रेशन कार्ड धारकांसाठी 1 एप्रिल पासून नवीन नियम; तुमचे कार्ड रद्द तर होणार नाही ना?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

भारतात १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डधारकांसाठी काही नवीन नियम आणि बदल लागू होणार आहेत. हे बदल मुख्यतः पात्रता, पुनरावलोकन (verification) आणि लाभ (subsidy) मिळवण्याच्या नियमांशी संबंधित आहेत.

एक एप्रिल पासून रेशन कार्डच्या नियमात होणार बदल तुमच्याकडे स्वतःची कार आहे घरात एसी लावलाय किंवा तुम्ही आयकर भरताय तर तुमच्या रेशन कार्डवर आता कायमची संक्रांत येण्याची शक्यता आहे. कारण येत्या 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डच्या नियमामध्ये मोठे बदल होणार आहेत.

त्यामुळे राज्यातील जवळपास 70 लाख अपात्र कार्ड धारकांना दणका बसण्याची शक्यता आहे. तसेच अनेक लाभार्थ्यांच नाव देखील काढून टाकल जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर रेशन कार्डसाठी खोटी माहिती देत असाल तर आत्ताच सावद व्हा नाहीतर तुम्हालाही त्याचा फटका बसू शकतो.

मुख्य उद्देश:

गरिबांच्या ताटातील घास पळवून अनेक श्रीमंत आणि सदन व्यक्तींनी पांढर रेशन कार्ड खिशात टाकल्याच्या तक्रारी सरकारकडे वाढले आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने आता थेट घराघरात जाऊन केवायसी करण्याचे निर्णय घेतले आहेत. खऱ्या गरजूंनाच धान्य मिळावं हा यामागील मुख्य उद्देश आहे.

पात्रता निकष अधिक कडक झाले;
सरकारने रेशन कार्डधारकांसाठी पात्रता निकष अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार,
काही कार्डधारकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे (सुमारे लाखो कार्डवर परिणाम होऊ शकतो).
आता फक्त योग्य पात्रता निकष पूर्ण करणाऱ्यांनाच मोफत धान्य आणि इतर लाभ मिळतील.

e-KYC / Aadhaar आधारित सत्यापन:
सरकारी निव्वळ धोरणानुसार जवळपास प्रत्येक रेशन कार्ड धारकाला e-KYC (ऑनलाइन आधार आधारित सत्यापन) पूर्ण करणे बंधनकारक केले आहे.
e-KYC न केल्यास लाभ रोखले जाऊ शकतात किंवा कार्ड रद्द होत शकते.
(या बदलाची पूर्वात्य माहिती आधी जारी झाली होती आणि आता नवीन निकषांमध्ये याची भूमिका वाढली आहे.)

नवीन नियम काय आहेत?

सरकारने बदललेले हे नवीन नियम अत्यंत गरजेचे आहेत. ते काय आहेत हेच आज जाणून घेणार आहोत.

  • तुमच्या घरामध्ये एसी किंवा 5 किलोवट पेक्षा जास्त क्षमतेच जनरेटर असेल.
  • कुटुंबाकडे स्वतःची चार चाकी कार किंवा ट्रॅक्टर असेल.
  • शहरामध्ये राहणाऱ्यांच वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांच्या वर असेल.
  • आणि ग्रामीण भागात दोन लाखांच्या वर असेल.
  • 100 चौरस मीटर पेक्षा मोठा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःच असं पक्क घर असेल.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल.

एकंदरीतच यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्याकडे असेल तर तुमच रेशन कार्ड हे लगेच रद्द किंवा बंद केल जाईल ज्यांनी खोटी माहिती देऊन आजवर स्वस्थ धान्य लाटलय त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे जर चौकशी करताना तुम्ही दोषी आढळलात तर आतापर्यंत घेतलेल्या धान्याची बाजार भाावाने वसूली केली जाणार आहे. इतकच नाही तर फसवणुकीचा गुन्हाही तुमच्यावर दाखल होऊ शकतो.

सध्या सरकारने ई केवायसी करणं हे अनिवार्य केल आहे. जर तुमची केवायसी अपूर्ण असेल तर तुमच रेशन कार्ड हे तात्पुरत बंद होऊ शकतं त्यामुळे रेशन दुकानात जाऊन तात्काळ आपली माहिती अपडेट करून घेणं हे तुमच्यासाठी फायद्याच ठरणार आहे.

जुन्या कार्डधारकांच काय होणार आहे?

आता या सगळ्यामध्ये जुन्या कार्डधारकांच काय होणार आहे? आता हे नियम केवळ नवीन अर्जदारांसाठीच नाही तर सध्याच्या कार्डधारकांसाठी देखील लागू आहेत. पडताळणी दरम्यान एखाद कुटुंब हे नवीन निकषात बसत नसल्याच आढळलं तर त्यांच कार्ड कोणतीही पूर्वसूचना न देता हे रद्द केल जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सतर्क राहणं योग्य ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *