प्रधानमंत्री मातृ वंदना योजना..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

तुम्ही गरोदर असाल स्तनपान करणाऱ्या महिला असाल तर तुम्हाला आता मिळतील 5000 ते 6000 हो मुलाच्या जन्मानंतर दोन टप्प्याने मध्ये डीव्हीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या बँक खात्यात भारत सरकार थेट 5000 पाठवणार आहे. त्यात जर तुम्हाला मुलगी म्हणजे अर्थात लक्ष्मी जन्माला आली तर ती रक्कम थेट 6000 होणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत 2,82,239 महिलांनी घेतलाय. शिवाय सरकारने आत्तापर्यंत 93 कोटी 50 लाख 21,000 पेक्षा जास्तीचा निधी दिलेला आहे. जर तुम्हाला पण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? त्यासाठी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे..

एका स्त्रीसाठी आई होणं हे सगळ्यात सुंदर स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करताना तिला बऱ्याच अडचणींना सामोर जावं लागतं. होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास त्यात आर्थिक त्रास तर आहेच बाळाला जन्म देताना योग्य त्या सोयी मिळाव्यात आई आणि बाळाच पोषण नीट व्हावं याकरता सरकारने ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना लागू केली आहे. आई आणि होणाऱ्या बाळाचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला शिवाय स्तनपान करणाऱ्या महिला या कुपोषित राहून त्यांच्यावर किंवा त्यांच्या नवजात बाळांवर याचा विपरीत परिणाम होऊ नये शिवाय जे अगदीच बेताच्या म्हणजे गरीब परिस्थितीतून येतात त्यांना आर्थिक सहाय्यताही मिळावी म्हणून ही योजना उपयोगी आहे.

 राज्य शासनाच्या निधी मधून राज्यामध्ये 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना राबवली जात है मात्र जानेवारी 2023 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून मिशन शक्ती हे अभियान राबवल जात आहे आणि याच अभियाना अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचनाच आधीन राहून राज्या मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 ही योजना राबवण्यासाठी 9 ऑक्टोबर 2023 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेचा अंतर्गत आता आपण जर पाहिल तर जे लाभार्थी महिला असेल. अशा पात्र लाभार्थी महिलेसाठी आटी, शर्ती आणि कागद पत्राचे पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी दोन हफ्त मध्ये 5000 आणि अशा महिलेसाठी दुसरा बाळाच्या वेळेस मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मांतर एकाच टप्प मध्ये 6000 रुपयेच अनुदान दिल जाणार आहे.

यासाठी काही अटी शर्ती देण्यात आलेले आहे ज्याच्या मध्ये राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रा मध्ये गर्भधारण च नोंदणी किंवा शेवटचा मासिक पाळीच्या तारखे पासून सहा महिने आत किमान एक प्रस्तुती पूर्व तपासणी झालेली असेल तर अशा महिलाला पहिल्या आपत्यासाठी पहिला हप्ता 3000 चा दिला जाणार आहे. याच प्रमाणे बाळाची जन्म नोंदणी झाल्यानंतर बीसीजी, ओपीजी, आरओ, ओपीवी तीन मात्रा किंवा पेंटा वेलेट लसीच तीन मात्रा अथवा समतुल्य पर्याय लसीक करणा प्राथमिक चक्र पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता 2000 रुपयाचा दिला जाणार आहे.

योजनेचे उद्दिश्ये:

या योजने अंतर्गत गर्भवती महिलांना पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी सहा हजार रुपये मदत देणे, आणि त्यांना आर्थिक मदत होईल हा महत्त्वपूर्ण उद्देश राज्य सरकारने प्रधानमंत्री मातृत्व वंदने योजनेअंतर्गत ठेवलेला आहे. जेणेकरून ज्या गावाकडील महिला असेल किवा अतिशय गरीब परीस्थितीत राहणाऱ्या ज्या कोणी महिला असेल त्यांना या योजनेचा फायदा होईल. आणि त्या महिला स्वतः सोबतच बाळाची देखील चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतील. असं सरकारच मत आहे आणि सर्व विच्रार करून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना हि काढण्यात आलेली आहे. गरीबातील गरीब महिलांना या योजनेचा फायदा व्हावा असाच विचार करून सरकारने हि योजना सुरु केली आहे. तर ज्या गरीब महिलांना या योजनेबद्दल माहिती नसेल असं कोणी जर आपल्या जवळ राहत असेल तर आपल पण कर्तव्य आहे कि त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणे. त्यामुळे हि माहिती जास्तीत लोकांना मिळाली पाहिजे एवढंच सरकारच उद्दिष्ट्ये आहे. आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांमार्फत हि माहिती देण्याच काम केलेलं आहे. अतिशय महत्वपूर्ण अशी हि माहिती आहे. तर आपण पण गरजू लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे.

योजनेसाठी पात्रता:

पाहूया या योजनेसाठी पात्र कोण कोण आहेत? प्रधानमंत्री मातृवंदना योजना पात्रता. प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी यापैकी किमान एका गटात असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही पात्र समजले जाल. सोबत गटातील कागदपत्र जोडणे ही अनिवार्य आहे.

प्रधान मंत्री मातृ वंदना योजना १ व २ फॉर्म नोंदणी करिता नवीन अटी व शर्ती नुसार खालील कागदपत्रे निकष असतील (यापैकी कोणतेही एक पुरावा)

1.ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक वर्षाला उत्पन्न रु ८ लाख पेक्षा कमी आहे.

2.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला

3.ज्या महिला अंशत ४०% किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांगजन)

4.बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला

5.आयुष्मान भारत अंतर्गत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMIAY) अंतर्गत महिला लाभार्थी

6.ई-श्रम कार्ड धारक केलेल्या महिला

7.किसान सन्माननिधी अंतर्गत महिला शेतकरी

8.मनरेगा जॉब कार्ड धारक महिला

9.गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी मदतनीस (AWW/AWHS)/आशा कार्यकर्ती (ASHAS)

10.NFSA कायदा अंतर्गत शिधापत्रिकाधारक माता

आवश्यक कागदपत्रे:

आता पाहूयात कागदपत्रे काय लागणार आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स कॉपी
  • आई आणि बाळ संरक्षण बाळाच्या लसीकरणाच्या नोंदी असलेल्या पानाची प्रत.
  • गरोदरपणाची नोंदणी केलेला आरसीएच पोर्टल मधील लाभार्थी नोंदणी क्रमांक.
  • लाभार्थीच्या स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक
  • डीबीटी स्वरूपात याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुमचा बँक अकाउंट असणं गरजेच आहे. शिवाय ते ऍक्टिव्ह म्हणजे चालू असलेल्या मोबाईल नंबरशी लिंक असायला हवं.

अर्ज कसा भरायचा:

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे पैसे कसे आणि कुठे मिळतात फॉर्म कुठे भरायचा मिळालेल्या माहितीनुसार ही स्कीम आधी ऑनलाईन स्वरूपात भरली जात होती पण आता तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडीत जाऊन हा फॉर्म भरायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं पैसे कसे मिळणार आहेत. सुरुवातीला सांगितलं तसं पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलेला 5000 मिळतील आणि दुसऱ्यांदा आई होणाऱ्या महिलेला जर मुलगी झाली तर तिला 6000 मिळतील. तेही डीबीटी म्हणजेच डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होतील.

पैसे किती टप्यात मिळणार आणि कसे?

आता पैसे एकदम मिळणार आहेत का तर नाहीत हे पैसे तुम्हाला दोन इन्सॉलमेंट मध्ये मिळणार आहेत त्यावर सरकारने काही नियमही लावलेत ते कोणते आहेत ते पाहूया सरकारी रुग्णालयात रजिस्टर्ड गर्भवती महिलांना त्यांच्या पहिल्या मुला मुलाच्या जन्मानंतर फक्त एकदाच लाभ मिळण्याची परवानगी आहे आणि लाभाची रक्कम 5000 रुपये आहे.

पगारी प्रसुती रजेवर म्हणजेच पेड मॅटर्निटी लीव् असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पात्र गर्भवती महिलांना थेट संबंधित गर्भवती लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात डीव्हीटी किंवा पीएफएमएस द्वारे तीन हप्त्यांमध्ये रक्कम जमा केली जाते. आता हे जे पैसे आहेत ते प्रत्यक्षात मिळणार कधी तर पहिल्या बॅचच्या मातांसाठी शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 570 दिवसांच्या आत आणि दुसरे जिवंत मूल असलेल्या मातांसाठी सर्व अटी आणि शरती पूर्ण केल्यानंतर मुलीच्या जन्माच्या तारखेपासून 270 दिवसांच्या आत हा लाभ घेता येतो.

केंद्र सरकारच्या सूचना आणि मंजुरीनुसार 25 ऑक्टोबर 2023 रोजी पात्र लाभार्थ्यांची पडताळणी आणि मंजुरी झाल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील आठ महिलांना त्यांचे लाभ देऊन निधीचे वितरण सुरू झाले होते. 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 66112 लाभार्थ्यांची नोंदणी होती. ज्यामध्ये 477480 या पहिल्या बॅचच्या आणि 83,532 या दुसऱ्या बॅचच्या मुलींचा समावेश आहे आणि नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी 2024-25 या वर्षात पीएफ एमएस या प्रणाली द्वारे 2 लाख 82,239 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *