तलाठी भरती 2026 पदवीधर साठी सुवर्णसंधी..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

एक महत्वाचा अपडेट, आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरतीला लवकरच सुरवात होणार आहे. राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठी पदांची हजारो पदे रिक्त आहे. तर हि तलाठी भरती प्रक्रिया, फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरु होणार आहे. आणि या भरती मध्ये राज्यात तलाठ्यांची १ हजार ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या परीक्षा आणि इतर महत्त्वाच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. हि तलाठी भरती म्हणजे पदवीधर उमेदवारानां नोकरीची एक मोठी संधी मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल. तसेच प्रश्नांचा दर्जा सुद्धा १२ वी परीक्षेचा समतुल्य असतो. म्हणजे सोपेच प्रश्न या नंतर निवड याद्या जाहीर होतील. म्हणजे या भरतीची प्रक्रिया सुद्धा एकदम सोपी आहे.

तलाठी पद म्हणजे काय?
तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी हा महसूल विभागातील सरकारी पद आहे. तलाठीचे मुख्य काम गावच्या महसूल रेकॉर्डचा देखभाल करणे, जमिनीशी संबंधित नोंदी, कागदपत्रे तयार करणे आणि महसूल गोळा करणे असते. तलाठी सामान्यतः गावातील नागरिकांना महसूल सेवा प्रदान करतो.
🔹 महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातून तलाठी भरती 2026 लवकरच सुरू होणार आहे.
🔹 राज्यात हजारो पदे भरली जाणार आहेत (सुमारे 1700+ पदे अंदाजे).
🔹 आवेदन प्रोसेस ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

तलाठी भरती २०२६: प्रमुख माहिती
पदाचे नाव: तलाठी (गट-क)
संभाव्य रिक्त पदे: १७०० पेक्षा जास्त
परीक्षा पद्धत: ऑनलाइन (Computer Based Test – TCS द्वारे)
एकूण प्रश्न: १०० (प्रत्येकी २ गुण)
एकूण गुण: २००
परीक्षा कालावधी: १२० मिनिटे (२ तास)
नकारात्मक गुण (Negative Marking): नाही


शैक्षणिक पात्रता & कागदपत्रे
उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
मराठी भाषा ज्ञान अनिवार्य.
MSCIT / कंप्युटर बेसिक कोर्स (किंवा नियुक्तीनंतर २ वर्षात घेणे) आवश्यक असू शकते.


🔹 अन्य प्रमाणपत्रे:
 • आधार कार्ड / ओळख
 • महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
 • पदवीचे प्रमाणपत्र
 • फोटो इत्यादी.


वयोमर्यादा:
🔹 खुला प्रवर्ग (General): 18 ते 38 वर्षे
🔹 आरक्षित वर्ग: शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत (उदा. SC/ST/OBC).

अभ्यासक्रम:
सामान्यतः तलाठी परीक्षेत खालील विषय येतात (मराठी विषयाची पातळी साधारण 12 वी प्रमाणे असते.)
मराठी भाषा – भाषा ज्ञान, व्याकरण
इंग्रजी भाषा – सामान्य ज्ञान (GK)
गणित / बुद्धिमत्ता (Aptitude)

पगार:
तलाठी पदासाठी बेसिक वेतन साधारण ₹25,500 ते ₹81,100/- पर्यंत असू शकते, भत्ते आणि सेवा लाभांसह.

अर्ज प्रक्रिया:

  • महाराष्ट्र महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट उघडा – mahabhumi.gov.in.
  • “तलाठी भरती 2026” किंवा “Apply Online” लिंक शोधा.
  • अर्ज फॉर्म भरताना वैयक्तिक, शैक्षणिक माहिती द्या.
  • आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा व सबमिट करा.
  • अर्जाची प्रिंट सेव्ह / जतन करा.

राज्यात लवकरच १७०० तलाठ्यांची भरती होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून, या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठ्यांची ही पदे भरली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *