📲 फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होतेय? या टिप्स अवश्य वापरा
तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असल्यास, तुम्ही ते होण्यापासून रोखू शकता. आम्ही आजच्या ब्लॉगमध्ये सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून तुम्ही स्मार्टफोनचे बॅटरी लाइफ नक्कीच वाढवू शकता. सविस्तर माहितीसाठी पुढे वाचा.
▪️ ब्राईटनेस नियंत्रित करा :
फोनच्या ब्राइटनेसमुळे बॅटरीवर खूप परिणाम होतो. तुम्ही ब्राइटनेस कमी करून स्मार्टफोन वापरू शकता. फोनचा ब्राइटनेस कमी किंवा ऑटो वर सेट करू शकता. यामुळे तुमच्या फोनच्या बॅटरीचा वापर कमी होईल आणि बॅटरी पूर्वीपेक्षा नक्कीच जास्त काळ टिकेल.
▪️ ही सेटिंग बंद ठेवा :
तसेच काम करत नसल्यास, आपल्या मोबाईल फोनचे जीपीएस(Location), ब्लूटूथ आणि वायफाय(Wifi) सेटिंग्ज बंद करावे. यामुळे बॅटरीचा वापर कमी होईल. तसेच मोबाईल डेटा वापरात नसताना बंद करा. या सेटिंग्जमध्ये भरपूर बॅटरी वापरली जाते. या कारणास्तव, जर या सेटिंग्ज वापरात नसेल तर बंद ठेवा.
▪️ बॅगराऊंड ॲप्सकडे लक्ष द्या :
फोनमधील अनेक ॲप बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात. याचा परिणाम फोनच्या बॅटरीवरही होतो. बॅगराऊंड ॲप बंद करून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य बऱ्याच प्रमाणात वाढवू शकता. तुम्ही बॅटरी सेटिंग्जमध्ये जाऊन हे तपासू शकता. त्यानंतर बॅकग्राउंडमध्ये काम करणारे ॲप बंद करा.
▪️ स्क्रीन टायमींग कमी करा :
जर तुमच्या फोनचा स्क्रीन टाइम आणि ब्राईटनेस जास्त असेल तर तो कमी करा. यामुळेही तुमच्या फोनच्या बॅटरीची खूप बचत होईल. यासाठी तुम्ही कमीतकमी किंवा 30 सेकंदांची आदर्श वेळ निवडून चार्जिंगची बचत करू शकता. याशिवाय वायब्रेशनची तीव्रताही कमी करा.
▪️ लाइव्ह वॉलपेपर वापरू नका :
तुमच्या फोनचे लाइव्ह वॉलपेपर देखील भरपूर बॅटरी वापरतात. लाइव्ह वॉलपेपर म्हणून वापरलेले ऍनिमेशन जास्त बॅटरी वापरतात. कारण यासाठी काम करणारे ॲप बॅकग्राऊंड चालूच असते. यामुळे तुमच्या फोनमधील साधे तसेच कमी प्रकाशातील वॉलपेपर वापरून तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी आणखी वाचवू शकता.
यासारख्या अनेक बातम्या व माहितीपूर्ण लेखांचे वाचन आणि अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सॲप समूहात मोफत सामील व्हा.