प्रधानमंत्री घरकुल योजना 2026..! नवीन जीआर?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. आता घरकुल योजने संदर्भातला महत्त्वाचा जीआर आलेला आहे. पैसे मंजूर झालेले आहे आणि त्यानुसार आता घरकुल योजनेतील जे काही लाभार्थी आहे ज्यांचे घरकुल मंजूर आहेत त्यांना हप्ता मिळालेला नाही पैसे मिळालेले नाही अशा सर्व घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आता पैसे मिळणार आहे त्या संदर्भातला हा जीआर आहे आपण बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम अंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी केंद्र हिस्स्याचा व समरूप राज्य हिस्स्याचा निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग यांचा 13 जानेवारी 2026 रोजीचा जीआर आहे या ठिकाणी आपण बघू शकता प्रस्तावनेमध्ये सुद्धा त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे.

आपण डायरेक्ट शासन निर्णय काय आहे तो बघूया.. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 झिरो अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम सर्वसाधारण घटकासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेला मातृ मंजुरीच्या मर्यादेत यासोबत जोडलेल्या यादीतील नगरपालिका नगरपंचायत या अंमलबजावणी यंत्रणे निहाय 33403 लाभार्थ्यांना केंद्र हिस्स्यापोटी 200.418 कोटी व राज्य हिस्स्यासाठी 133.612 कोटी असा एकूण 334.03 कोटी अक्षरात 334 कोटी 3 लाख एवढा निधी वितरित करण्यास यावेळे मंजुरी देण्यात येत आहे.

केंद्र हिस्स्यापोटी 200.418 हजार कोटी एवढा निधी मागणी करण्यात आलेली होती त्यानुसार आता हा केंद्राचा 60 टक्के हिस्सा आणि पुढे जो राज्याचा हिस्सा आहे 133 कोटी 61 लक्ष 2 हजार एवढा निधी हा सुद्धा मागणी करण्यात आली आहे त्यानुसार आता हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत एसएन ए स्पर्श प्रणालीवर सदर निधी प्राप्त करून घेण्यासाठी या ठिकाणी या पत्रानुवयी सूचना देण्यात आलेले आहे त्यानुसार सर्व बाबी पूर्ण करून सदर निधी प्रयोजनार्थ वितरित करण्यात आला आहे या प्रयोजनार्थच खर्च होईल याची सर्व अंमलबजावणी याची दक्षता यंत्रणांनी घ्यायची आहे. मग अशा पद्धतीने सर्व अटीशरतीचे काटोकर पालन करून हा निधी वितरित करायचा आहे असे सांगण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने हा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtr.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता डाऊनलोड करून घेऊ शकता आणि या ठिकाणी ज्या ज्या नगरपालिका किंवा ज्या ज्या ठिकाणी हा निधी आलेला आहे ते जिल्हावार यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्याला किती निधी प्राप्त झालेला आहे ही सर्व माहिती डिटेलमध्ये या जीआर मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने आता घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे आता लवकरच सर्व घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती.

तुमचा हप्ता आला नसेल तर?

प्रशासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत याचबरोबर जर तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नसेल तर इथून पुढे तुम्हाला वेळेवरती नक्की हप्ता मिळू शकतो या संदर्भातील जी सूचना देण्यात आली आहे लाभार्थ्यासाठी या ठिकाणी जी सूचना देण्यात आली आहे ती सूचना अशी आहे की… मंत्री अवस योजना ग्रामीण अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की घरकुलांचे अनुदान हे एसएनए स्पर्श प्रणाली अंतर्गत वितरीत करण्यात येत असून लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होण्यास विलंब होत आहे जेवढे एफटीओ पंचायत समिती स्तरावरून केल्या जातात त्यापैकी काही लाभार्थ्यांचे अनुदान खात्यात जमा होत आहे व काही लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात वितरीत होण्यास विलंब होत आहे अथवा जमा सुद्धा होत नाहीये.

सदर बाबी एसएनएने स्पर्श प्रणाली पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे असल्याच्या प्रकाराच्या तांत्रिक अडचणी येत आहे तरी सर्व घरकुल लाभार्थ्यांनी कृपया करून ही बाब लक्षात घ्यावी व प्रशासनात सहकार्य करावे ही विनंती आदेशावरून असं या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे ज्यांचे ज्यांचे पैसे आता घरकुलचे असतील किंवा इतर योजनेचे असतील ते जर आले नसतील तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये येतील येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही जी प्रणाली आहे सुरळीत पद्धतीने सुरू होईल शासनाचे भरपूर असे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टचे पैसे या प्रणाली अंतर्गत वितरीत केले जातात ही जर प्रणाली विकसित पूर्णपणे जर झाली तर कोणताही हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी विलंब लागणार नाही जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आतापर्यंत आलेले नसतील तर एफटीओ जनरेट होऊन त्यांचे पैसे लवकरच बँक खात्यामध्ये जमा होईल काही लाभार्थ्यांच्या यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *