सोनं चांदीपेक्षा तांबं महागणार?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

सोन आणि चांदी सध्या सगळीकडे चर्चेत असलेले धातू या दोन धातूंनी मागच्या वर्षभरात आजपर्यंतच्या इतिहासातले सगळे रेकॉर्ड मोडले एका वर्षात सोन्याचे भाव जवळपास दुप्पट झालेत तर चांदीचे भाव तब्बल साडेतीन पटींनी वाढलेत जानेवारीमध्ये सोन्यान प्रति तोळा एक लाख 80 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता चांदीचा रेट सुद्धा प्रति किलो चाळीस लाख रुपयापर्यंत गेला होता त्यानंतर हे रेट कमी झाले असले तरी सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये तेजी राहण्याचा अंदाज आहे.

याच दरम्यान आता मार्केटमध्ये एक तिसरा धातू आलाय जो या दोन धातूंच्या वर्चस्वाला टक्कर देणार आहे. यावर्षी फक्त सोनं आणि चांदीच नाही तर या धातूचाही सगळीकडे बुलबाला असेल असं म्हटलं जातय. हा धातू म्हणजे कॉपर अर्थातच तांब. ज्या तांब्याला आजपर्यंत फक्त फॅक्ट्रीचा धातू म्हटलं जायचं तेच तांब आता मार्केटचा नवा किंग ठरणार आहे. इथून पुढे सोन्या चांदीपेक्षा कॉपर जास्त महाग होईल असे दावेही केले जात आहेत. हे दावे नेमके काय आहेत? आता तांब्याची डिमांड एवढी कशी वाढणार आहे? हा धातू खरंच सोन चांदीपेक्षा महाग होऊ शकतो का? जाणून घेऊया…

तांब्याची डिमांड कशी वाढते?

सगळ्यात आधी जगभरात तांब्याची डिमांड कशी वाढते ते बघूया. 2025 मध्ये तांब्याच्या किमतीत 40%्यांनी वाढ झाली. वर्षाच्या शेवटी या धातून आपला आधीचा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला. अनेक तज्ञांच्या म्हणण्यानुसार 2025 मध्ये सोनं आणि चांदीकडे सगळ्यांच लक्ष होतं पण 2026 हे वर्ष कॉपर्स इयर म्हणजेच तांब्याच वर्ष असेल. गुरुवारी 29 जानेवारीला शेअर मार्केटमध्ये नवा रेकॉर्ड झाला. हिंदुस्तान कॉपर्सच्या एका शेअरची व्हॅल्यू 760 रुपयापर्यंत पोहोचली होती. हा नवा रेकॉर्ड आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त 10 महिन्यांपूर्वी या शेअरची व्हॅल्यू 183 रुपये एवढी होती.

गेल्या सहा महिन्यात या शेअरन इन्व्हेस्टर्सना जवळपास तिप्पट रिटर्न दिला आहे. फक्त एका महिन्यात या शेअरची व्हॅल्यू जवळपास 40 टक्क्यांनी वाढली आहे. या ऑल टाईम हाय नंतर कंपनीचे शेअर्स काही प्रमाणात खाली आले मात्र यावर्षी कॉपरच्या मागणीत वाढ कायम राहणार असल्याचं तज्ञांच म्हणण आहे. मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला कॉपरन इंटरनॅशनल मार्केटमध्ये जवळपास 14,500डॉलर प्रति टन आणि भारतात1480 प्रति किलोचा उच्चांक गाठला होता.

नंतर सोन आणि चांदीच्या किंमतींसोबत कॉपरची किंमतही कमी झाली पण येणाऱ्या काळात हा धातू पुन्हा तेजीत येण्याचा अंदाज आहे. 2025 मध्ये जगात शुद्ध तांब्याची मागणी 28 मिलियन मेट्रिक टनापर्यंत पोहोचली होती. अनेक सेक्टर्स मध्ये ही वाढ 25 ते 30 टक्क्यापर्यंत झाली आहे यापैकी सर्वाधिक डिमांड चीन मधून होती. जगाच्या एकूण तांब्याच्या पुरवठ्यापैकी जवळपास 60 टक्के पुरवठा एकट्या चीनमध्ये झाला. याशिवाय भारत आणि अग्नेय आशियातल्या देशांमध्येही मागच्या वर्षात तांब्याच्या मागणीत पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ जागतिक सरासरी पेक्षा जास्त आहे आता हाच ट्रेंड यावर्षीही कायम राहणार आहे.

इथून पुढे तांब्याची डिमांड एवढी का वाढणार?

आता इथून पुढे तांब्याची डिमांड एवढी का वाढणार आहे ते बघूया. तांब्याची डिमांड वाढण्यामागे चार मुख्य कारण आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रिक वेहीकल, ग्रीन एनर्जी आणि डेटा सेंटरच वाढतं नेटवर्क.

या चारही गोष्टींसाठी तांब या धातूची गरज सर्वाधिक आहे. एआय आणि त्यावर आधारित डेटा सेंटर हे तांब्याशिवाय चालूच शकत नाही. सध्या भारतासोबत जगभरात मोठ्या संख्येने एआय डेटा सेंटर्स उभारले जात आहेत. या सगळ्यांमध्ये वायरिंग, ग्रीड आणि कूलिंग सिस्टीम मध्ये तांब्यांचाच वापर होतो. तज्ञांच्या म्हणण्यानुसार भविष्यात एआयच्या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर तांब्याशिवाय पर्याय नाही.

मागच्या तीन वर्षात एआयच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. एआय टेक्नॉलॉजीने जगभरात खळबळ उडवली आहे. इथून पुढे एआय हे जगाच भविष्य असेल हे स्पष्ट आहे. साहजिकच त्यामुळे तांब्याची डिमांड ही जगभरात वाढणार हे नक्की. भविष्यात तांब्याची डिमांड वाढण्यामागे इलेक्ट्रिक वेहीकलचाही रोल मोठा आहे.

एका इव्ही साठी पेट्रोल आणि डिझेलच्या गाडीच्या तुलनेत साडेतीन ते चार पट जास्त तांब लागतं. साधी पेट्रोल वेहीकल बनवण्यासाठी सरासरी 50 पाउंडच्या आसपास तांब्याची गरज असते पण तेच जर आपण इलेक्ट्रिक वेहीकलचा विचार केला तर एका इव्ही साठी सरासरी 180 पाऊंड तांब लागतं. म्हणजेच जर इलेक्ट्रिक वेहीकलच उत्पादन वाढलं तर साहजिकच तांब्याची मागणीही वाढणार तेच आता होताना दिसतय.

एका आकडेवारीनुसार 2025 मध्ये जगभरात विकल्या गेलेल्या चार नव्या कार पैकी एक कार ईव्ही होती. हा आकडा खूप मोठा आहे कारण फक्त काही वर्षांपूर्वी ईव्हीचा वापर अगदी नगण्य होता. जगात सध्या 39 असे देश आहेत जिथे नवीन कारच्या विक्रीमध्ये ईव्हीचा वाटा 10 टक्क्यापेक्षा जास्त आहे. 2019 मध्ये हा आकडा फक्त चार एवढा होता. सिंगापूर आणि विएतनाम मध्ये इव् विक्रीचा वाटा 40 टक्क्यापर्यंत पोहोचलाय हा युके आणि युरोपियन युनियन पेक्षाही जास्त आहे म्हणजेच काय तर जगभरात सगळीकडे इलेक्ट्रिक व्हीकलची डिमांड मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामुळे तांब्याच्या मागणीतही प्रचंड वाढ पाहायला मिळते साहजिकच मागणी वाढल्यामुळे तांब्याच्या किमतीतही वाढ पाहायला मिळते.

तांब्याच्या किमती वाढण्यामागे मोठं कारण?

आता तांब्याच्या किमती वाढण्यामागे या धातूची वाढती मागणी हे एकच कारण नाही तर मागणीच्या तुलनेत कमी होत असलेला सप्लाय हे यामागचं मोठं कारण आहे. रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार 2025 मध्ये तांब्याचा सप्लाय मागणीच्या तुलनेत 1,24,000 टन कमी होता.

आता यावर्षी हा फरक वाढून 1,50,000 टन एवढा होण्याची शक्यता आहे. साहजिकच एखाद्या वस्तूची मागणी जास्त आणि सप्लाय कमी असेल तर त्या वस्तूची किंमत वाढत जाणार हेच तांब्यासोबत होताना दिसतय. पण आता तांब्याची एवढी मागणी असताना त्याचा सप्लाय त्या प्रमाणात का होत नाहीये? ते बघूया. तसं पाहिलं तर इतक्या वर्षांपासून तांब्याची मागणी फक्त बांधकाम आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या क्षेत्रांपुरतीच मर्यादित होती पण मागच्या काही वर्षात एआय आणि इव्हीच्या सेक्टरमध्ये जी क्रांती झाली त्यामुळे तांब्याची मागणी अचानक वाढली पण मागणी वाढली असली तरी तांब्याचे उत्पादन मात्र पूर्वी इतकच होतय त्यामुळे जोपर्यंत नव्या खाणी शोधल्या जात नाहीत किंवा आहे त्या खाणींमधून होत असलेलं तांब्याच प्रोडक्शन वाढत नाही तोपर्यंत तांब्याच सप्लाय वाढणार नाही.

तांब्याचा सप्लाय करणारे टॉप पाच देश कोणते?

जगभरात तांब्याचा सप्लाय करणारे टॉप पाच देश आहेत चिली, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, पेरू, चीन आणि इंडोनेशिया हे पाच देश मिळून तब्बल 140 लाख टनांप पेक्षा जास्त तांब्याच उत्पादन करतात त्यामुळे या देशांमध्ये काहीही झालं तर त्याचा परिणाम जगभरातल्या तांब्याच्या सप्लायवरती होतो. मागच्या वर्षभरात हेच घडल्याचं दिसलय. सप्टेंबर महिन्यात जगातली दुसरी सर्वात मोठी तांब्याची खाण असलेल्या इंडोनेशियाच्या ग्रासबर्ग खाणीत भूस्खलन झालं. तेव्हापासून ही खाण बंद आहे. ती 2027 च्या आधी पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाही. त्याआधी जुलै महिन्यात चिली मधल्या एका तांब्याच्या खाणीत मोठ्या खडकाचा स्पोट झाला. ज्यानंतर खाणीतलं कामकाज थांबलं.

तर मे महिन्यात काँगो मधल्या जगातल्या सर्वात महत्त्वाच्या तांब्याच्या खाणींपैकी एका खाणीत भूकंपामुळे पाणी साचलं. या सर्व अडथळ्यांमुळे जागतिक तांब्याच्या पुरवठ्यावरती मोठा प्रभाव पडलाय. यासोबतच मागच्या काही वर्षांपासून अनेक तांब्याच्या खाणींमधून कमी दर्जाच्या धातूच उत्पादन व्हायला लागलय.

30 वर्षांपूर्वी एक टन मातीत सरासरी 1.2% तांब मिळत होतं. आज हा आकडा 0.6% एवढा खाली आलाय. याचा परिणाम म्हणजे आता खान कामगारांना पूर्वी एवढं तांब काढण्यासाठी दुप्पट खडक खोदावा लागतोय. त्यावर जास्त प्रक्रिया करावी लागते. या सगळ्यांमुळे खर्च वाढतोय. त्यामुळे उत्पादनाचा वेग कमी झालाय आणि तांब्याची किंमतही वाढतीय. गेल्या वर्षी अमेरिकेच्या टॅरीफच्या भीतीमुळेही तांब्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं टॅरीफमुळे अमेरिकन कंपन्यांना घाबरून तांब्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते साठवून ठेवण्याकडे भर दिला. यामुळे या धातूचा बाजारातला पुरवठा कमी झाला आणि किमती वाढल्या.

तांब हा धातू खरंच महाग होऊ शकतो का?

आता या सगळ्याचा परिणाम म्हणून सोन, चांदीपेक्षा तांब हा धातू खरंच महाग होऊ शकतो का? तर निव्वळ मार्केट मधल्या किमतीचा विचार केला तर तांब कधीही सोनं किंवा चांदीला मागे टाकू शकणार नाही. कारण पृथ्वीमध्ये सोनं आणि चांदीच्या तुलनेत तांब्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे सोनं आणि चांदीची पर अंस किंमत तांब्यापेक्षा नेहमीच जास्त असेल. पण तज्ञांच्या म्हणण्यानुसार जर इन्हेस्टमेंटच्या तुलनेत मिळत असलेल्या रिटर्न्सचा विचार केला तर तांब भविष्यात सोनं आणि चांदीला मागे टाकू शकतो. जगभरात सोन्याकडे सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं जातं पण आता इन्वेस्टर सोन्यातून नफा घेऊन तो कॉपरमध्ये गुंतवत आहेत.

आता सोन्यातून चांगले रिटर्न्स मिळण्याची अपेक्षा आहे. चांदीतून चांगले रिटर्न्स मिळतील पण धोकाही जास्त आहे. या तुलनेत कॉपर मधून रिटर्न जास्त मिळतील आणि धोकाही जास्त नाही यामुळे इन्वेस्टर्स आता तांब्याकडे वळत असल्याचं दिसतय. सध्या तरी तांब्याची चर्चा जगभरात व्हायला लागली आहे एआय आणि इव्ही सारख्या सेक्टर्स मधल्या वाढीमुळे तांब्याची डिमांड आणखी वाढणार हे नक्की आहे त्यामुळे आता तांब हा धातू मार्केटचा नवा किंग असेल असं बोललं जातय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *