संभाजीनगरच्या CA बंधूकडून पक्ष्याच्या नावावर ३०० कोटींची करचोरी ?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

सोमवारी 14 जुलै रोजी महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू आणि मध्यप्रदेशातल्या 150 ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. या छापेमारींची व्याप्ती पार आपल्या छत्रपती संभाजीनगर पर्यंत पोहोचली आहे. शहरातील प्रसिद्ध सीए बंधू आसावा ब्रदर्सच्या घरासह कॉलेज कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या.

सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या कारवाईत 70 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पहाटे पाच ते रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 16 तास ही कारवाई सुरू होती. यात पदकाला काही कागदपत्र सापडल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

बघणार आहोत की “असावा ब्रदर्स” नेमके आहेत तरी कोण? त्यांच्यावर कोणत्या संदर्भात कारवाई सुरू आहे:

कारवाईत काय समोर आलंय, छत्रपती संभाजीनगरच्या एन दोन भागात ठाकरेनगर आहे जवळपास 25 वर्षांपूर्वी तिथे दिनेशजी आसावा नावाच्या व्यक्तीची एक साधी किराणा दुकान होती दिनेशजी अगदी साधे आणि सरळ चालणाऱ्या व्यक्तींमध्ये गणले जायचे पुढे 2005 च्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा सोमेश्वर आसावा यांनी सीए ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तो शहरातच प्रॅक्टिस सुद्धा करायला लागला तसच आपल्याप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांनी सीएच व्हावं असा त्याचा निर्धार होता त्यामुळे सोमेश्वरने 2007 घरातच सीए बनण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू केली.

पुढे वर्षभरात सोमेश्वरचे दोन्ही भाऊ शैलेश आणि पवन सुद्धा सीए झाले तिघा भावांनी लग्न सुद्धा केली सीए झालेल्या मुलींसोबतच अशा पद्धतीने त्यांच्या घरात सहा सीए झाले होते. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमेश्वर आणि शैलेश हे शक्यतो क्लायंटचे काम बघायचे तर पवन हा शिकवणीकडे लक्ष द्यायचा अतिशय हालाकीच्या परिस्थितीत उभा राहिलेल्या या कुटुंबाकडे सध्या शेकडो कोटींची ची मालमत्ता आहे.

यांची संपत्ती किती आणि कोठे आहे :

फक्त सिडको भागात त्यांच्या तीन इमारती त्याशिवाय कॉमर्स अकादमी आसावा ब्रदर्स कॉमर्स कॉलेज आणि हरसूल टी पॉईंट भागात दोन कार्यालय आहेत. तर कन्नड तालुक्यात चिखलठाणा येथे सुद्धा त्यांचे कॉमर्स कॉलेज असल्याची माहिती आहे. सोमवारी पहाटे आसावा ब्रदर्सवर आयकर विभागाची धाड पडली.

आसावा ब्रदर्स वर धाड/ कारवाई कश्याप्रकारे केली गेली :

दिल्लीतून आयकर विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी नागपूर विभागाच्या काही अधिकाऱ्यांसह मुंबईत आपलं बसतान टाकलं होतं. ही कारवाई अगदी गोपनीय ठेवण्यात आली होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या सोबतच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याची माहिती लागू दिली नाही. दरम्यान रविवारी रात्री मुंबईहून पदकाने नाशिक मार्गे छत्रपती संभाजीनगरचा रस्ता धरला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास हे शहरात आले आणि त्यांनी आसवा ब्रदर्सच्या घरासह अकादमी महाविद्यालय आणि कार्यालयांवर छापा मारला.

या कारवाईत 70 पेक्षा जास्त कर्मचारी सहभाग असल्याचं सांगण्यात आलंय. ही कारवाई चार दिवस सुरू राहणार असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे आसावा ब्रदर्सवर आरोप करण्यात आले की त्यांनी कर चोरीसह आपल्या क्लायंट्सला कर वाचवण्याच्या पळवाटा दिल्यात स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीए सोमेश्वर असावा याची काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे ते आपल्या क्लायंटचा कर वाचवण्यासाठी पळवाटा देतात सोमेश्वर असावा कळत देशभरातून अनेक क्लायंट्स येतात त्यांचा कर चुकवण्यासाठी तो संबंधित रक्कम ही आपल्या संस्थांना डोनेशन म्हणून देण्यासाठी सांगतो मग त्यातील 20% ही संस्थेला ठेवून संबंधित व्यक्तीला रोखमध्ये पैसे परत करतो असा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय. दिव्य मराठी या वृत्तपत्राने छापलेल्या माहितीनुसार आसाबा ब्रदर्सने युवा भारत आत्मनिर्भर दल या पक्षाच्या नावाने देणग्या मिळवल्या. उद्योजक तसच विविध संस्थांनी त्याच्या संस्थेला देशभरातून कोट्यावधी रुपयांची देणगी दिली आहे.

विविध संस्था उद्योगांच्या देणग्यातून आसवा ब्रदर्सने कलम 80 जीजीसी म्हणजेच राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या देणग्यांमध्ये 100% सूट याचा लाभ घेतल्याचा आरोप आहे. त्यांनी 300 कोटींचा कर चुकवल्याचा दावा करण्यात आलाय. आसावा ब्रदर्स यांच्यावर गेल्या 10 वर्षात पडलेली ही दुसरी धाड आहे. यापूर्वी 2016 सुद्धा आयकर विभागाकडून त्यांच्यावर धाड पडली होती पण वर्तमानात आसावाब्रदर्सवर होणाऱ्या कारवाईची व्याप्ती मोठी असल्याचं सांगण्यात आलय.

तसच या कारवाईत काही महत्त्वाचे कागदपत्र हाती लागल्याची माहिती आहे त्यामुळे आसावा ब्रदर्सच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं देखील बोललं जातय. पण आता या कारवाईचा त्यांच्या सीएच्या व्यवसायावर काही परिणाम होईल का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आसावा ब्रदर्सवर चार्टर्ड अकाउंटंटच्या व्यावसायिक आचार संहितेचा भंग केल्याचा तसेच कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय त्यांची चौकशी ही 1949 च्या चार्टर्ड अकाउंटंट ऍक्टच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या आयसीएआय म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया मार्फत केली जाईल संबंधित प्रकरणात आयसीएआय स्वतः तक्रार नोंदवण्याची शक्यता आहे. त्यानंतर डायरेक्ट डिसिप्लीन हे संबंधित तक्रारीला दोन प्रकारात तपासतील पहिला प्रकार हा कमी गंभीर गुण्यांचा असतो ज्यामध्ये अचूक नोंदी न ठेवणे तसेच वेळेवर अहवाल न देणे असे गुन्हे असतात तर दुसऱ्या प्रकारात गंभीर गुन्हे असतात ज्यात बनावट सर्टिफिकेट्स आर्थिक फसवणूक व्यवसायिक वर्तन भंग असे गुन्हे असतात डायरेक्ट डिसिप्लिन हे गुन्ह्याचा प्रकार ओळखून समिती स्थापन करतील पहिल्या प्रकारासाठी बोर्ड ऑफ डिसिप्लीन निर्णय घेतो तर दुसऱ्या प्रकारासाठी डिसिप्लिनरी कमिटी निर्णय घेते यात सुनोचितपणे सुनावणी आणि

साक्ष घेतली घेतली जाते त्यानंतर निकाल दिला जातो ज्यात दोषी आढळल्यास आपल्या गुन्ह्याच्या प्रकारावर काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी सदस्यत्व निलंबित करण्यात येतं आता पुन्हा आसावा ब्रदर्सवर दहा वर्षात आयकर विभागाचा पडलेला दुसरा छापा आहे. जर त्याशिवाय त्याच्यावर करण्यात आलेले आरोप हे दुसऱ्या प्रकारांमध्ये मोडले असल्याच दिसतय त्यावरून कुठेतरी त्यांच सदस्यत्व कायमस्वरूपी निलंबित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी सोमेश्वर असावा चर्चेत आला होता. त्याने घरासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली असा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता शिवाय त्याला दोन-तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. त्यात आता हे प्रकरण त्यांना कुठे घेऊन जाणार हे तर वेळ आल्यावरच कळेल तोपर्यंत तुम्हाला यावर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *