प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना काय आहे, तर अपघात दरम्यान मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास विमाधारक किंवा त्याच्या परिवाराला योजनेअंतर्गत पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांद्वारे पॉलिसीचा लाभ दिला जातो. आता या योजनेचे सर्व महत्त्वाचे मुद्दे काय ते जाणून घेऊ वय वर्ष 18 ते 70 मधील सर्व नागरिक ज्यांचे सहभागी बँकेमध्ये खाते आहे त्या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेसाठी भरावा लागणार वार्षिक प्रीमियम हा 18 ते 70 वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी सारखाच आहे या विम्याचे संरक्षण तुम्हाला एका वर्षासाठी मिळते ज्याचा कालावधी हा एक जून ते 31 मे असा असतो आणि दरवर्षी विमा संरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी ठरवून दिलेल्या एनरोलमेंट पिरेड म्हणजे नाव नोंदणीच्या कालावधी प्रीमियम भरून त्याचे नूतनीकरण म्हणजे रिन्यूअल करावे लागते. योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळवताना केवायसी साठी तुमचे आधार कार्ड हे प्राथमिक दस्तऐवज किंवा कागदपत्र असेल प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेचे प्रमुख आकर्षण आहे त्याचा वार्षिक प्रीमियम जो आहे 20 रुपये हो 20 रुपये जे आपल्याकडून कधी खर्च होतात तेही समजत नाही पण त्यातच तुम्हाला अपघाती संरक्षण मिळत आहे.
आता या 20 रुपयांमध्ये मिळणाऱ्या लाभ कोणता? तर अपघाता दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला तर रुपये दोन लाख त्याच्या नोमिनी अथवा परिवाराला दिले जातात तसेच अपघातामध्ये जर विमाधारकाचे दोन्ही डोळे दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाले तर रुपये दोन लाख विमा कंपनी द्वारे अदा करण्यात येतात आणि जर अपघाता दरम्यान विमाधारकाचा एक डोळा हा अथवा पाय निकामी झाला तर त्या परिस्थितीमध्ये रुपये एक लाख विमाचा लाभ म्हणून दिला जातो. तर अशा बहुपयोगी आणि किमान प्रीमियमवर अपघात विमा देणाऱ्या योजनेसाठी तुम्हाला नोंदणी करायची असेल.
प्रधानमंत्री २० रुपये विमा योजना काय आहे?
प्रवेशासाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ७० वर्षे आहे. या योजनेसाठी प्रीमियम दर किती आहे? बँक शाखांद्वारे केलेल्या नोंदणीसाठी, प्रीमियम दर प्रति सदस्य प्रति वर्ष २० रुपये आहे. यू-मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे केलेल्या नवीन नोंदणीसाठी, प्रीमियम दर प्रति वर्ष १९ रुपये आहे.

योजनेचे फायदे:
- अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास आर्थिक मदत पुरवते.
- कमी प्रीमियमवर उपलब्ध.
- नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया सोपी आहे.
- ही योजना प्रधानमंत्री जनधन योजनेशी देखील जोडलेली आहे.
- ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा जाळी आहे.
योजनेचे महत्त्वाचे मुद्दे:
प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीचे दोन महत्त्वाचे पैलू असतात सगळ्यात पहिला म्हणजे प्रीमियम आणि दुसरा म्हणजे कव्हरेज आता प्रीमियम म्हणजे काय की तुम्ही जी अमाऊंट दर वर्षाला विमा कंपन्यांकडे भरतात त्याला आपण प्रीमियम म्हणतो. ते म्हणजे काय की तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य म्हणून जी रक्कम बिगा कंपन्यांकडून मिळते ती रक्कम म्हणजे कव्हरेज असते.
- कव्हरेज: अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास २ लाख रुपयांचे आणि आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
- प्रीमियम: योजनेचा वार्षिक प्रीमियम २० रुपये आहे, जो तुमच्या बचत खात्यातून आपोआप डेबिट होतो.
- नूतनीकरण: योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करता येते.
- सोपी नोंदणी: योजनेत नावनोंदणी करण्यासाठी किमान कागदपत्रे आवश्यक आहेत.
- लाभार्थी: १८ ते ७० वर्षे वयोगटातील बचत खातेधारक या योजनेत सामील होऊ शकतात.
अर्जप्रक्रिया:
तर सरकारच्या जनसुरक्षा डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर व्हिजिट करा. वेबसाईटचा मेन पेजवर इथे तुम्हाला भाषा बदल करता येईल त्याखाली इथे तीन वेगवेगळ्या सरकारी विमा पॉलिसीज आहेत. योजनेच्या अटी व शर्ती बघण्यासाठी रुल्स किंवा नियम या ऑप्शनवर आता क्लिक करा. तिथे दिलेल्या पर्यायांपैकी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना सिलेक्ट करा तुम्हाला योजनेसंबंधी माहिती आणि सर्व अटी शर्ती वाचायला मिळतील. या योजनेसाठी अँड्रॉइड किंवा नाव नोंदणी करायची असेल तर ती ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येईल.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध असेल तर तिथे लॉगिन करून तुम्हाला योजनेअंतर्गत नाव नोंदणी करता येईल.
आपण ऑफलाइन नोंदणी कशी करायची त्याची प्रक्रिया बघू त्यासाठी..
- अर्ज या ऑप्शन वर क्लिक करा.
- इथे पुन्हा प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना सिलेक्ट करा.
- आता या स्क्रीनवर तुमच्यासमोर दोन अर्ज आहेत अर्जाचा म्हणजे एप्लीकेशन फॉर्म आणि दाव्याचा म्हणजे क्लेम फॉर्म सध्या आपण अर्जाचा अर्ज बघणार आहोत पण पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला कधी क्लेम सबमिट करावा लागला तर त्याचा फॉर्म तुम्हाला इथेच मिळेल याची नोंद घ्या.
- आता एप्लीकेशन अर्ज यावर क्लिक करा इथे वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्हाला फॉर्म मिळेल.
- आता हा अर्ज डाउनलोड करून तो तुम्हाला भरायचा आहे.
- ज्यामध्ये सर्वप्रथम तुमचे बचत खाते नंबर टाका.
- योजनेत सहभागी कधी होणार आहात त्या तारखेला आणि महिन्याला हायलाईट करा.
- नंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे, जसे नाव, पत्ता, जन्मतारीख, इमेल, मोबाईल नंबर, आधार नंबर, अपंगत्व असेल तर त्याची माहिती.
- आणि तुमच्या नॉमिनी ची माहिती पण पूर्णपणे भरून घ्यायची.
- या ठिकाणी तुमचे डिक्लेरेशन देऊन सही करा.
- आणि ज्या बँकेत तुमचे बचत खाते आहे जसे आयसीआयसीआय एचडीएफसी किंवा एसबीआय इथे तुमच्या आधार कार्डच्या प्रती सोबत हा अर्ज जमा करावा.
- ज्या दिवशी अर्ज भरून तुम्ही योजनेत सहभागी व्हाल त्याच्या पुढील महिन्यात एक तारखेपासून तुम्हाला योजनेअंतर्गत विमा संरक्षण सुरू केले जाईल.
विमाधारकाचा अपघाता दरम्यान मृत्यू झाल्यास कागदपत्रे…
क्लेम फॉर्म भरताना काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण पाहूया हा क्लेम फॉर्म वेबसाईट व्यतिरिक्त बँक शाखा, विमा कंपनी शाखा, रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य केंद्र, बँक किंवा विमा एजंट यांच्याकडेही मिळू शकतो. अपघात झाल्यापासून 30 दिवसांचे आज फॉर्म सर्व आवश्यक कागदपत्रांसोबत संबंधित विमा कंपनीला पाठवणे गरजेचे आहे विमाधारकाचा अपघाता दरम्यान मृत्यू झाल्यास फॉर्म सोबत जोडायची कागदपत्रे कोणती ती बघूया,
- मूळ एफ आय आर किंवा पंचनामा.
- पोस्टमार्टम चे रिपोर्ट आणि मृत्यूचे प्रमाणपत्र.
- तसेच अपघाता दरम्यान कायमचे अपंगत्व आले, तर त्यासाठी मूळ एफ आय आर किंवा पंचनामा सिव्हिल सर्जन ने दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र.
- आणि डिस्चार्ज सर्टिफिकेट जोडावे लागतील.