राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाल आणि दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या पदांवर अखेर राज्य सरकारन महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अजित पवार यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी 31 जानेवारीला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
त्यानंतर आता त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत शासन निर्णयही जाहीर करण्यात आलाय. मात्र या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. बीडच्या पालकमंत्री पदावर सुनीत्रा पवार यांची नियुक्ती होताच धनंजय मुंडे यांचा पुन्हा एकदा गेम झाला अशी चर्चा जनमाणसात रंगू लागली आहे. नेमक हे प्रकरण काय आहे बीडच्या पालकमंत्रीपदाच्या घोषणेनंतर धनंजय मुंडे यांचं नाव पुन्हा का चर्चेत आलय आणि या निर्णयामागं नेमकी कोणती राजकीय गणित आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेयुया…
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याच्या कारभाराची जबाबदारी स्वीकारली. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी राजभवनात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला मात्र हा शपथविधी इतक्या घाईघाईत का झाला असा आरोप करत काही राजकीय नेत्यांकडून टीका करण्यात आली. तर अनेकांनी या निर्णयाच समर्थनही केलं. आता या संपूर्ण घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलय. त्यांनी सांगितलं की पवार कुटुंबाने तिसऱ्याच दिवशी सर्व दशक्रिया विधी पूर्ण केली होती त्यामुळे चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा निर्णय परिस्थिती आणि जबाबदारीची गरज लक्षात घेऊन घेतल्याचही त्यांनी स्पष्ट केलय.
सुनेत्रा पवार यांच्याकडे पालकमंत्रीपद;
दरम्यान आता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच पालकमंत्रीपद सोपवण्यात आला आहे या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रकही जाहीर करून माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अर्थखात वगळता अजित पवारांकडे असलेली सर्व खाती आता सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहेत इतकच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी ही भविष्यात सुनीत्रा पवार यांच्याकडे दिली जाईल असे संकेत प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहेत त्यामुळे सरकार सोबतच पक्षाच्या पातळीवरही सुनेत्रा पवार यांची भूमिका अधिक मजबूत होणार असल्याचं स्पष्ट होतं.
अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सक्रिय होते. तर बीड जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या निधनानंतर हे दोन्ही जिल्हे कोणाकडे जाणार याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर राज्य सरकारन एक अधिकृत परिपत्रक जारी करून या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. सुनेत्र पवार आता पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची आणि प्रशासनाची सूत्र हाती घेणार आहेत. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारने घेतलेले निर्णय हे केवळ रिक्त पदे भरण्यापुरते मर्यादित नाहीत. तर त्यामागे स्पष्ट राजकीय दिशा असते सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतर पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे सोपवण्यात आलं हा निर्णय सहानुभूतीपोटी घेतला गेला असं मानणं चुकीचं ठरेल
प्रत्यक्षात हा निर्णय सत्तेच केंद्रीकरण आणि नियंत्रण स्पष्ट करण्यासाठी आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगते आहे अजित पवार ज्या पद्धतीने सरकार आणि पक्ष चालवत होते तीच लाईन कायम ठेवण्याचा प्रयत्न या नियुक्त्यांमधील दिसतो. म्हणजेच अजित पवार गेले असले तरी त्यांच्या सत्ता केंद्राला धक्का लागू दिला जाणार नाही हा स्पष्ट संदेश यातून दिला जातोय बीड जिल्ह्याच पालकमंत्रीपद हा या संपूर्ण प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतोय मसाजोक प्रकरण संतोष देशमुख हत्या आणि त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा या सगळ्या पार्श्वभूमीमुळे बीड आधीच राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनलेला आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर अनेकांना वाटत होतं की रिक्त झालेल्या पालकमंत्री पदावर धनंजय मुंडेंना संधी मिळेल आणि त्यांचा कमबॅक होईल मात्र सरकारन तो मार्गच बंद केला सुनेत्रा पवार यांच्याकडेच बीडच पालकमंत्रीपद देऊन एक वेगळाच राजकीय संदेश दिला गेलाय बीड सारख्या अस्थिर जिल्ह्यात सध्या कोणताही वादग्रस्त चेहरा पुढे आणायचा नाही हे महायुतीने स्पष्ट केलं सत्ता सांभाळताना जोखीम कमी ठेवणं आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवणं हाच या निर्णयामागचा मुख्य हेतू आहे.
धनंजय मुंडेंच्या राजकीय भविष्याबाबत प्रश्नचिन्ह:
या निर्णयामुळे धनंजय मुंडेंच्या राजकीय भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहतं थेट विरोध नाही पण त्यांचा मार्ग सध्या बंद केला गेलाय असंच चित्र दिसतं त्यामुळेच राजकीय वर्तुळात धनंजय मुंडेंचा गेम झाला का हा प्रश्न चर्चेत आलाय हे एखाद्या व्यक्ती विरोधातल राजकारण नाही तर सध्याच्या परिस्थितीत कोणाला पुढे आणायचं आणि कोणाला थांबवायचं याचा विचार करून घेतलेला निर्णय एकूणच पाहता अजित पवारांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी भावनिक आधारावर नाही तर पूर्णपणे राजकीय गणित मांडून भरली जातात सुनेत्रा पवार यांना केवळ पद नाही तर विश्वास नियंत्रण आणि जबाबदारी दिली जात आहे आणि त्याच प्रक्रियेत काही नेत्यांची वाटचाल थांबते हेच या घडामोडीतून स्पष्ट होतं.
राजकारणात नेतृत्व बदलत चेहरे बदलतात पण सत्तेची दिशा ठरवताना भावना नाही तर गणित महत्त्वाचं ठरतं आणि आत्ताच चित्र नेमकं तेच दाखवतं एकूणच पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने या टप्प्यावर अत्यंत विचारपूर्वक पाऊल टाकलाय धनंजय मुंडेंना संधी न देता सुनेत्र पवार यांना पुढे करत पक्षाने एक सर्वसमावेशक आणि तुलनात्मक दृष्ट्या स्वीकारा चेहरा समोर आणलाय सोबतच मराठा आणि ओबीसी या दोन्ही महत्त्वाच्या सामाजिक घटकांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न या निर्णयामागे स्पष्टपणे दिसतोय आणि त्यामुळेच पक्षान सध्या संतुलन साधणारी भूमिका घेतल्याच चित्र आहे.
सुनेत्रा पवार यांच्या समोर मोठा आव्हानही उभं राहिलाय;
मात्र या निर्णयासोबतच सुनेत्रा पवार यांच्या समोर मोठा आव्हानही उभं राहिलाय अजित पवारांचा राजकीय वारसा केवळ नावापुरता नव्हता तर तो निर्णय क्षमता प्रशासनावर पकड आणि कार्यकर्त्यांशी भेट संवाद यावर आधारलेला होता. तोच वारसा पुढे नेताना सुनेत्र पवार यांना स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागणार आहे पण यासारख्या वेगाने विस्तारत असलेल्या जिल्ह्यातील शहरी प्रश्न विकासाच नियोजन आणि प्रशासनातील समन्वय तर दुसरीकडे बीड सारख्या जिल्ह्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सामाजिक तणाव आणि विश्वास पुनरस्थापना या दोन्ही आघाड्यांवर त्यांना आपलं प्रशासकीय कसब दाखवाव लागणार आहे.
एकाच वेळी दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी मिळणं हे त्यांच्या राजकीय कारकर्दीतील निर्णायक वळण मांडल जात याच टप्प्यावर त्यांची नेतृत्व क्षमता आणि निर्णय क्षमता कसोटीला लागणार आहे.
