नगर सोलापूर हायवेवरून जात असताना आंबेलवाडी फाट्यावर एक ब्लॅक कलरची थार येऊन थांबते आणि त्या थार मधून दोघेजण खाली उतरतात रस्त्याच्या बाजूलाच एक पानटपरी असते तिथे ते सिगरेट घेण्यासाठी जातात टपरी चालक त्यांना एक सिगरेटच पाकीट देतो आणि गाडीतून उतरलेला तो व्यक्ती त्या चालकाला एक 500 ची नोट देतो आणि समोर येतो तो छत्रपती संभाजीनगरातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बनावट नोटांचा बाजार गेल्या चार वर्षांपासून काही सराहित गुन्हेगारांकडून शहरात 500 च्या खोट्या नोटा छापण्याचा कारखानाचा चालू चालवला जात होता. ज्याचा पोलिसांनी काल पर्दाफाश केला.
वाळूज एमआयडीसी भागातून 60 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह 88 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. या घटनेन सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पण हा सगळा गोरख धंदा चालवला जात होता यात कोण कोण सहभागी होतं आणि पोलिसांनी त्यांचा कसा पर्दाफाश केला?
हा घटनाक्रम कसा झाला आणि कोण कोण या मध्ये सामील आहे ते थोडक्यात बघूया :
हा सगळा घटनाक्रम शेवगाव तालुक्यातील शहर टाकळीचा अंबादास रामभाऊ ससाने हा बनावट नोटा बनवण्यात पटायत आहे. 2015 पासून तो बनावट नोटा बनवून त्या मार्केटमध्ये आणण्याचं काम करत होता. 2015 ते 2020 या पाच वर्षांच्या काळात त्यान अनेक साथेदारांना सोबत घेऊन कोट्यावधींच्या खोट्या नोटा बाजारात आणल्याचा आरोप आहे. या धंद्यासाठी त्यान स्वतःचं नाव बदलून मेजर असं ठेवलं होतं. त्यामुळे सगळेजण त्याला मेजर म्हणूनच ओळखायचं. सुरुवातीला तो तयार झालेल्या नोटा मार्केटमध्ये आणण्यासाठी अल्पवीन मुलांना या धंद्यात उतरवायचा आणि त्यांना थोडीफार रक्कम देऊन त्यांच्याकडून नोटांची तस्करी करून घ्यायचा.
01:35या काळात त्याच्यावर दोन वेळा गुन्हे दाखल करण्यात आले होते पण तो पोलिसांच्या हाती काही लागत नव्हता. स्वतःची ओळख लपवण्यासाठी तो जुन्या गाड्यांची खरेदी विक्रीच्या धंद्यातही होता गाड्यांच्या धंद्यात तो स्वतःची अरुण भास्कर वाघ अशी नाव बदलून ओळख करून द्यायचा त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. गाड्यांच्या धंद्यातून मिळणारे पैसे तो बनावट नोटा बनवण्यासाठी लावत असे नोटा छापण्यापासून ते मार्केटमध्ये विकण्यापर्यंत त्याचे एक छोट नेटवर्क जे आहे ते त्याने तयार केलं होतं पुढे 2023 मध्ये तो पोलिसांच्या तावडीत सापडला तत्कालीन पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी प्रथम ससानेच जे रॅकेट आहे ते उघडकीस आणलं होतं. याच काळात वैजापूर मध्येही बनावट नोटा बनवणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली या टोळीचे धागेदोरे हे बीड माजलगाव आणि परई पर्यंत पस पसरलेले होते. त्यामुळे पोलीस बनावट नोटा बनवणाऱ्यांच्या टोळीवर लक्ष ठेवून होते. 2019 ला संभाजीनगरच्या पुंडलिक नगर भागातूनही शेख समरान या उच्चशिक्षित तरुणाला नोटा बनावट नोटा छापताना पकडलेलं होतं ज्याला 2021 मध्ये जामीन मिळाला होता. पण ससाने हा या धंद्यात चांगलाच मुरलेला होता. त्यामुळे 2023 ला जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हाच त्याने एक मोठा प्लॅन तयार केला होता. अटक केल्यावर पोलिसांनी त्याला संभाजीनगरच्या हरसूल कारागृहात ठेवलं तिथेच त्याची ओळख आकाश बनसोडे आणि मंगेश शिरसाट सोबत झाली. आकाश हा मूळचा संभाजीनगरचाच होता. पेठेनगरच्या नर्स निसर्ग कॉलनीत त्याच घर आहे.
तो 2020 पासून एका हत्तेच्या प्रकरणात कारागृहात बंद होता. पुढे त्याची आणि ससाने उर्फ मेजरची चांगली मैत्री झाली आणि तिथूनच त्यांनी बनावट नोटांचा कारखाना टाकण्याचा प्लॅन बनवला. काही दिवसांनी ससानेला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला पण बनसोडे अजूनही कोठडीत बंद होता म्हणूनच ससानेन त्याला जामीन मिळून देण्यासाठी प्रयत्न केले पुढे काही दिवसात त्यालाही जामीन मिळाला आणि तो हरसूल कारागृहातून बाहेर पडला बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला या दोघांनी प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशात त्याने नोटा छापण्यासाठीची प्रिंटिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यान एक मोठी प्रिंटिंग मशीन खरेदी केली. पण ती कुठे ठेवायची हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला होता. तेव्हा मे महिन्यात त्याला संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीच्या बाजूला तिसगावच्या परिसरात एक आलिशान घर मिळालं त्या घराचा मालक हा दुसऱ्या शहरात राहत होता. त्यामुळे त्याचं या घराकडे येणं जाणं कमी होतं आणि शिवाय हे घर शेतात होतं त्यामुळे तिकडे लोकांची जास्त वर्दही नव्हती. नोटा छापण्यासाठी ही जागा सुरक्षित असल्यामुळे ससानेन हे घर भाड्याने घेतलं आणि तिथेच त्याने नोटा छापायला सुरुवात केली गेल्या तीन महिन्यात त्याने जवळपास कोट्यावधींच्या नोटा त्या घरात छापल्या होत्या जेव्हा पोलिसांनी त्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्यात पोलिसांना 59 लाख ५० हजार रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या आणि अजून दोन कोटी 18 लाख रुपयांच्या नोटा छापण्या इतका कागद आणि शाई त्यांना तिथे आढळून आली होती पोलिसांनी वेळीच ही कारवाई केली नसती तर, या सगळ्या बनावट नोटा मार्केटमध्ये येण्यासाठी वेळ लागला नसता.
एका सिगारेट मुले प्लान कसा उघडकीस आला:
ससानेचा हा सगळा प्लन आधी सांगितलेल्या पानटपरीच्या एका सिगरेट मुळे उघडखस आला 27 जुलैला रविवारी दुपारी कर्जतचा निखिल शिवाजी गांगुर्डे आणि अहिल्यानगर मधील तपोवनचा सोमनाथ माणिक शिंदे हे दोघेजण सिगरेट घेण्यासाठी आंबिलवाडी फाट्यावर टपरीत गेले तिथे त्यांना सिगरेटच्या पाकिटासाठी त्यांनी 500 ची नोट दिली पहिल्यांदा टपरी चालकाने ती नोट ठेवून घेतली आणि नंतर उरलेल पैसे देण्यासाठी ते परत गेले पण थोड्याच वेळात निखिलन पुन्हा एक सिगरेटच पाकीट खरेदी केलं आणि पुन्हा 500 ची नोट त्या टपरी चालकाला दिली यावेळी मात्र त्या चालकाला संशय आला आणि त्याने त्या दोन्ही नोटा व्यवस्थित तपासून पाहिल्या तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या दोन्ही नोटा खोट्या आहेत त्याने लगेच नगर पोलीस ठाण्यात फोन केला आणि घडलेली हकीकत सांगितली पुढे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीतेंनी रविवारीच नगर सोलापूर रोडवर एक सापा रचून निखिल आणि सोमनाथला पकडलं गीतेंनी त्यांच्या गाडीची झडती घेतली तेव्हा त्यांना गाडीत एका प्लास्टिकच्या पिशवीत ५०० रुपयांच्या 160 बनावट नोटा सापडल्या गीतंनी निखिल आणि सोमनाथला ताब्यात घेतला आणि त्यांची चौकशी केली तेव्हा निखिलला सांगितलं की आम्ही ५००० हजार रुपये देऊन बीडच्या संजय प्रदीप कापरे कडून एक लाखाच्या खोट्या नोटा घेतल्या त्यानंतर गीतेंनी आपल्याच पथकासह बीडला कूच केली आणि संदीप कापरेला ताब्यात घेतलं तेव्हा पोलिसांसमोर आणखी दोन नाव समोर आली त्यात एक नाव होतं विनोद अरबत आणि दुसरं अनिल पवार हे दोघेही संभाजीनगरचे राहणार आहेत. त्यांनीच संदीप कापरेला या नोटा दिल्या होत्या त्यानंतर नगर पोलिसांनी संभाजीनगरकडे मोर्चा जो आहे तो वळवला आणि एक एक करत धागे उकलत गेले संभाजीनगर मधून अरबट आणि पवारला अटक केल्यानंतर त्यांना ससाने वाळूजला असल्याचं कळालं लगेच पोलिसांच्या पदकाने वाळूजच्या दिशेने कूच केली तेव्हा ससाने हा वाळूज एमआयडीसीतल्या एका हॉटेलमध्ये जेवण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनी त्या हॉटेलवर छापा टाकला आणि ससानेचा साथीदार आकाश बनसोडे आणि मंगेश शिरसाटला ताब्यात घेतलं पण ससाने तिथे नव्हता. तो बाजूलाच उभ्या केलेल्या रिक्षात बसलेला होता.
त्याने पोलिसांना बनसोड्या ताब्यात घेताना पाहिलं आणि रिक्षातून पळ काढला. पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो फरार होण्यात यशस्वी झाला. पुढे पोलिसांनी बनसोडेच्या मदतीने नोटा छापण्याचा कारखान्याची रस्ता माहिती करून घेतला आणि त्यांना घेऊन ते तासगावच्या त्या कारखान्यावर त्यांनी छापा टाकला तेव्हा नोटा छापण्याच मोठं प्रिंटर कागद शाही आणि कटिंग करायच्या राहिलेल्या ६ लाखांच्या बनावट नोटा असा सगळा 88 लाख २० हजार ७00 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यानंतर पोलिसांनी आकाश बनसोडे मंगेश शिरसाट प्रदीप काकरे निखिल गांगुर्डे आणि सोमनाथ शिंदेला ताब्यात घेतला.
सात जणां विरोधात गुन्हा दाखल केलाय ससानेचा शोध सुरू असल्याच सुद्धा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीतेने सांगितल याशिवाय राहुरी पोलिसांनी मागच्या महिन्यात सोलापूरच्या टेंबुर्णीत बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता ज्यामध्ये काल अटक करण्यात आलेल्या कर्जतच्या निखिल गांगुडेचा सुद्धा सहभाग होता त्यामुळे पोलीस दोन्ही अंगलने सध्या तपास करतायत 2021 पासून हा प्रकार चालू असल्याचं मार्केटमध्ये असल्यानं हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा असण्याची शक्यता आहे त्या शोधण्यासाठीच शहरातील बँकांचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित विषय जो आहे तो त्यांच्यासमोर मांडत असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांनी सांगितलय. जर कुणाला बनावट नोटा आढवून आल्या किंवा कोणी बनावट नोटा देत असल्याचा संशय जरी आला तर तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचा आव्हानही जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. बाकी तुम्हाला या बनावट नोटांबद्दल आणि या प्रकरणाबद्दल जी कारवाई पोलिसांनी केली त्याबद्दल काय वाटतं आणि जर तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या कुणी बनावट नोटा दिल्या किंवा आढळल्या तर त्वरितच तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांना संपर्क तुम्ही नक्का करा.