भारतीय संस्कृतीत ताकाचे स्थान फार मोठे आहे. प्रत्येकाला वेहवेसे वाटणारे ताक म्हणजे स्वास्थ्य, थंडाव्याचा, उत्तम संगम. घरगुती ताकाचा दर्जा वेगळाच आहे. ताकामुळे आपणास मिळणारे आरोग्य फायदे, ताकासाठी दही निवडताना घ्यायची काळजी, बाजारातील आणि घरगुती ताकाची तुलना, त्वचा व वजनावर धोरणात्मक परिणाम, कोणासाठी ताक उपयुक्त व कोणासाठी नाही आणि ताकाविषयीचे प्रचलित गैरसमज आहेत.
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक शरीरातील घातक पदार्थ मुद्रावटे बाहेर काढून शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. महत्त्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काही न खाल्ल्यास शरीराचे पंचकर्म आपोआप सुधारते. आणि शरीरातील चरबी निघून जाते इतकेच नाहीतर चेहऱ्यावरील काळे डाग जाऊन चेहरा तरतरी करतो तेजस्वी होतो ताकामध्ये विटामिन बी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे घटक असतात ज्यांचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार बरे होतात ताक पिल्यानंतर 90% भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते साधारण माणसाने सुद्धा दररोज ताक पिल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकद प्रचंड प्रमाणात वाढते.
ताकासाठी दही कसं निवडावं?
ताक करण्यासाठी गरज असते ती ताज्या, नैसर्गिक, हलक्या आंबट दह्याची! घरात बांधलेलं, एकसंध, थोडंसं आंबट असलेलं ताजं दही हे सर्वोत्तम मानलं जातं, कारण त्यात लैक्टिक अॅसिड बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात असतात. हे सूक्ष्मजीव शक्तिशाली प्रोबायोटिक्स म्हणून पचनसंस्थेला मदत करतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. आतड्यांचं आरोग्य राखतात. बाजारातील आकर्षक दिसणारं, जाडसर, अत्यंत शुभ्र किंवा कृत्रिम रंग व टिकवणारे पदार्थ असलेलं दही ताकासाठी वापरू नये. ताकासाठी फक्त ताजं, नैसर्गिक दहीच योग्य आहे. खूप जुने किंवा जास्त आंबट दही किंवा दह्यात गंध आला असेल तर ते ताकासाठी टाळावे, कारण त्याने ताकाची चव खराब होते आणि पचनावरही परिणाम होऊ शकतो.
ताक बनवण्याची योग्य पद्धत:
ताक बनवण्याची पद्धत जितकी सोपी तितकी परिणामकारक आहे. एक वाटी ताज्या दह्यात दोन ते तीन वाट्या थंड, उकळून पुन्हा थंड केलेलं पाणी घाला. हे मिश्रण घुसळा जेणेकरून यात गुठळ्या राहू नयेत. ताक शक्यतो साधं असावं. कोणतीही फोडणी, मसाले, जिरे, मीठ, आलं किंवा साखर घालू नये. फक्त दही आणि पाण्याचा हा संयोग नैसर्गिक स्वाद आणि पोषक घटक टिकवतो. अशा ताकात नैसर्गिक सूक्ष्मजीव जास्त प्रमाणात सक्रिय राहतात आणि त्याचे स्वास्थ्यदायी फायदे अधिक मिळतात.

ताक कोणी पिऊ नये?
ज्यांना दूध, दही किंवा ताक यातील लैक्टोज पचत नाही (लैक्टोज इन्टॉलरन्स), त्यांनी ताक घेऊ नये किंवा अगदी मर्यादित घ्यावे. अशा लोकांना ताक घेतल्यानंतर पोट दुखणे, फुगणे किंवा जुलाब अशी लक्षणं जाणवू शकतात. याशिवाय, सतत सर्दी, जुलाब, अतिसार अथवा पचनाचा गंभीर त्रास असणाऱ्यांनी किंवा काही गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ताक प्यावे. लहान बाळांना किंवा नाजूक प्रकृतीच्या वृद्ध
ताकाचे फायदे:
ताकात प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, जीवनसत्त्व बी असे महत्त्वाचे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ताक पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहे.
ताकातील प्रोबायोटिक्समुळे आतड्यातील चांगल्या जिवाणूंची वाढ होते आणि त्यामुळे अपचन, गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता अशा तक्रारी कमी होतात. ताक हे सहज पचण्याजोगं असते. ताक त्वचेसाठी लाभदायक आहे. नैसर्गिक डीटॉक्सिफायर म्हणून ताक कार्य करतं. शरीरातील अनावश्यक विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत करतं.
ताकाच्या नियमित सेवनामुळे त्वचा मऊ, उजळ, निरोगी तजेलदार राहते. ताकातील लैक्टिक अॅसिडमुळे त्वचेच्या मृत पेशी दूर होतात आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो. ताक केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, त्यामुळं केसांना पोषण आणि बळकटी मिळते.
- शरीरातील उष्णता कमी होते.
- ताकाच्या सेवनाने पोट साफ होते व पचनशक्ती सुधारते.
- पिण्यामुळे त्वचेवरील ट्रेडिंगचे डाग, काळे डाग, पिंपल्सचे ब्रश आणि काळसरपणा कमी होते.
- त्यांना झटपट वजन कमी करायचं आहे त्यांनी ताकाचा समावेश जरूर करावा वजन कमी होते.
- ताकामध्ये भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे हाडे व दात मजबूत होतात.
- तोंड आले असल्यास ताकाचा गुळण्या किंवा दह्याचे पाणी पिल्यास बरे होते.
- ताक धने पावडर टाकून प्यायला छातीतील जळजळ कमी होते.
- कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज एक ग्लास ताक फायदेशीर ठरेल.
- रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत होते कमी होते.
- ताकामध्ये जिरे मिरी पावडर व सैंधव मीठ टाकल्याने अन्नपचन चांगले होते.
- ताकामध्ये अनेक जीवनसत्वे असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषक तत्व देतात पोट जड होणे या समस्येवर ताक अधिक फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी ताक प्रभावी आहे.
यामध्ये अतिशय कमी कॅलरी, चरबी असते, ज्यामुळे वजन वाढत नाही. ताक प्यायल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं; पण शरीरावर अतिरिक्त भार येत नाही. ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे, त्यांनी साखरेचे किंवा केमिकलयुक्त पेय टाळून साधं ताक निवडावं.
वजन कमी करण्यासाठी ताक कसे प्यावे:
किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ते नेमकं कसं घ्यावं किंवा कोणत्या वेळी घ्यावं त्याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे याबाबत तुम्ही या चार टिप्स जर फॉलो केल्या तर नक्की वजन कमी होण्यास मदत होईल.
- कन्सिस्टन्सी कशी असावी एक मोठा ग्लास ताक घेणार असाल त्यामध्ये एक ते दीड चमचा दही आणि बाकी सगळं पाणी असायला पाहिजे.
- ताक आंबट आणि थंड नसावं रोजच्या रोज ताज लावून घ्या.
- बाहेरच जर ताक आणणार असाल किंवा टेट्रापॅड जर आणणार असाल तर खात्री करून घ्या की त्यामध्ये एक्स्ट्रा साखर ऍड केलेली नाहीये.
- यामध्ये तुम्ही सेंधव मीठ जिरेपूड कोथिंबीर पुदिना यासारखे पदार्थ घालून घेऊ शकतात एक्स्ट्रा साखर किंवा बाकी काहीही घालायची गरज नाही.
ताक पिऊन तुमचं वजन कमी करू शकता काय करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही दुपारचं जेवण घेता किंवा सकाळचा नाश्ता घेता त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्हाला काय करायचं आहे ताकाचा वापर तुमच्या जेवणामध्ये नाश्त्यामध्ये करायचा आहे मग ऑटोमॅटिकली तुमचा नाश्ता जर तुम्ही एक प्लेट पोहे खात असाल तर ऑटोमॅटिकली तुमचे अर्धा प्लेटच पोहे तुम्ही खाल कारण ताकामुळे तुमचं पोट आहे ते भरलं जातं आणि त्याच्यामुळे आपले जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते कमी घेतले जातात दुपारच्या जेवणात देखील तुम्हाला एक ग्लास ताक घ्यायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही दोन चपात्या खात असाल तर एकाच चपाती वरती तुम्ही बास कराल आणि हे तुम्ही करून बघा करून बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की खरंच ही ट्रिक आहे ती वर्क करते.
पावसात ताक का प्यावे..
पावसाळ्यामध्ये पचन बिघडतं पोट फुगतो आणि आजारांची शक्यता वाढते पण यावर एक सोपा घरगुती आणि सायंटिफिक उपाय आहेत ताक की जे ताज्या दह्यापासून बनवलेला असेल ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात म्हणजे जिवंत सूक्ष्मजीव आपल्या आतड्यांमधील गुड फॅक्टरीयास वाढवतात हे बॅक्टेरिया पचन तर सुधारतातच शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात आणि शरीरातील अपायकारक वाद कमी करतात त्यामुळे दररोज जेवणानंतर एक ग्लास ताक घ्या त्यात जिरे थोडी लसणाची फोडणी तुम्ही घालू शकता. हे शरीराला थंडावा देतो पाचन संतुलन ठेवतो आणि आजार दूर ठेवतो त्यामुळे पावसाळ्यातील या समस्येसाठी गोळ्या खाण्यापेक्षा नैसर्गिक आणि शक्ती वर्ग ताक पिणे आहे.
बाजारातील आणि घरगुती ताक?
काही कंपन्यांचे तयार ताक बाजारात सहज मिळते. पण या ताकामध्ये चव, स्वरूप टिकवण्यासाठी प्रिझव्हेंटिव्स, कृत्रिम रंग, अधिक मीठ किंवा साखर असे पदार्थ असू शकतात.
नैसर्गिक प्रोबायोटिक्सचे प्रमाणही या ताकात कमी असू शकते. म्हणून, पौष्टिकतेच्या दृष्टीने घरी ताज्या दह्यापासून बनवलेलं ताक जेवढं पौष्टिक आहे. स्वतः तयार केलेल्या ताकात नैसर्गिक प्रोबायोटिक्स, पचनासाठी आवश्यक घटक, कॅल्शियम आणि प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात, शिवाय ते पूर्णपणे शुद्ध व सुरक्षित असतं.
बाजारातील तयार ताक वेळेवर सोयीचं असू शकतं; पण दैनंदिन आरोग्यासाठी घरगुती, ताजं साधे ताक अधिक चांगलं ठरतं.
प्रचलित गैरसमज
ताकाबद्दल अनेक गैरसमज आहेत. काहींना वाटतं ताक फक्त उन्हाळ्यात किंवा पोट बिघडलं असता प्यावं; पण प्रत्यक्षात ताक वर्षभर योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्यास लाभदायक असतं. ताकात मीठ, मसाले, साखर घातल्याशिवाय किंवा ताक फोडणीशिवाय स्वादिष्ट, उपयोगी नाही, प्रत्यक्षात नैसर्गिक, केवळ दही आणि पाण्यातून बनवलेलं ताक हेच सर्वोत्तम आहे. ताक आजारी, गरीब, सर्वांच्या आरोग्याचा योग्य साथी आहे.
ताकाच्या दैनंदिन सेवनामुळे पचनक्रिया सुधारते, त्वचा निरोगी राहते, वजन नियंत्रणात येते. शारीरिक स्वास्थ्य जपलं जातं. आपल्या प्रकृतीनुसार व वैद्यकीय सल्ल्यानुसार ताक सेवन करावं. हेच आरोग्याच्या जपणुकीसाठी आवश्यक आहे.