भारतीय मुलांना लहान वयातच मोबाइल स्क्रीनचे व्यसन.. वाढताहेत मानसिक आणि शारीरिक समस्या..!
अलीकडील एका अभ्यासानुसार, भारतातील पाच वर्षांखालील बालकांचा दररोजचा स्क्रीन टाईम सरासरी २.२ तास असल्याचे आढळून आले आहे. हा स्क्रीन टाईम सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ‘क्युरस’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात एम्स, रायपूर येथील डॉ. आशिष खोब्रागडे आणि डॉ. एम. स्वाथी शेनॉय यांनी…