लाडकी बहिण योजनेचे मिळणार १५०० ऐवजी २१०० रुपये…!
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळत आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्याने राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे सुद्धा जमा…