलेल्या आहेत पण या सर्व गोष्टींमध्ये शून्य टक्के तथ्य आहे आज जम्मू सांबा कठुवा राजोरी आणि पुंज येथे शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आलेले आहेत. यासोबतच आपला जो
उत्तरेकडचा भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा काही बंधन सरकारकडून घालण्यात आलेली आहेत. भारत सरकार आणि सुरक्षा दलांनी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत पहेलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे. भारतानं अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची ऑलरेडी कोंडी केलेली होती पण लष्करी कारवाई कधी होणार याची चर्चा सुरू होती. आज देशभरामध्ये 244 ठिकाणी मॉकड्रिल सुद्धा आहे पण हे मॉक ड्रिल करण्याआधीच भारताने एअर स्ट्राईक करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे.